रेशन कार्ड ई-केवायसी तुमच्या मोबाईल वरून: 2 मिनिटात | Ration Card eKYC Online
मित्रांनो आज आपण रेशन कार्ड ई-केवायसी तुमच्या मोबाईल वरून कशी करायची ? या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत. जर eKYC वेळेत केली नाही तर रेशन कार्ड बंद होणे, धान्य मिळणे थांबणे यासारख्या अडचणी टाळता येतील.
आजच्या डिजिटल युगात शासनाच्या अनेक सेवा ऑनलाईन झाल्या आहेत. त्यातच आपली ओळख पटवून देणारे रेशन कार्ड देखील आलेच. मित्रांनो, रेशन कार्ड धारकाची ओळख निश्चित करून त्याचा योग्य लाभ योग्य व्यक्ती पर्यंत पोहोचावा, यासाठी रेशन कार्डची ई-केवायसी करणे आवश्यक करण्यात आले आहे.
मित्रांनो, पूर्वी ई- केवायसी करण्यासाठी आपल्याला रेशन दुकानावर किंवा सरकारी कार्यालयात जावे लागत होते. मात्र आता आपल्या स्वतःच्या मोबाईल फोन वरून घरबसल्या रेशन कार्ड ई- केवायसी करणे शक्य झाले आहे. मोबाईल वरून ई-केवायसी केल्यामुळे आपला वेळ, पैसे आणि श्रम वाचतात. तसेच चुकीची किंवा बनावट नोंद देखील टाळली जाते. त्यामुळे रेशन कार्ड बंद होणे, धान्य मिळणे थांबणे यासारख्या अडचणी टाळायच्या असतील तर वेळेत ई-केवायसी पूर्ण करणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला ही जर रेशन कार्ड ई-केवायसी तुमच्या मोबाईल वरून कशी करायची? हे जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा…
रेशन कार्ड eKYC स्टेप्स

स्टेप 1:- सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या मोबाईल च्या प्ले स्टोअर वरून Mera eKYC हे ऍप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. त्यासोबतच Aadhaar face RD हे ऍप देखील इन्स्टॉल करून घ्यायचे आहेत.

स्टेप 2:- आता Mera eKYC हे ऍप ओपन करायचे आहे व विचारलेल्या परमिशन्स Allow करायच्या आहेत.
स्टेप 3:- त्या नंतर तुमचं State (महाराष्ट्र राज्य) निवडायच आहे व Verify Location या बटन वर क्लिक करायचे आहे. तुमचं लोकेशन ऑटोमॅटिक व्हेरिफाय होऊन जाईल.

स्टेप 4:- या पुढे ज्या व्यक्तीची केवायसी करायची आहे त्या व्यक्तीचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे व Generate OTP बटन वर क्लिक करायचं आहे. आता आधारला रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी पाठवला जाईल, तो दिलेल्या जागी टाकून नंतर कॅपचा टाकायचा आहे व Submit बटन वर क्लिक करायचं आहे.

स्टेप 5:- त्या नंतर तुम्हाला तुमचे डिटेल्स दाखवले जातील, ज्यात तुमचं नाव, रेशन कार्ड नंबर, तुमचं राज्य, आधार कार्ड नंबर आणि तुमची केवायसी झाली आहे की नाही ते स्टेटस देखील दाखवलं जाईल. जर तुमची केवायसी झाली नसेल तर खाली दिलेल्या Face eKYC या बटन वर क्लिक करायचं आहे.

स्टेप 6:- त्या नंतर ऑटोमॅटिकली आधार फेस आरडी च ऍप ओपन होईल. त्यात दिलेल्या सर्कल मध्ये तुमचा चेहरा ऍडजस्ट करून डोळे मिचकवायचे आहेत, व तुमचा फेस स्कॅन होऊन तुमची केवायसी पूर्ण होऊन जाईल.
स्टेप 7:- तुमची केवायसी झाल्यावर तुम्हाला eKYC Registered Successfully असा मेसेज देखील येईल. इथे Ok करायचं आहे.

eKYC झाली की नाही चेक करा (eKYC Status Check)
स्टेप 1:- स्टेटस चेक करण्यासाठी पुन्हा तुम्हाला तुमचं State (महाराष्ट्र राज्य) निवडायच आहे व Verify Location या बटन वर क्लिक करायचे आहे. तुमचं लोकेशन ऑटोमॅटिक व्हेरिफाय होऊन जाईल.

स्टेप 2:- या पुढे ज्या व्यक्तीची केवायसी स्टेटस चेक करायच आहे त्या व्यक्तीचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे व Generate OTP बटन वर क्लिक करायचं आहे. आता आधारला रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी पाठवला जाईल, तो दिलेल्या जागी टाकून नंतर कॅपचा टाकायचा आहे व Submit बटन वर क्लिक करायचं आहे.

स्टेप 3:- त्या नंतर तुम्हाला तुमचे डिटेल्स दाखवले जातील, ज्यात तुमचं नाव, रेशन कार्ड नंबर, तुमचं राज्य, आधार कार्ड नंबर आणि तुमची केवायसी झाली आहे की नाही ते स्टेटस देखील दाखवलं जाईल. जर इथे Y असं दाखवत असेल तर याचा अर्थ की तुमची केवायसी पूर्ण झालेली आहे.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण रेशन कार्ड ई-केवायसी तुमच्या मोबाईल वरून कशी करायची, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा.
धन्यवादl
Tags: ration card ekyc kashi karavi, ration card ekyc marathi, ration card online kyc maharashtra, ration card kyc marathi corner, ration card kaise kare mobile se maharashtra, ration kyc kaise kare mobile se, ration card ekyc online, ration card online kyc, ration card kyc online status check, ration kyc kaise kare maharashtra, ration card ekyc kaise kare mobile se
