Shop

पोर्टेबल एसी म्हणजे काय त्याची फायदे तोटे काय आहेत ? | Portable AC Buy or Not

Portable AC

नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखात आपण पोर्टेबल एसी (Portable AC) बद्दल जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, आत्ता उन्हाळा चालू आहे. आणि त्यातल्या त्यात मे महिना असल्या वर तर विचारायलाच नको. या गर्मी पासून वाचायचे असेल तर आपण आपले घर थंड ठेवले पाहिजे. त्यासाठी आपण घरात AC आणतो. तसे पहायला गेले तर बाजारात अनेक प्रकारचे एसी उपलब्ध आहेत. जसे की स्प्लिट एसी, विंडो एसी, वगैरे. पण आज आपण आकाराने लहान असलेल्या पण एका शक्तिशाली अश्या Portable AC बद्दल बोलत आहे. जर तुम्ही तुमच्या घरासाठी एखादे कूलिंग डिवाइझ घेण्याचा विचार करत असाल, तर हे Portable AC तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.



चला तर मग या पोर्टेबल एसी बद्दल माहिती जाणून घेऊ या.

पोर्टेबल एसी (Portable AC) म्हणजे नेमकं काय

पोर्टेबल एसी म्हणचे असे एसी आहे की जे सहज रित्या एका ठिकाणा हून दुसऱ्या ठिकाणी हलवता येईल. सध्या बाजारात इतर एसी च्या तुलनेत या पोर्टेबल एसी ची मागणी वाढत चालली आहे. कारण हे पोर्टेबल एसी आकाराने लहान असतात आणि इतर एसीच्या तुलनेत वजनाने थोडे हलके असतात. त्यामुळे ते एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये सहज हलवता येतात. तसेच यात फक्त एक Exhaust पाइप येईल ज्याचे एक टोक तुम्हाला एसीच्या मागे जॉईंट करून दुसरे टोक खिडकी किंवा दरवाजाच्या बाहेर काढायचे आहे. जेणे करून गरम हवा बाहेर फेकली जाईल व रूम थंड राहील.

या पोर्टेबल एसी चे काही फायदे जाणून घेऊ या

Advantages of Portable AC

  • पोर्टेबल एसी हे आकाराने लहान असतात. त्यामुळे याला जास्त जागा लागत नाही.
  • या पोर्टेबल एसी ला इंस्टॉल करण्याचा कोणताही खर्च लागतं नाही.
  • या पोर्टेबल एसी ला खाली व्हील्स (चाके) असल्यामुळे ते सहज एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवता येऊ शकते.
  • इतर एसी च्या तुलनेत या पोर्टेबल एसी चे वीज बिल कमी येते.
  • कुलिंग रेंज बद्दल सांगायचे झाले तर यात तुम्हाला स्पीड ऍडजस्ट करण्याचे म्हणजे लो, मेडिउम, हाय असे बटन मिळतात. तसेच लहान जागेला हा पोर्टेबल एसी लवकर थंड करतो.
  • हा पोर्टेबल एसी ह्युमीडिफायर आणि प्युरीफायरचे देखील काम करतो.
  • या एसीला तुम्ही रिमोट ने सुद्धा कंट्रोल करू शकता.
  • तुम्ही जर भाड्याच्या घरात राहत असाल तर हे पोर्टेबल एसी तुमच्यासाठी उत्तम आहे. कारण हे एसी ट्रान्सपोर्टेशन आणि शिफ्टिंग करण्यासाठी सोपे आहे.

पोर्टेबल एसी चे काही तोटे

Disadvantages of Portable AC

  • इतर म्हणजे स्प्लिट आणि विंडो एसी च्या तुलनेत या एसीचा आवाज थोडा जास्त येतो.
  • या पोर्टेबल एसी चे कंप्रेसर व मशिनरी इतर एसी च्या तुलनेत छोटी असल्यामुळे या एसी ला मोठी रूम थंड करायला थोडा वेळ लागु शकतो.
  • तसेच काही एसी मध्ये इन बिल्ट वॉटर ट्रे असतो ज्यातले पाणी काढावे लागते तसेच या पोर्टेबल एसी मधले पाणी काढण्याचा थोडा त्रास होऊ शकतो.

तर मित्रांनो, प्रत्येक एसी मध्ये काही न काही दोष असतात तसेच पोर्टेबल एसी मध्ये पण आहेत. पण एकंदरीत विचार केला तर पोर्टेबल एसी हे इतर कूलिंग डीवाइझ पेक्षा नक्कीच चांगले आहे. तसेच ते कमी किंमतीत बाजारात उपलब्ध असल्याने परवडण्यासारखे आहे.



Amazon वरती असलेले सर्वात चांगले पोर्टेबल एसी (Portable AC)

तर मित्रांनो, तुम्ही एखादे एअर कंडिशनर घेण्याचा विचार करत असाल तर पोर्टेबल एअर कंडिशनर च घ्या. व इतरांना ही पोर्टेबल एसी घेण्याचा सल्ला द्या. मित्रांनो, तुम्हाला आजचा लेख आवडला असेल अशी मी आशा करतो आणि जर तुम्हाला हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!