पीएफ ऑनलाइन क्लेम प्रोसेस फक्त 5 स्टेप मध्ये | How to Withdraw PF Online - MarathiDiary
EPFएम्प्लॉई पोव्हिडन्ट फंड (EPF)

पीएफ ऑनलाइन क्लेम प्रोसेस फक्त 5 स्टेप मध्ये | How to Withdraw PF Online

नमस्कार मित्रांनो, आमच्या आजच्या या नवीन लेखात आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नेहमी प्रमाणे आज ही आम्ही तुमच्यासाठी काही नवीन व उपयोगी माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो, आज आपण पीएफ ची रक्कम ऑनलाईन पद्धतीने कसे काढू शकतो याबद्दल जाणून घेणार आहोत.

How to Withdraw PF Online in Marathi

मित्रांनो, सरकारी नोकरी असो किंवा खाजगी आजकाल प्रत्येक नोकरीच्या ठिकाणी तुमच्या पगारातून एक ठराविक रक्कम पीएफच्या स्वरूपात कापली जाते व सेवा निवृत्तीच्या वेळी ती पूर्ण जमा झालेली रक्कम तुम्हाला दिली जाते. थोडक्यात सांगायचे झाले तर पीएफ जमा होतो म्हणजे एक प्रकारे तुमची गुंतवणूकच होते. जी निवृत्त झाल्यावर खूप कामी येते. पण जर नोकरीच्या दरम्यान तुम्हाला कधी पैश्यांची गरज पडली तर हे पैसे काढता येतात का? तर याच उत्तर ‘हो’ असे आहे.



मित्रांनो, आता तुम्ही तुमच्या पीएफ मधील रक्कम ही निवृत्त होण्या आधीही काढू शकता, पण तसे कारण ही हवे. जसे की शिक्षणासाठी, लग्नासाठी, काही आजार पणासाठी किंवा जर तुम्ही दोन महिन्या पेक्षा जास्त बेरोजगार असाल तर तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यातून पैसे काढता येतात. पण हा पीएफ कसा काढायचा ते बऱ्याच लोकांना माहीत नसते. मग अश्या वेळेस लोक पीएफ ऑफिसला किंवा एखादया एजंटकडे जाऊन पीएफ काढतात व त्याबद्दल एजंटला पैसे म्हणजेच कमिशन देतात. पण आता तुम्हाला पीएफ काढण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही, कारण आता तुम्ही घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने पीएफ काढू शकणार आहात.

तुम्हाला ही ऑनलाईन पद्धतीने पीएफ कसा काढायचा हे जाणून घ्यायचे असेल तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

पीएफ ऑनलाइन क्लेम प्रोसेस

ऑनलाइन पद्धतीने पीएफ (PF) काढण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा:-

मित्रांनो, पीएफचा क्लेम अप्लाय करण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले गरज असते ती म्हणजे तुमचा UAN नंबर ची. UAN म्हणजे Universal Account Number. हा नंबर पहिल्यांदा पीएफ अकाउंट ओपन करतांना मिळतो. हा 12 अंकी नंबर असतो. आणि याचा वापर पीएफ खात्याश शिल्लक रक्कम आणि पीएफ बद्दल इतर तपशील जाणून घेण्यासाठी केला जातो. ज्याप्रमाणे तुमचा पॅन नंबर किंवा आधार नंबर कायमस्वरूपी असतो त्याचप्रमाणे UAN नंबर सुद्धा कायमस्वरूपी असतो. हा नंबर तुम्हाला तुमच्या पेमेंट स्लिप वर बघायला मिळेल.

मित्रांनो, पीएफ पोर्टल वर लॉगिन करण्यासाठी युझरनेम व पासवर्ड ची आवश्यकता पडणार असते. युझरनेम हा तुमचा UAN नंबर असतो. आणि पासवर्ड मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचा UAN नंबर ऍक्टिव्हेट करावा लागतो. व नंतर पासवर्ड तयार करावा लागतो.



स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला गूगल वरती “epfo” असे टाइप करायचे आहे. त्या नंतर “Employees’ Provident Fund Organisation” या सर्च रिझल्ट वर क्लिक करायचे आहे. किंवा आम्ही तुम्हाला डायरेक्ट epfo ची लिंक देत आहे त्यावर क्लिक करा.

पीएफ ऑनलाईन क्लेम करण्यासाठी epfo लिंक => epfindia.gov.in

How to Withdraw PF Online Step 1

स्टेप 2: वेबसाईटवर ओपन झाल्यावर तुम्हाला होम पेज वर काही ऑप्शन दिसतील त्यातील Online Claim Member Account Transfer या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

How to Withdraw PF Online Step 2

स्टेप 3: आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला लॉग इन करायचे आहे. म्हणजे लॉग इन करताना तुम्हाला तुमचा UAN नंबर टाकायचा आहे व खाली पासवर्डच्या जागी तुम्हाला UAN ऍक्टिव्हेट करताना तयार केलेला पासवर्ड टाकायचा आहे. नंतर कॅपचा कोड टाकून Sign in बटन वर क्लिक करायचे आहे. या नंतर तुमचे पीएफ अकाउंट वर लॉग इन होऊन जाईल.

(महत्वाची टीप: मित्रांनो, पीएफ क्लेम करताना तुमच्या पीएफ अकाउंट ला केवायसी (KYC) अपडेट असणे गरजेचे आहे. म्हणजेच तुमचे आधार नंबर, बँक अकाउंट, पॅन डिटेल्स वगैरे सगळंच अपडेट असले पाहिजे. अन्यथा तुम्ही पीएफ क्लेम करू शकत नाही.)



How to Withdraw PF Online Step 3

स्टेप 4: मित्रांनो, तुमचे KYC स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला आता Manage या ऑप्शन मध्ये जायचे आहे. व KYC वर क्लिक करून तुम्ही तुमचे स्टेटस चेक करू शकता. आणि जर एखादी KYC पूर्ण नसेल तर डॉक्युमेंट अपलोड करून ती पूर्ण करा.

How to Withdraw PF Online Step 4

त्यानंतर तुम्हाला Online Services मध्ये Claim (FORM- 31,19,10C & 10D) या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

How to Withdraw PF Online Step 4 sub-step 2

स्टेप 5: त्या नंतर Online Claim चे पेज उघडेल, तेथे तुमची सर्व माहिती असेल थोडे खाली स्क्रोल करून तुम्हाला तुमच्या बँक अकाउंट ला व्हेरिफाय करायचे आहे. त्यासाठी तुमचा बँक अकाउंट नंबर दिलेल्या बॉक्स मध्ये टाकून Verify बटन वर क्लिक करायचे आहे.

( महत्वाची टीप : ज्या बँकने तुम्ही KYC केलेली आहे त्याच बँकेचा नंबर टाका, ते अकाउंट चालू नसेल तर परत नवीन बँकेची KYC करून घ्या नंतर क्लेम साठी अर्ज करा)

हा लेखा पण वाचापीएफ (PF) अकाउंट मध्ये बँक डिटेल्स ऍड किंवा अपडेट कसे करायचे

How to Withdraw PF Online Step 5

नंतर Certificate of undertaking वर Yes क्लीक करायचे आहे. व नंतर Proceed to online claim या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

How to Withdraw PF Online Step 5 sub-step 2

स्टेप 6: आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला I want to apply for मध्ये तुमच्या क्लेम फॉर्म ला सिलेक्ट करायचे आहे. त्यात तुम्हाला चार प्रकारचे फॉर्म दिसतील, त्यातील जर तुम्ही नोकरी करताना पीएफ मधील अमाउंट काढणार असाल तर तुम्हाला PF advance (फॉर्म 31) हा फॉर्म निवडायचा आहे.

How to Withdraw PF Online Step 6

त्यानंतर तुम्हाला पीएफ काढण्याचे कारण (Purpose) काय आहे ते सांगायचे आहे. त्या नंतर epfo च्या नियमानुसार पीएफ अमाउंटला कॅल्क्युलेट करून तुम्हला Withdraw amount टाकायची आहे.

How to Withdraw PF Online Step 6 sub-step 2

यानंतर तुमचा पूर्ण पत्ता टाकायचा आहे. हा पत्ता तुमच्या आधार नुसार असायला हवा. या नंतर तुम्हाला तुमच्या पासबुकची/ कॅन्सल चेक कॉपी अपलोड करायची आहे. नंतर दिलेले Disclaimer ला टिक करून Get Aadhar OTP या बटन वर क्लिक करायचे आहे. (मित्रांनो, इथे तुमच्या आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे.)

How to Withdraw PF Online Step 6 sub-step 3

मित्रांनो, आता तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो तुम्हाला दिलेल्या जागी टाकून Validate OTP and submit claim form या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. व तुमचा कलम सबमिट होऊन जाईल.

How to Withdraw PF Online Step 6 sub-step 4

काही दिवसांनी तुमच्या पीएफ अकाउंट मधील पैसे तुमच्या बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर केला जाईल. अमाउंट ट्रान्सफर केल्यावर तुम्हाला epfo द्वारे SMS पण पाठविला जातो.

तर मित्रांनो अश्या प्रकारे तुम्ही घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने तुमच्या पीएफ क्लेम करून काढु शकता.

तर मित्रांनो, आशा करतो की या माहितीचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. तसेच हा लेख तुम्हाला आवडला असेल किंवा महत्व पूर्ण वाटला असल्यास तुमच्या मित्र मंडळीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद

Tags: PF withdrawal process online in Marathi, PF withdrawal in Marathi, EPF withdrawal process in Marathi, PF online kadhane, PF claim process in Marathi, PF claim Mahiti, PF withdrawal Mahiti

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद

error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!