पेटीएम मध्ये UPI Lite कसे ऍक्टिव्हेट करायचे व ते कसे वापरायचे? | PayTM UPI Lite - MarathiDiary
Payment AppPaytmUPI

पेटीएम मध्ये UPI Lite कसे ऍक्टिव्हेट करायचे व ते कसे वापरायचे? | PayTM UPI Lite

नमस्कार मित्रांनो, आज आपण पेटीएम मध्ये यूपीआई लाइट (PayTM UPI Lite) कसे ऍक्टिव्हेट करायचे व ते कसे वापरायचे, या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, आजकालच्या डिजिटल काळात आपण सर्व जण डिजिटल पद्धतीने सर्व गोष्टी करतो. अगदी कुठले ही पेमेंट करायचे असेल तरीही आपण डिजिटल पद्धतीने च करतो. डिजिटल पेमेंट करताना आपण UPI चा वापर करतो. या UPI ची व्यवहार प्रक्रिया सुलभ करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने सप्टेंबर 2022 मध्ये UPI Lite लाँच केले होते. NPCI च्या परिपत्रका नुसार, देशभरातील एकूण UPI व्यवहारांपैकी 50 टक्के व्यवहार हे 200 रुपये किंवा त्याहून कमी किमतीचे केले जात असे. पण मित्रांनो, जेव्हा व्यवहार जास्त प्रमाणात होतात, तेव्हा UPI सिस्टीम ओव्हरलोड होते, त्यामुळे बँकांमधील व्यवहार उशिरा होतात. आणि अनेक वेळा पेमेंट्स अडकतात. या व्यतिरिक्त, यूपीआई वापरताना त्याला पिन तयार करावा लागतो आणि नंतर बँकेने पेमेंट सुरू करण्याची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे UPI ला उशीर होतो. म्हणून, पेमेंट लवकर व्हावे यासाठी आणि बँकांमधील विलंब कमी करण्यासाठी, UPI Lite सुरू करण्यात आले. या आधी BHIM अँप ने UPI Lite व्यवहारांना परवानगी देणे सुरू केले, आणि आता अलीकडेच Paytm हे UPI Lite लाँच करणारे पहिले डिजिटल पेमेंट अँप बनले आहे. हो मित्रांनो, आता पेटीएम मध्ये ही तुम्ही यूपीआई लाइट ऍक्टिव्हेट करून तुम्ही तुमच्या छोट्या छोट्या किंमतीचे व्यवहार अगदी सोप्या व जलद पद्धतीने करू शकणार आहात. तसेच बँकांच्या स्टेटमेंट मध्ये यूपीआई लाइट च्या व्यवहाराची एन्ट्री दिसत नाही. पण हे यूपीआई लाइट पेटीएम मध्ये ऍक्टिव्हेट कसे करायचे व नंतर ते कसे वापरायचे या बद्दल तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.



PayTM UPI Lite Information in Marathi

सर्वात पहिले यूपीआई लाइट (UPI Lite) काय आहे या बद्दल थोडे जाणून घेऊ या

UPI Lite म्हणजे काय?

मित्रांनो, यूपीआई लाइट हे कमी किंमतीचे व्यवहार सुलभ करण्यासाठी डिझाइन केलेले एक डिजिटल ऑन डिव्हाइस वॉलेट आहे. या नवीन फीचर मुळे छोटे छोटे व्यवहार अगदी सुलभ व जलद पद्धतीने होतील. मित्रांनो, यूपीआई लाइट ची कमाल मर्यादा ही रू 200 इतकी आहे. तर कमाल शिल्लक मर्यादा ही रू 2000 इतकी आहे. वापरकर्ता UPI Lite च्या वॉलेट मध्ये रु 2000 लोड करू शकतो आणि शिल्लक रकमेचा पूर्ण वापर होईपर्यंत व्यवहार करण्यासाठी वापरू शकतो. प्रति व्यवहार जास्तीत जास्त रु 200 आहे. त्यामुळे, मर्यादा गाठेपर्यंत वापरकर्ता अनेक व्यवहार करू शकतो. जर रू 2000 मर्यादा संपवून वापरकर्त्याला त्यापुढील व्यवहारांची आवश्यकता असेल तर ते त्यांच्या यूपीआई लाइट खात्यात किंवा वॉलेट मध्ये आणखी रू 2000 जोडू शकतात. म्हणजे दिवसाला एकूण 4000 रुपये ऍड करू शकतात. यूपीआई लाइट चे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे UPI पिन न जोडता किंवा व्यवहार करताना बँक पुष्टीकरणाची प्रतीक्षा न करता, 200 रुपयां पर्यंतचे झटपट व्यवहार करता येतात. आणि दिवसभरात लहान लहान किंमतीचे कितीही व्यवहार तुम्ही करू शकता.

तसेच UPI Lite वॉलेट च्या खात्या मधून केलेले व्यवहार हे UPI Lite खात्यातून कापले जातात, लिंक केलेल्या बँक खात्यातून नाही. यामुळे बँकेच्या पासबुक मध्ये वारंवार डेबिट होणाऱ्या व्यवहारांची संख्या कमी होईल, परिणामी व्यवहारांचे रेकॉर्ड ठेवणे सोपे होते. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की जेव्हा जेव्हा UPI Lite द्वारे व्यवहार केला जातो तेव्हा तेव्हा वापरकर्त्याला एक एसएमएस सूचना ही पाठवली जाते. थोडक्यात सांगायचे झाले तर ज्या लोकांना वारंवार छोटे मोठे व्यवहार करावे लागतात त्यांच्यासाठी यूपीआई लाइट हे फिचर खूप उपयुक्त आहे. कारण प्रत्येक वेळी पिन किंवा पासकोड न टाकता सर्व प्रोसेस जलद आणि अधिक सोयीस्कर रित्या होते. त्यामुळे तुम्ही जर पेटीएम वापरत असाल तर आजच पारंपारिक पेमेंट पद्धती सोडून द्या व तुमच्या पेटीएम मध्ये यूपीआई लाइट ऍक्टिव्हेट करून या डिजिटल पेमेंट पद्धतीचा वापर करा.

आता पेटीएम मध्ये यूपीआई लाइट (UPI Lite) कसे ऍक्टिव्हेट करायचे ते जाणून घेऊ या:

पेटीएम UPI Lite कसे ऍक्टिव्हेट करायचे

स्टेप 1: मित्रांनो, तुम्ही जर आधीच पेटीएम वापरत असाल तर सर्वात आधी पेटीएम अँप अपडेट करून घ्या. व नंतर ते अँप ओपन करा.



स्टेप 2: आता अँप च्या होम पेज वरच थोडे खाली तुम्हाला UPI Lite चा ऑप्शन लिहिलेला दिसेल, त्यावर क्लिक करायचे आहे. जर तिथे हा ऑप्शन दिसत नसेल तर सर्च ऑप्शन मध्ये जाऊन UPI lite असे टाकून सर्च करा. तुम्हाला हे फिचर दिसेल, किंवा तुम्ही लिंक बँक अकाउंट मध्ये जाऊन सर्वात वरती तुम्हाला UPI Lite ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक जर शकता.

Paytm UPI LITE Wallet Activate Kase karayche Step 2

स्टेप 3: आता यूपीआई शी लिंक असलेले सर्व बँक अकाउंट तुम्हाला दाखवले जातील. पण मित्रांनो, सर्वच बँक यूपीआई लाइट ला सपोर्ट करत नाहीत. फक्त काही निवडक बँका यूपीआई लाइट ला सपोर्ट करतात. त्यात स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक यासारख्या बँकांमध्ये तुम्हाला यूपीआई लाइट चे फिचर मिळत आहे. तर इथे वरती तुम्हाला सांगितले जाईल की यूपीआई लाइट द्वारे तुम्ही 200 रुपये पर्यंत चे पेमेंट करू शकता. आता या फिचर ला चालू करण्यासाठी तुमची बँक सिलेक्ट करून खाली दिलेल्या Proceed to Setup UPI Lite या बटन वर क्लिक करायचे आहे.

Paytm UPI LITE Wallet Activate Kase karayche Step 3

स्टेप 4: मित्रांनो आता यूपीआई लाइट ला ऍक्टिव्हेट करण्यासाठी तुम्हला Add Money असे सांगितले जाईल. तर तुम्हाला इथे अमाउंट टाकून खाली दिलेल्या Add Money to UPI Lite या बटन वर क्लिक करायचे आहे. (मित्रांनो, तुम्ही जास्तीत जास्त 2000 रू ऍड करू शकता. एकदा ही अमाउंट संपल्यावर परत रू 2000 अमाउंट तुम्ही रिलोड करू शकता. म्हणजे दिवसातून जास्तीत जास्त 4000 रू तुम्ही यूपीआई लाइट खात्यात ऍड करू शकता.)

Paytm UPI LITE Wallet Activate Kase karayche Step 4

स्टेप 5: नंतर यूपीआई पिन टाकायचा आहे. व थोड्याच वेळात तुमच्या यूपीआई लाइट खात्यात पैसे ऍड होऊन जातील. व यूपीआई लाइट तुमच्या बँक अकाउंट ला लिंक केले जाईल.

Paytm UPI LITE Wallet Activate Kase karayche Step 5

Paytm UPI LITE चा बॅलन्स चेक कसा करायचा?

आता यूपीआई लाइट ला ऍक्सेस करण्यासाठी परत होम पेज वर येऊन UPI Lite ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. जर तिथे हा ऑप्शन दिसत नसेल तर सर्च ऑप्शन मध्ये जाऊन UPI lite असे टाकून सर्च करा. पुढच्या पेज वर यूपीआई लाइट खात्यामध्ये किती अमाउंट आहे ते दाखवले जाईल. इथूनच तुम्ही अमाउंट परत ऍड ही करू शकता. व त्या खाली तुम्ही केलेल्या पेमेंट ची हिस्ट्री सुद्धा दाखवली जाईल.



Paytm UPI LITE Balance Check Kasa Karaycha

Paytm UPI LITE पेमेंट हिस्टरी चेक कशी करायची?

मित्रांनो, तुम्हाला आता Paytm च्या होम पेज वर जायचे आहे. नंतर Balance & History या ऑप्शन मध्ये क्लिक करायचे आहे. पुढच्या पेज वर तुम्हाला Paytm UPI LITE चे सर्व डिटेल्स बघायला मिळतील. जसे की तुमचा बॅलन्स किती आहे, Paytm Postpaid मध्ये किती अमाउंट आहे, यूपीआई लाइट मध्ये किती बॅलन्स आहे, बँक अकाउंट मध्ये किती शिल्लक आहे, ट्रांझक्शन किती झाले असे सर्व डिटेल्स इथे बघायला मिळतात.

Paytm UPI LITE Payment History Check Kashi Karaychi

Paytm UPI LITE अँप वरून पैसे कसे पाठवायचे?

मित्रांनो, नॉर्मल यूपीआई मध्ये तुम्ही जसे पेमेंट करता त्याच प्रकारे यूपीआई लाइट मध्ये ही तुम्ही पेमेंट करू शकता. म्हणजे तुम्ही क्यूआर कोड स्कॅन करून, यूपीआई अड्रेस वर, फोन नंबर वर, अश्या सर्व प्रकारे तुम्ही पेमेंट करू शकता. उदाहरणार्थ: समजा तुम्हाला 5 रुपयांचे पेमेंट करायचे आहे. तर ज्या व्यक्तीला पेमेंट करायचे आहे त्याचा फोन नंबर/QR कोड व पैसे टाका व नंतर यूपीआई लाइट ऑप्शन सिलेक्ट करा व नंतर Pay Securely ऑप्शन वर क्लिक करा. व तुमचा पेमेंट पूर्ण होऊन जाईल. मित्रांनो, इथे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा पिन विचारला जात नाही तर डायरेक्ट पेमेंट होते.

Paytm UPI LITE Madhe Paise Transfer Kase Karayche

UPI Lite (यूपीआई लाइट) चे फायदे काय आहेत

  • मित्रांनो, यूपीआई लाइट चा सर्वात मोठा फायदा म्हणजे यात पेमेंट करताना पिन टाकायची आवश्यकता नसते.
  • UPI Lite मुळे तुमचा पेमेंट अयशस्वी होण्याची शक्यता कमी आहे. अनेक वेळा पेमेंट करताना बँकेच्या सर्व्हर वर ओव्हरलोड होतो त्यामुळे पेमेंट उशिरा होते किंवा रद्द होते. पण यूपीआई लाइट चा वापर करून पेमेंट करताना हा प्रॉब्लेम येत नाही.
  • यूपीआई लाइट द्वारे केलेले पेमेंट सोप्या व जलद पद्धतीने होतात. त्यामुळे वेळेची ही बचत होते.
  • यूपीआई लाइट चा अजून एक फायदा म्हणजे तुमचे बँक स्टेटमेंट देखील क्लीन राहतात. म्हणजे छोटे छोटे व्यवहार बँक पासबुक मध्ये दाखवले जात नाहीत. तर बँक स्टेटमेंट मध्ये फक्त UPI Lite वॉलेट वर लोड केलेली रक्कम दाखवली जाते आणि UPI Lite वापरून केलेले सर्व व्यवहार UPI अँप वर पेमेंट हिस्ट्री मध्ये दाखवले जातात.
  • तसेच यूपीआई लाइट द्वारे तुम्ही 200 रुपया पर्यंत चे छोटे छोटे कितीही व्यवहार करू शकता. किंवा 200 रुपयांचे दोन, तीन , चार असे मल्टिपल ट्रांझक्शन करू शकता.

FAQ

पेटीएम यूपीआई लाइट म्हणजे काय?

मित्रांनो, पेटीएम UPI Lite हे कमी किंमतीचे व्यवहार सुलभ करण्यासाठी डिझाइन केलेले ऑन डिव्हाइस डिजिटल वॉलेट खाते आहे. या फीचर मुळे छोटे छोटे व्यवहार सोपे आणि जलद होतात.

पेटीएम यूपीआई लाईट सुरक्षित आहे का?

हो मित्रांनो, हे NPCI द्वारे जारी केले एक सुरक्षित ऑन डिव्हाइस डिजिटल वॉलेट आहे. जे तुमच्या बँक खात्याशी लिंक केले जाते. सुरक्षेच्या दृष्टीने वापरकर्ते पेटीएम अँप फिंगरप्रिंट, फेस आयडी किंवा पॅटर्न लॉक द्वारे लॉक करून ठेवू शकतात.

कोण कोणत्या बँका पेटीएम यूपीआई लाइट ला सपोर्ट करतात?

मित्रांनो, सध्या फक्त 9 बँका पेटीएम यूपीआई लाइट ला सपोर्ट करत आहेत. त्यांची नावे:

1. कॅनरा बँक
2. सेंट्रल बँक ऑफ इंडिया
3. HDFC बँक
4. इंडियन बँक
5. कोटक महिंद्रा बँक
6. पंजाब नॅशनल बँक
7. स्टेट बँक ऑफ इंडिया
8. युनियन बँक ऑफ इंडिया
9. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक

या बँका पेटीएम यूपीआई लाइट ला सपोर्ट करतात. UPI LITE साठी लवकरच इतर बँकाही सपोर्ट करतील अशी अपेक्षा आहे.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण पेटीएम अँप मध्ये यूपीआई लाइट कसे ऍक्टिव्हेट करायचे व त्या द्वारे ट्रांझक्शन कसे करायचे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आशा करतो की आमचा आजचा हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तसेच हा लेख तुम्हाला महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र मंडळीं सोबत ही नक्की शेअर करा. धन्यवाद

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद

error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!