Uncategorized

लाडकी बहीण योजनेचा फॉर्म एडिट कसा करायचा? | Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Correction Durusti

नमस्कार मित्रांनो, आज आपण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म एडिट कसा करायचा? या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Correction Durusti


बऱ्याच महिलांनी नारीशक्ती दूत ऍप द्वारे अर्ज म्हणजेच फॉर्म भरले आहेत, पण जर तुमचा अर्ज भरताना काही चूक झाली असेल, जसे की नाव चुकीचं टाकलं गेलं असेल, पत्ता चुकीचा टाकला गेला असेल, किंवा काही कागदपत्रे अपलोड करायची राहिली असतील, बँक डिटेल्स चुकले असतील, तर आता चिंता करायची आवश्यकता नाही.

कारण आता तुम्ही ही सर्व माहिती एडिट करू शकता, म्हणजेच आता तुम्ही फॉर्म मध्ये दुरुस्ती करू शकता. चला तर मग लाडकी बहीण योजनेचा फॉर्म एडिट कसा करायचा? या बद्दल पुढे माहिती जाणून घेऊ या.

लाडकी बहीण योजनेचा फॉर्म एडिट कसा करायचा?

स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वर जाऊन नारीशक्ती दूत ऍप सर्च करायचं आहे. इथे तुम्हाला Update असा ऑप्शन आलेला दिसेल, तर सर्वात आधी तुम्हाला हे ऍप अपडेट करून घ्यायचा आहे. व नंतर ओपन करायचे आहे.

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Form Durusti Step 1

स्टेप 2: ऍप ओपन केल्यावर तुम्हाला नवीन इंटरफेस आलेला दिसेल. मग खाली skip ऑप्शन वर क्लिक करा. त्या नंतर ज्या मोबाईल नंबर द्वारे तुम्ही हा फॉर्म भरला होता, तो मोबाईल नंबर टाकून नंतर दिलेल्या टर्म्स आणि कंडिशन्स ऍक्सेप्ट करायच्या आहेत. नंतर स्वीकारा ऑप्शन वर क्लिक करून मग Login बटन वर क्लिक करायचे आहे.

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Form Durusti Step 2

स्टेप 3: त्या नंतर तुमच्या मोबाईल नंबर वर एक OTP येईल तो ओटीपी टाकून Verify OTP या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. या नंतर ज्या परमिशन्स मागितल्या जातील त्यांना allow करायचं आहे.



Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Form Durusti Step 3

स्टेप 4: मित्रांनो, आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला तीन ऑप्शन दिसतील त्यातील तिसरा ऑप्शन म्हणजे ‘केलेले अर्ज’ या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Form Durusti Step 4

स्टेप 5: त्या नंतर तुम्हाला ज्या फॉर्म मध्ये तुम्हाला दुरुस्ती करायची असेल तो फॉर्म तुम्हाला इथे ओपन करायचा आहे.

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Form Durusti Step 5

स्टेप 6: त्या नंतर तुम्हाला त्या फॉर्म मधील भरलेली सर्व माहिती दिसेल. यात काय काय माहिती एडिट म्हणजेच दुरुस्त करायची आहे ती सर्व एकदा चेक करून घ्यायची आहे. त्यासाठी वरती उजव्या बाजूला तुम्हाला edit चा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Form Durusti Step 6

स्टेप 7: त्या नंतर भरलेला अर्ज तुम्ही फक्त एकदा एडिट करू शकता, परत एडिट करता येणार नाही, असा मेसेज आलेला दिसेल. त्यावर Ok करायचं आहे.

त्यानंतर तुम्ही जी माहिती चुकीची भरलेली आहे ती माहिती दुरुस्त करू शकता. जसे की तुमचे नाव एडिट करू शकता, पत्ता वगैरे एडिट करू शकता (इथे पत्ता, जिल्हा, गाव वगैरे ही सर्व माहिती आधार कार्ड प्रमाणेच असायला हवी ) , तसेच बँकेचे डिटेल्स चुकले असतील तर ते देखील चेक करून एडिट करू शकता. त्याचप्रमाणे जर एखादे डॉक्युमेंट बदलायचे असेल तर त्या डॉक्युमेंट जवळ असणाऱ्या लाल रंगाचा चुकीच्या चिन्हावर क्लीक करून तुमचे डॉक्युमेंट चेंज करू शकता.

स्टेप 8: त्या नंतर हमीपत्र देऊन स्वीकारा या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. त्या नंतर तुम्ही एडिट केलेली माहिती परत एकदा चेक करून नंतर ‘माहिती अपडेट करा’ या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 9: त्या नंतर तुम्ही एडिट केलेली सर्व माहिती तुम्हाला आलेली दिसेल. तसेच जर काही कागदपत्रे नवीन अपलोड केली असतील तर ती इथे आलेली दिसतील आणि जर नसेल केली तर काहीही दिसणार नाही. त्या नंतर शेवटी ‘फॉर्म सबमिट करा’ या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 10: त्या नंतर पुन्हा एकदा तुम्हाला एक ओटीपी मागितला जाईल, तो आलेला ओटीपी टाकून व्हेरिफाय करायचं आहे. व अश्या प्रकारे तुमचा फॉर्म / अर्ज एडिट होऊन जाईल.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म एडिट कसा करायचा, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवादl

Tags: mukhyamantri mazi ladki bhahin yojana form edit, mazi ladki bhahin yojana form correction kaise kare, ladki bahin yojana form edit kasa karava, ladki bahin yojana form pending problem, majhi ladki bahin yojana form edit kaise kare, ladli bahan yojana form correction kaise kare, ladki bahin yojana online form correction edit option, ladki bahin yojana form edit, ladki bahin yojana form correction, mukhyamantri mazi ladki bhahin yojana online form edit correction

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!