Government CardsPAN CardSidebar PostTop Post

पॅन कार्ड हरवलं/खराब झालं? घरी मागवा फक्त 50 रू. मध्ये

हरवलेले / खराब झालेले पॅन कार्ड रिप्रिंट/डुप्लीकेट काढण्यासाठी आयकर विभागाच्या दोन महत्वाच्या वेबसाईट आहेत.

  1. NSDL पॅन कार्ड वेबसाइट – www.onlineservices.nsdl.com
  2. UTI पॅन कार्ड वेबसाइट – www.pan.utiitsl.com

यापैकी आपण NSDL च्या वेबसाइट वरून डुप्लीकेट पॅन कार्ड कसे तयार करायचे ते या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत.



स्टेप 1: सर्वात प्रथम NSDL च्या वेबसाइट वर जायचे आहे. वेबसाइट वर गेल्यावर तुम्हाला काही माहिती विचारली जाईल ती बॉक्स मध्ये भरा. जसे की…

वेबसाइटवर गेल्यावर पाहल्या बॉक्स मध्ये पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. नंतर जल्मतारीख मध्ये महिना आणि वर्ष ( Month & Year ) टाकायचे आहे. हे टाकल्यानंतर तुम्हाला GSTN नंबर विचारला जाईल, हा बॉक्स रिकामा ठेवा तरी चालू शकतो. नंतर Captcha Code टाकून Submit बटन वर क्लिक करायचं आहे.

Reprint Pan Card Online nsdl in Marathi Step (1)

स्टेप 2: जसे तुम्ही Submit बटनावर क्लिक कराल तसे तुम्हाला तुमच्या पॅन कार्डला जोडलेली तुमची वैयक्तिक माहिती नवीन पेज वर दिसेल. एकदा ती माहिती तुमचीच आहे का? याची खात्री करून घ्या.

माहितीमध्ये तुमच्या पॅन कार्डला जोडलेला मोबाईल नंबर आणि ई-मेलचे शेवटचे काही शब्द दाखवले जातील. या ई-मेल आणि मोबाईल नंबर चा वापर तुमची ओळख पटण्यासाठी होणार आहे ते कसे ते बघुयात.

पेज वर थोडे खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला OTP प्राप्त करण्यासाठी पर्याय ( मोबाईल नंबर/ई-मेल ) विचारले जातील. त्यातील जो पर्याय तुमच्या पॅन कार्ड जोडला गेलेला आहे तो निवडा. आणि लक्षात ठेवा पुढच्या पेज वर तुम्हाला OTP टाकायचा आहे, तर मोबाइल नंबर चालू ठेवा किंवा ई-मेल लॉगिन करून ठेवा म्हणजे OTP तुम्हाला लवकर भेटेल.



दुसरी महत्वाची गोष्ट जो पत्ता तुमच्या पॅन कार्डला जोडलेला आहे, त्याच पत्यावरच आयकर विभाग तुमचे पॅन कार्ड पाठवते.

पर्याय निवडल्यावर खालच्या नोटला Agree करायचं आहे आणि Generate OTP बटन वर क्लिक करायचं आहे.

Reprint Pan Card Online nsdl in Marathi Step (2)

स्टेप 3: जो मोबाईल नंबर/ई-मेल पॅन कार्ड लिंक आहे त्यावर OTP जाणार आहे तो OTP इथे टाकायचा आहे. आणि Validate OTP वर क्लिक करायचं आहे.

Reprint Pan Card Online nsdl in Marathi Step (3)

स्टेप 4: इथे आपली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आता फक्त ऑनलाईन पेमेंट करणे बाकी आहे, त्यासाठी तुमच्यासमोर दोन पर्याय दिसतील. त्यातील Online Payment Through PAYTM पर्याय निवडा हा पर्याय जास्त सोयीस्कर आहे या मध्ये UPI पेमेंट आहे.

फक्त ५०/- रुपये मध्ये तुम्ही पॅन कार्ड रिप्रिंट/डुप्लीकेट तयार करू शकता.

Reprint Pan Card Online nsdl in Marathi Step (4)

स्टेप 5: नवीन स्क्रीन वर तुम्हाला ५०/- पेमेंट करण्यासाठी Pay Confirm बटन वर क्लिक करायचे आहे.

Reprint Pan Card Online nsdl in Marathi Step (5)

स्टेप 6: आता PAYTM ची पेमेंट करण्यासाठीची स्क्रीन उघडेल. तुम्ही तुमच्या डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा UPI पेमेंट अँप gpay, phonePe, BHIM ने हि पेमेंट करू शकता.

जर तुम्हाला पेमेंट करण्यामध्ये काही अडचण येत असेल तर एक सोपी पद्धत आहे. तुम्हाला त्याच पेज वर QR Code दिसेल, त्यावर क्लिक करा. तो मोठा होऊन तुमच्यासमोर दिसेल. आता तुम्ही तुमच्या आवडत्या UPI अँप ने तो QR Code स्कॅन करून पेमेंट करू शकता.

पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला Waiting ची स्क्रीन येईल. तिथे थोडे थांबा.

Reprint Pan Card Online nsdl in Marathi Step (6)

स्टेप 7: नंतर Payment Successfully ची स्क्रीन येईल. आता Continue बटन वर क्लिक करून पुढे जा.

Reprint Pan Card Online nsdl in Marathi Step (7)

स्टेप 8: या पेज वर तुम्हला पॅन कार्ड रिप्रिंट/डुप्लीकेट साठी पेमेंट केल्याची पावती तयार करायची आहे, त्यासाठी Generate and Print Payment Receipt बटन वर क्लिक करा.

Reprint Pan Card Online nsdl in Marathi Step (8)

स्टेप 9: आता तुमच्या समोर पावती (Receipt) तयार झाल्याचा मेसेज येईल. तुम्ही Download PDF बटन वर क्लिक करून ती डाउनलोड करू शकता.

Reprint Pan Card Online nsdl in Marathi Step (9)

अशा पद्धतीने तुम्ही पॅन कार्ड रिप्रिंट/डुप्लीकेट साठीचा अर्ज पूर्ण केलात. आणि साधारण १० ते १५ दिवसात पॅन कार्ड पोस्टाने तुमच्या घरी येवून जाईल. हे पॅन कार्ड ओरिजिनल असेल PVC प्लास्टिक कार्ड मध्ये असेल.

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!