Paytm App वरून Mobile Recharge कसा करावा ?
Paytm App वरून मोबाईल रिचार्ज करणे खूप सोपे आहे. परंतु नवीन लोकांना ते थोडे अवघड वाटते. पण काळजी करू नका आम्ही सोप्या पद्धतीने तुम्हाला मोबाईल रीचार्ज कसा करायचा ते समजावून सांगू, जर तुम्ही खाली दिलेल्या स्टेप फॉलो केल्या तर काही मिनिटांत तुम्ही मोबाइल रीचार्ज करण्यात तज्ञ व्यक्ती होऊन जाताल.
सर्वात प्रथम तुमच्यकडे Paytm वर अकाउंट असणे गरजेचे आहे आणि जर तुमचे Paytm App वर अकाउंट नसेल तर हि पोस्ट वाचा – Paytm अकाउंट कसे तयार करावे. तुम्ही Paytm App वरून कोणताही टेलिकॉम कंपनीचा ( Jio, Airtel, Vi ) रिचार्ज करू शकता.
पेटीएम वरून मोबाईल रिचार्ज कसा केला जातो!
स्टेप 1: Paytm इन्स्टॉल केलेले अँप ओपन करा, आत्ता Recharge & Pay Bills क्लिक करा
स्टेप 2: मोबाइल ऑपशन वर क्लिक करा, नंतर जो मोबाइल नंबर रिचार्ज करायचा आहे तो टाईप करा, आणि Proceed बटण वर क्लिक करा
स्टेप 3: आत्ता तुम्हाला प्लॅन निवडायचा आहे, तुमच्या गरजेनुसार प्लॅन निवडू शकता जसे डेटा प्लॅन, टॉकटाइम प्लॅन, Top Up प्लॅन इत्यादी
स्टेप 4: नंतर Pay बटण वर क्लिक करा
स्टेप 5: आता चार ते पाच पेमेंट पर्याय तुमच्यासमोर येतील, पण मी तुम्हाला एटीएम कार्डच्या मदतीने रिचार्जबद्दल सांगणार आहे
जर तुमच्याकडे ATM Card असेल तर डेबिट कार्ड पर्याय निवडा आणि तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर क्रेडिट कार्ड पर्याय निवडा
स्टेप 6: आत्ता तुम्हाला तुमच्या कार्डची माहिती टाईप करायची आहे
जसे Card Number (16 अंकी नंबर), Month (कार्डवरील महिना निवडा करा), Year (कार्डवरील वर्ष निवडा करा) , CVV Number (कार्डच्या मागे असलेला 3 अंकी नंबर) Pay Now बटण वर क्लिक करा
आपल्या बँकेला लिंक असलेल्या मोबाइल नंबर वर OTP येईल तो टाईप करा आणि काही मिनिटात मोबाइल रिचार्ज होईल
या पोस्ट बद्दल काही प्रश्न असतील तर खालील कंमेंट मध्ये टाकू शकता, धन्यवाद…