Business Guide

JustDial वर फ्री मध्ये बिझनेस ऍड / रेजिस्टर करा | Register your Business on JustDial Free

नमस्कार मित्रांनो, आज आपण जस्टडाएल (JustDial) वर बिझनेस रेजिस्ट्रेशन कसे करायचे, त्याचे प्लॅन्स काय आहेत? त्याचे फायदे काय, यासर्व गोष्टीं बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

JustDial Var Register Kase Karayche

मित्रांनो, जेव्हा आपण एखादा बिझनेस सुरू करतो, तेव्हा आपली इच्छा असते की तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवावा. जेणेकरून आपली आणि आपल्या बिझनेसची प्रगती होईल. त्यादृष्टीने आपण प्रयत्न देखील करतो. अनेक ओळखीच्या लोकांना आपल्या बिझनेस बद्दल सांगतो. पण मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की एवढं करून काही पुरेसे नसते. तुम्हाला जर तुमच्या बिझनेसची प्रगती करायची असेल किंवा जर तुम्हाला तुमचा बिझनेस लाखो लोकांपर्यंत पोहचवायचा असेल तर तुम्हाला तुमचा बिझनेस ऑनलाईन म्हणजेच इंटरनेट वर घेऊन जायला हवा.



म्हणजेच आता इंटरनेट वर अशा काही सोशल साइट्स आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमचा बिझनेस हजारो लोकांपर्यंत नेऊ शकता. त्यासाठी काय करायचे ? कुठे जायचे ? असे कोणालाही काही विचारायची गरज नाही. कारण आता JustDial द्वारे तुम्ही तुमचा बिझनेस ऑनलाईन ऍड किंवा रेजिस्टर करून लाखो लोकांपर्यंत पोहचवू शकता. तसेच तुमचे प्रॉडक्ट / सर्विसेस ऑनलाईन विकू शकता आणि ऑनलाईन पेमेंट घेऊन कमी खर्चात जास्त फायदा मिळवू शकता.

सर्वात पहिले JustDial म्हणजे नेमकं काय आहे ? आणि ते कसे काम करते ? ते जाणून घेऊ या:-

मित्रांनो, असे अनेक लोक आहेत जे एखाद्या प्रॉडक्ट किंवा सर्विस बद्दल जाणून घेण्यासाठी इंटरनेटचा किंवा गूगलचा वापर करतात. गूगल काही वेळेस पाहिजे अशी माहिती भेटत नाही तेव्हा लोक JustDial च्या हेल्पलाईन किंवा वेबसाइट/अँपचा वापर करतात. JustDial ला 8888888888 या नंबर वर कॉल करून लोक एखाद्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिस बद्दल प्रश्न विचारतात. आणि JustDial तुम्ही विचारलेल्या सर्विस कॅटेगरीतील आपल्या वेबसाईटवर लिस्ट असलेले बिझनेसची लोकांना माहिती देतात. त्यामुळे तुमचा बिझनेस JustDial वर लिस्ट असेल तर तुम्हाला ऑनलाईन कस्टमर मिळू शकतात. तसेच तुमच्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हीसला ऑनलाईन ओळख मिळाल्याने तुमच्या बिझनेसचा फायदा होऊ शकतो.

चला तर मग तुमचा बिझनेस JustDial वर रेजिस्टर/ ऍड कसा करायचा याबद्दल सविस्तर पणे जाणून घेऊ या.

JustDial वर फ्री मध्ये बिझनेस ऍड / रेजिस्टर कसा करायचा

स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला प्ले स्टोअर वरती जाऊन JustDial चे अँप इन्स्टॉल करायचे आहे.



जर तुम्हाला Justdial च्या नवीन गो डिजिटल प्लॅन बद्दल माहिती पाहिजे असेल तर => JustDial गो डिजिटल प्लॅन माहिती <= क्लिक करून तुमच्या व्यवसायाची माहिती टाका. आणि तुम्हाला फ्री मध्ये बिझनेस रेजिस्टर करायचा असेल तर खालच्या स्टेप्स फॉलो करा.

स्टेप 2: आता अँप उघडून तुम्हाला तुमचे अकाउंट Justdial वर तयार करायचे आहे, त्यासाठी तुमचे नाव (Name) आणि मोबाइल नंबर (Mobile) टाकून arrow बटन वर क्लिक करायचे आहे. किंवा खाली असलेल्या बटन वर क्लिक करून तुम्ही तुमचे अकाउंट गूगल किंवा फेसबुकच्या मार्फत तयार करू शकता.

JustDial Var Register Kase Karayche Step 2

स्टेप 3: नंतर तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल ऑटोमॅटिक भरला जाईल असे नाही झाले तर तुम्ही तो दिलेल्या जागी टाकायचा आहे.

JustDial Var Register Kase Karayche Step 3

स्टेप 4: आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला अँप वापरण्यासाठी काही परमिशन्स (Permissions) विचारल्या जातील त्या allow करायच्या आहेत. तुम्ही या सर्व परमिशन्स दिल्या नाहीत तरी चालू शकते.

JustDial Var Register Kase Karayche Step 4

स्टेप 5: आता Justdial अँपचे होम पेज ओपन होईल, तुम्ही वरती डाव्या कोपऱ्यात दिलेल्या प्रोफाइल इमेज वर क्लिक करायचे आहे नंतर Free Listing चा ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

JustDial Var Register Kase Karayche Step 5

स्टेप 6: त्या नंतर तुमच्या बिझनेस किंवा कंपनीची माहिती टाकायची आहे. यात कंपनीचे नाव (Business Name), संपर्कसाठी व्यक्तीचे नाव (Contact Person), संपर्कसाठी व्यक्तीचा मोबाइल नंबर (Mobile Number), पिन कोड (Pincode) टाकून Continue बटन वर क्लिक करायचे आहे.

JustDial Var Register Kase Karayche Step 6

स्टेप 7: आता तुम्हाला तुमच्या बिझनेस किंवा कंपनीचा प्रकार (Business Category) निवडायचा आहे, नंतर ज्या ठिकाणी व्यवसाय आहे त्या बिल्डिंगचे नाव (Building Name) आणि जवळच्या रस्त्याचे नाव (Street Name) टाकायचे आहे, नंतर Landmark ऑपशन मध्ये महत्त्वाची खूण टाकायची आहे. आणि सर्वात खाली तुमच्या बिझनेस किंवा कंपनीचे फोटो अपलोड करून Continue बटन वर क्लिक करायचे आहे.

JustDial Var Register Kase Karayche Step 7

स्टेप 8: पुढच्या पेज वर तुम्हाला तुमच्या व्यवसायाचे टायमिंग म्हणजे कधी चालू/बंद असतो ते निवडायचे आहे.

JustDial Var Register Kase Karayche Step 8

आता तुम्हाला तुमच्या व्यवसाय यशस्वीरित्या सबमिट झाल्याचा मेसेज दिसेल अशा तर्‍हेने तुमचा व्यवसाय Justdial कडे रजिस्टर झाला. तुमचा व्यवसाय 24-48 तासात Justdial वर दिसायला सुरुवात होईल.

JustDial Var Register Kase Karayche Step 9

एका गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला तुम्हाला Justdial कडून काही वेळानंतर कॉल येईल ते तुम्हाला वेगवेगळ्या प्लॅनची माहिती दिली जाईल, तेव्हा तुमच्या गरजेनुसार तुम्ही तो निवडू शकता. तसेच तुम्हाला फ्री प्लॅन सोबत राहायचे असेल तर तसे त्यांना सांगा.

Justdial रेजिस्ट्रेशन प्लॅन्स कोणते आहेत?

मित्रांनो तसे पहायला गेले तर Justdial बिझनेस रेजिस्ट्रेशन चे दोन प्रकारचे प्लॅन असतात.

  1. Free रेजिस्ट्रेशन आणि
  2. Paid रेजिस्ट्रेशन.

Justdial Free Registration Plan

मित्रांनो, फ्री रेजिस्ट्रेशन प्लॅन मध्ये जेव्हा तुम्ही जस्ट डाएल वर बिझनेस ऍड करता तेव्हा तुमच्या कडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. म्हणजेच बिझनेस ऍड करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे चार्जेस तुम्हाला द्यावे लागत नाही. इथे तुम्ही Justdial च्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अँप वर जाऊन फ्री मध्ये तुमचा बिझनेस रेजिस्टर करू शकता.

Justdial Paid Registration Plans

मित्रांनो, Paid रेजिस्ट्रेशन प्लॅन मध्ये काही विविध पॅकेजेस (Packages) असतात ज्यांचे वेग वेगळे चार्जेस असतात.

  • Diamond Package:- मित्रांनो, पेड रेजिस्ट्रेशन मधील डायमंड पॅकेज सर्वात महाग असा प्लॅन आहे. तुम्ही जर हा प्लॅन निवडला तर जस्ट डाएल तुमचा बिझनेस सर्वात टॉप पोझिशनला दाखवते. पण हा प्लॅन बिझनेस कॅटेगरीतील एखादया ऑर्गनायझेशन (संस्था) लाच मिळू शकते.
  • Gold Package:- हे पॅकेज एखादया बिझनेस कॅटेगरीतील फक्त 10 ते 20 बिझनेस ऑर्गनायझेशन ला मिळते.
  • Silver Package:- हे पॅकेज सुद्धा 10 ते 20 बिझनेस ऑर्गनायझेशनसाठी उपलब्ध असते. आणि Justdial चे हे सर्वात स्वस्त असे पॅकेज आहे.

Justdial चे फायदे काय आहेत?

  • मित्रांनो जर तुमचा बिजनेस असेल तर जस्ट डायल हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. कारण की जर तुम्ही तुमचा बिजनेस जस्ट डायल वर ऍड केला तर तुम्ही तुमच्या बिजनेसची सेवा ही लोकांपर्यंत पोहोचवून बिझनेसचा सेल वाढवू शकता आणि त्यातून तुम्ही तुमचा फायदा करून घेऊ शकता.
  • तसेच जर तुम्ही तुमच्या कामासाठी एखादा बिजनेस शोधत असाल तर जस्ट डायल ही वेबसाईट तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी तुम्ही फक्त तुम्हाला हवा तो बिझनेस सर्च करून त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळवू शकता व समोरच्या पार्टीशी बोलून तुम्हाला हवी ती सेवा खरेदी करू शकता किंवा बुक करू शकता.

तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण जस्टडाएल वर बिझनेस ऍड कसा करायचा त्या बद्दल जाणून घेतले. आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तसेच हा लेख महत्त्व पूर्ण वाटला असल्यास तुमच्या सर्व मित्र मंडळीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!