Mobile Help

मोबाईल हरवल्यास किंवा चोरी झाल्यास ऑनलाईन पोलीस तक्रार कशी करायची? | Mobile Lost Police Complaint Online

नमस्कार मित्रांनो, आज आपण मोबाईल हरवल्यास किंवा चोरी झाल्यास ऑनलाईन पोलीस तक्रार कशी करायची? त्यासाठी अर्ज कसा करायचा? या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

Mobile Lost Police Complaint Online

मित्रांनो, सध्याच्या तंत्रज्ञान प्रधान युगात मोबाईल फोन हे केवळ संवादाचे माध्यम न राहता, अनेक वैयक्तिक, सामाजिक आणि आर्थिक व्यवहारांसाठी वापरले जाणारे महत्त्वाचे उपकरण बनले आहे. त्यामुळे मोबाईल हरवणे किंवा चोरी होणे ही गोष्ट एखाद्या व्यक्तीसाठी चिंतेची बाब ठरते. या घटनेमुळे वैयक्तिक माहितीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो, तसेच आर्थिक गैरवापराची देखील शक्यता वाढते. अशा प्रसंगी त्वरित पोलीस तक्रार दाखल करणे आवश्यक असते.



मित्रांनो, ज्या प्रकारे डिजिटल क्रांतीमुळे आपण घर बसल्या ऑनलाइन पद्धतीने महत्त्वपूर्ण कागदपत्रे मिळवू शकतो तसेच ऑनलाईन तक्रारी देखील नोंदवू शकतो. आणि सुदैवाने, आता राज्य सरकारनी ऑनलाईन पोलीस तक्रार दाखल करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे. ही सेवा नागरिकांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने न्याय मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरते. चला तर मग मोबाईल हरवल्यास किंवा चोरी झाल्यास ऑनलाईन पोलीस तक्रार कशी करायची? याची प्रक्रिया समजावून घेऊ या. पण त्या साठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा…

मोबाईल हरवल्यास/ चोरी झाल्यास पोलीस कम्प्लेन्ट

स्टेप 1:- मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला महाराष्ट्र पोलीस च्या https://citizen.mahapolice.gov.in या अधिकृत वेबसाईट वर यायचं आहे. वेबसाईट ओपन झाल्या वर उजव्या बाजूला तुम्हाला Lost Mobile Intimation असा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे.

Mobile Lost Police Complaint Online Step 1

स्टेप 2:- त्या नंतर ज्याचा मोबाईल आहे त्यांचा आधार कार्ड नुसार पूर्ण नाव म्हणजेच First name, Middle name, Surname टाकायचं आहे.

स्टेप 3:- त्या नंतर त्या व्यक्तीची जन्म तारीख, जेंडर, ई-मेल आयडी, ऑक्यूपेशन म्हणजेच नोकरी/ व्यवसाय टाकायचा आहे. त्या नंतर ID प्रूफ मध्ये आधार कार्ड सिलेक्ट करायचं आहे व पुढे आधार कार्ड नंबर टाकून एखादा Alternate मोबाईल नंबर असेल तर तो टाकायचा आहे.

Mobile Lost Police Complaint Online Step 2

स्टेप 4:- मित्रांनो, आता या नंतर ज्या व्यक्तीचा मोबाईल हरवला आहे त्या व्यक्तीचा पूर्ण पत्ता आधार कार्ड नुसार टाकायचा आहे. त्यात जिल्हा, तालुका, राज्य , गावचे नाव व पिन कोड व्यवस्थित सिलेक्ट करून टाकायचं आहे. तसेच तुमचा पर्मनंट पत्ता जो असेल तो ही टाकायचा आहे. दोन्ही पत्ते सारखेच असतील तर Same For Permanent इथे Yes ऑप्शन वर टिक करायचे आहे.



स्टेप 5:- त्या नंतर तुमचा मोबाईल ज्या दिवशी हरवला त्याची तारीख आणि वेळ टाकायची आहे व ज्या लोकेशन ला हरवला ते लोकेशन टाकायचं आहे. नंतर तुमचं राज्य व जिल्हा निवडायचा आहे. नंतर तुमचा एरिया कोणत्या लोकल पोलिस स्टेशन अंतर्गत येतो ते पोलिस स्टेशन निवडायचं आहे.

Mobile Lost Police Complaint Online Step 3

स्टेप 6:- त्या नंतर Make या ऑप्शन मध्ये तुमचा मोबाईल कोणता आहे ते टाकायचं आहे. त्या नंतर Model कोणतं आहे ते टाकायचं आहे. त्या नंतर IMEI नंबर टाकून हरवलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे, तसेच Service Provider मध्ये कोणत्या कंपनी चा मोबाईल आहे ते टाकायचं आहे व शेवटी अजून काही डिस्क्रिप्शन टाकायचं असेल तर ते टाकू शकता. त्या नंतर दिलेल्या बॉक्स मध्ये टिक करून Submit बटन वर क्लिक करायचं आहे.

या नंतर तुमचं मोबाईल हरवल्याचं ऍप्लिकेशन सबमिट होऊन जाईल. तुम्हाला इथे ऍप्लिकेशन नंबर सुद्धा मिळेल. तुम्ही या केलेल्या अर्जाला किंवा Acknowledgement ला पीडीएफ मध्ये सेव्ह करून त्याची प्रिंट देखील काढून ठेवू शकता.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण मोबाईल हरवल्यास किंवा चोरी झाल्यास ऑनलाईन पोलीस तक्रार कशी करायची? या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवादl

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!