Government CardsHome Page 2

डिजिटल स्वाक्षरीचं प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन कसं काढायचं? | मालमत्ता पत्रक | Property Card Online

नमस्कार मित्रांनो, प्रॉपर्टी कार्ड म्हणजेच मिळकत पत्रिका किंवा मालमत्ता पत्रक. महाराष्ट्र सरकारनं आता डिजिटल स्वाक्षरीत असलेले प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी आता तुम्हाला सरकारी कार्यालयात जायची गरज नाहीये. तुम्ही घरबसल्या मोबाईलवर ते काढू शकता. ते कसं काढायचं, त्यासाठी किती फी आकारली जाते, या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

Property Card Online Kase Kadhayche

मित्रांनो, ज्या प्रकारे आपल्या सातबारा उताऱ्यावर आपल्या शेत जमिनी संबंधित सर्व माहिती असते, त्याच प्रमाणे एखादया व्यक्तीच्या नावावर किती बिगर शेतजमीन आहे याची माहिती देखील आपल्याला मिळू शकते. त्यासाठी सरकारने स्वामित्व योजना आणली होती. या योजने अंतर्गत नागरिकांना त्यांच्या जमिनीचे व घरांचे प्रॉपर्टी कार्ड देण्यात येत आहेत. प्रॉपर्टी कार्ड म्हणजेच मालमत्ता पत्रक, किंवा मिळकत पत्रिका. म्हणजेच बिगर शेत जमीन असलेल्या ठिकाणी व्यक्तीच्या नावावर किती मालमत्ता आहे याची माहिती त्यात नमूद केलेली असते.



यात त्या व्यक्तीचे घर, बंगला, व्यवसायाची इमारत इत्यादी स्थावर मालमत्तेची माहिती लिहिलेली असते. आणि मित्रांनो, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी आता तुम्हाला सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही तर तुम्ही घरबसल्या मोबाईल वरच ते काढू शकता. हे प्रॉपर्टी कार्ड कसे काढायचे आणि त्यासाठी किती शुल्क आकारले जाईल या बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

हे हि वाचा: 7/12 ऑनलाईन डाउनलोड कसा करायचा (Free मध्ये)

डिजिटल स्वाक्षरीचं प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन कसे काढायचे

डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन कसे काढायचे ते जाणून घेण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा

स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला bhulekh.mahabhumi.gov.in या संकेत स्थळावर जायचे आहे. व नंतर तुमच्या समोर महाराष्ट्र सरकारची महसूल विभागाची वेबसाईट ओपन होईल. त्या नंतर उजव्या बाजूला तुम्हाला डिजिटल स्वाक्षरी 7/12 (Digital Signed 7/12) या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

Property Card Online Kase Kadhayche Step 1

स्टेप 2: आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला LogIn करायचे आहे. मित्रांनो, इथे तुम्ही सातबारा काढताना जो युझरनेम व पासवर्ड टाकला होता तोच टाकून लॉगिन करायचे आहे. पण जर तुम्हाला ते आठवत नसेल तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर वापरून ही लॉगिन करू शकता.



फक्त त्यासाठी वर दिलेल्या OTP Based Login या पर्यायावर क्लीक करायचे आहे. त्या नंतर खाली दिलेल्या जागी तुमचा मोबाईल नंबर टाकून Send OTP या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. थोड्याच वेळात तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो टाकून Verify OTP बटन वर क्लिक करून व्हेरिफाय करून घ्यायचे आहे.

Property Card Online Kase Kadhayche Step 2

स्टेप 3: आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल. त्या वर तुम्हाला मेनू बार वर विविध पर्याय दिसतील त्यापैकी Digitally Signed Property Card या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. व त्या नंतर डिजिटल साइन प्रॉपर्टी कार्ड चे नवीन पेज ओपन होईल.

Property Card Online Kase Kadhayche Step 3

Note: तुम्ही या वेबसाइट वर लॉगिन मोबाइल मधून केले असेल तर मेनू उघडण्यासाठी मेनू बारच्या डाव्याबाजूला असलेल्या तीन लाईन ऑपशन वर क्लिक करायचे आहे. आणि जर मेनू उघडत नसेल तर ब्राउर चा डेस्कटॉप मोड चालू करायचा आहे. असे केले तर वेबसाइट कॉम्पुटर वर जशी दिसते तशी मोबाइल वर दिसेल.

स्टेप 4: आता त्या पेज वर तुम्हाला सर्वात पहिले तुमचा विभाग निवडायचा आहे, त्या नंतर तुमचा जिल्हा, भूमिअभिलेख कार्यालय व गाव निवडायचे आहे. या नंतर आता तुम्हाला सी टी सी नंबर (CTC number) म्हणजे. सर्वे नंबर निवडायचा आहे. आता तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड ची फी किती आहे ते सांगितले जाईल. व तसा मेसेज ही येईल. व नंतर Ok या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

प्रॉपर्टी कार्डसाठी लागणारे शुल्क

  1. मित्रांनो, तुमची मालमत्ता जर महानगरपालिका क्षेत्रात येत असेल तर प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी तुम्हाला 135 रुपये शुल्क आकारले जाईल.
  2. तसेच जर तुमची मालमत्ता नगरपालिका किंवा नगरपंचायत क्षेत्रात येत असेल तर तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड साठी 90 रुपये आकारले जातील.
  3. आणि जर तुमची मालमत्ता ग्रामीण भागात येत असेल तर प्रॉपर्टी कार्ड साठी तुम्हाला 45 रुपये आकारले जाऊ शकतात.

आता तुम्हाला Recharge Account ऑप्शन निवडायचा आहे. मित्रांनो, प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी तुम्हाला सांगितलेली रक्कम वॉलेट मध्ये जमा करावी लागणार आहे.

जर तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड फ्री मध्ये पाहायचा असेल तर हा लेख वाचा: प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन फ्री मध्ये कसं काढायचं?

Property Card Online Kase Kadhayche Step 4

स्टेप 5: तर त्यासाठी रिचार्ज ऑप्शन निवडून नंतर पुढच्या पेज वर Make payment चा ऑप्शन दिसेल. त्या वर सांगितलेली अमाउंट टाकून Pay Now ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. मेसेज मध्ये जेवढी अमाउंट सांगितली आहे तेवढेच पैसे टाका, जास्तीचे पैसे टाकले तर ते वॉलेट मध्ये अडकून पडतील. आम्ही खाली डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी किती शुल्क आकारले जाईल त्याची माहिती दिलेली आहे.

Property Card Online Kase Kadhayche Step 5

स्टेप 6: नेक्स्ट पेज वर तुम्ही टाकलेली अमाउंट तपासून Confirm बटन वर क्लिक करायचे आहे.

Property Card Online Kase Kadhayche Step 6

स्टेप 7: या नंतर तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा भीम यूपीआई द्वारे पैसे जमा करायचे आहेत.

Property Card Online Kase Kadhayche Step 7

स्टेप 8: आता पुढे तुम्हाला पेमेंट सक्सेसफुली झाल्याचा मेसेज येईल आणि वॉलेट मध्ये पैसे जमा झाल्याचे दिसेल. नंतर तिथे दिलेल्या Continue बटन वर क्लिक करायचे आहे.

Property Card Online Kase Kadhayche Step 8

स्टेप 9: मित्रांनो, आता तुम्हाला तुमची माहिती परत एकदा टाकायची आहे. त्यात तुमचा विभाग, जिल्हा, भूमिअभिलेख कार्यालय, गाव आणि सी टी एस (सिटी सर्वे) नंबर निवडायचा आहे. ही माहिती भरल्यावर तुम्हाला खाली वॉलेट अमाउंट दिसेल.

जर तुम्हाला तुमचा सिटी सर्वे नंबर माहिती नसेल तर हा लेख वाचा: प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन फ्री मध्ये कसं काढायचं?

जर तुमच्या वॉलेट मध्ये प्रॉपर्टी कार्डसाठी लागणारे पैसे असतील तर माहिती टाकून झाल्यावर खाली Download बटन येईल. आणि जर वॉलेट मध्ये पुरेसे पैसे नसतील तर तुम्हाला Recharge Account बटन वर क्लिक करून लागणारे पैसे ऍड करायचे आहेत.

Property Card Online Kase Kadhayche Step 9

स्टेप 10: आता तुम्हाला Download या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. व तुमच्या समोर प्रॉपर्टी कार्ड ओपन होईल. हे प्रॉपर्टी कार्ड तुम्ही बघू शकता.

Property Card Online Kase Kadhayche Step 10

प्रॉपर्टी कार्ड कसे वाचायचे?

मित्रांनो, सर्वात वरती तुम्हाला गावचे नाव, तालुका आणि जिल्हाचे नाव याची माहिती दिलेली आहे. त्या नंतर नगर भूमापन क्रमांक व त्याचे क्षेत्र किती आहे ते दिलेले आहे. त्या नंतर सदर जागा किंवा प्लॉट कुणाच्या नावावर आहे त्याची माहिती दिलेली असते. त्या नंतर सर्वात खाली महत्त्वाची सूचना दिलेली असते.

ती सूचना म्हणजे: ही मिळकत पत्रिका डिजिटल स्वाक्षरी त असल्याने त्याला कोणत्याही सही शिक्क्याची आवश्यकता नाही व ते कोणत्याही सरकारी कामासाठी वापरता येऊ शकते असे इथे नमूद केलेले आहे.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन पद्धतीने कसे काढायचे, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.

Tags: Property Card Online Kase kadhayche, Property Card Mhanje Kay, Property Card Fayde, Property Card Maharashtra, Property Card Info in Marathi, Property Card Download Marathi, Property Card Apply Marathi, Property Card Information in Marathi

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!