Shop

सर्वात चांगली मसाज गन (स्नायूंच्या दुखण्यापासून मुक्ती) | Best Massage Gun in India

नमस्कार मित्रांनो, आजच्या या नवीन लेखात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आम्ही तुम्हाला मसाज गन बद्दल माहिती सांगणार आहोत, तसेच तुम्हाला घरी वापरण्यासाठी सर्वात चांगले मसाज गन कोणते आहे ते जाणून घ्यायचे असेल तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे.

Best Massage Gun in India

मित्रांनो, तुमच्या घरात जर कोणी वृद्ध व्यक्तीला स्नायूंच्या दुखण्याने किंवा स्नायूंच्या तणावामुळे त्रास होत असेल, तर त्यांच्यासाठी मसाज गन वापरणे खूप उपयोगी ठरेल. वृद्ध व्यक्तींमध्ये सहसा हात, पाय व पोटऱ्या दुखीचा त्रास सतत होत असतो त्यामुळे त्यांना शरीराच्या या त्रासापासून व तणाव पासून दूर करायचे असेल तर तुमच्याकडे एक मसाज गन असायलाच हवी.



तसेच दिवस भर काम केल्यानंतर किंवा जिम वर्क आऊट केल्यानंतर तुमच्या मसल्स दुखतात का? जर तुमचं उत्तर हो असेल तर तुमच्यासाठी मसाज गन वापरणे खूप फायदेशीर ठरू शकते. अनेक जण मसल्स पेन झाल्यावर मसाज पार्लर मध्ये जाऊन मसाज करून घेतात. पण प्रत्येक वेळी पार्लर वर पैसा खर्च करण्यापेक्षा जर तुमच्याकडे स्वतःची मसाज गन असेल तर तुम्ही घरच्या घरी ती केव्हाही वापरू शकता व तुमच्या स्नायूंच्या वेदना कमी करू शकता.

मित्रांनो, मोठ्या व्यक्ती किंवा खेळाडू मसाज गनचा वापर करताना दिसतात. तसेच आता घराघरामध्ये अगदी वृद्ध व्यक्तींमध्ये ही मसाज गन हळूहळू लोकप्रिय होताना दिसत आहे. मसाज गन हे एक पोर्टेबल आणि हँडहेल्ड असे उपकरण आहे. या मसाज गन शक्यतो वायर लेस असतात. काही मसाज गन बॅटरी वर चालतात तर काही रिचार्ज करण्या योग्य असतात.

मसाज गन खरेदी करताना कोणत्या गोष्टी पहाव्यात

स्ट्रोक स्पीड (Stroke Speed) – मित्रांनो, स्ट्रोक स्पीड म्हणजे RPM स्पीड. तुमच्या मसाज गन मध्ये जितज जास्त RPM स्पीड असेल तेवढेच ती गन तुमच्यासाठी जास्त फायदेशीर ठरते. मसाज गनमध्ये शक्यतो 1500 RPM पेक्षा जास्त स्पीड असायला हवे. म्हणजेच जितके स्पीड जास्त असेल तितकीच मसाजची तीव्रता जास्त असेल. तसेच हा स्ट्रोक स्पीड ऍडजस्टेबल म्हणजे कमी जास्त ही करता आला पाहिजे, अशीच मसाज गन निवडावी.

Attachments आणि Case – मित्रांनो, तुमच्या मसाज गन मध्ये वेग-वेगळे attachments दिले आहेत की नाही ते नक्की चेक करा. कारण बॉडीच्या प्रत्येक भागा वर तुम्ही एकाच attachment ने मसाज करू शकत नाही. प्रत्येक बॉडी पार्टची गरज ही वेग-वेगळी असते.

बॅटरी लाइफ (Battery Life) – मित्रांनो, कोणत्याही उपकरणची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याची बॅटरी लाइफ. त्यामुळे तुमच्या मसाज गनची बॅटरी लाइफ किती आहे ते नक्की चेक करा. एकदा चार्ज केल्या वर कमीत कमी दोन तास तरी तुमची मसाज गन चालली पाहिजे.



वजन (Weight) – मित्रांनो, तुम्ही निवडलेल्या मसाज गनचे वजन किती आहे, ही गोष्ट पण खूप महत्त्वाची आहे. शक्यतो कमी वजनाचे मसाज गन निवडावी, जेणेकरून तुम्हाला ती इझिली हँडल करता येईल.

एर्गोनॉमिक डिझाइन (Ergonomic Design) – मित्रांनो, तुम्ही निवडलेल्या मसाज गनची डिझाइन अशी हवी की तुमच्या हातातून मसाज गन पडायला नको. तुम्हाला ती व्यवस्थित पकडता आली पाहिजे. तसेच तुमची मसाज गन स्वेट प्रूफ असली पाहिजे. जेणे करून ती तुमच्या हातातून निसटणार नाही.

आवाजाची तीव्रता – बहुतेक मसाज गन हे वापरतांना आवाज करतात. बहुतेक करून बंद खोलीत किंवा काना जवळच्या भागात जर तुम्ही मसाज करत असाल तर तुम्हाला त्या आवाजचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही निवडलेल्या मसाज गनची आवाजाची तीव्रता कमी आहे की नाही ते नक्की चेक करा.

भारतातील सर्वात चांगल्या मसाज गन

1) Dr. Physio Supervolt मसाज गन

मित्रांनो, या मसाज गनमध्ये खूप पॉवरफुल मोटर बसवण्यात आली आहे, जी 4200 RPM चा स्पीड देते. या मसाज गनची बॅटरी बॅकअप पण चांगली आहे. एकदा चार्ज केल्यावर जवळ जवळ तीन तास पर्यंत ही मसाज गन बॅटरी वर चालू शकते. तसेच यात सहा डीटॅचेबल attachments पण बघायला मिळतात. ही मसाज गन स्वेट प्रूफ असून नॉन स्लीपरी आहे. या मसाज गन चे वजन फक्त थोडे जास्त म्हणजे 1.47 किलो आहे.

या मसाज गन ची किंमत ही अंदाजे 2300 रुपये पर्यंत असू शकते. तसेच याची एर्गोनॉमिक डिझाइन, आणि यात दिलेल्या सहा पॉवर सेटिंग आणि याचे लांब हँडल यामुळे हे मसाज गन वापरण्यास चांगले मानले जाते.

Dr Physio Supervolt Machine Gun

2) Caresmith Cordless मसाज गन

मित्रांनो, हि मसाज गन एर्गोनॉमिकल डिझाइन सह येते आणि कॉर्डलेस पण आहे. तसेच यात असलेली मोटर 3300 RPM चा स्ट्रोक स्पीड देते. या मसाज गन मध्ये सहा ऍडजस्टेबल attachments पण दिले गेले आहेत. तसेच या मसाज गनची बॅटरी 2500 mh ची असून खूप चांगली आहे. या मसाज गन चे वजन 800 ग्रॅम पर्यंत असू शकते. तसेच या मसाज गन वर तुम्हाला नऊ महिन्यांची वॉरंटी सुद्धा मिळणार आहे. आणि या प्रोडक्ट ची किंमत ही अंदाजे 2800 रुपये पर्यंत असू शकते.

Caresmith Battery Powered Massage Gun

3) Lifelong मसाज गन

मित्रांनो, या मसाज गनची खासियत म्हणजे यात तुम्हाला 30 इंटेनसिटी लेव्हल दिले आहेत ज्यांचा उपयोग तुमच्या गरजे नुसार घेऊ शकता. तसेच यात पॉवर फुल मोटर पण दिली आहे जी 3300 RPM स्ट्रोक स्पीड देते. आणि याच बॅटरी बॅकअप पण दोन ते तीन तासांचा असून चांगला आहे आणि यात लिथिअम आयन बॅटरी वापरली असून ती बराच काळ टिकते. या शिवाय यात तुम्हाला सहा वेग वेगळे attachments पण दिले आहेत जे तुम्ही तुमच्या बॉडीच्या वेग वेगळ्या पार्टस वर वापरू शकता.

या मसाज गन चे वजन पण कमी आहे फक्त 980 ग्राम. त्यामुळे तुम्ही हे मसाज गन सहज कॅरी करू शकता. या मसाज गन वर तुम्हाला एक वर्षाची वॉरंटी मिळत असून याची किंमत बघायची झाली तर या मसाज गनची किंमत ही ऍमेझॉन वर तुम्हाला 2900 रुपये पर्यंत मिळू शकते.

Lifelong Gun Massager

4) Caresmith 24V मसाज गन

मित्रांनो, केअरस्मिथचे हि मसाज गन आधीच्या गन पेक्षा खूप चांगली व वेगळ्या प्रकारची डिझाइन आहे. याची डिझाइन तर एर्गोनॉमिकल आहेच शिवाय वजनाने ही खूप हलके आणि कॉम्पॅक्ट डिझाइन आहे. या मसाज गन ला व्यवस्थित ठेवण्यासाठी याच्या सोबत एक case पण दिले आहे. याची मोटर तुम्हाला 3300 स्ट्रोक पर मिनिटचा स्पीड देते. जो खूप पॉवर फुल स्पीड आहे.

याची बॅटरी लाइफ पण अतिशय चांगली आहे, चार तास पर्यंत हे मसाज गन तुम्ही चालवू शकता. शिवाय यात तुम्हाला बॉडीच्या वेग वेगळ्या पार्टससाठी सहा वेग-वेगळे attachments दिले आहेत. या मसाज गन वर तुम्हाला एक वर्षाची वॉरंटी दिली जात असून या मसाज गन ची किंमत ही जवळ पास 4800 रुपये पर्यंत असू शकते.

Caresmith 24V Massage Gun

5) Flexnest Premium मसाज गन

मित्रांनो, flexnest चे हे मसाज गन खूप स्टर्डी मटेरिअलचे बनले असून ड्युरेबल आहे. याची बिल्ड क्वालिटी खूप चांगली आहे. आणि वजनाने ही मसाज गन खूप कमी म्हणजे फक्त 710 ग्रॅम पर्यंत आहे. याची पॉवर फुल मोटर तुम्हाला 3000 RPM चा स्पीड देते. तसेच यात तुम्हाला चार सिलिकॉन चे attachments हेड्स पण दिले आहेत. जे इंटरचेंजेबल आहेत.

तसेच यात तुम्हाला लिथिअम आयन बॅटरीचा सपोर्ट दिला आहे त्याची कॅपॅसिटी 2500 mh आहे. या मसाज गन वर तुम्हाला एक वर्षाची वॉरंटी मिळते व ऍमेझॉन वर या प्रोडक्ट ची किंमत ही 5000 रुपये पर्यंत असू शकते.

Flexnest Premium German-Designed Massager Gun

मसाज गनचे फायदे

  • मित्रांनो, मसाज गनचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते पोर्टेबल आहेत. त्यामुळे तुम्ही तुमची मसाज गन कुठे ही नेऊ शकता.
  • रेग्युलर मसाज पेक्षा मसाज गनने होणाऱ्या मसाजने लवकर आराम मिळतो.
  • मसाज गन मध्ये केलेली इन्व्हेस्ट ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट असते. त्यामुळे मसाज पार्लर मध्ये जाण्यापेक्षा व दरवेळेस पैसे खर्च करण्या पेक्षा मसाज गन वापरणे चांगले.
  • मसाज गन तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण वाढवते. त्यामुळे स्नायूंना आराम मिळतो.
  • मसाज गन स्नायूंमधील टाइटनेस कमी करून वेदना कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे तणाव कमी होऊन शरिराला आराम मिळतो.

मसाज गनचे तोटे

  • मसाज गनने मिळणारा आराम हा तात्पुरता असतो.
  • मसाज गन योग्य रीतीने हाताळली गेली नाही तर तर तुमच्या बॉडीला किंवा स्नायूंना त्रास होऊ शकतो किंवा जखम ही होऊ शकते.
  • शरीराच्या एखाद्या भागाला सूज आली असल्यास तिथे मसाज गनचा वापर करता येत नाही.
  • तसेच हाय ब्लड प्रेशर, व्हेरिकोज व्हेन्स, संधिवात, स्नायूंचा आजार, असलेल्या व्यक्तींना मसाज गन चा वापर करता येत नाही.

मसाज गनची काळजी कशी घ्यावी

मित्रांनो, तुम्हाला जर तुमची मसाज गन दीर्घ काळ टिकवायची असेल तर त्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी तुमची मसाज गन ओव्हरचार्ज करू नका. नाहीतर त्याची बॅटरी लाइफ खराब होऊ शकते. या शिवाय तुमची मसाज गन पाण्याच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्या. मसाज गन मध्ये जर काही बिघाड झाला तर कस्टमर केअरशी संपर्क करा व रिपेअर करून घ्या.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण मसाज गन बद्दल बरीच माहिती जाणून घेतली. आशा आहे की तुम्ही ही तुमच्यासाठी एक मसाज गन नक्कीच खरेदी कराल. मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला आज चा हा लेख नक्कीच आवडला असेल. तसेच हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र मंडळीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद।

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!