प्लास्टिक PVC वोटर आयडी कार्ड ऑनलाईन तयार करा, Free मध्ये | Order PVC Voter ID Card
नमस्कार मित्रांनो, आमच्या आज च्या या नवीन लेखात आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नेहमी प्रमाणे आज ही आम्ही तुमच्या साठी काही तरी नवीन व खूप उपयोगी माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो आज आपण प्लास्टिक PVC वोटर आयडी कार्ड घरी ऑनलाईन पद्धतीने कसे ऑर्डर करायचे, या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, मतदान कार्ड किंवा वोटर आयडी कार्ड किती महत्वाचे डॉक्युमेंट आहे या बद्दल तर तुम्हाला माहित असेलच. आपल्या सरकारने प्रत्येक व्यक्तीच्या ओळखीसाठी मतदार ओळखपत्र जारी केले आहे. जेणेकरून प्रत्येक व्यक्ती आपले ओळखपत्र म्हणून ही त्याचा वापर करू शकतो. पण तुमचे मतदार ओळखपत्र किंवा कार्ड हरवले असेल किंवा खराब झाले असेल किंवा जर तुम्ही अजूनही कागदी मतदार ओळखपत्र वापरत असाल तर तुम्ही ताबडतोब नवीन PVC मतदार कार्ड बनवून घ्यायला हवे.
पण त्यासाठी तुम्हाला कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही कारण आता तुम्ही नवीन PVC मतदार ओळखपत्रासाठी घरबसल्या ऑनलाइन अर्ज करून तुमचे नवीन PVC मतदार ओळखपत्र मागवू शकता. तो अर्ज कसा करायचा, त्यासाठी कोण कोणते कागदपत्रे लागणार या सर्व गोष्टीं बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
पीव्हीसी वोटर आयडी कार्ड ऑनलाइन ऑर्डर करण्याची प्रक्रिया
स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला इलेकशन कमिशन ऑफ इंडिया च्या ऑफिशियल वेबसाईट voters.eci.gov.in वर जायचे आहे.
स्टेप 2: आता पोर्टल वर आल्या नंतर, तुमच्या समोर Login आणि Sign Up चा ऑप्शन दिसेल. तुमचा आयडी आधीच तयार केला असेल तर तुम्ही डायरेक्ट लॉगिन करायचे आहे, अन्यथा Sign Up वर क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर टाकून कॅपचा व ओटीपी व मतदार कार्ड नंबर असेल तर तो टाकून, पासवर्ड तयार करायचा आहे व तुमचे अकाउंट तयार करायचे आहे. व नंतर लॉगिन करायचे आहे.
स्टेप 3: लॉगिन झाल्या नंतर नेक्स्ट पेज वर तुम्हाला अनेक फॉर्म दिसतील त्यातील फॉर्म 8 म्हणजेच Shifting of residence/correction of entries in existing electoral roll/replacement of EPIC/marking of PwD वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 4: त्या नंतर ऍप्लिकेशन कोणासाठी करताय ते self कींवा other elector साठी करायचे आहे ते निवडायचे आहे. स्वतः साठी ऍप्लिकेशन करत असाल तर self ऑप्शन निवडून नंतर तुमचा EPIC नंबर टाकायचा आहे व नंतर Submit बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 5: या नंतर खाली तुम्हाला तुमची माहिती दिसेल नाव वगैरे, ते चेक करून नंतर Ok बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 6: या नंतर Application for मध्ये तुम्हाला Issue of replacement epic without correction या पर्याय निवडायचा आहे. व Ok बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 7: त्या नंतर तुमचा फॉर्म ओपन होईल. त्यात तुम्हाला next बटन वर क्लिक करायचे आहे. त्या नंतर खाली तुम्हाला आधार नंबर चा ऑप्शन दिसेल त्यावर टिक करून तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्या नंतर मोबाईल नंबर वर टिक करून self ऑप्शन निवडून मग तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. व नेक्स्ट बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 8: आता अजून थोडे खाली आल्यावर तुम्हाला काही ऑप्शन दिसतील, त्यातील पहिले म्हणजे तुमचे कार्ड जर हरवले असेल तर lost ऑप्शन वर टिक करायचे आहे. आणि पोलीस स्टेशन मधून घेतलेली FIR कॉपी इथे अपलोड करावी लागेल. आणि जर FIR नसेल तर दुसरा ऑप्शन म्हणजे Destroy due to reason of beyond control like floods, fire, natural disasters या पर्याय वर क्लिक करायचे आहे. इथे तुम्ही हा दुसरा ऑप्शन निवडू शकता म्हणजे तुम्हाला कोणतेही डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार नाही.
स्टेप 9: आता या नंतर खाली तुम्हाला Place म्हणजे तुमच्या गावचे नाव टाकायचे आहे. व दिलेला कॅपचा टाकून Preview अँड Submit या बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 10: आता या नंतर तुम्हाला तुम्ही भरलेला फॉर्म दिसेल त्यात भरलेली माहिती बरोबर आहे का ते चेक करून घ्यायचे आहे. आणि सर्व काही बरोबर असल्यास सबमिट बटण वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 11: मित्रांनो, ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या नंतर, तुम्हाला एक Reference number मिळेल जो तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे.
त्या नंतर Download acknowledgement वर क्लिक करून ही pdf फाइल सेव्ह करून ठेवायची आहे व नंतर ok बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 12: आता परत तुम्हाला होम पेज वर येऊन खाली Track application status वर यायचं आहे.
स्टेप 13: तुम्हाला मिळालेला रेफरन्स नंबर टाकून राज्य सिलेक्ट करून Submit करायचे आहे. तुम्हाला तुमचे मतदार कार्ड चे स्टेटस दिसेल. काही दिवसांनी तुमचे ऍप्लिकेशन अप्रुव्ह होईल आणि मग तुमचे नवीन PVC मतदार कार्ड किंवा ओळखपत्र पंधरा ते वीस दिवसात पोस्टातर्फे तुमच्या घरी पोहचवले जाईल.
PVC मतदार ओळखपत्र बद्दल थोडी माहिती
मित्रांनो, PVC मतदार ओळखपत्र म्हणजे हे एक प्रकारचे स्मार्ट पीव्हीसी मतदार कार्ड आहे. जे प्लास्टिक पासून बनलेले असते. मित्रांनो, आता पर्यंत आपण एक कागदी कार्ड, ज्यावर प्लास्टिकचे कव्हर होते असे मतदार कार्ड वापरत होतो. या कार्डची नवीन आवृत्ती म्हणजे पीव्हीसी (PVC) मतदार कार्ड आहे. पीव्हीसी मतदार कार्ड बनवण्याचा मुख्य उद्देश म्हणजे निवडणुकीतील अनियमितता रोखणे हा आहे.
या कार्ड ची मुख्य गोष्ट म्हणजे ते जाड प्लास्टिक वर छापलेले असून हे कार्ड सहजासहजी खराब होत नाही. अजून एक गोष्ट म्हणजे जुन्या मतदार कार्ड मध्ये मोनोक्रोम प्रिंट असल्याने त्यात असलेला फोटो नीट दिसत नसायचा त्यामुळे फोटो ओळखण्यात अडचण येत होती. ही समस्या सोडवण्यासाठी निवडणूक आयोगाने आता नवीन रंगीत पीव्हीसी मतदार कार्ड बनवले आहे. आणि ते पूर्णपणे मोफत असणार आहे. या नवीन PVC मतदार कार्ड साठी तुमच्या कडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाहीये.
PVC मतदार ओळखपत्र ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड, चालू मोबाईल नंबर, ई – मेल आयडी, इत्यादी.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण प्लास्टिक PVC वोटर आयडी कार्ड घरी ऑनलाईन पद्धतीने कसे ऑर्डर करायचे, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.
Tags: PVC Voter Card Online Order Kase Karayche, PVC Voter Card Online Apply Marathi, Plastic Voter Card Online Order Marathi, Plastic Voter Card Online Apply Marathi, Voter Card Haravle Ahe, Voter Card Gahal Zale Ahe, Voter Card Chorila Gele Ahe, Navin Voter Card Banavne, Duplicate PVC Voter Card Online Order, Duplicate PVC Voter Card Online Apply Marathi, PVC Voter Card Tayar Online, PVC Plastic Voter Card Apply Marathi