MSRTC Yojana

एसटीचे ऑनलाईन तिकीट बुकिंग कसे करायचे ? | MSRTC Bus Booking Online

नमस्कार मित्रांनो, आज आपण एसटीचे ऑनलाईन तिकीट बुकिंग कसे करायचे, तसेच आपल्या आवडती सीट कशी निवडायची, आणि महिलांसाठी 50 टक्के आरक्षण सीट बुक कशी करायची, याबद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने आता सर्व महिलांना एसटी प्रवास मध्ये 50 टक्के सवलत दिली आहे. आणि आता तर तसा GR देखील जारी करण्यात आला आहे. तसेच याआधीही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना राज्य सरकारने एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मध्ये मोफत प्रवास करण्याची सवलत दिली होती. याव्यतिरिक्त ही ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या बसेस मधून प्रवास करण्यासाठी विविध सवलती जाहीर केल्या होत्या. या सर्व सेवांचा किंवा सवलतींचा लाभ आजही अनेक नागरिक घेत आहे.



पण एसटी च्या या देण्यात येणाऱ्या या सवलतींमुळे आता बसेस मध्ये गर्दी वाढलेली दिसून येते. त्यामुळे बरेच नागरिक किंवा प्रवासी एसटीचे ऑनलाईन तिकीट बुकिंग करण्याचा प्रयत्न करतात. मात्र ऑनलाईन तिकीट काढताना या आरक्षण सवलतीचा लाभ कसा घ्यावा याबाबत प्रवाश्यांना माहीत नसते. म्हणूनच तुम्ही देखील एसटीचा प्रवास करताना गर्दीमुळे आरक्षण करणार असाल तर ते ऑनलाईन पद्धतीने कसे करायचे हे जाणून घेण्यासाठी आमचा आजचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

Online Bus Booking Kase Karayche

एसटीचे ऑनलाईन तिकीट बुकिंग कसे करायचे ?

स्टेप 1: मित्रांनो, एसटीचे ऑनलाईन तिकीट बुकिंग करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ च्या msrtc.maharashtra.gov.in या ऑफिशियल वेबसाईटवर जायचे आहे. आता वेबसाईट च्या होम पेज वर असलेल्या ऑनलाईन बुकिंग (Online Booking) या ऑप्शन ला सिलेक्ट करायचे आहे.

Online Bus Booking Kase Karayche Step 1

स्टेप 2: मित्रांनो, आता तुम्हाला तुमचे अकाउंट तयार करावे लागेल. किंवा तुम्ही Guest user म्हणून देखील तुम्ही तिकीट बुक करू शकता. पण जर तुम्हाला तुमचे तिकीट कॅन्सल करायचे असेल तर Guest user द्वारे तुम्ही ते करू शकणार नाहीत. आणि तुमचे पैसे ही तुम्हाला परत मिळणार नाही. त्यामुळे अकाउंट तयार करणे खूप महत्त्वाचे असते.

तर मित्रांनो, अकाउंट तयार करण्यासाठी LogIn पेज वर दिलेली माहिती भरायची आहे. त्यासाठी आधी New user या ऑप्शन मध्ये जाऊन तुमची सर्व प्रकारची माहिती द्यावी. तसेच युझरनेम व पासवर्ड देखील तयार करावा. व नंतर दिलेला कॅपचा टाकून अकाउंट लॉगिन करून घ्यायचे आहे.

Online Bus Booking Kase Karayche Step 2

स्टेप 3: आता तुम्हाला कुठून कुठपर्यंत प्रवास करायचा आहे ते सिलेक्ट करून घ्या. म्हणजेच जर तुम्हाला पुणे ते ठाणे प्रवास करायचा असेल तर From मध्ये पुणे टाका व To मध्ये ठाणे टाका.



त्याचप्रमाणे Journey date मध्ये तुम्हाला कोणत्या तारखेपासून प्रवास करायचा आहे ते सिलेक्ट करून लिहायचे आहे. व नंतर राज्यातील सर्व प्रकारच्या बसेस ची लिस्ट म्हणजेच Bus type सिलेक्ट करायचे आहे. उदाहरणार्थ, शिवशाही. बस चा प्रकार सिलेक्ट केल्यानंतर आता Search बटन वर क्लिक करायचे आहे.

Online Bus Booking Kase Karayche Step 3

स्टेप 4: मित्रांनो, आता पुढे तुम्हाला सिलेक्ट केलेल्या शिवशाही बस ची वेळ कधी आहे, त्याचा मार्ग कोणता आहे, कोणत्या टाइपची बस आहे वगैरे सर्व माहिती तुम्हाला आणली जाते. आता समज तुम्हाला सकाळी 7.20 वाजेच्या बस ने जायचे आहे तर त्यापुढील बटन वर तुम्हाला टिक करायचे आहे, तसेच खाली दिलेल्या Get fare या ऑप्शन द्वारे त्या बस साठी प्रवासी भाडे किती आहे ते पाहू शकता. उदाहरणार्थ प्रौढ व्यक्तीसाठी प्रवासी भाडे 400 रू व मुलांसाठी 220 रुपये इतके आहेत. तसेच आरक्षण म्हणजेच सीट रिझर्व्ह करण्यासाठी 10 रू एक्सट्रा घेतले जातात.

मित्रांनो, या वेबसाईटवर तुम्हाला पुणे ते ठाणे या दरम्यान किती स्टॉप आहेत व कुठे कुठे बस थांबते त्याची माहिती देखील तुम्हाला इथे मिळते, यासाठी View Stop बटन वर क्लिक करा. तसेच Show Availability या ऑप्शन द्वारे बस मध्ये किती सीट एव्हलेबल आहेत ते देखील पाहता येते.

Online Bus Booking Kase Karayche Step 4

स्टेप 5: मित्रांनो, आता तुम्हाला Book Ticket या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. त्या नंतर नेक्स्ट पेज वर तुम्ही बस कुठून पडकणार आहात ते सिलेक्ट करा. उदाहरणार्थ- पुणे स्वारगेट व ठाण्यात कुठे उतरणार आहात ते सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्ही महिला आहात की पुरुष ते सिलेक्ट करा.

या नंतर कोटा सिलेक्ट करायचा आहे. यास्त जर तुम्ही महिला असाल तर कन्सेशन (Ladies concession) या ऑप्शन ला सिलेक्ट करायचे आहे. ज्यामुळे 50 टक्के आरक्षण लागू होईल. व त्या नंतर तुमचे वय टाकायचे आहे. मित्रांनो, कन्सेशन साठी तुम्हाला इथे पुरावा म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, वोटींग कार्ड यापैकी कोणते प्रूफ तुम्ही देणार आहात ते सिलेक्ट करा व नंतर त्याचे डिटेल्स भरा. जसे की जर तुम्ही पुरावा म्हणून आधार कार्ड देणार असाल तर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. तसेच जर तुमच्या सोबत लहान मुलं असेल तर त्याची ही माहिती भरायची आहे. व नंतर Go बटन वर क्लिक करायचे आहे.

Online Bus Booking Kase Karayche Step 5

स्टेप 6: मित्रांनो, आता नेक्स्ट पेज वर तुम्ही भरलेली सर्व माहिती व Seat Selection चा ऑप्शन दिसेल. तुम्हाला जर सीट सिलेक्ट करायची असेल तर Yes ऑप्शन वर टिक करा.

Online Bus Booking Kase Karayche Step 6

व नंतर तुमच्या समोर बस मध्ये उपलब्ध असलेल्या सीट ची माहिती तुम्हाला दिसेल, व त्या वरून तुम्हाला आवडेल ती सीट तुम्ही निवडू शकता. व नंतर Allocate बटन वर क्लिक करायचे आहे. (मित्रांनो, इथे तुम्ही निवडलेली सीट तुम्हाला भेटेलच याची खात्री नसते. त्या ऐवजी इतर कोणतीही सीट तुम्हाला दिली जाऊ शकते. ) त्या नंतर Continue बटन वर क्लिक करायचे आहे.

Online Bus Booking Kase Karayche Step 6 Sub-Step 2

स्टेप 7: आता नेक्स्ट पेज वर इतर माहिती सोबतच या संपूर्ण प्रवासाचे तुम्हाला ऑनलाईन किती पैसे भरायचे आहेत ते सांगितले जाते. तुम्ही महिला प्रवासी असाल तर तुम्हाला सवलती मध्ये अर्धे तिकीट लागू होईल. मित्रांनो, आता तिकिट बुकिंग चे कन्फर्मेशन मिळवण्यासाठी आता तुम्हाला खालील बॉक्स मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. व तुम्ही कोणत्या मोड ने ऑनलाईन फी भरणार आहात ते सिलेक्ट करायचे आहे व नंतर Make Payment ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. व नंतर Ok बटन वर क्लिक करायचे आहे.

Online Bus Booking Kase Karayche Step 7

स्टेप 8: आता तुम्ही तुमचे पेमेंट क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआई, नेट बँकिंग वगैरे पद्धतीने करू शकता. यापैकी एक निवडून तुम्ही तुमचे पेमेंट करायचे आहे.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे तुम्ही तुमचे एसटी चे तिकीट ऑनलाईन पद्धतीने बुक करू शकता. या तिकिटावर तुमची सर्व माहिती व प्रवासाचे ठिकाण वगैरे सर्व माहिती दिलेली असते.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण एसटीचे ऑनलाईन पद्धतीने तिकीट बुकिंग कसे करायचे, या बद्दल माहिती जाणून घेतली. तसेच आता प्रवाशांना तिकीट आरक्षण करण्यासाठी आरक्षण केंद्रावरील रांगेत थांबावे लागणार नाही, तर घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तुमचे एसटीचे तिकीट बुक करू शकता. मित्रांनो, मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!