अतिवृष्टी, दुष्काळी अनुदानाची स्थिती ऑनलाईन चेक करा | e Panchnama Payment Status Check - MarathiDiary
Shetkari

अतिवृष्टी, दुष्काळी अनुदानाची स्थिती ऑनलाईन चेक करा | e Panchnama Payment Status Check



नमस्कार मित्रांनो, आमच्या आजच्या या नवीन लेखात आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नेहमी प्रमाणे आज ही आम्ही तुमच्यासाठी काही तरी नवीन व खूप उपयोगी माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो आज आपण अतिवृष्टी, दुष्काळी अनुदानाची स्थिती ऑनलाईन चेक कशी करायची? या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

Panchnama Payment Status Check Marathi

मित्रांनो, विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती जसे की अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, दुष्काळ किंवा गारपीट अश्या प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती मुळे बाधित झालेल्या शेती पिकांची व शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई देण्याकरिता शासनाच्या माध्यमातून एक विशिष्ट अनुदान दिले जाते. यासाठी शासनाने देखील वेगवेगळे प्रकारचे जीआर काढून निधी उपलब्ध करून दिले आहेत.



मित्रांनो, जानेवारी 2023 च्या शासन निर्णयानुसार हे अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना एक विशिष्ट प्रकारचा क्रमांक देऊन व केवायसी करून या अनुदानाचे वितरण केले जात आहे. परंतु केवायसी झालेल्या बऱ्याच शेतकऱ्यांना अजून पर्यंत तरी अनुदान मिळालेले नाही. शिवाय आपल्या अनुदानाची सद्य स्थिती काय आहे हे देखील शेतकऱ्यांना पाहता येत नव्हतं. यासाठीच आता शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक पोर्टल तयार झाले आहे.

या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या अनुदानाची स्थिती काय आहे? केवायसी झाली असेल तर अनुदानाचे वितरण झाले आहे का? किती अनुदान वितरण झाले आहे? आणि जर अनुदान वितरण झाले नसेल तर ते का झाले नाही त्याचे कारण काय आहे, हे सर्व ऑनलाईन पध्दतीने पाहता येणार आहे. त्यामुळे तुम्हाला अतिवृष्टी, दुष्काळी अनुदानाची स्थिती ऑनलाईन चेक कशी करायची? हे जाणून घ्यायचे असेल तर आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा…

अनुदानाची स्थिती ऑनलाईन चेक

अतिवृष्टी, दुष्काळी अनुदानाची स्थिती ऑनलाईन चेक कशी करायची? या बद्दल जाणून घेऊ या

मित्रांनो, याआधी आपल्या अनुदानाची स्थिती चेक करण्यासाठी बँकेत किंवा तलाठी कार्यायल किंवा तहसील कार्यालयात जावं लागत होतं. पण चांगली गोष्ट म्हणजे आता तुम्हाला यापैकी कुठेही जायची गरज नाही. कारण आता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील तुमची अनुदानाची स्थिती चेक करू शकता. ते कसे करायचे हे पुढे जाणून घेऊ या….

स्टेप 1: मित्रांनो, अनुदानाची स्थिती चेक करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला https://mh.disastermanagement.mahait.org या पोर्टल वर जायचे आहे.



Anudan Status Check Step 1

आता पोर्टल वर आल्या नंतर अवकाळी, गारपीट किंवा इतर काही नैसर्गिक आपत्तीसाठी ज्या यादी मध्ये तुमचं नाव आलं असेल त्यायादी मध्ये तुम्हाला दिलेला जो विशिष्ट क्रमांक असेल म्हणजेच ज्याला VK नंबर असे देखील म्हटले जाते. तो क्रमांक एंटर करायचा आहे आणि नंतर सर्च/ Search बटन वर क्लिक करायचे आहे.

Anudan Status Check Step 2

स्टेप 2: आता या नंतर तुमचं नाव ज्या ठिकाणी नाव आलेलं दिसेल तसेच तुमची जी काही अनुदानाची रक्कम असेल त्या बद्दलची सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला दाखवली जाईल.

स्टेप 3: मित्रांनो, या खालीच Payment Status मध्ये तुमचं पेमेंट क्रेडिट (credit) आहे की फेल (failed) हे देखील दाखवले जाईल. जर तुमचं पेमेंट फेल असेल तर ते का फेल झालं आहे? त्याच कारण काय आहे? ते देखील तुम्ही इथे ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता.

Anudan Status Check Step 3

उदाहरणार्थ, जर आधार लिंक मुळे पेमेंट फेल झाले असेल तर तुम्हाला बँकेत जाऊन आधार लिंक प्रोसेस करून घ्यावी लागेल आणि मग तुमचं पेमेंट होऊन जाईल.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण अतिवृष्टी, दुष्काळी अनुदानाची स्थिती ऑनलाईन चेक कशी करायची? या बद्दल माहिती जाणून घेतली. या ऑनलाईन पद्धतीने तुमच्या अनुदानाची स्थिती चेक करून त्यामध्ये असलेला प्रॉब्लेम दुरुस्त करण्याचं काम तुम्ही या पोर्टल च्या माध्यमातून करू शकता. तर मित्रांनो, मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.



Tags: Panchnama Payment Check Marathi, Maharashtra Panchnama Payment Status Check, Nuksan Bharpai Check, Dushkal Anudan Check, Ativrusthi Anudan Check, Garpithi Anudan Check, Bhukamp Anudan Check, ativrushti nuksan bharpai vatap, dushkal anudan update, e panchnama payment Status online, mh disaster management system, anudan yadi pdf, dushkali anudan labharthi yadi, Sheti Anudan Check

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद