पासपोर्ट साठी ऑनलाईन अर्ज करा घरच्याघरी (फक्त 10 मिनिटात) | Passport Online Apply
नमस्कार मित्रांनो, आज आपण पासपोर्ट साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा, तसेच नवीन पासपोर्ट तयार करायला किती खर्च येते आणि तो घरपोच मिळण्यासाठी किती दिवस लागत, शेवट पोलीस वेरिफिकेशन कसे होते, याबद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, ज्या प्रकारे आपल्याला सरकारी काम करण्यासाठी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड आवश्यक असते त्याच प्रमाणे परदेशात जाण्यासाठी तुमच्या कडे पासपोर्ट असणे आवश्यक आहे. तसेच ज्या व्यक्तींना व्यावसायासाठी किंवा काही काम निमित्त किंवा शिक्षणासाठी परदेशात जावे लागते. त्यांच्यासाठी पासपोर्ट हे एक खूप महत्त्वाचं कागदपत्रं असतं. शिवाय पासपोर्ट सह ज्या देशात तुम्ही जाणार आहात त्या देशाचा व्हिसा असणं आवश्यक असतं. पण व्हिसा (Visa) मिळवण्यासाठी आधी तुमच्याकडे पासपोर्ट (Passport) असणं गरजेचं असतं.
पासपोर्टच्या माध्यमातून नागरिकांचे नागरिकत्व माहिती होतं असतं. म्हणजे जस भारतात आधार कार्ड पॅन कार्ड ला ओळखीचं पुरावा म्हणून ओळखले जाते, त्याच प्रमाणे पासपोर्ट ला आंतरराष्ट्रीय ओळखपत्र म्हणून ओळखले जाते. यामुळे तुम्हाला परदेशात जायचं असेल तर तुम्हाला आधी पासपोर्ट बनवावा लागेल. पूर्वी पासपोर्ट बनवण्यासाठी पासपोर्ट ऑफिसच्या चकरा माराव्या लागत होत्या, पण आता त्याची गरज नाही. कारण आता भारत सरकारने पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया अगदी सोपी आणि वेगवान केली आहे. त्यामुळे तुम्ही आता घरी बसून पासपोर्टसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
ते पण फक्त तुमच्या आधार कार्ड आणि मार्कशीट च्या साहाय्याने. काही वेळा मार्कशीट नसेल तर फक्त आधार कार्ड च्या मदतीने सुद्धा तुम्ही पासपोर्ट काढू शकता. पासपोर्ट साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज अप्लाय कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
पासपोर्ट घरच्याघरी बनवा ऑनलाईन
passportindia.gov वेबसाईट वर नोंदणी प्रक्रिया
पासपोर्ट साठी ऑनलाइन पद्धतीने अप्लाय करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा:
स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला इंटरनेट वरून passportindia.gov.in ही वेबसाईट सर्च करून ओपन करायची आहे. आता वेबसाईट च्या होम पेज वर डाव्या बाजूला New user registration ऑप्शन वर क्लिक करा.
स्टेप 2: त्या नंतर पुढच्या स्टेप मध्ये तुम्हाला Register to apply at या ऑप्शन मध्ये CPV Delhi आणि passport office असे दोन ऑप्शन बघायला मिळतील. त्यातील दुसरा ऑप्शन म्हणजे passport office या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
त्यानंतर पासपोर्ट ऑफिस ची लिस्ट ओपन होईल त्यातून तुम्हाला तुमच्या शहराचे पासपोर्ट ऑफिस निवडायचे आहे. त्यानंतर खाली तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. जसे की तुमचे पूर्ण नाव म्हणजे फर्स्ट नेम, मिडल नेम व लास्ट नेम. ( तुमचे नाव हे तुमच्या आधार कार्ड किंवा बाकीच्या ओळखपत्रांनुसार असावे). त्या नंतर तुमचा ई- मेल आयडी टाकायचा आहे.
स्टेप 3: इथे तुम्ही तुमच्या ई-मेल आईडीलाच युजर आयडी बनवू शकता. किंवा दुसरा एखादा लॉगिन आयडी बनवून पासवर्ड टाकायचा आहे. तोच पासवर्ड नंतर कन्फर्म करायचा आहे. त्या नंतर hint question ऑप्शन मध्ये एखादा हिंट प्रश्न निवडायचा आहे व त्याचे बरोबर उत्तर खाली द्यायचे आहे. त्या नंतर दिलेला captcha भरायचा आहे. पूर्ण दिलेली माहिती एकदा वाचून नंतर Register या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. इथे तुमचे आयडी साथीचे रजिस्ट्रेशन सक्सेसफुली पूर्ण होऊन जाईल.
स्टेप 4: आता इथे तुम्हाला एक मेसेज येईल की तुमचा अकाउंट ऍक्टिव्हेट करण्यासाठी तुमच्या ई-मेल वर एक लिंक येईल ती चेक करा. तर तुमच्या email id इनबॉक्स चेक करून या इ मेल आयडी वर पासपोर्ट ऑफिस कडून ऍक्टिवेशन लिंक येईल, त्या लिंक वर क्लिक करून तुमच अकाउंट ऍक्टिवेट करायच आहे.
स्टेप 5: आता या नंतर तुम्हाला तुमचा जीमेल आयडी टाकून Submit बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 6: अशा प्रकारे तुमचे अकाउंट सक्सेसफुली ऍक्टिव्हेट होऊन जाईल. तसेच खाली दिलेल्या click here to login वर क्लिक करायचे आहे.
पासपोर्ट साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
स्टेप 1: आता नेक्स्ट पेज वर Existing to user login ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 2: नंतर तुम्ही बनवलेला युजर आयडी टाकून Continue बटन वर क्लिक करायचे आहे. त्या नंतर पासवर्ड व दिलेला कॅपचा टाकून Login बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 3: लॉगिन करून झाल्यानंतर आता Apply for Fresh Passport/Reissue of Passport ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 4: आता आपण इथे नवीन पासपोर्ट साठी अप्लाय करतो आहे त्यामुळे खाली दिलेल्या Click here to fill the application form या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
पासपोर्ट अर्ज फी
स्टेप 5: त्या नंतर तुमचे state व District सिलेक्ट करायचे आहे. नंतर Apply for ऑप्शन मध्ये Fresh passport वर क्लिक करायचे आहे. त्या नंतर Type of application मध्ये Normal ऑप्शन ला सिलेक्ट करायचे आहे. आणि Booklet type मध्ये 36 पेज चा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तुम्ही जर जास्त ट्रॅव्हल करत असाल तर 60 पेज पण निवडू शकता. व नंतर Next बटन वर क्लिक करायचे आहे.
पासपोर्ट प्रकार | 36 पेज | 60 पेज |
---|---|---|
नवीन पासपोर्ट (10 वर्षे वैधता) New or fresh passport (10-year validity) | Rs.1,500 | Rs.2,000 |
पासपोर्टचे नूतनीकरण/ पुन्हा जारी करणे (10 वर्षे वैधता) Renewal/ reissue of passport (10-year validity) | Rs.1,500 | Rs.2,000 |
स्टेप 6: आता पुढे तुमचे नाव, आडनाव टाकायचे आहे. त्या नंतर Gender सिलेक्ट करायचे आहे. त्या नंतर वर दिलेल्या नावाव्यतिरिक्त तुमचे अजून कुठले नाव आहे का? असे विचारले जाईल. जर दुसरे नाव नसेल तर No ऑप्शन वर टिक करायचे आहे.
तसेच तुम्ही तुमचे पहिले नाव चेंज केले आहे का असे विचारले जाईल. तिथे पण Yes किंवा No सिलेक्ट करायचे आहे. तसेच तुमची जन्म तारीख, स्टेट, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून टाकायचे आहे. त्या नंतर तुम्ही मॅरीड आहेत की नाही ते सिलेक्ट करायचे आहे.
स्टेप 7: नंतर Citizenship by या ऑप्शन मध्ये Birth वर क्लिक करायचे आहे. याचा अर्थ तुम्ही जन्मतः च भारतीय आहात. त्यानंतर तुमचा पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. व वोटर आयडी असेल तर टाकायचा आहे. नाही टाकले तरी चालेल.
आता तुम्हाला तुमचे एम्प्लॉयमेंट टाइप सिलेक्ट करायचे आहे. म्हणजे तुम्ही सेल्फ एम्प्लॉइड आहेत की प्रायव्हेट जॉब, स्टुडंट, बिझनेस वगैरे जे असेल ते सिलेक्ट करायचे आहे. पुढे जर तुमचे माता पिता किंवा कोणी कुटुंबातील व्यक्ती गवर्नमेंट सर्व्हेन्ट असतील तर Yes वर क्लिक करायचे व नसतील तर No वर क्लिक करायचे आहे.
त्यानंतर Education qualification ऑप्शन मध्ये तुमचे शिक्षण टाकायचे आहे. नंतर तुमचा आधार नंबर टाकायचा आहे व नंतर तुमच्या बॉडी वर जर कोणता आयडेंटिफिकेशन मार्क (जन्मखून) असेल तर त्या बद्दल सांगायचे आहे. हा ऑप्शन ब्लॅंक सोडला तरी चालेल.
त्यानंतर दिलेल्या टर्म्स आणि कंडिशन्स ऍग्री करून त्या नंतर Save my details या ऑप्शन वर क्लिक करून मग Next बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 8: त्या नंतर Family details मध्ये तुमच्या वडिलांचे पूर्ण नाव, आईचे पूर्ण नाव भरायचे आहे. तसेच तुम्ही जर मॅरीड असाल तर तुमच्या जोडीदाराचे नाव टाकायचे आहे. व Next ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 9: आता नेक्स्ट पेज वर तुमचा करंट अड्रेस भारताबाहेर नसेल तर तुम्ही No ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. व नंतर खाली तुमचा पत्ता टाकायचा आहे. त्या नंतर व्हिलेज (गाव) नेम, स्टेट, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून टाकायचे आहे. तसेच तुमच्या एरिया च्या पोलीस स्टेशन चे नाव सिलेक्ट करायचे आहे. त्या नंतर मोबाईल नंबर व ई-मेल आयडी टाकायचे आहे.
त्यानंतर तुम्हाला विचारले जाईल की तुमचा पर्मनंट अड्रेस वेगळा आहे की वरच्या प्रमाणे सारखे आहे. ते Yes /No करायचे आहे. व नंतर Save details ऑप्शन वर क्लिक करून Next बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 10: आता नेक्स्ट पेज वर Emergency contact मध्ये तुमच्या घरातील कोणत्याही एका व्यक्तीच्या मोबाईल नंबर, त्या व्यक्तीचे नाव, ई-मेल आयडी वगैरे माहिती टाकायची आहे व नंतर save करून next बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 11: आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील जसे की या आधी जधी तुमचे पासपोर्ट इश्यू (तयार) केले गेले आहे का व कधी होल्ड केलं गेलं आहे का वगैरे.. जर नसेल तर इथे सर्व ऑप्शन ला No करायचे आहे. व Next बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 12: तसेच नेक्स्ट पेज वर सर्व ऑप्शन No करायचे आहे व नंतर Save my details वर क्लिक करून Next करायचे आहे.
स्टेप 13: आता नेक्स्ट पेज वर तुम्ही पासपोर्ट साठी आधी जी माहिती भरली आहे तीच माहिती तुमच्या समोर लिहिलेली दिसेल ही माहिती चेक करून Next बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 14: आता तुम्हाला प्रूफ म्हणून काही डॉक्युमेंट द्यायचे आहेत. तुम्ही इथे बर्थ प्रूफ द्यायचे आहे, तसेच अड्रेस प्रूफ पण द्यायचे आहे. तुम्ही दोन्ही ठिकाणी आधार कार्ड देऊ शकता. त्यानंतर तुमचे डिस्ट्रिक्ट नेम टाकायचे आहे. तारीख टाकायची आहे त्या नंतर टर्म्स आणि कंडिशन्स ऍक्सेप्ट करून Save my details करून next बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 15: आता तुम्ही पासपोर्ट साठी केलेल्या ऍप्लिकेशन मध्ये भरलेल्या सर्व डिटेल्स सक्सेसफुली सबमिट होतील. ताची एक प्रिंट तुम्हाला काढून घ्यायची आहे. व तुमच्या जवळ ठेवायची आहे. व नंतर तुमचा फॉर्म सबमिट करण्यासाठी Submit Form या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 16: आता Submit Form या पर्यायावर क्लिक करा. असे केल्याने, तुमचा फॉर्म सबमिट केला जाईल आणि तुम्हाला एक Application reference number (ARN) दिला जाईल जो तुम्ही तुमच्याकडे जपून ठेवा.
आता ARN खाली दिसणार्या Pay and schedule च्या पर्यायावर क्लिक करा.
स्टेप 17: आता तुम्हाला पेमेंट मोड सिलेक्ट करायचे आहे. इथे आपण ऑनलाईन मेथड द्वारे 1500 रुपये पेमेंट करणार आहोत तर तो ऑप्शन सिलेक्ट करून मग Next बटन वर क्लीक करायचे आहे.
स्टेप 18: त्यानंतर तुम्हाला पासपोर्ट अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुमच्या जवळची लोकेशन सिलेक्ट करायचे आहे. या लोकेशन वर जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे प्रोसेस करायची आहे. त्या नंतर दिलेला कॅपचा टाकायचा आहे व नंतर Next ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 19: आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला अपॉइंटमेंट तारीख दिली जाईल, ही तारीख व जागा तुम्ही बदलू शकता. त्या नंतर Pay and Book Appointment ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 20: त्या नंतर तुमच्या समोर एसबीआय चे पेमेंट गेटवे ओपन होईल. कोणतेही एक पेमेंट मोड सिलेक्ट करून पेमेंट करायचे आहे.
स्टेप 21: व त्या नंतर तुम्ही बघू शकता की तुमचे पेमेंट रिसीट आली आहे. तसेच इथे तुम्हाला तुमचा अपॉइंटमेंट नंबर व त्या संबंधित सर्व डिटेल्स बघायला मिळतील. तसेच तुम्हाला अपॉइंटमेंट ची वेळ सुद्धा दिली जाईल.
त्या वेळेतच तुम्हाला पासपोर्ट ऑफिस मध्ये जायचे आहे. व तुमचे सर्व डॉक्युमेंट व्हेरिफाय करून घ्यायचे आहे. त्या नंतर तुमचे पासपोर्ट साथीचे ऍप्लिकेशन ग्रॅंटेड होते व त्या नंतर तुमचे ऍप्लिकेशन गव्हर्नमेंट तर्फे तुमच्या एरियाच्या पोलिस स्टेशनमध्ये पाठवले जाते. जिथे 5 ते 6 दिवस लागतात. व त्या नंतर तुमचे पासपोर्ट जनरेट होऊन येते. व तसे तुम्हाला एसएमएस द्वारे कळवले जाते. व पोस्टाने तुमच्या पर्यंत ते पासपोर्ट पाठवले जाते.
मित्रांनो, तुमचा पासपोर्ट झाला आहे की नाही ही चेक करण्यासाठी वेबसाइट च्या Homepage वर Track Application Status वर क्लिक करून तुमचा आयडी व लॉगिन पासवर्ड देऊन तुमचा passport झाला आहे की नाही ते तुम्ही चेक करू शकता.
पासपोर्टचे प्रकार
रंगांच्या आधारे पासपोर्टचे वर्गीकरण तीन प्रकारे केले जाते.
- निळा पासपोर्ट: भारतातील सामान्य लोकांसाठी नियमित/ रेग्युलर आणि त्वरित/ तत्काल
- पांढरे: अधिकृत, सरकारी कामासाठी परदेशात जाणाऱ्यांसाठी
- मारून: राजनैतिक, भारतीय डिप्लोमैट्स आणि वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांसाठी.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण पासपोर्ट साठी ऑनलाईन पद्धतीने अप्लाय कसे करायचे, या बद्दल माहिती जाणून घेतली. या पूर्ण प्रक्रियेत सर्व गोष्टी ऑनलाईन केल्या जातात फक्त व्हेरिफिकेशन साठी तुम्हाला पासपोर्ट ऑफिस मध्ये फक्त एकदाच जावे लागते.प व नंतर तुमचे पासपोर्ट पोस्टाने तुमच्या पर्यंत येईल. तर मित्रांनो, मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.
Tags: passport, apply for passport, apply for passport online, passport online, apply for new passport, passport cost, new passport apply online, passport kasa banvaycha, passport kasa tayar karaycha, passport online marathi, passport apply in marathi, passport mahiti, navin passport tayar, new passport mahiti, new passport info in marathi, passport marathi, passport arj kasa karava, passport online arj, passport form kasa bharaycha, passport form bharne, passport apply mahiti, passport process marathi, passport online information in marathi