संजय गांधी निराधार योजनेचे 1500 रु आले का नाही ते मोबाईल द्वारे चेक करा | Sanjay Gandhi Yojana Status Check Online
नमस्कार मित्रांनो, आज आपण संजय गांधी निराधार योजनेचे 1500 रुपये आले का नाही ते मोबाईल द्वारे कसे चेक करायचे? या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना ही महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागा मार्फत राबवली जाणारी एक अतिशय महत्वाची योजना आहे. ही योजना मुख्यत्वे करून निराधार, आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि गरजू व्यक्तींना मासिक आर्थिक मदत पुरविण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा ठराविक रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाते.
मित्रांनो, खरंतर आजच्या डिजिटल युगात नागरिकांना घरबसल्या त्यांच्या मोबाईल फोन द्वारे शासकीय योजनांशी संबंधित माहिती मिळवता येते. त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेचे 1500 रुपये जमा झाले आहेत की नाही, हे तपासणे देखील अगदी सोपं आणि सुलभ झालं आहे. पण अनेक लाभार्थ्यांना याबाबतची अचूक माहिती नसते किंवा मोबाईल द्वारे तपासणीची प्रक्रिया कशी करायची याची माहिती असतेच असे नाही. त्यामुळे या लेखामध्ये आपण संजय गांधी निराधार योजनेचे 1500 रुपये आले का नाही ते मोबाईल द्वारे कसे चेक करायचे? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
संजय गांधी निराधार योजना पैसे आले का नाही?
स्टेप 1:- मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला https://sas.mahait.org/ या वेबसाईट वर जायचं आहे. नंतर वेबसाईट च्या होम पेज वर थोडं खाली आल्यावर ‘लाभार्थी स्थिती’ असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे.

स्टेप 2:- त्या नंतर Search by मध्ये आधार चा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे व त्या खाली तुमचा आधार नंबर टाकायचा आहे व दिलेला कॅपचा टाकून Get Mobile OTP या बटन वर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर तुमच्या आधारला रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी पाठवला जाईल, तो ओटीपी दिलेल्या जागी टाकायचा आहे. मित्रांनो, जर ओटीपी येत नसेल तर तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालेलं नाही किंवा योजना ऑनलाईन झालेली नाही. त्यासाठी तुम्हाला तहसील ऑफिस मध्ये जाऊन योजना ऑनलाईन करून घ्यावी लागेल, तरच इथे तुम्हाला ओटीपी येईल, व तुम्ही इथे माहिती पाहू शकाल.

स्टेप 3:- तर मित्रांनो, तुम्हाला ओटीपी आला असेल तर तो टाकून Get Data बटन वर क्लिक करायचं आहे.

स्टेप 4:- आता नेक्स्ट पेज वर वरती तीन डॉट दिसतील त्यावर क्लिक करून Desktop Site या ऑन करायची आहे. आलेल्या विंडो मध्ये कॅन्सल करून नंतर तुम्हाला तुमची पूर्ण माहिती आलेली दिसेल. यात तुमचं नाव, राज्य, कुठे राहता, आधार नंबर, पत्ता, तसेच तुम्हाला कोणत्या स्कीमचा लाभ भेटतो, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसेल.

स्टेप 5:- आता या नंतर खाली तुम्हाला Financial year असा ऑप्शन दिसेल तिथे तुम्ही 24-25 किंवा 25-26 असे ऑप्शन दिसतील, तुम्ही कोणतंही एक वर्ष सिलेक्ट करू शकता व search बटन वर क्लिक करायचे आहे. त्या नंतर तुम्ही निवडलेल्या वर्षाचं पेमेंट स्टेटस काय आहे, ते पाहू शकता. ते जर सक्सेस असेल तर याच अर्थ तुमचं पेमेंट झालेलं आहे. तसेच पेमेंट कधी झालं, कोणत्या बँकेत झालं, किती रक्कम जमा झाली वगैरे सर्व माहिती इथे बघायला मिळेल. आणि जर पेमेंट failed दाखवत असेल तर त्याचं कारणही इथे दाखवलं जाईल.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण संजय गांधी निराधार योजनेचे 1500 रुपये आले का नाही ते मोबाईल द्वारे कसे चेक करायचे? या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवादl
Tags: sanjay gandhi yojana status check online, sharvan bal yojana status check online, sanjay gandhi niradhar yojana status check online maharashtra, sharvan bal yojana status check maharashtra, sanjay gandhi status check, sharvan bal status check, maharashtra yojana status check online