सँडविच मेकर बद्दल महत्वाची माहिती आणि खरेदी टिप्स | Best Sandwich Maker 2022
घरच्या घरीच हॉटेल सारखे टेस्टी आणि ग्रील्ड सॅंडविच बनवायचे आहे का ? आणि तेही काही मिनिटात ! असे सॅंडविच बनवण्यसाठी तुमच्याकडे चांगले सँडविच मेकर असायला हवे. आम्ही तुमच्यासाठी उत्तम दर्जाचे 5 सँडविच मेकर (Sandwich Maker) घेऊन आलो आहोत. सविस्तर माहितीसाठी पूर्ण लेख वाचा.
मित्रांनो, सकाळी सकाळी झटपट होणारा नाश्ता म्हणजे सँडविच. सँडविच म्हणजे काय तर भाज्या, चिरलेले चीज ,किंवा इतर कोणताही तुम्हाला आवडणारा पदार्थ ब्रेडच्या दोन्ही स्लाइस मध्ये ठेवून त्याला टोमॅटो सॉस किंचा चटणी लावून गरम करणे. खरंतर सँडविच हा बऱ्याच जणांचा आवडता पदार्थ आहे. आणि ते जगभरात खूप प्रसिद्ध आहे. बरेच जण जेवण म्हणून सँडविच लाच पसंती देतात.
असे म्हणतात की सँडविचला १८ व्या शतकापासून खाल्ले जात आहे. पूर्वीच्या काळी रात्री जुगार खेळताना किंवा मद्यपान करताना पुरुष मंडळी सँडविच खात असे. पण आता तर सँडविच हे सभ्य समाजातील उच्चभ्रू लोकांचे जेवण बनले आहे. थोडक्यात काय तर सँडविच आता जगभरात खूपच प्रसिद्ध झालेला एक पदार्थ आहे.
मित्रांनो, सँडविच खायला जेवढे सोपे जाते तेवढेच त्याला बनवायला मात्र खूप वेळ जातो. पण आता बाजारात वेग वेगळ्या कंपनी चे सँडविच मेकर उपलब्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला काही सर्वात चांगले सँडविच मेकर बद्दल माहिती सांगणार आहोत. तुम्ही पण जर सँडविच मेकर खरेदी करणार असाल तर ही माहिती तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. त्यामुळे शेवट पर्यंत नक्की वाचा.
सर्वात चांगले सँडविच मेकर (Sandwich Maker)
1) प्रेस्टीज सँडविच मेकर (Prestige) | Amazon वर बघा |
2) हावेल्स सँडविच मेकर (Havells) | Amazon वर बघा |
3) केंट सँडविच मेकर (Kent Sandwich Maker) | Amazon वर बघा |
4) आई बेल सँडविच मेकर ( Ibell Sandwich Maker) | Amazon वर बघा |
5) बोरोसिल सँडविच मेकर (Borosil Sandwich Maker) | Amazon वर बघा |
सँडविच मेकर खरेदी करताना कोणत्या गोष्टी तपासून पहाव्यात
मित्रांनो, सँडविच मेकर हे स्वयंपाक घरातील एक महत्त्वाचे उपकरण बनले आहे. कारण यामध्ये खूप जलद गतीने सँडविच बनवले जाते. पण सँडविच मेकर खरेदी करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी तपासून घ्याव्या हे बरेच जणांना माहीत नसते. चला तर मग जाणून घेऊ या.
- सँडविच मेकर चा आकार – तुमच्या घरातील सदस्यांची संख्या व तुम्ही एका वेळी किती सँडविच बनवणार आहात, या दोन गोष्टी लक्षात घेऊन मगच सँडविच मेकर कोणत्या आकाराचा घ्यावा ते ठरवावे. याशिवाय सँडविच मेकर शक्यतो कॉम्पॅक्ट आकाराचा व जास्त जागा न घेणारा असावा.
- कार्यक्षमता – सँडविच मेकर ची कार्यक्षमता तपासून बघणे खूप महत्वाचे आहे. कारण जर तुम्ही डबल किंवा ट्रिपल लेयर सँडविच बनवत असाल तर तुमचे सँडविच मेकर तेवढ्या कॅपॅसिटी चे आहे का ते तपासून बघा.
- सँडविच मेकरची बॉडी – मित्रांनो, सँडविच मेकर ची बॉडी मजबूत व टिकाऊ असावी. तसेच स्वच्छ करायला ही सोपे असावी. शक्यतो टेफ्लॉन कोटिंग असलेले सँडविच मेकर चांगले व दीर्घकाळ टिकणारे असतात.
- किंमत – सँडविच मेकरची किंमत ही तुमच्या बजेट मध्ये बसणारी असावी. त्यासाठी तुम्हाला अनेक ठिकाणी सर्च करून बघावे लागेल.
- नॉन स्टिक – तुम्ही खरेदी करत असणारे सँडविच मेकर नॉन स्टिक आहे की नाही ते तपासून घ्या. कारण सँडविच बनवताना किंवा ते बाहेर काढताना त्याला आतून चिकटू नये. म्हणून सँडविच मेकर नॉन स्टिक असणे खूप आवश्यक आहे.
- हिटिंग सिस्टीम – तुमच्या सँडविच मेकर मध्ये वेग-वेगळे हिटिंग मोड असायला हवे. जेणेकरून तुम्ही हवे तेवढे टेम्परेचर सेट करून ब्रेड टोस्ट किंवा ब्राउनिंग करू शकता.
- हँडल्स – सँडविच मेकर चे हँडल शक्यतो स्टेनलेस स्टील चे बनलेले असावे. कारण ते तुटत नाहीत व दीर्घकाळ टिकतात.
- उष्णता प्रतिरोधक हँडल – तुमच्या सँडविच मेकरचे हँडल हे शक्यतो हिट रेसिस्टंट असावे. त्यामुळे तुम्हाला चटका बसणार नाही.
- पॅनल लॅच – तुमच्या सँडविच मेकरला पॅनल लॅच असणे गरजेचे आहे. हे एक प्रकारचे लॉक असते. ज्यामुळे सँडविच बनताना मध्येच ते उघडत नाही.
सर्वात चांगले सँडविच मेकर
Best Sandwich Maker
आता भारतातील सर्वात चांगले सँडविच मेकर कोण कोणते आहेत व त्यांची वैशिष्ट्ये व खासियत काय आहे ते जाणून घेऊ या.
प्रेस्टीज सँडविच मेकर (Prestige Sandwich Maker)
Prestige Sandwich Maker PGMFD 800 W
मित्रांनो, प्रेस्टीज चे सँडविच मेकर तुम्हाला अंदाजे 1300 रुपये पर्यंत मिळू शकते. या प्राइझ रेंज मध्ये तुम्हाला प्रेस्टीज चे सहा मॉडेल्स मिळतात. त्यांची नावे आहेत..
- PG MF B 800 W
- PG MF S 800 W
- PS MF B 800 W
- PS MF S 800 W
- PG MF D 800 W
- PS MF D 800 W
हे सगळे सँडविच मेकर 800 वॅटचे आहेत. यात G म्हणजे ते ग्रिल सँडविच मेकर आहे. आणि जिथे S लिहिले आहे ते सँडविच प्लेट मेकर आहे. म्हणजे या मध्ये कट वाला सँडविच बनतो.
या सगळ्यांमध्ये सर्वात चांगले मॉडेल हे PG MF D 800 वॅट आहे. नावाप्रमाणेच हे सँडविच मेकर 800 वॅट चे असून ते खूप ड्युरेबल आहे. यात तुम्हाला ग्रिल प्लेट्स मिळतात. या हिटिंग प्लेट्स वर जर्मन टेक्नॉलॉजी चे ग्राब्लॉन नॉन स्टिक कोटिंग केलेली आहे. या कोटिंगमुळे सँडविच करताना कमीत कमी तेल किंवा बटर लागते. या सँडविच मेकर मध्ये तुम्हाला लीप लॉक मिळते ज्यामुळे सँडविच मेकर मध्ये मध्ये उघडत नाही. तसेच यात तुम्हाला दोन पॉवर लाईट हिटिंग इंडिकेटर बटन दिले आहे. रेड आणि ग्रीन. रेड बटन लागले म्हणजे तुमचे सँडविच मेकर प्री हिट होत आहे. आणि ग्रीन बटन लागले की आता तुम्ही त्यात सँडविच बेक करण्यासाठी ठेवू शकता. या
सँडविच मेकर ची बॉडी ही हिट रेझिस्टंट आहे. त्यामुळे हँडल गरम होऊन चटका वगैरे बसणार नाही. याची कॉर्ड ची लांबी ही 1.5 मी देण्यात आली आहे. या सँडविच मेकरमध्ये तुम्ही आयर्न किंवा स्टील ची भांडी वापरू शकता नाही. कारण त्यामुळे प्लेट्स ला स्क्राचेस पडू शकतात. व कोटिंग खराब होऊ शकते. प्लेट्स नॉन स्टिक असल्याने खूपच कमी तेल लागते. या मॉडेल चे वजन अंदाजे 1.32 kg आहे. तसेच या प्रोडक्ट वर तुम्हाला एक वर्षाची वॉरंटी मिळते. या सर्व फीचर्स मुळे हे सँडविच मेकर अतिशय स्वच्छ, टिकाऊ आणि वापरण्यास सोपे आहे.
हावेल्स सँडविच मेकर (Havells Sandwich Maker)
Havells Perfect Fill Plus 800 watt Grill Sandwich Maker
मित्रांनो, हे सँडविच मेकर 800 वॅट चे असून या प्रॉडक्ट वर तुम्हाला दोन वर्षांची वॉरंटी मिळते. या सँडविच मेकरमध्ये तुम्हाला ग्रील प्लेट्स मिळतात जे नॉन स्टिक कोटींग चे बनलेले आहेत. या प्रॉडक्ट मध्ये पूर्ण बॉडी हीट रेझिस्टंट आहे. येथे कुठल्याही प्रकारचा चटका बसण्याची शक्यता नाही. तसेच सॅंडविच तयार होताना त्याचे हँडल उघडू नये म्हणून लॉक सिस्टीम देण्यात आली आहे. या शिवाय यात ही तुम्हाला लाईट इंडिकेटर दिले गेले आहेत. याची कमीत कमी किंमत ही अंदाजे 1500 ते 2000 रुपये पर्यंत असू शकते. या सँडविच मेकर ची डिझाइन सुद्धा खूप आकर्षक आहे.
फक्त याची कॉर्ड ची लांबी जर कमी आहे. या सँडविच मेकर मध्ये तुम्ही एक वेळी दोन सँडविच बनवू शकता. हावेल्स चे हे प्रोडक्ट अतिशय टिकाऊ आहे.
केंट सँडविच मेकर (Kent Sandwich Maker)
KENT Sandwich Grill 700W with Non-Toxic Ceramic Coating
मित्रांनो, केंट चे हे सँडविच मेकर दिसायला खुपच आकर्षक व स्टायलिश आहे. तसेच हे सँडविच मेकर 700 वॅट चे आहे. यात असलेल्या ग्रील प्लेट्स या सिरॅमिक नॉन टॉक्सिक कोटिंगच्या बनलेल्या आहेत. हे सँडविच मस्कर पूर्ण 180° मध्ये ओपन होते. तसेच या प्रोडक्ट ची किंमत तुम्हाला अंदाजे 1700 रुपये पर्यंत भेटू शकते. या सँडविच मेकर मध्ये सुद्धा इतर सँडविच मेकर प्रमाणे हँडल लॉक सिस्टीम देण्यात आली आहे. तसेच पॉवर लाईट इंडिकेटर सुद्धा आहेत. याला स्वच्छ करणे ही खूप सोपे आहे.
तसेच या मध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक टेम्परेचर कट ऑफ फिचर सुद्धा देण्यात आले आहे. यामध्ये तुमच्या सँडविच मधल्या फिलिंग प्रमाणे सँडविच मेकर ऍडजस्ट होते. व भरपूर स्पेस देते. यात फक्त सँडविच मेकर ची कॉर्ड लेन्थ थोडी छोटी आहे. बाकी या प्रोडक्ट मध्ये नाव ठेवण्यासारख काहीच नाही.
हावेल्स सँडविच मेकर (Havells Sandwich Maker)
Havells Big Fill 900-Watt 2 Slice Sandwich Maker
मित्रांनो, हावेल्स चे हे सँडविच मेकर 900 वॅट चे आहे. जर खूप चांगला परफॉर्मन्स देते, तसेच डिझाइन ने ही हे सँडविच मेकर खूप चांगले आहे. या सँडविच मेकर मध्ये तुम्हाला दोन प्रकारच्या प्लेट्स मिळतात. ग्रिल प्लेट्स आणि पॉकेट सँडविच प्लेट्स. पण या दोघापैकी ग्रिल प्लेट्स चे सँडविच मेकर जास्त प्रचलित आहे. या सँडविच मेकर मध्ये तुम्ही टोस्टिंग सोबत ग्रिल पण करू शकता. या सँडविच मेकर चे प्लेट्स नॉन स्टिक कोटिंग चे बनलेले आहेत. जे खूप कमी तेलात सँडविच बनवतात. तसेच स्वच्छ करायला खूप सोपे आहे. या सँडविच मेकर ची बिल्ड क्वालिटी पण खूप चांगली आहे. या सँडविच मेकर मध्ये पण तुम्हाला हँडल लीक सिस्टीम मिळते. तसेच या मध्ये ही पॉवर इंडिकेटर लाइट्स दिले गेले आहेत. या सँडविच मेकर मध्ये तुम्ही एक वेळेला दोन मोठे साईझ चे सँडविच बनवू शकता. यात फक्त तुम्हाला कॉर्ड लेंथ थोडी कमी मिळेल. या प्रोडक्ट वर तुम्हाला एक वर्षांची वॉरंटी मिळते. तसेच याची किंमत अंदाजे 2000 रुपये पर्यंत किंवा त्याच्या आसपास असू शकते.
आई बेल सँडविच मेकर ( Ibell Sandwich Maker)
iBELL SM301 3-in-1 Sandwich Maker with Detachable Plates 750 Watt
मित्रांनो, हे सँडविच मेकर 3 इन 1 आहे. म्हणजेच यामध्ये तीन प्लेट्स दिल्या आहेत ज्या removable आहेत. तसेच हे सँडविच मेकर 750 वॅट चे आहे. तसेच या सँडविच मेकर मध्ये दिलेल्या प्लेट्स या नॉन स्टिक कोटींगच्या बनलेल्या आहेत. यात ही तुम्हाला दोन पावर इंडीकेटर लाइट्स बटन दिले गेले आहेत, एक रेड आणि दुसरे ग्रीन. या मध्ये अजून एक फिचर आहे, ते म्हणजे ऑटो शट ऑफ. यामध्ये तुमचे सँडविच मेकर हव्यात्या टेंपरेचर ला पोहोचल्या नंतर हे सँडविच मेकर आपोआप बंद होते. या सँडविच मेकर वर आपल्याला एक वर्षाची, वॉरंटी मिळते आणि या सँडविच मेकर ची किंमत ही अंदाजे साडेचार ते पाच हजार पर्यंत असु शकते. हे सँडविच मेकर साफ करण्यास अगदी सोपे आहे. कारण यात दिलेल्या प्लेट्स आपण काढू शकतो.
यात waffels, सँडविच, आणि ग्रीलिंग अश्या तीन ही प्रकारच्या सँडविच बनवता येतात. या प्लेट्स चेंज करणे ही खूप सोपे आहे. यात फक्त दिलेली कॉर्ड ची लांबी जर छोटी आहे. बाकी याच्या उत्कृष्ट कामगिरी मुळे व टिकाऊ पणामुळे हे सँडविच मेकर तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो.
आई बेल सँडविच मेकर (Ibell Sandwich Maker)
iBELL SM501 Sandwich Maker, 1500 Watt
मित्रांनो आय बेलवचे हे सँडविच मेकर पंधराशे वॅट चे आहे. याची किंमत ही अंदाजे दोन ते अडीच हजार पर्यंत असू शकते. हे सँडविच मेकर ची सगळ्यात चांगली खासियत म्हणजे सँडविचच्या हाएट नुसार हे सँडविच मेकर आपली हाईट ऍडजेस्ट करते. म्हणजे च तुम्ही यात जास्त फिलिंग वाले सँडविच सुद्धा बनवू शकता. या सँडविच मेकर मध्ये दिलेल्या प्लेट्स या नॉन स्टिक कोटींगच्या बनलेल्या असल्यामुळे कमी तेलात किंवा कमी बटर मध्ये तुमच सँडविच बनवून तयार होते. या सँडविच मेकर ची अजून एक खासियत म्हणजे यामध्ये तुम्हाला ऑईल कलेक्टर ट्रे सुद्धा दिले गेले आहे. ज्यामध्ये जर तुमच्या कडुन जास्त ऑइल पडले असेल तर ते दिलेल्या ट्रे मध्ये कलेक्ट होते. या सँडविच मेकर चे हँडल हिट रेझिस्टंट असल्यामुळे चटका वगैरे बसण्याची शक्यता अजिबात नसते.
थोडक्यात या सँडविच मेकर ची पूर्ण बॉडी ही शॉक प्रूफ आहे. तसेच त्याची डिझाइन सुद्धा खूप उत्तम आणि आकर्षक बनवली आहे. या सँडविच मेकर मध्ये सुद्धा तुम्हाला दोन पावर इंडिकेटर लाईट दिले आहेत. रेड आणि ग्रीन. तसेच या प्रॉडक्ट वर तुम्हाला एक वर्षांची वॉरंटी मिळते. हे सँडविच मेकर खूप फास्ट काम करते. त्यामुळे जर तुम्ही नॉन व्हेज ग्रील करणार असाल तर हे सँडविच मेकर तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.
बोरोसिल सँडविच मेकर (Borosil Sandwich Maker)
Borosil Super Jumbo 180° 2000-Watt Grill Sandwich Maker
मित्रांनो, बोरोसिल चे हे सँडविच मेकर एक अतिशय आकर्षक व सर्वोत्तम असे सँडविच मेकर आहे. हे सँडविच मेकर 2000 वॅट चे आहे. या सँडविच मेकर ची बॉडी ही स्टेनलेस स्टील चो बनलेली आहे. हे सँडविच मेकर 180° मध्ये ओपन होते, म्हणून तुम्ही त्याच्या एक वेळी दोन्ही बाजूच्या प्लेट्स ग्रीलिंग साठी वापरु शकता. तसेच या सँडविच मेकर मध्ये तुम्हाला सुपेरिअर नॉन स्टिक कोटिंग बघायला मिळते. शिवाय यामध्ये ऑइल कलेक्टर ट्रे देण्यात आले आहे. ज्यामध्ये एक्सट्रा ऑइल किंवा बटर कलेक्ट होते. तसेच हे साफ करण्यास ही खूप सोपे आहे. याची कॉर्ड लेंथ पण बरीच मोठी आहे. या शिवाय यात तुम्हाला टेम्परेचर नॉब देण्यात आला आहे. ज्याद्वारे तुम्ही हवे ते टेम्परेचर सेट करू शकता. या सँडविच मेकर ची किंमत ही अंदाजे 6000 पर्यंत असू शकते.
यात तुम्ही व्हेज तसेच नॉन व्हेज पदार्थ ही ग्रिल करू शकता. ज्यांच्याकडे वेळ कमी आहे, आणि मोठी कुटुंबे आहेत किंवा जर तुम्हाला एकाच वेळी अनेक जणांसाठी स्वयंपाक करायचा असेल, त्यांच्यासाठी बोरोसिल चे हे 2000 वॅट चे जम्बो सँडविच मेकर एक सर्वोत्तम पर्याय आहे.
मित्रांनो, असे हे सँडविच मेकर वापरण्यास अगदी सोपे, झटपट काम करणारे, वेळेची बचत करणारे, आणि कमी जागा व्यापणारे आहे. त्यामुळे तुमच्या घरी पण असेच एक सँडविच मेकर असायला हवे. अजून एक महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जर कधी पिकनिक ला किंवा बाहेर फिरायला जात असेल तर सँडविच मेकर ही तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकता. आणि गरमा गरम सँडविच चा आस्वाद कुठेही कधीही घेऊ शकता.
मित्रांनो, जर तुम्हाला आजचा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीं सोबत नक्की शेअर करा.
धन्यवाद.