वैद्यकीय चाचणी व रिपोर्ट (Medical Test & Report)

NCV टेस्ट संपूर्ण माहिती: NCV म्हणजे काय, कधी व कशी केली जाते, खर्च, रोगांचे निदान | Nerve Conduction Velocity Test

Nerve Conduction Velocity Test म्हणजेच NCV टेस्ट हि शरीरातील Nerves म्हणजेच नसांमधून वाहणाऱ्या इलेक्ट्रिकल इम्पल्स [electrical impulse] ची गती मोजण्यासाठी केली जाते. आता तुम्ही म्हणाल electrical impulse म्हणजे नक्की काय? तर त्यासाठी आपण आधी Nerves [नस] म्हणजे काय हे समजून घेऊयात. तर Nerves ह्या एखाद्या इलेक्ट्रिकल वायर केबल सारखा काम करतात. ज्याप्रकारे इलेक्ट्रिकल वायर इलेक्ट्रिसिटी वाहून नेते अगदी त्याचप्रमाणे Nerves इलेक्ट्रिकल इम्पल्स वाहून नेण्याचा काम करतात. आता आपण पाहुयात इलेक्ट्रिकल इम्पल्स म्हणजे नक्की काय?

NCV Test Kashi Keli Jate

आपलं शरीर हे ब्लड सेल्स, Muscles, आणि Nerves ने बनलेला आहे. जेव्हा आपण एखादं बटण चालू करतो तेव्हाच लाईट चा बल्ब किंवा फॅन चालू होतो. म्हणजे बल्ब चालू होण्यासाठी आपल्याला बटण चालू करावं लागतं आणि तेव्हाच कृती घडते. अगदी तसंच जेव्हा आपण एखादी कृती करतो म्हणजे हात उचलणे, हात खाली घेणे, लिहिणे, वाचणे, पाणी पिणे ह्यासाठी सुद्धा एका बटण ची गरज असते म्हणजेच इलेक्ट्रिकल इम्पल्स ची गरज असते. ह्या ज्या आपण कृती करतो त्या किती सहज दिसत असल्यातरी त्यामागे एक कॉम्प्लिकेटेड प्रोसेस असते आणि त्यामध्ये Nerves खूप मोठा रोल प्ले करतात.



म्हणजे बघा आता तुम्हाला पेन उचलायचा आहे तर आधी पेन उचलण्यासाठीचा संदेश मेंदूकडून हाताकडे जातो आणि तो संदेश वाहून नेण्याचा काम इलेक्ट्रिकल इम्पल्स करतो आणि मग आपण पेन उचलतो. आपण अजून एक उदाहरण समजून घेऊयात. जेव्हा तुम्ही गरम तव्यावर हात ठेवता तेव्हा तुमच्या हातातील Sensory नयूरॉन्स ती वस्तू गरम आहे हि माहिती हा संदेश आपल्या शरीरातील Nervous सिस्टिम कडे पोहचवतात मग तिथून ती हातातील Motor नयूरॉन्स कडे पोहचवली जाते आणि हात आपोआप मागे खेचला जातो. आता हि प्रोसेस असताना मोठी आणि कॉम्प्लिकेटेड दिसत असली तरी ती काही सेकंदातच घडते आणि आपले हात भाजण्यापासून संरक्षण होते आहे ना मजा.

अशाप्रकारे सुई टोचल्यानंतर देखील अशीच Reaction होते आणि त्यासाठी शरीरातील Nerves, Nervous सिस्टिम, इलेक्ट्रिकल इम्पल्स, आणि नयूरॉन्स [ज्यांनी Nerves बनतात] हे सगळे जबाबदार असतात.जर nerves मध्ये काही बिघाड झाला तर nervous सिस्टिम कडे संदेश पोहचणार नाहीत आणि त्यामुळे शरीराला धोखा निर्माण होईल. म्हणजे जर गरम तव्यावरून हात मागे घेतला पाहिजे हा संदेशच पोचला नाही तर हात भाजून नुकसान होईल. आता तुम्हाला समजलं असेलच कि nerves चा काय रोल असतो.

आता वळूयात आपल्या विषयाकडे NCV टेस्ट हि Nerves मधून वाहून नेणाऱ्या इलेक्ट्रिकल इम्पल्स ची गती मोजण्यासाठी केली जाणारी टेस्ट आहे. आता पाहुयात ह्या टेस्ट मधून आपल्याला काय माहिती मिळते? जेव्हा Nerve काही कारणांनी डॅमेज होते काही आजारांमुळे नसांवर ताण येतो आणि नर्व्ह डॅमेज होते. तेव्हा आपोआपच वाहून नेल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिकल इम्पल्स ची गती कमी होते. आणि त्या कमी झालेल्या किंवा स्थिर नसलेल्या गतीवरूनच नर्व्ह किती डॅमेज झाली आहे हे कळते. त्यासोबतच पेशंट ला कोणत्या नर्व्ह चा आजार झाला आहे हे समजते.

NCV टेस्ट का केली जाते ?

पेशंट मध्ये खालील लक्षणे [symptoms] आढळल्यास डॉक्टर NCV टेस्ट करायला सांगतात ते symptoms पुढीलप्रमाणे आहेत:

  1. हातापायाला मुंग्या येणे
  2. हात किंवा पाय कमजोर पडणे
  3. हात किंवा पायांना सेंसेशन नसल्याची जाणीव होणे
  4. हात किंवा पाय सुन्न पडणे
  5. हातापायांची बोटे सुन्न पडणे त्याचबरोबर खूप वेदना होणे
  6. हात किंवा पायांची आग आग होणे
  7. पाय किंवा हातांना सुई टोचल्यासारखे वाटणे
  8. शरीराचा समतोल साधने अशक्य होणे

NCV टेस्ट कशी केली जाते ?

NCV Test Mhanje Kay.jpg

आता आपण पाहुयात NCV टेस्ट ची प्रोसिजर काय आहे ?



  1. NCV टेस्ट हि नयूरॉलॉजिस्ट द्वारे केली जाते. हि टेस्ट करण्याआधी nurse स्टाफ तुम्हाला सर्व मेटल च्या तसेच काही इलेक्ट्रिक वस्तू काढून ठेवायला सांगतात. मेटल च्या वस्तू जसे कि हातातील घड्याळ, गळ्यातील चेन किंवा दागिने, अंगठी, चष्मा, अगदी तुमच्या कमरेचा बेल्ट हि काढून ठेवावा लागतो. अशाप्रकारे टेस्ट सुरु होण्यापूर्वी सगळ्या मेटल आणि इलेक्ट्रिक वस्तू काढून ठेवल्या जातात.
  1. हॉस्पिटलच्या रूल्स नुसार ठराविक ड्रेस किंवा ऍप्रॉन घालावा लागतो किंवा आपल्या आहे त्या कपड्यांवर सुद्धा हि टेस्ट केली जाते. त्यानंतर तुम्हाला प्रोसेस बद्दल थोडी माहिती दिली जाते. त्यानंतर तुम्हाला बेड वर झोपायला सांगितले जाते.
  2. जिथे टेस्ट होणार आहे तो स्किन चा पार्ट क्लीन केला जातो. ज्याठिकाणी electrodes प्लेस करायचे आहेत त्याठिकाणी एक पेस्ट किंवा conducting जेल लावला जाते. जेणेकरून स्किन आणि electrode मधील इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट चांगला राहून जे सिग्नल transmission आहे ते चांगल्या प्रकारे होण्यासाठी हे जेल apply केला जातं.
  1. ज्या नर्व्ह वर टेस्ट करायची आहे ती नर्व्ह नयूरॉलॉजिस्ट द्वारे शोधली जाते. ज्या नर्व्ह वर टेस्ट करायची आहे त्या नर्व्ह वर दोन electrodes प्लेस केले जातात एक असतो तो स्टिम्युलेटिंग electrode म्हणजे जो सिग्नल stimulate [उत्तेजित] करतो आणि दुसरा electrode रेकॉर्डिंग electrode नर्व्ह मधील इम्पल्स ची ऍक्टिव्हिटी रेकॉर्ड करतो. दोन्ही electrodes ठराविक जागी काही अंतर सोडून नयूरॉलॉजिस्ट कडून प्लेस केले जातात.
  1. त्यानंतर नयूरॉलॉजिस्ट द्वारे ज्या नर्व्ह चा स्टडी करायचा आहे त्या नर्व्ह वर शॉक देणारा electrode प्लेस केला जातो. इथे घाबरण्याची काहीच गरज नाही तुम्हाला फक्त हलका करंट दिला जातो त्यामुळे थोडंसं दुखेल किंवा टोचल्यासारखा होईल किंवा थोडासा झटका लागेल .आणि हे सगळं नयूरॉलॉजिस्ट च्या निरीक्षणाखाली केला गेल्यामुळे काही घाबरण्याची आवशक्यता नाही. त्यानंतर शॉक दिल्यामुळे stimulate झालेल्या नर्व्ह मधील इम्पल्स ची ऍक्टिव्हिटी स्क्रीन वर रेकॉर्ड केली जाते आणि टेस्ट चा result हि त्याला अनुसरुनच दिला जातो.

NCV टेस्ट करण्याआधी काय काळजी घ्यावी?

  • जर तुम्हाला काही आजार असेल किंवा काही फॅमिली history असेल तर ते तुम्ही तुमच्या नयूरॉलॉजिस्ट ला सांगणे गरजेचे आहे.
  • जर तुम्हाला रक्त पातळ होण्याची गोळी [ब्लड thinner] चालू असेल तर त्या बद्दल आधीच तुमच्या नयूरॉलॉजिस्ट ला कल्पना देणे गरजेचे आहे. त्यासोबतच तुम्हाला चालू असणाऱ्या सर्व औषधांबद्दल ची माहिती आधीच नयूरॉलॉजिस्ट ला सांगावी.
  • जर तुमच्या शरीरात पेसमेकर किंवा काही मेटल इम्प्लांट्स बसविले असतील तर त्याबद्दल आधीच कल्पना देणे गरजेचे आहे.
  • टेस्ट ला जाताना आरामदायक कपडे घालावेत जेणेकरून तुम्ही टेस्ट करताना comfortable असाल.
  • टेस्ट ला जाण्याच्या आधी कोणत्याही लोशन किंवा moisturizer चा वापर करणे टाळावे. जेणेकरून
  • electrodes च्या ऍक्टिव्हिटी मध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही हे पाहावे.

NCV टेस्ट नंतर काय काळजी घ्यावी?

  • टेस्ट झाल्यानंतर तुम्ही तुमच्या नॉर्मल ऍक्टिव्हिटी पुन्हा सुरु ठेवू शकता.
  • जर तुम्हाला काही औषधे तात्पुरती बंद करायला सांगितली असतील तर डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही पुन्हा औषधे सुरु ठेवू शकाल. पण त्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
  • जर तुम्हाला काही असामान्य symptoms दिसत असतील जसे कि सूज किंवा खूप वेदना होत असतील तर डॉक्टरांशी संपर्क साधावा.

NCV टेस्ट चा होणारा खर्च?

NCV टेस्ट चा खर्च अंदाजे २ हजार ते ५ हजार रुपये येऊ शकतो. तसेच तुम्ही कोणत्या डॉक्टर आणि कोणत्या हॉस्पिटल मध्ये टेस्ट करता, त्यावर हि खर्च अवलंबून असतो.

NCV टेस्ट ला लागणारा वेळ?

NCV टेस्ट ला अंदाजे ३० मिनिटे ते १ तास लागू शकतो. NCV टेस्ट ला लागणारा वेळ हा तुमच्या किती नसांचे परीक्षण करायचे आहे त्यावरून ठरवला जातो.

NCV टेस्ट झाल्यानंतर कोणत्या रोगांचे निदान करता येते?

NCV टेस्ट हि काही रोगांचे निदान करण्याचा फक्त एक भाग आहे. NCV टेस्ट सोबत आणखी काही टेस्ट करून खालील रोगांचे निदान करता येते.

  1. Polyneuropathy [पोलीन्यूरोपैथी] यालाच पेरिफेरल न्यूरोपैथी असे देखील म्हणले जाते. पेरिफेरल nerves मध्ये झालेल्या damage ला Polyneuropathy म्हणतात. हे काही केसेस मध्ये डायबेटिस शी रिलेटेड असू शकते. ज्या पेशंट ना डायबेटिस झालेला आहे आणि त्याची व्यवस्थित काळजी घेतली गेली नाही आणि तो कंट्रोल मध्ये ठेवता आला नाही तर पुढे जाऊन डायबेटिस चे मॅनिफेस्टेशन म्हणून polyneuropathy होण्याचा धोका असू शकतो.
  2. कार्पेल टनेल सिन्ड्रोम
  3. Guillain bare सिन्ड्रोम
  4. मायस्थेनिया ग्रॅव्हिस
  5. चारकोट मारी टूथ डीसीस

Tags: NCV Test Mahiti, NCV Test Kashi Keli Jate, NCV Test Ka Keli Jate, NCV Test Koni Karavi, NCV Test Price, NCV Test Kharch, NCV Test Kadhi Karavi, NCV Test Mhanje Kay, NCV Test info in Marathi, NCV Test in Marathi, NCV Test Mahiti, NCV Test Time

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!