चेहऱ्यावर पिंपल्स का येतात?, आणि त्यावर घरगुती उपाय काय | How Do Pimples Form? Causes, Types, and More
नमस्कार मित्रांनो, नेहमी प्रमाणे आजही आम्ही तुमच्यासाठी एक नवीन व महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण चेहऱ्यावर येणाऱ्या पिंपल्सला कमी कसे करायचे, पिंपल्स येण्याची कारणे काय आहेत, ते येऊ नयेत यासाठी काय उपाय करावे, अश्या विविध गोष्टी बद्दल जाणून घेणार आहोत.
पिंपल्स किंवा मुरुमं म्हणजे नेमकं काय? व ते का होतात?
मित्रांनो, प्रत्येकाला असं वाटत असतं की आपली त्वचा नितळ, चांगली आणि तजेलदार असावी. पण या मध्ये समस्या निर्माण करणारी गोष्ट म्हणजे पिंपल्स किंवा मुरुमं किंवा त्याला पुरळ (acne) असेही म्हटले जाते. पिंपल्स किंवा मुरुमं हे शक्यतो जास्त करून चेहऱ्यावर येत असतात. चेहऱ्याच्या आत असलेले ऑइल ग्लँड्सला जेव्हा संसर्ग होतो तेव्हा पिंपल्स यायला सुरुवात होते.
हे पिंपल्स साधारण पणे लाल रंगाचे व पुळीच्या आजूबाजूला सूज आणणारे असतात. मुली व स्रिया मध्ये पिंपल्स येण्याचे प्रमाण जास्त असते. त्यात ही तारुण्यात पीपंल्स येण्याचे प्रमाण जास्त असते. याचे बरेच कारणं आहेत, त्यातल्या त्यात महत्वाचे कारण म्हणजे शरीरात होणारे हार्मोनल चेंजेस. तरुण वयात येणाऱ्या या पिंपल्स ला तारुण्य पिटिका असेही म्हटले जाते.
पिंपल्स येण्याची काय कारणे आहेत?
Why do Pimples Appear ?
मित्रांनो, जेव्हा आपल्याला एखादी समस्या असते तेव्हा त्या समस्येचे कारण काय आहे हे आपल्याला माहीत असायला हवे. जर कारण माहीत असेल तरच आपण त्यावर उपाय करू शकतो. म्हणूनच चेहऱ्या वर पिंपल्स येण्याचे काय काय कारणे आहेत त्या बद्दल जाणून घेऊ या.
कारण 1 – मित्रांनो, पिंपल्स येण्याचे पहिले कारण म्हणजे तारुण्य अवस्था. याचे कारण म्हणजे हार्मोनल चेंजेस. साधारणपणे 12 ते 14 वर्षाच्या मुली आणि मुलांमध्ये याचे म्हणजे पिंपल्स येण्याचे प्रमाण जास्त असते. फक्त तरुण मुलीचं नाही तर तरुण अवस्थेत असणाऱ्या मुलांमध्ये ही पिंपल्स येण्याचे प्रमाण जास्त आहे.
कारण 2 – पिंपल्स येण्याचे दुसरे कारण म्हणजे प्रदूषण. प्रदूषणामुळे त्वचेला सर्वात जास्त प्रमाणात हानी पोहचते. हवेतील धूळ व मातीचे कण चेहऱ्यावर बसतात व त्वचेचे छिद्र बंद करतात. तसेच त्वचेवर असलेला तेलाच्या थराला हे धुळीचे कण चिपकुन संसर्ग होतो. व आपल्याला त्यामुळे नंतर पिंपल्स किंवा मुरुमं यायला सुरुवात होते.
कारण 3 – पिंपल्स येण्याचे तिसरे कारण म्हणजे आपली खाण्याची सवय. आजकालच्या काळात फास्ट फूड व जंक फूड चे प्रमाण अतिशय वाढत चालले आहे. खास करून तरुण मुला-मुलीं मध्ये फास्ट फूडचे खाण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात दिसून येते. या फास्ट फूड मुळे चेहऱ्यावर पिंपल्स देखील येऊ शकतात. त्यामुळे अती तेल कट व मसाले दार पदार्थ खाणे टाळावे. शक्यतो फळे, भाज्या याकडे जास्त लक्ष द्यावे.
कारण 4 – पिंपल्स येण्याचे चौथे कारण म्हणजे मानसिक ताण तणाव. जात विचार करणे किंवा कोणत्याही गोष्टीचा तणाव घेणे यामुळे चेहऱ्या वर असलेल्या ग्लँड्स चे छिद्र ब्लॉक होऊन पिंपल्स येऊ शकतात.
कारण 5 – पिंपल्स येण्याचे पाचवे आणि सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे शरीरात होणारे हार्मोनल चेंजेस. तरुण अवस्थेत हार्मोनल चेंजेस जास्त प्रमाणात होत असते. त्या मूळे पिंपल्स येऊ शकतात. हार्मोनल चेंजेस मुले वयाच्या पंचवीशी नंतर सुद्धा पिंपल्स येऊ शकतात. स्रियां मध्ये शक्यतो पाळीच्या दरम्यान पिंपल्स येण्याचे प्रमाण जास्त असते. कारण त्यावेळी हॉर्मोन्स चे प्रमाण जास्त बदलत असते.
पिंपल्स जाण्यासाठी किंवा होऊ नये यासाठी काही उपाय
How to Get Rid of Acne: Home Remedies for Pimples
- मित्रांनो, शरीराच्या इतर त्वचेच्या तुलनेत आपल्या चेहऱ्या वरील त्वचा ही अधिक संवेदनशील असते. त्यामुळे तिची योग्य ती निगा राखणे खूप महत्त्वाचे आहे. पिंपल्स झाल्यावर सुरवातीला जास्त करून शक्यतो नैसर्गिक उपचार करावेत. यामध्ये तुम्ही कोरफडीचे जेल वापरू शकता कारण यामध्ये अँटी बॅक्टेरियल कन्टेन्ट असतात. तसेच हळद, दही आणि मधाचं एकत्र मिश्रण करून ते चेहऱ्यावर लावू शकता यामुळे चेहऱ्या वर पिंपल्स किंवा मुरूम येणे टाळता येऊ शकेल.
- याशिवाय जर तुम्हाला फेस पॅक किंवा फेस मास्क वापरण्याची सवय असेल तर अशा वेळेस तुम्ही हर्बल प्रोडक्ट वापरलेले पाहिजे.
- चेहऱ्या वरील पिंपल्स किंवा मुरुमांसाठी हर्बल प्रोडक्ट शिवाय इतर काही औषधे सुद्धा तुम्ही वापरू शकता. फक्त कोणतीही औषधी उत्पादने वापरण्यापूर्वी तज्ञ डॉक्टरांचा म्हणजेच त्वचा रोग तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.
- जर तुम्ही कॉस्मेटिक उत्पादने वापरणार असाल तर ती चांगल्या क्वालिटीची असावी. तसेच तज्ञांच्या सल्ल्या नुसार वापरावी.
- मित्रांनो तुमच्या खाण्याची सवय सुद्धा तुमच्या त्वचेला बाधक ठरू शकते. त्यामुळे बाहेरील फास्ट फूड किंवा जंक फूड तसेच तेल कट पदार्थ, तिखट पदार्थ खाणे शक्यतो टाळावेत व त्या ऐवजी ओमेगा थ्री ने भरपूर असलेले पदार्थ खावेत जसे की मासे, सुकामेवा.
- याशिवाय तुमच्या आहारात भाज्या, फळे, सोयाबीन, कडधान्ये यांचा समावेश करावा व पांढरा भात, बेकरी प्रोडक्ट, ब्रेड, साखर यांचे आहारात प्रमाण हे कमी च असावे.
- तसेच पुरेसी झोप घेणे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे व कुठल्याही ताण तणावा पासून दूर राहा. नियमित जेवा व तुमच्या त्वचेची काळजी घ्या.
- चेहऱ्या वर आलेले पिंपल्स हे कधीही फोडू नका. त्यामुळे तुमच्या त्वचेला हानी पोहचू शकते किंवा चेहऱ्या वर त्यांचे कायम स्वरूपी डाग पडू शकतात.
- तसेच पिंपल जर आला असेल तर त्यावर तुम्ही थोडेसे नारळाचे तेल लावा. तुम्हाला लवकरच आराम मिळेल. व पिंपल्सचे डाग ही पडणार नाही.
- पिंपल्स घालवण्यासाठी टुथ पेस्टचा ही वापर करण्यात येतो. टूथ पेस्ट मुळे चेहऱ्यावरील मुरुमं लवकर निघून जाण्यास मदत होते.
- याशिवाय लसणाची पाकळी घेऊन ती कापून पिंपल्सच्या जागी लावावी. त्याने सुद्धा लवकरच पिंपल्स निघून जातात.
- तसेच दिवसातून दोन ते तीन वेळा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. फक्त यात साबणाचा वापर करू नका. फक्त स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा.
- दिवस भर इकडे तिकडे लागलेले घाण हात चेहऱ्याला लावू नका. कारण चेहऱ्याला इन्फेक्शन होऊन पिंपल्स येऊ शकतात. हात स्वच्छ धुवून मगच चेहऱ्याला लावावा.
- केसांमध्ये होणार कोंडा सुद्धा पिंपल्स येण्याचं एक कारण असू शकत. त्यामुळे केसांमध्ये कोंडा होणार नाही याची काळजी घ्या. तुमचे केस स्वच्छ ठेवा.
- रोज सन स्क्रिन लोशन वापरा. तसेच रात्री झोपण्यापूर्वी मेकअप काढून टाकावा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भरपूर पाणी प्या.
- चंदन पावडर आणि गुलाब पाणी यांची पेस्ट बनवून ती चेहऱ्यावर लावल्यास पिंपल्स येत नाही.
- याशिवाय बेसन पीठ व लिंबू एकत्र करून पेस्ट बनवा व ती पेस्ट चेहऱ्या वर नियमित पणे लावल्यास पिंपल्स ची समस्या येत नाही.
- तसेच मुलतानी माती, हळद, गुलाब पाणी यांची पेस्ट करून लावल्यास ही पिंपल्स किंवा मुरुमं कमी होण्यास मदत होते.
- पिंपल्स घालवण्यासाठी केळी कुस्करून त्यात थोडे दही व मध टाकून त्याची पेस्ट चेहऱ्या वर लावल्यास तुम्हाला लवकरच फरक जाणवेल.
वरील सर्व उपाय करून ही जर तुमच्या चेहर्या वरील पिंपल्स कमी होत नसतील तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्यानुसार पिंपल्स घालवण्यासाठी किंवा पिंपल्स चे डाग कमी करण्यासाठी लेझर ट्रीटमेंट करू शकता.
मित्रांनो, प्रत्येकाची त्वचा ही वेग वेगळी असते. त्यामुळे वरील सर्व उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप आवश्यक आहे. कुठलाही उपाय करण्याआधी डॉक्टरांना एकदा नक्की विचारा.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण चेहऱ्या वरील पिंपल्स जाण्यासाठी किंवा पिंपल्स होऊ नये यासाठी विविध उपाय बघितले. आशा आहे की तुम्हाला आमचा आज चा हा लेख नक्कीच आवडला असेल. आणि हो, तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.
धन्यवाद