2023 मध्ये WhatsApp चे ‘हे’ नवे फीचर्स; जाणून घ्या काय
- Chat Lock / चॅट लॉक
- Status Update / स्टेटस अपडेट
- Message Edit / मेसेज एडिट
- Silence Unknown Callers
- Photo Upload Quality / फोटो कॅलिटी
- Chat Transfer / चॅट ट्रान्सफर
- Upcoming Features
मित्रांनो, आजकाल प्रत्येक युझर्सचे कोणते आवडते मेसेजिंग अँप असेल तर ते फक्त व्हाट्सऍप. युजर्स व्हाट्सऍप ला आपली पहिली पसंती देतात त्याचे कारण म्हणजे व्हाट्सऍप आपल्या युजर्स साठी म्हणजेच वापरकर्त्यांसाठी नेहमी नवं नवीन फीचर्स आणत असते. यामध्ये युजर्सची प्रायव्हसी अधिक सुरक्षित राहावी आणि त्यांचा व्हाट्सऍप प्लॅटफॉर्म वापरण्याचा अनुभव अधिक चांगला व्हावा हाच कंपनीचा नेहमी प्रयत्न असतो. मित्रांनो, व्हाट्सऍपचे बरेच नवीन फिचर अजूनही बऱ्याच जणांना माहीत नाही. आणि भविष्यात व्हाट्सऍप अजून काही फिचर आणत आहे.
म्हणजेच व्हाट्सऍप ने आपल्या अँड्रॉइड आणि iso युजर्स साठी नवीन अपडेट आणले आहे ज्यात विविध प्रकारचे नवीन फीचर्स आहेत. ते कोण कोणते फीचर्स आहेत व त्यांचा काय उपयोग होऊ शकतो व ते फिचर कसे वापरायचे, हे सर्व आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत, आणि ही सर्व माहिती जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
Chat Lock / चॅट लॉक
मित्रांनो, या फीचरचा उपयोग म्हणजे याद्वारे तुम्ही तुमच्या व्हाट्सऍप वर एखाद्या व्यक्तीसोबत केलेले चॅट लॉक करू शकता. म्हणजे तुमच्या शिवाय त्या व्यक्ती सोबत केलेले चॅट इतर कोणीही वाचू शकणार नाही. या फिचर चा वापर कसा करायचा ते पुढील स्टेप्स द्वारे जाणून घेऊ या.
स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले तुमच्या मोबाईल वर व्हाट्सऍप ओपन करा. व ज्या व्यक्तीचे चॅट तुम्हाला लॉक करायचे आहे त्याच्या प्रोफाइल वर क्लिक करा.
स्टेप 2: आता पेज ला स्क्रोल करा, नंतर तुम्हाला चॅट लॉक चा ऑप्शन दिसेल. तर त्या ऑप्शन वर क्लिक करा व Block chat with fingerprints या ऑप्शन ला अनेबल करा.
स्टेप 3: आता तुमचे फिंगरप्रिंट टाकून त्या व्यक्तीचे चॅट लॉक करा. आणि या नंतर तुम्ही तुमचं व्हाट्सऍप ओपन केल्यावर सर्वात वरती लॉक केलेल्या चॅट विभागात तुम्ही लॉक केलेले चॅट दिसेल.
Status Update / स्टेटस अपडेट
1) Status Privacy: मित्रांनो, व्हाट्सऍप स्टेटस बाबतीत अनेक बदल करण्यात आले आहेत. त्यातील पहिला बदल म्हणजे तुम्ही तुमचे स्टेटस तुम्हाला हव्या त्या व्यक्तींना दाखवू शकता. आणि ज्यांना तुम्ही तुमचे स्टेटस दाखवू इच्छित नाही त्यांच्या पासून तुमचे स्टेटस लपवू शकता. तुमच्या व्हाट्सऍप स्टेटस मध्ये बदल करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
- यासाठी सर्वात पहिले तुमच्या व्हाट्सऍप च्या स्टेटस सेक्शन मध्ये जा.
- आता तीन डॉट्स वर क्लिक करा आणि त्या नंतर स्टेटस प्रायव्हसीचा ऑप्शन निवडून तुम्हाला पाहिजे त्या व्यक्तीला स्टेटस दाखवा आणि ज्या व्यक्तीला दाखवायचे नसेल त्यांच्या पासून तुमचे स्टेटस लपवा.
2) स्टेटस तुमचा आवाज: मित्रांनो, या शिवाय आता तुम्ही तुमचा आवाज रेकॉर्ड करून तुमच्या स्टेटस वर टाकू शकता. यासाठी
- सर्वात पहिले तुमच्या स्टेटस ऑप्शन मध्ये जा आणि तिथे दिलेल्या पेन्सिल आयकॉन वर क्लिक करा.
- त्या नंतर तुमच्या समोर माइकचा ऑप्शन ओपन होईल. त्यावर क्लिक करून ठेवा व तुमचा आवाज रेकॉर्ड करून स्टेटस अपडेट करा.
3) नवीन स्टेटस इंडिकेटर: तसेच जेव्हा एखादी व्यक्ती स्टेटस अपडेट करते तेव्हा त्या व्यक्तीच्या प्रोफाईल फोटो जवळ एक निळ्या रंगाची रिंग दिसते. या रिंग द्वारे तुम्हाला कळेल की त्या व्यक्तीने नवीन स्टेटस टाकला आहे.
4) स्टेटस वर इमोजी रिएक्शन: मित्रांनो, या सोबतच आता तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या स्टेटस वर इमोजी रिऍक्शन देखील देऊ शकता. त्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा…
- जेव्हा तुम्ही एखाद्याचे स्टेटस पाहता तेव्हा त्या स्टेटसच्या खाली असलेल्या रिप्लाय ऑप्शन वर क्लिक करा.
- आता तुमच्या समोर वेगवेगळे इमोजी उघडतील. तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही एका इमोजी वर क्लिक करून व लगेच तो इमोजी स्टेटस टाकणाऱ्या व्यक्तीला पाठवला जाईल.
5) Status Link Previews: मित्रांनो, नवीन अपडेटेड व्हाट्सऍप मध्ये लिंक प्रिव्ह्यू चा ऑप्शन देखीव आला आहे. या ऑप्शन तुम्हाला स्टेटसच्या वर आलेला बघायला मिळणार आहे. म्हणजे स्टेटस वर यूट्यूब लिंक पोस्ट केल्यानंतर तुम्ही त्या लिंकचे पूर्वावलोकन करू शकता.
Message Edit / मेसेज एडिट
मित्रांनो, जर तुमच्या कडून एखाद्या व्यक्तीला काही चुकीचा मेसेज पाठवला गेला असेल, तर तो पाठवल्या नंतर, तुम्ही तो मेसेज डिलीट न करता दुरुस्त करू शकता. पण चुकीचा मेसेज एडिट करण्यासाठी तुम्हाला ठराविक वेळ मिळणार आहे. म्हणजे मेसेज दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला फक्त पंधरा मिनिटे मिळणार आहेत. आता हे मेसेज एडिट कसे करायचे हे जाणून घेण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.
स्टेप 1: मित्रांनो, पाठवलेला मेसेज एडिट करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही पाठवलेला मेसेज निवडा आणि वर दाखवलेल्या तीन डॉट वर क्लिक करा.
स्टेप 2: त्या नंतर edit या ऑप्शन वर क्लिक करा आणि तुमचा पाठवलेला चुकीचा मेसेज एडिट करून पाठवा.
Silence Unknown Callers / अज्ञात कॉल साइलेंट
मित्रांनो, या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या व्हाट्सऍप वरील unknown नंबर वरून आलेले कॉल सायलेंट करू शकता. ते कसे करायचे हे जाणून घेण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा…
स्टेप 1: सर्वात पहिले तुमचे व्हाट्सऍप ओपन करा आणि उजव्या बाजूला दिलेल्या तीन डॉट्स वर क्लिक करा आणि Settings चा ऑप्शन निवडा.
स्टेप 2: आता प्रायव्हसी ना ऑप्शन वर क्लिक करून, पेज ला वरती स्क्रोल करा आणि कॉलचा ऑप्शन निवडा. असे करताच तुमच्या समोर एक नवीन पेज ऊन होईल. तिथेच silent unknown callers या ऑप्शन ला इनेबल करा.
Photo Upload Quality / फोटो अपलोड कॅलिटी
मित्रांनो, व्हाट्सऍप वरती आपण सर्वात जास्त फोटोज शेअर करत असतो. पण मित्रांनो, जेव्हा आपण एखादा चांगल्या क्वालिटी चा फोटो व्हाट्सऍप वर अपलोड करतो तेव्हा जास्त डेटा जाऊ नये म्हणून तो फोटो कम्प्रेस होतो. पण आता तुम्ही व्हाट्सअप्प वर बेस्ट क्वालिटी फोटो अपलोड करू शकता. ते कसे करावे हे जाणून घेण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा…
स्टेप 1: सर्वात पहिले व्हाट्सऍप ओपन करा. त्या नंतर Setting मध्ये जाऊन Storage ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 2: आता अपलोड इमेज क्वालिटी या ऑप्शन वर क्लिक करून Best quality हा ऑप्शन निवडा. या मुळे तुमचे फोटोज बेस्ट क्वालिटी मध्ये शेअर होतील.
Multi Device Support / मल्टी-डिव्हाइस सपोर्ट
मित्रांनो, मल्टि डिव्हाइस सपोर्ट या फीचर द्वारे तुम्ही तुमचे व्हाट्सऍप एकाच वेळी चार वेगवेगळ्या डिव्हाइस वर म्हणजेच उपकरणांवर चालवू शकता. एकाच वेळी चार वेगवेगळ्या डिव्हाइस वर व्हाट्सऍप कसे वापरायचे हे जाणून घेण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
स्टेप 1: सर्वात पहिले तुमच्या सेकंडरी डिव्हाइस वर व्हाट्सऍप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. त्या नंतर व्हाट्सऍप ओपन करा व दिलेल्या तीन पर्याय ऑप्शन वर क्लिक करा.
स्टेप 2: आता या नंतर Link to existing account या ऑप्शन ला निवडायचे आहे. त्या नंतर तुमच्या समोर एक क्यू आर कोड ओपन होईल.
स्टेप 3: आता तुमच्या प्रायमरी डिव्हाइस वर व्हाट्सऍप ओपन करून वर दिलेल्या तीन डॉट्स वर क्लीक करा व तिथे दिलेल्या ऑप्शन पैकी Link Device या ऑप्शन वर क्लिक करा.
स्टेप 4: आता तुमच्या प्रायमरी डिव्हाइस च्या व्हाट्सऍप वरून सेकंडरी डिव्हाइस चा QR कोड स्कॅन करा. या नंतर तुम्ही तुमचे व्हाट्सऍप सेकंडरी डिव्हाइस वर देखील चालवू शकता.
Note: मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवायांची आहे की तुम्ही जर तुमच्या प्रायमरी डिव्हाइस मध्ये व्हाट्सऍप वर बरेच दिवस इनऍक्टिव्ह राहिलात तर तुम्ही तुमच्या इतर सर्व सेकंडरी डिव्हाइसेस च्या व्हाट्सऍप वरून आपोआप लॉग आउट होऊन जाल.
Chat Transfer / चॅट ट्रान्सफर
मित्रांनो, चॅट ट्रान्सफर हे फिचर वापरून, तुम्ही तुमच्या जुन्या फोनचे व्हाट्सऍप चॅट तुमच्या नवीन फोनच्या व्हाट्सऍप वर गुगल ड्राइव्हच्या मदती शिवाय ट्रान्सफर करू शकता. यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.
स्टेप 1: सर्वात पहिले तुमच्या फोन मधील व्हाट्सऍप ओपन करा आणि उजव्या बाजूला दिसणार्या तीन डॉट्सच्या ऑप्शन वर क्लिक करा.
स्टेप 2: आता Settings चा ऑप्शन ओपन करायचा आहे. आणि Chat या ऑप्शन वर क्लिक करा.
स्टेप 3: या नंतर नेक्स्ट पेज वर थोडे वरती स्क्रोल करा आणि ट्रान्सफर चॅट चा ऑप्शन निवडा. आता स्टार्ट ऑप्शन वर क्लिक करा आणि तुमचे लोकेशन इनेबल करा.
स्टेप 4: या नंतर तुमच्या समोर QR कोड स्कॅन करायचा ऑप्शन ओपन होईल. आता तुम्ही तुमच्या नवीन डिव्हाइसच्या व्हाट्सऍप चा QR कोड स्कॅन करा. असे केल्याने, तुमच्या जुन्या व्हाट्सऍपचे चॅट नवीन डिव्हाइस च्या व्हाट्सऍप वर ट्रान्सफर केले जातील.
Upcoming Features
मित्रांनो, या ऑप्शन मध्ये आपण व्हाट्सऍप आपल्या युजर्स साठी भविष्यात अजून कोण कोणते फीचर्स आणणार आहे त्या बद्दल जाणून घेणार आहोत.
Admin review alert (ऍडमिन रिव्ह्यू अलर्ट): मित्रांनो, या फीचरचा वापर करून तुम्ही ग्रुप मध्ये आलेला कोणताही मेसेज ऍडमिनला रिव्ह्यू साठी पाठवू शकता. म्हणजेच ग्रुप मधील कोणत्याही मेसेज वर तुमचा काही आक्षेप असेल तर तुम्ही तो मेसेज ऍडमिनला रिव्ह्यूसाठी पाठवू शकता. त्या नंतर, ऍडमिन तो मेसेज चेक करेल व नंतर तो मेसेज ठेवायचा की डिलीट करायचा ते ठरवू शकतो.
Block unknown number ( ब्लॉक अननोन नंबर): मित्रांनो, भविष्यात व्हाट्सऍप आपल्या युजर्स साठी Block unknown number हे फिचर जारी करणार आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही अनोळखी नंबर वरून येणारा मेसेज नोटिफिकेशन मधूनच ब्लॉक करू शकणार आहात किंवा वर दाखवलेल्या ब्लॉक ऑप्शन सह त्या अनोळखी नंबर ला जास्त वेळ दाबून ब्लॉक करू शकाल.
Shopping from whatsapp (व्हाट्सऍप वरून खरेदी): मित्रांनो, व्हाट्सऍपच्या या फीचर च्या मदतीने आता तुम्ही तुमच्या व्हाट्सऍप वर शॉपिंग देखील करू शकणार आहात आणि व्हाट्सऍप च्या पेमेंट फीचर च्या मदतीने तुम्ही तुमचा UPI वापरून व्हाट्सऍप वरूनच पेमेंट करू शकाल. पेमेंटचे फीचर तुमच्या व्हाट्सऍप मध्ये आधी पासूनच असले तरी व्हाट्सऍप वरून खरेदी करण्याचे फीचर भविष्यात व्हाट्सऍप द्वारे जारी केले जाईल.
Broadcast channel: मित्रांनो, आता टेलीग्राम प्रमाणेच, तुम्ही व्हाट्सऍप वर वेगवेगळ्या ब्रॉडकास्ट चॅनेल मध्ये देखील जॉईन होऊ शकता. भविष्यात व्हाट्सऍप आपल्या युजर्स साठी हे फीचर जारी करणार आहे.
Updated UI: मित्रांनो, व्हाट्सऍप चा यूजर इंटरफेस भविष्यात चेंज होणार आहे. म्हणजेच व्हाट्सऍपचे कॉल्स, स्टेटस आणि चॅट चे नेव्हिगेशन बटण जे वरच्या बाजूला होते, आता तुम्हाला ते नेव्हिगेशन बटण खाली दिसेल. कारण ते वापरण्यास सोपे पडते. तथापि, आयफोन युजर्स साठी, हे नेव्हिगेशन बटण आधी खालीच दिसत होते. आता लवकरच हे फीचर अँड्रॉइड युजर्स साठीही जारी करण्यात येणार आहे.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण व्हाट्सऍप च्या काही नवीन व काही अपकमिंग फीचर्स बद्दल माहिती जाणून घेतली. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहेच की whatsapp हे मेसेंजर सारखे काम करते. ज्याद्वारे लोक त्यांच्या महत्त्वाच्या फाइल्स, फोटो, व्हिडिओ आणि गोष्टी त्यांच्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तीं सोबत शेअर करतात. तसेच काही लोक त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी देखील व्हाट्सऍप चा वापर करतात. या कारणास्तव, व्हाट्सऍप आपल्या फीचर्स मध्ये दिवसेंदिवस नवीन अपडेट आणत आहे.
मित्रांनो, मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.