Shop

प्रेशर कुकर बद्दल सविस्तर माहिती | Best Pressure Cooker 2022

नमस्कार मित्रांनो, आज आपण प्रेशर कूकर बद्दल माहिती बघणार आहोत. तसेच भारतातील सर्वात चांगले प्रेशर कुकर कोण-कोणते आहेत त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

Best Pressure Cooker

मित्रांनो, पूर्वीच्या काळी स्वयंपाक करणे जरा अवघड काम होते. पूर्वी सगळं स्वयंपाक हा चुलीवर होत होता. तसेच अन्न शिजवण्यासाठी कढई किंवा पातेले या भांड्यांचा उपयोग केला जात असे. पण नंतर च्या काळात या मध्ये बदल होत गेले आणि प्रेशर कुकर चा वापर करण्यास सुरुवात झाली. या प्रेशर कुकर मध्ये अन्न शिजवणे सोपे झाले. तसेच वेळ ही कमी लागत असे. स्वयंपाक लवकर, टेस्टी आणि आरोग्यदायी होण्यासाठी प्रेशर कुकर चा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला. या प्रेशर कुकर मध्ये अन्न चांगले शिजते व त्यातील पोषक घटक ही टिकून राहतात. त्यामुळे या प्रेशर कुकर चा वापर आता घरोघरी होऊ लागला आहे. पण हे प्रेशर कुकर म्हणजे नेमकं काय आहे आणि तो खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे सुद्धा माहीत असायला हवे. तरच तुम्ही एक चांगला प्रेशर कूकर खरेदी करू शकाल.



सर्वात पहिले जाणून घेऊ या की प्रेशर कूकर म्हणजे नेमकं काय आहे? मित्रांनो, प्रेशर कूकर म्हणजे एक असे हवाबंद भांडे आहे ज्यामध्ये पाणी टाकून त्याच्या वाफेच्या सहाय्याने अन्न शिजवले जाते. या वाफेमुके भांड्यात तापमान आणि दबाव वाढून अन्न शिजवले जाते.

सर्वात चांगले प्रेशर कूकर

1) पीजन स्टेनलेस स्टील प्रेशर कूकर (Pigeon)Amazon वर बघा
2) प्रेस्टीज नक्षत्र अल्फा (Prestige)Amazon वर बघा
3) हॉकिंस प्रेशर कूकर (Hawkins)Amazon वर बघा
4) प्रेस्टीज स्वच्छ प्रेशर कूकर (Prestige)Amazon वर बघा
5) बोरोसिल प्रोन्टो प्रेशर कूकर ( Borosilicate)Amazon वर बघा

प्रेशर कूकर खरेदी का करावा

मित्रांनो, तुम्हाला जर कमी वेळेत तुमचा आवडीचा पदार्थ शिजवायचा असेल तर तुमच्याकडे प्रेशर कूकर असायलाच हवा. तसेच प्रेशर कूकर मध्ये शिजवलेल्या अन्नात त्यात असलेली जीवनसत्त्वे व पोषक घटक आणि पदार्थाची चव ही टिकून राहते. व त्यामुळे तुम्ही खात असलेल्या पदार्थांचे सर्व पौष्टिक तत्वे तुम्हाला भेटतात. प्रेशर कूकर मुळे ऊर्जेची बचत होते. तसेच हे पर्यावरण पूरक आहे. याशिवाय उच्च आणि विकसित तंत्रज्ञान मुळे तसेच योग्य रित्या वापर केल्यास प्रेशर कूकर मध्ये स्वयंपाक करणे आता सुरक्षित झाले आहे.

प्रेशर कूकर खरेदी करताना कोण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ?

  • सर्वात पहिले प्रेशर कूकर चा आकार लक्षात घेऊनच प्रेशर कूकर खरेदी करायला हवा. तुमच्या कुटुंबात किती सदस्य आहेत त्यावरून प्रेशर कूकर किती लिटर चा घ्यायचा हे ठरवावे. जर तुमच्या कुटुंबात 3 सदस्य असतील तर तुम्ही 3 किंवा 4 लिटर चा प्रेशर कूकर घ्यायला आणि जास्तीच्या प्रत्येक 2 सदस्यामागे 1 लिटर ने वाढावा.
  • तुम्हाला कोणत्या प्रकारचा प्रेशर कुकर घ्यायचा आहे ते आधी ठरवा. तसे प्रेशर कूकर चे तीन प्रकार आहेत.
    • अ) अल्युमिनियम प्रेशर कूकर – हे प्रेशर कूकर जास्त काळ टिकतात. तसेच वजनाने हलके व चांगले उष्णता वाहक असल्याने लवकर गरम होतात. पण यावर डाग लवकर पडतात. व ते लवकर जुने वाटू लागतात. तसेच या मध्ये जर तुम्ही एखादा acidic पदार्थ शिजवला तर त्याची अल्युमिनियम सोबत रिऍक्शन होऊ शकते. आणि असे पदार्थ तुमच्या आरोग्यास हानिकारक ठरू शकता. तसेच ॲल्युमिनियम चे प्रेशर कुकर जास्त महाग नसतात.
    • ब) स्टेनलेस स्टील प्रेशर कूकर – मित्रांनो स्टेनलेस स्टील ची प्रेशर कुकर चांगले व टिकाऊ आहेत. तसेच ते वजनाने थोडे जड असतात आणि वर्षानुवर्षे त्यांची चमक तशीच नवीन राहते. हे प्रेशर कूकर साफ करण्यासाठी ही सोपे असतात. त्यांच्या वर डाग पडले तरीही ते लवकर स्वच्छ होतात. तसेच कुठल्याही acidic पदार्थाशी स्टेनलेस स्टील रिएक्शन करत नाही. त्यामुळे आरोग्यास कोणताही धोका नसतो. फक्त ॲल्युमिनियम च्या प्रेशर कुकर पेक्षा हे थोडे जास्त महाग असतात.
    • क) हार्ड एनोडाईज्ड प्रेशर कुकर – टिकाऊपणा च्या दृष्टीने हे प्रेशर कुकर खूप चांगले असतात. हे प्रेशर कुकर वर्षानुवर्षे चांगल्या कंडीशन मध्ये राहतात. तसेच हे प्रेशर कूकर उष्णते चे उत्कृष्ट वाहक असून लवकर गरम होतात. त्यामुळे ऊर्जेची बचत होते. तसेच हे कूकर वजनाने हलके असतात. या प्रेशर कुकर मध्ये कुठल्याही ऍसिडिक पदार्थाची रिअक्शन होत नाही. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने ही हा प्रेशर कुकर वापरण्यास उत्तम आहे.फक्त इतर प्रेशर कुकर च्या तुलनेत या प्रेशर कुकर ची किंमत जास्त असते. या प्रेशर कुकर ला साफ करण्यासाठी तुम्ही मेटल चा स्क्रब वापरू शकत नाहीत. कारण याची कोटिंग खराब होते.

तर मित्रांनो यापैकी तुम्हाला ज्या प्रकारचा प्रेशर कूकर आवडेल तो तुम्ही घेऊ शकता. आम्ही खाली आर्टिकल मध्ये सर्वात चांगले प्रेशर कुकर सांगितले आहेत.

  • मित्रांनो काही प्रेशर कुकर हे इंडक्शन वर वापरण्यास योग्य नसतात. त्यामुळे जर तुम्हाला इंडक्शन वर वापरण्यास प्रेशर कुकर घ्यायचा असेल तर प्रेशर कुकर खरेदी करताना त्यावर ‘इंडक्शन स्टोव्ह कंपॅटीबल’ असे चिन्ह आहे की नाही ते एकदा तपासून घ्या.
  • प्रेशर कूकर खरेदी करताना तो लोकल ब्रँड चा न घेता. एखाद्या चांगल्या कंपनी चा घ्यावा. जेणे करून रिपेअरिंग साठी तुम्हाला जास्त त्रास होणार नाही.
  • तुम्ही जर मोठा कूकर घेणार असाल तर त्याच्या दोन्ही बाजूला हँडल असलेले घ्यावे. त्यामुळे हाताळण्यास सोपे जाते. आजकाल मार्केट मध्ये फोल्डिंग चे हँडल असलेले कुकर्स पण मिळतात. ते पण एकदा बघून घेण्यास काही हरकत नाही.
  • नॉन स्टिक चे प्रेशर कूकर शक्यतो घेऊ नये कारण त्यांचा पृष्ठभाग जास्त टिकत नाही व ते लवकर खराब होतात.
  • तुमच्याकडे जर डिश वॉशर असेल तर प्रेशर कूकर घेताना तो डिश वॉशर सेफ आहे की नाही ते नक्की तपासून घ्या.
  • मित्रांनो, प्रेशर कूकर खरेदी करताना त्याच्या झाकण बदललं पण विचार करायला हवा. प्रेशर कूकर चे दोन प्रकारचे झाकण असतात. एक आतून उघडणारे व दुसरे जे बाहेरून उघडतात. आतून उघडणारे झाकण जास्त सुरक्षित मानले जातात. तेव्हा तुमच्या पसंतीची हवा तो प्रेशर कूकर तुम्ही निवडू शकता.
  • प्रेशर कूकर खरेदी करण्याआधी त्याची वॉरंटी किती आहे ते बघून घ्या. कारण यामुळे जर त्या प्रेशर कूकर मध्ये काही दोष आढळल्यास किंवा काही नुकसान झाल्यास तुम्हाला ते एक्सचेंज करता येईल.

आता भारतातील सर्वात चांगले प्रेशर कूकर कोणते आहेत ते जाणून घेऊ या



Pigeon by Stovekraft Stainless Steel Pressure Cooker

पीजन स्टोव्हक्राफ्ट स्टेनलेस स्टील प्रेशर कूकर (Pigeon Stovekraft)

Pigeon by Stovekraft Stainless Steel Pressure Cooker 3L

मित्रांनो, पीजन चे हे प्रेशर कूकर पूर्ण पणे स्टेनलेस स्टील चे आहे. हे कूकर तुम्हाला 3 लिटर व 5 लिटर मध्ये पण मिळते. हे प्रेशर कूकर टिकाऊ आहे तसेच याचे हँडल पण चांगले आहे. याचा बेस हा स्टेनलेस स्टील व अल्युमिनियम दोघांचा मिळून बनलेला आहे. या प्रेशर कूकर तुम्ही गॅस स्टोव्ह किंवा इंडक्शन वर ही वापरू शकता. हा प्रेशर कूकर ISI सर्टीफाइड आहे. तसेच या प्रेशर कूकर ची तुम्हाला पाच वर्षांची वॉरंटी मिळते. या प्रेशर कूकरची किंमत बघायची झाली तर तीन लिटर च्या प्रेशर कूकर ची किंमत ही अंदाजे 1500 रुपये पर्यंत असू शकते. आणि पाच लिटर च्या प्रेशर कूकर ची किंमत ही अंदाजे 2000 रुपयेच्या जवळ पास असू शकते.

Prestige Nakshatra Alpha Pressure Cooker

प्रेस्टीज नक्षत्र अल्फा (Prestige Nakshatra Alpha)

Prestige Nakshatra Alpha Stainless Steel Pressure Cooker 3.5L

मित्रांनो, प्रेस्टीज चा हा प्रेशर कूकर खूप चांगला आहे. याचे रिझल्ट्स पण खूप चांगले आहेत. हा प्रेशर कूकर तुम्हाला साडे तीन लिटर मध्ये व पाच लिटर मध्ये पण मिळतो. हा प्रेशर कूकर पूर्ण पणे स्टेनलेस स्टील चा बनलेला आहे. याचा बेस पण अल्युमिनियम व स्टेनलेस स्टील दोघांचा मिळून बनलेला आहे. व तो खूप टिकाऊ आहे. या प्रेशर कूकर मध्ये हिट ट्रान्सफर लवकर होते त्यामुळे हा कूकर लवकर गरम होतो व त्यामुळे ऊर्जेची बचत होते. हा प्रेशर कूकर ISI प्रमाणित आहे. याची डिझाइन पण खूप चांगली आहे. या मॉडेल ची किंमत ही 3.50 लिटर च्या कूकर ची किंमत ही अंदाजे 2200 रुपये पर्यंत असू शकते. तर 5 लीटर च्या कुकरची किंमत ही 2500 रुपये पर्यंत असू शकते. हा प्रेशर कूकर तुम्ही गॅस स्टोव्ह तसेच इंडक्शन वर सुद्धा वापरू शकता. या प्रोडक्ट वर तुम्हाला पाच वर्षांची वॉरंटी मिळते. तसेच हा प्रेशर कूकर वापरण्यास सोपा व वजनाने हलका आहे. मध्यम किंवा लहान कुटुंबसाठी हा एक उत्तम कूकर आहे.

Hawkins Stainless Steel Pressure Cooker

हॉकिंस प्रेशर कूकर (Hawkins Pressure Cooker)

Hawkins Stainless Steel Contura Induction Pressure Cooker 3L

मित्रांनो, या पिशर कुकरचे खूप चांगले फीडबॅक आहेत. हा प्रेशर कूकर ऍपल डिझाइन मध्ये येतो. यामध्ये केलेल्या ॲपल डिझाईन मुळे हीट ट्रान्सफर सगळी कडे सारखी होते. त्यामुळे ऊर्जेची जास्त बचत होते. याचा बेस ही खूप वेगळ्या पद्धतीने डिझाईन केला आहे. हा प्रेशर कुकर तुम्ही गॅस स्टोव्ह तसेच इंडक्शन वर सुद्धा वापरू शकता. या प्रेशर कुकर वर तुम्हाला पाच वर्षांची वॉरंटी मिळते. तसेच या प्रेशर कुकर ची किंमत बघायची झाली तर जर तुम्ही 3 लिटरचा प्रेशर कूकर मॉडेल घेत असाल तर त्याची किंमत ही अंदाजे 2600 रुपये पर्यंत असू शकते व 5 लिटर प्रेशर कुकरच्या मॉडेल ची किंमत ही अंदाजे 3200 रुपये पर्यंत असू शकते. किंमत जरी जास्त असली तरी या मॉडेल चे रिझल्ट्स खूप चांगले आहेत.

Prestige Svachh Pressure Cooker

प्रेस्टीज स्वच्छ प्रेशर कूकर (Prestige Svachh Pressure Cooker)

Prestige Svachh 3 Litre Pressure Cooker with hard anodized Body

मित्रांनो, प्रेस्टीज चे हे प्रेशर कूकर मार्केट मध्ये खूप प्रसिद्ध आहे. हे प्रेशर कूकर वेगवेगळ्या डिझाइन्स मध्ये म्हणजे वेग-वेगळ्या साईझ आणि शेप्स मध्ये उपलब्ध आहे. हे प्रेशर कूकर डिश वॉशर सुरक्षित आहे. म्हणजे तुम्ही या कुकरला डिश वॉशर मध्ये सुद्धा धुऊ शकता. हे प्रेशर कूकर गॅस स्टोव्ह तसेच इंडक्शन वर सुद्धा वापरू शकता. या प्रोडक्ट वर तुम्हाला दहा वर्षांची वॉरंटी मिळते. तुम्ही जर 3 लिटर चा कूकर घेत असाल तर तुम्हाला ते 2300 रुपये पर्यंत मिळू शकते. आणि जर तुम्ही हे कूकर पाच लिटर चा घेणार असाल तर तुम्हाला ते 2800 रुपये पर्यंत मिळू शकते.

Borosil Pronto Induction Pressure Cooker

बोरोसिल प्रोन्टो प्रेशर कूकर ( Borosilicate Pronto Pressure Cooker)

Borosil Pronto Induction Base Stainless Steel Pressure Cooker 3L

मित्रांनो, बोरोसिल चे हे मॉडेल आत्ता पर्यंत चे सर्वात चांगले प्रेशर कूकर मॉडेल आहे. याचे रिझल्ट्स आणि फीडबॅक खूप चांगले आहेत. याची बिल्ड क्वालिटी आणि हँडल क्वालिटी खूप चांगली आहे. खूप टिकाऊ असे हे मॉडेल आहे. तसेच हे प्रेशर कूकर ISI प्रमाणित आहे. व या प्रोडक्ट वर तुम्हाला पाच वर्षांची वॉरंटी मिळते.याचा बेस पण खूप चांगल्या क्वालिटी चा आहे. यात हिट ट्रान्स्फर पण खूप लवकर होते. त्यामुळे अन्न लवकर शिजते. बोरोसिल चा तीन लिटर चा प्रेशर कूकर हा तुम्हाला 2500 रुपये पर्यंत मिळू शकतो. तर 5 लिटर चा प्रेशर कूकर हा तुम्हाला 2700 रुपयेच्या जवळ पास असू शकतो.


तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण भारतातील सर्वात चांगले प्रेशर कूकर बद्दल जाणून घेतले. आशा आहे की तुम्ही पण जेव्हा प्रेशर कूकर खरेदी करायला जाल तेव्हा या गोष्टींचा तुम्हाला नक्की फायदा होईल. तसेच हा लेख व ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास तुमच्या मित्र मंडळीं सोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!