Miss Call SMS वरून SBI बँक बॅलन्स कसा तपासावा
चला तर मग माहित करून घेऊ Miss Call SMS वरून SBI Bank Balance कसा चेक करायचा.
- SBI कॉल बॅंकिंग नोंदणी प्रक्रिया
- SBI बॅलन्स तपासा
- SBI मिनी स्टेटमेंट
- SBI मागील ६ महिन्याचे ई-स्टेटमेंट
- SBI कॉल बॅंकिंग नोंदणी रद्द प्रक्रिया
आजचे एकवीसातल्या शतकातले युग खूप वेगवान झाले आहे. पूर्वीच्या काळात जेव्हा SBI Bank खात्यातील बॅलन्स चेक करण्यासाठी बँकेत जायला लागत असे आणि पासबुक प्रिंट करून किंवा बँक कर्मचारांना विचारून बॅलन्सची माहिती भेटत असे पण आत्ता तसे काही करायची गरज नाही घरी बसून आपल्या मोबाइलवरून आपल्याला बँक शिल्लक माहिती मिळू शकते. आपल्याकडे इंटरनेटचे थोडेसे ज्ञान जरी असेल तरी आपण आपल्या मोबाइल फोनवरून नेटबँकिंगद्वारे आपले खाते नियंत्रित करू शकतो. आज बरेच लोक घरी बसून नेटबँकिंगच्या सुविधेचा लाभ घेत आहेत. देशातील जवळपास सर्व मोठ्या बँकांनी नेट बँकिंगची सुविधा उपलब्ध करुन दिली असून त्यांच्या वापरकर्त्यांना त्याचा फायदा झाला. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय बद्दल बोलाल, तर यामध्ये तुम्हाला नेटबँकिंगची सुविधा देखील मिळेल.
चला तर मन SBI Quick – Missed Call Banking सेवेची माहिती करून घेवू
एसबीआय क्विक – मिस्ड कॉल बॅंकिंग ही बँकेची एक विनामूल्य सेवा आहे जिथे आपण आपल्या अकाउंट बॅलन्स, मिनी स्टेटमेंट आणि बरेच काही मिळवू शकता फक्त एक मिस्ड कॉल देऊन किंवा एसएमएस पाठवून. यासाठी आपला मोबाईल नंबर बँकेच्या खात्याला जोडलेला असायला हवा आणि तरच आपण या सेवेचा लाभ घेवू शकतो.
SBI कॉल बॅंकिंग नोंदणी प्रक्रिया (SBI Quick Registration Process)
प्रथम तुम्हाला खालील मेसेज तुमच्या मोबाईल नंबर वरून पाठवावा लागेल
‘REG अकाउंट नंबर’ या नंबर वर 09223488888
उदा. REG 98765432109
नंतर तुम्हाला या सेवेला जोडला गेल्याचा मेसेज येईल. जर तुम्हाला मेसेज आला नाही तर मोबाईल नंबर बँकेला जोडला गेलेला आहे का याची खात्री करून घ्या
(हि प्रोसेस तुम्हाला फक्त एकदाच कराची गरज आहे)
SBI बॅलन्स तपासा (SBI Quick Balance Enquiry)
बॅलन्स तपासण्यासाठी 09223766666 या नंबर मिस कॉल द्या किंवा खालील मेसेज पाठवा
‘BAL’ या नंबर वर 09223766666
SBI मिनी स्टेटमेंट (SBI Quick Mini Statement)
मागील 5 व्यवहारांच्या मिनी स्टेटमेंट साठी 09223866666 या नंबर वर मिस कॉल द्या किंवा खालील मेसेज पाठवा
‘MSTMT’ या नंबर वर 09223866666
SBI मागील ६ महिन्याचे ई-स्टेटमेंट (SBI Quick E-Statement)
आपण आपल्या बचत बँकेच्या खात्यातील शेवटच्या 6 महिन्यांसाठी ई-स्टेटमेंट या सेवेद्वारे मिळवू शकता. आपल्या बँकेला जोडलेल्या ईमेल आयडीवर PDF फाइल मध्ये माहिती पाठविले जाईल.
यासाठी तुम्हाला खालील मेसेज पाठवावा लागेल –
ESTMT <अकाउंट नंबर> या नंबर पाठवा 09223588888
(टीप: Code हा आपल्या आवडीचा कोणताही 4 अंकी क्रमांक आहे जो आपल्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर पाठविलेल्या पीडीएफ चा पासवर्ड असेल)
SBI कॉल बॅंकिंग नोंदणी रद्द प्रक्रिया (SBI Quick de-register Process)
SBI कॉल बॅंकिंग नोंदणी रद्द करण्यासाठी खालील मेसेज पाठवावा लागेल –
DREG या नंबर वर 09223488888
या लेख बद्दल काही प्रश्न असतील तर खालील कंमेंट मध्ये टाकू शकता, धन्यवाद…