Paytm चा पासवर्ड विसरल्यास नवीन पासवर्ड कसा तयार करायचा ? | Paytm पासवर्ड रिसेट कसा करावा ? | Paytm पासवर्ड विसरल्यास काय करावे ?
आजकाल प्रेत्येक अँप, वेबसाइटसाठी पासवर्ड असतो आणि जेवढे जास्त अँप, वेबसाइट आपण वापरतो तेवढे जास्त पासवर्ड आपल्याला लक्ष्यत ठेवावे लागतात, त्यामध्ये एखाद्या अँप, वेबसाइट पासवर्ड विसरणे साहजिक आहे. या पोस्ट मध्ये आपण विसरलेल्या Paytm अकाउंटचा पासवर्ड कसा बदलायचा ते बघणार आहोत.
पेटीएमचा पासवर्ड विसरल्यास नवीन पासवर्ड कसा तयार करायचा?
Paytm पासवर्ड रिसेट कसा करावा?
पेटीएमचा पासवर्ड रीसेट खुप सोपे आहे. फक्त 2 मिनिटात आपण ते करू शकतो. खाली दिलेल्या सोप्या स्टेप फॉलो करा.
स्टेप 1: पेटीएम अॅप उघडा आणि Paytm रजिस्टर मोबाइल नंबर टाईप करा, नंतर Proceed Securely बटण वर क्लिक करा
स्टेप 2: एकदा तुमच्या आठवणीतला पासवर्ड टाकून बघा जर तरी लॉगिन होत नसेल तर Forgot Password वर क्लिक करा
स्टेप 3: परत एकदा Paytm रजिस्टर मोबाइल नंबर टाईप करा आणि नंतर Proceed Securely बटण वर क्लिक करा
स्टेप 4: तुमच्या मोबाइल वर OTP येईल तो टाईप करा आणि Confirm बटण वर क्लिक करा
स्टेप 5: आत्ता तुम्हाला तुमचा नवीन पासवर्ड टाईप करायचा आहे, नवीन पासवर्ड सेट करण्यासाठी काही नियम आहेत
- पासवर्ड कमीतकमी 5 अंकी/अक्षरी हवा
- पासवर्ड मध्ये एकतरी स्पेसिअल कॅरेक्टर असावे (उदा. @ * #)
- पासवर्ड मध्ये इंग्लिश अंक आणि अक्षरे हवीत
या सर्व स्टेप फॉलो करून तुम्ही पेटीएमचा पासवर्ड बदलला आहे तरी आत्ता नवीन पासवर्ड तुम्ही लॉगिन करू शकता.
Paytm कस्टमर केअरला कॉल करून पासवर्ड बदलणे –
तुम्ही Paytm कस्टमर केअर ला कॉल करून सुद्धा तुमचा पासवर्ड बदलू शकता. त्यासाठी हा नंबर 0120 4888 488 Paytm रजिस्टर मोबाइल नंबर वरून डायल करा (तुमच्या सिम मध्ये बॅलन्स असणे गरजेचे आहे किंवा फ्री कॉलिंग प्लॅन). कॉल केल्यानंतर भाषा निवडा आणि नंतर तुम्हाला पासवर्ड बदलण्यासाठी 1 किंवा 2 प्रेस करायला सांगतील. नंतर 5-10 मिनटात तुमच्या मोबाइल मेसेज वर पासवर्ड रिसेट करायची लिंक येईल त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचा पेटीएम नवीन पासवर्ड तयार करू शकता.
या ब्लॉग बद्दल काही प्रश्न असतील तर खालील कंमेंट मध्ये टाकू शकता, धन्यवाद…