पनवेल महानगरपालिका प्रॉपर्टी टॅक्स: ऑनलाईन चेक, पेमेंट | Check & Pay Panvel Mahanagar Palika Property Tax Online
नमस्कार मित्रांनो, आज आपण पनवेल महानगरपालिकाचा प्रॉपर्टी टॅक्स ऑनलाईन पध्दतीने चेक करणे आणि त्याचे पेमेंट ऑनलाईन कसे करायचे? या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, तुमचा मालमत्ता कर हा, तुमच्या मालमत्तेचा प्रकार, आकार, स्थान, ती मालमत्ता जुनी आहे की नवीन आहे, वगैरे अश्या बऱ्याच गोष्टीवर अवलंबून असतो. आता पनवेल महानगरपालिकेचं बघायचं झालं तर विविध नगरपालिकांमध्ये मालमत्ता कराचे दर आणि नियम जसे वेगवेगळे असू शकतात तसेच पनवेल महानगरपालिका मध्येही कराचे वेगवेगळे नियम व दर असू शकतात. कारण पनवेल महानगरपालिकेच्या अखत्यारीत पनवेल शहर सोबतच आणि 29 गावे येतात.
ज्यामध्ये खारघर, तळोजा, वगैरे अनेक ग्रामपंचायतींचा समावेश होतो. यामुळे सर्व मालमत्ता धारक नागरिकांना वेळेवर व सोप्या, जलद मार्गाने प्रॉपर्टी टॅक्स भरता यावा यासाठी PMC म्हणजेच पनवेल म्युनिसिपल कॉर्पोशन (पनवेल महानगरपालिका) तुम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्म ची सुविधा देखील प्रदान करते. यामुळे मालमत्ता धारक सोयीस्कर पद्धतीने त्याचा मालमत्ता कर भरू शकतो. त्यामुळे तुम्ही जर पनवेल मध्ये राहत असाल आणि कोणत्याही अडचणी शिवाय तुम्हाला तुमचा मालमत्ता कर ऑनलाईन पध्दतीने भरायचा असेल तर आमचा आजचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा….
पनवेल महानगरपालिका चा प्रॉपर्टी टॅक्स ऑनलाईन चेक कसा करायचा
स्टेप 1: मित्रांनो, तुम्ही जर कधी पनवेल महानगरपालिका चा प्रॉपर्टी टॅक्स म्हणजेच मालमत्ता कर ऑफलाईन पध्दतीने भरला असेल तर त्याची रिसीट तुम्ही समोर काढून ठेवा, पुढे ती लागू शकते. आता तुमच्या गुगल क्रोम वरून panvel municipal corporation किंवा पनवेल महानगरपालिका असे सर्च करा. आणि त्या नंतर थोडं खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला https://panvelmc.org ही लिंक दिसेल, त्यावर क्लिक करायचे आहे.
त्या नंतर वेबसाईट च्या होम पेज वर खाली तुम्हाला Pay property tax ऑप्शन मध्ये View More या बटन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 2: आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला ‘नोड सेक्टर’ सिलेक्ट झालेलं दिसेल, त्या खाली असलेला पहिला ऑप्शन ‘नोड’ दिसेल. त्यात तुम्हाला ज्या सिटीचा प्रॉपर्टी टॅक्स म्हणजेच मालमत्ता कर भरायचा आहे त्या भागाचे नाव सिलेक्ट करायचं आहे.
नंतर आता ‘सेक्टर क्रमांक’ मध्ये तुम्हाला सेक्टर क्रमांक सिलेक्ट करून टाकायचा आहे जो की तुम्हाला तुमच्या ऑफलाईन मालमत्ता कर भरलेल्या रिसीट वर लिहिलेला मिळेल. नंतर मालमत्ता क्रमांक म्हणजेच प्रॉपर्टी नंबर टाकायचा आहे.

शेवटी ‘मालमत्ता शोधा’ या खालील ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 3: मित्रांनो, या नंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर OTP पाठवला जाईल, तो OTP दिलेल्या जागी टाकून Verify करून घ्यायचं आहे.

स्टेप 4: आता पुढे तुम्हाला तुमच्या मालमत्ते ची सर्व माहिती (डिटेल्स ) पाहायला मिळतील. जसे की तुमचे नाव, सोसायटीचे नाव, तुमचा पत्ता वगैरे. मित्रांनो, आता थोडं खाली स्क्रोल केल्यावर तुमच्या उजव्या बाजूला तुम्हाला तुमचे प्रॉपर्टी टॅक्स बिलाची एकूण रक्कम बघायला मिळेल.

पनवेल महानगरपालिका प्रॉपर्टी टॅक्सचे ऑनलाईन पेमेंट कसे करायचे
स्टेप 1: मित्रांनो, पनवेल महानगरपालिकेचा मालमत्ता कर ऑनलाईन भरण्यासाठी आता पुढे तुम्हाला तुमच्या बिलाची एकूण रक्कम दिसेल त्या खाली असलेला Pay हा पर्याय दिसेल.

स्टेप 2: मित्रांनो, आता पुढे तुम्हाला तुमचा ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर चेक करून घ्यायचा आहे. नंतर payment gateway मध्ये OnePay या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. व दिलेल्या टर्म्स आणि कंडिशन्स वर टिक करून I Accept या बटन वर क्लिक करायचे आहे आणि मग Pay Now ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 3: मित्रांनो, या नंतर तुम्हाला पेमेंट करण्यासाठी अनेक ऑप्शन बघायला मिळतील, जसे की यूपीआय, डेबीट कार्ड, क्रेडिट कार्ड, क्यूआर, नेट बँकिंग इत्यादी. तुम्ही या पैकी कोणत्याही मेथड ने पेमेंट करू शकता. आपण इथे यूपीआय सिलेक्ट करणार आहोत.

मित्रांनो, यूपीआय ऑप्शन सिलेक्ट करून नंतर तुम्हाला तुमचा यूपीआय आयडी टाकायचा आहे. आणि नंतर Pay Now या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. मित्रांनो, या नंतर तुम्हाला तुमच्या यूपीआय ऍप वर पेमेंट करण्यासाठी विचारले जाईल, तेव्हा तुम्हाला तुमच्या यूपीआय ऍप वर जाऊन Yes या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे आणि पेमेंट करायचे आहे. थोड्याच वेळात तुमचे पेमेंट पूर्ण होईल व तसा मेसेज ही आलेला दिसेल.
स्टेप 4: मित्रांनो, तुम्ही केलेल्या पेमेंट ची रिसीट देखील डाउनलोड करू शकता. त्यासाठी Get Receipt या ऑप्शन वर क्लिक करून तुम्ही तुमची रिसीट डाउनलोड करून घ्यायची आहे व ही रिसीट सेव्ह करण्यासाठी वर दिलेल्या डाउनलोड बटन वर क्लिक करून save करून घ्यायचं आहे.

तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही तुमचं पनवेल म्युनिसिपल कॉर्पोशन चे प्रॉपर्टी टॅक्स चे बिल ऑनलाईन पध्दतीने पे करू शकता.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण पनवेल महानगरपालिकाचा प्रॉपर्टी टॅक्स ऑनलाईन पध्दतीने कसा भरायचा, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा.
धन्यवाद
FAQ
पनवेल महानगरपालिकेचा मालमत्ता कर ऑनलाइन भरण्यासाठी अधिकृत वेबसाईट उपलब्ध आहे का?
हो मित्रांनो, तुमचा पनवेल महानगरपालिका मालमत्ता कर ऑनलाइन भरण्यासाठी तुम्ही पनवेल महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट https://panvelmc.org ला भेट देऊ शकता.
पनवेल महानगरपालिकेच्या मालमत्ता कराच्या बिलात तफावत आढळल्यास किंवा ऑनलाईन भरणा करताना काही अडचण असल्यास काय करावे?
मित्रांनो, तूम्हाला तुमच्या मालमत्ता कराच्या बिलात काही तफावत आढळल्यास, किंवा ऑनलाईन भरणा करताना काही अडचण आल्यास, तुम्ही पनवेल महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाशी संपर्क साधू शकता किंवा हेल्पलाईन क्रमांक वापरून त्यांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
पनवेल महानगरपालिकेची मालमत्ता कराची नोटीस मिळाल्यास काय करावे?
मित्रांनो, वेळेवर पेमेंट न केल्यास तुम्हाला पनवेल महानगरपालिका मालमत्ता कराची नोटीस पाठवू शकते. ती नोटीस आल्यास तुम्ही सर्वात आधी नोटीस वरील सर्व तपशील वाचून बरोबर असल्याची एकदा खात्री करून घ्यायची आहे. तसेच सर्व तपशील योग्य असल्यास, तुम्ही देय तारखे पर्यंत तुम्ही प्रलंबित रक्कम भरून घ्यावी. जर तुम्ही देय तारखे पर्यंत प्रलंबित रक्कम भरण्यास असमर्थ झालात, तर तुम्हाला अतिरिक्त दंड भरावा लागू शकतो. याशिवाय तुम्ही मुदतवाढीची विनंती करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेशी संपर्क देखील करू शकता.
Tags: Panvel property tax online payment, Panvel duplicate property tax receipt, Panvel home tax Kase Bharayche, how to pay Panvel property tax online, how to pay property tax online Panvel maharashtra, how to pay property tax online panvel, property tax online payment, Panvel property tax online payment in marathi, PCM property check, PCM property tax kaise bhare, Pay PCM Property Tax Online, Check PCM Property Tax Online