मखाना म्हणजे काय? त्याचे आरोग्यासाठी काय फायदे आहेत? | Makhana Info
- मखाना म्हणजे काय?
- मखान्याततील पोषक घटक
- मखानाचे आरोग्यासाठी फायदे
- मखानाचे सेवन कसे करावे?
- मखान्यांच्या काही रेसिपी
नमस्कार मित्रानो, आमच्या आज च्या या नवीन लेखात आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नेहमी प्रमाणे आज ही आम्ही तुमच्या साठी काही तरी नवीन व खूप उपयोगी माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो आज आपण मखाना म्हणजे काय व त्याचे आरोग्यासाठी काय फायदे आहेत, व मखान्यांचे काही रेसिपी कशा बनवायच्या, अश्या बऱ्याच गोष्टी बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, आपण दररोज अनेक सेलिब्रिटिझ बघतो. त्यांना बघून आपसूकच आपल्या मनात विचार येतो की हे इतके फिट कसे काय दिसतात. त्यांचं वजन इतकं नियंत्रणात कसे काय राहते? त्यासाठी सेलिब्रिटिझ लोक काय करत असतील? बरेच जण म्हणतात की ते नियमितपणे एक्सरसाईझ म्हणजे व्यायाम करतात. हे जरी बरोबर असले तरी फक्त व्यायाम करण्याने फिट राहत येते का? तर नाही. त्या बरोबर डाएट पण खूप महत्वाचा असतो. मित्रांनो, तसं बघायला गेलं तर फक्त सेलेब्रिटिझच नाही तर आजकाल प्रत्येक व्यक्ती ही हेल्थ कॉन्शस असलेली दिसते. आपण फिट राहावे यासाठी काय करता येईल याकडे सर्वांचे लक्ष असते.
आता फिट रहायचे म्हणजे उपवास करायचा का? पण भूक तर लागणारच ना. मग भूक भागवण्यासाठी व आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी तसेच अति वजन ही वाढणार नाही यासाठी आपण काही ठराविक पदार्थ खातो. या पदार्थांमध्येच आता अजून एका महत्वाच्या पदार्थाचे नाव ऍड झाले आहे ते म्हणजे मखाना. मित्रांनो, मखाना म्हणजेच त्याला लोटस सीड, फॉक्स नट्स, प्रिकली लिली, मखने, मखाने असे ही म्हटले जाते. याच मखाना बद्दल आपण अजून माहिती व त्याचे फायदे, नुकसान अशी सर्व माहिती सविस्तर पणे पुढे जाणून घेणार आहोतच. पण त्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा…
सर्वात पहिले मखाना म्हणजे काय त्या बद्दल जाणून घेऊ या:
मखाना म्हणजे काय?
मित्रांनो, पॉपकॉर्न सारखे दिसणारे पांढर्या रंगाचे व वजनाने अतिशय हलके असणारे मखाने म्हणजे एखाद्या धान्याच्या भाजुन बनवलेल्या लाह्या किंवा मुरमुरे नसून सेलेब्रिटी लोकांनी फिटनेस साठी डायट मध्ये समावेश केलेला अगदी लो कॅलरी फुड आयटम आहे. भारतात जम्मु-कश्मिर, मिझोरम, हिमाचल प्रदेश, बिहार या राज्यां मध्ये या मखान्यांची शेती केली जाते. या पदार्थाला जास्त करून हेल्थ कॉन्शस लोकांकडुन जास्त मागणी असते कारण मखानेचा वापर खाण्यासाठी केला जातो.
मित्रांनो, मखाना हे एक प्रकारच्या जलपर्णी म्हणजे पाण्यात उगवणाऱ्या एका वनस्पतीपासुन मिळणारे बी आहे. ही वनस्पती दिसायला काटेरी व कमळासारखी असतात. याची पाने गोलाकार व पाण्यावर तरंगत असतात, व दिसायला काहीशी वरुन हिरवी व पाण्याखाली जांभळे लालसर रंगाचे असतात. या वनस्पतीपासून निघणारे हे बी म्हणजेच मखाने होय. या आरोग्यदायी मखान्याचा वापर वेगवेगळ्या प्रकारचे गोड पदार्थ, नमकिन तसेच साखर विरहीत खीर बनवण्यासाठी देखील केला जातो. याशिवाय लोक फराळ म्हणूनही मखणे खातात. आयुर्वेदानुसार, माखणा हा गोड व थंड प्रभाव देणारा पदार्थ आहे.
मखान्यात कोण कोणते पोषक घटक असतात?
मित्रांनो, मखान्यामध्ये अनेक आवश्यक पोषक घटक असतात. साधारणपणे एक कप किंवा 32 ग्रॅम मखाना मध्ये खालील पोषक घटक असतात…
- कर्बोदके म्हणजेच कार्बोहायड्रेट: 20 ग्रॅम
- प्रथिने म्हणजेच प्रोटिन्स: 5 ग्रॅम
- व्हिटॅमिन ए: 15.5 IU
- व्हिटॅमिन बी: 60.3 मिलिग्रॅम
- फोलेट: 33 MCG
- आयर्न: 1.2 मिलिग्रॅम
- कॅल्शियम: 52 मिलिग्रॅम
- पोटॅशियम: 430 मिलिग्रॅम
- फॉस्फरस: 198 मिलिग्रॅम
- ओमेगा -3 फॅटी ऍसिड: 32 मिलिग्रॅम
- ओमेगा – 6 फॅटी ऍसिड: 340 मिलिग्रॅम
त्यामुळे मखान्याला आरोग्यासाठी खूप पौष्टिक मानले जाते.
मखानाचे आरोग्यासाठी काय फायदे आहेत?
लहान मुलांसाठी मखानाचे फायदे
मित्रांनो, मखाना हा एक खूप पौष्टिक पदार्थ आहे. उपवासासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी पौष्टिक पर्याय म्हणून मखाना मोठ्या प्रमाणावर खाल्ला जाऊ शकतो. मखाना झाल्यावर पोट खूप भरल्यासारखे वाटते. पण मखना किंवा मखाना केवळ प्रौढ व्यक्तींसाठीच उत्कृष्ट आहार नाही तर वाढत्या बाळांसाठी किंवा मुलांसाठी सुद्धा एक चांगला पर्याय आहे. हा मखाना तुम्हाला सुपर मार्केट किंवा किराणा दुकानात सहज उपलब्ध होऊ शकतो. बाळाला किंवा लहान मुलांना मखाना खाण्याचा फायदा कोणत्या प्रकारे होऊ शकतो हे पुढे जाणून घेऊ या
- मित्रांनो, मखान्या मध्ये कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असल्याने त्यामुळे वाढत्या बाळाला जर मखाने खाऊ घातले तर त्यांचे हाडे आणि दात यांचा विकास उत्तम होतो असतो.
- मित्रांनो, तुम्हाला माहित असेल च की ग्लूटेन मुक्त अन्नपदार्थांमुळे बाळांमध्ये ऍलर्जी होण्याची शक्यता कमी असते. आणि मखाना हा ग्लूटेन मुक्त असतो त्यामुळे बाळांना देण्यासाठी मखाने सर्वात सुरक्षित आहे.
- मखान्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे बाळांचे स्नायू आणि हाडे मजबूत होतात.
- मखान्यामध्ये अँटिऑक्सिडेंट चे गुणधर्म सुद्धा असतात आणि ते लहान मुलांचे आरोग्य चांगले ठेवण्याचे काम करतात. यामुळे मखाने खाणाऱ्या बाळाला आरोग्याच्या गंभीर समस्या होत नाहीत.
- मखाने खाल्यामुळे बाळाची पाचक प्रणाली व्यवस्थित राहण्यास मदत होते आणि किडनीचे आरोग्य देखील उत्तम राहते.
- तसेच मखान्यामध्ये भरपूर कॅलरीज असतात आणि त्यामुळे बाळाचे पोट भरलेले राहते. त्यामुळे प्रवासात नेण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.
स्त्रियांसाठी मखानाचे फायदे
- मखानाचे स्त्रियांसाठी देखील अनेक फायदे आहेत. यात अनेक पोषकद्रव्ये असतात. ज्यात कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह व्हिटॅमिन बी 1 इत्यादींचा स्रोत जास्त असतो.
- तसेच मखाना मध्ये अँटीऑक्सिडेंटस भरपूर प्रमाणात असतात. जे आपल्या त्वचेला निरोगी व चांगली राखण्यास मदत करते. त्यामुळे चेहऱ्यावर येणाच्या वृद्धत्वाच्या चिन्हांना ते प्रतिबंधित करतात.
- याशिवाय प्रेग्नन्सी मध्ये महिलांचे शरीर खूप कमकुवत होते, आणि अनेक आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता भासणे, हात- पाय दुखणे अशा अनेक समस्या उदभवू शकतात. पण मखाना मध्ये असणारे फॉलिक ऍसिड, आयर्न, जस्त, कॅल्शियम या सर्व पोषक घक्तांच्या च्या सेवनाने सर्व आजाराच्या समस्यांपासून आराम मिळतो. म्हणूनच गर्भवती महिलांसाठी मखाना खूप फायदेशीर आहे.
- स्त्रियां मध्ये शरीरातील रक्ताची कमतरता भरून काशण्याचे काम ही मखाना उत्तम प्रकारे करते. तसेच जर मखाना तुपात तळून त्यावर मीठ- मिरपूड घालून खाल्ल्यास शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.
- तसेच हाडे मजबूत करण्यासाठी, निरोगी हृदय साठी तसेच वजन कमी करण्यासाठी मखाना चे सेवन करणे उत्तम आहे.
- एवढेच नाही तर मधुमेह असलेल्या लोकांसाठी मखाना खूप फायदेशीर आहे. तटात असणाऱ्या गुणधर्मामुळे ते शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते.
पुरुषांसाठी मखानाचे फायदे
- मित्रांनो, पुरुषांनी मखाना दररोज सेवन केल्यास टेस्टेस्टेरॉन हार्मोन्सची लेव्हल वाढते.
- तसेच मखाना मध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्स असतात जे मसल्स बनवण्यात मदत करतात. त्यामुळे ज्यांना मसल्स बनवायचे आहे. मात्र वजन वाढवायचे नाही. अश्या पुरुषांनी मखान्यांचे दररोज सेवन करणे गरजेचे असते.
- तसेच पुरुषांमध्ये चांगल्या व निरोगी शुक्राणूंचे प्रमाण वाढविण्यासाठी तुम्हाला दररोज मखाना खायला पाहिजे.
- याशिवाय मखाना पुरुषांमध्ये असणारी लैंगिक समस्या किंवा नपुंसकता दूर करण्यास मदत करू शकते. पुरुषांमध्ये नपुंसकतेचे अनेक कारणे असू शकतात. जसे की ब्लड प्रेशर आणि डायबिटीज. या कारणामुळे ही पुरुषांत नपुंसकत्व निर्माण होऊ शकते. पण दररोज मखाने खाल्ल्यास या सर्व समस्या दूर होऊ शकतात.
- तसेच जे पुरुष तणावात असतात किंवा ज्यांना तणावाचे काम असते त्यांनी देखील मखानाचे सेवन करावे कारण त्यात अँटीऑक्सिडंट आणि अँटी- इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत जे पुरुषांना तणावापासून मुक्त करण्यास मदत करतात.
- वजन कमी करण्यासाठी, हृदय निरोगी ठेवण्यासाठी, डायबिटीज असणाऱ्यांसाठी देखील मखानाचे सेवन उपयुक्त आहे.
मखानाचे सेवन कसे करावे?
- मखना किंवा मखाने कुरकुरीत होईपर्यंत थोडे तुपात भाजून त्यात मीठ आणि मिरपूड घालून खावे.
- तुम्ही जर तूप खात नसाल तर मखाने मीठ किंवा वाळू मध्ये भाजून घेऊ शकता. यामुळे ते आणखी कुरकुरीत होतील.
- मखान्याची भाजी सुद्धा करतात. अनेक भागात भाजलेले मखाने ग्रेव्हीमध्ये शिजवले जातात.
- तसेच मखाने दुधात शिजवून त्याची छान चविष्ट खीरही बनवता येते. तसेच ते बारीक करून तूप, साखर घालून चांगला हलवा देखील करता येतो.
- मखाने इतर ड्रायफ्रुट्स मध्ये मिसळून गुळ किंवा साखरेमध्ये शिजवुन खाल्यास खूप चांगली एनर्जी मिळते.
मखानाचे तोटे
मित्रांनो, मखाना मध्ये प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न, फॉस्फरस आणि अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. यामुळे अनेक आजारांपासून आपला बचाव होतो. मात्र अनेक लोक मखानाचे अतिसेवन करतात. त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. जसे की….
- मखान्यांचे सेवन अति प्रमाणात केल्यास पोटाचे विकार होऊ शकतात. किंवा पचनशक्ती कमी होऊ शकते.
- मखान्यांचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीराच्या विविध भागांमध्ये पुरळ, जळजळ, सूज अश्या विविध प्रकारच्या ऍलर्जी होऊ शकतात.
- मखाने जास्त प्रमाणात खाल्ल्यास गॅस आणि अपचन सारख्या समस्या होऊ शकतात. यासोबतच बद्धकोष्ठतेचा त्रासही होऊ शकतो.
- तसेच मखण्याच्या अति सेवनाने शरीरात उष्णता वाढू शकते. ज्यामुळे अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
मखाने कोणी खाऊ नये?
- किडनी स्टोन असणाऱ्या व्यक्तींनी मखान्यांचे सेवन करू नये. कारण त्यात कॅल्शिअम जास्त प्रमाणात असते त्यामुळे स्टोन चा आकार वाढू शकतो.
- मखानामध्ये पोटॅशिअम जास्त प्रमाणात असते. आणि त्याच्या अति सेवनाने किडनी वर परिणाम होऊ शकतो.
- ज्यांना पचन संबंधित तक्रारी असतील किंवा पॉट फुगण्याची समस्या असेल त्यांनी मखाने खाणे टाळावे.
- फ्लू किंवा सर्दी असल्यास मखाने खाऊ नयेत. त्यामुळे आरोग्य बिघडू शकते.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मखाना घेण्यापूर्वी एखाद्या तज्ञ डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा कारण प्रत्येकाच्या शारीरिक गरजा वेग वेगळ्या असतात.
मखान्यांच्या काही रेसिपी
मित्रांनो, अनेक जणांना मखाने कसे खावे ते माहीत नसते. त्यांच्यासाठी आम्ही काही रेसिपी घेऊन आलो आहोत.
मखाने चाट:- मित्रांनो, अनेकांना संध्याकाळ च्या वेळेला काही न काहीतरी खायची सवय असते. पण असे काही तरी खायचे असते ज्यामुळे वजन वाढणार नाही. तर त्यासाठी तुम्ही मखानाचे चाट बनवू शकता.
त्यासाठी तुम्ही एक कढईत तूप घालून मखाने 4 ते 5 मिनिटं भाजून घ्या. त्या नंतर त्यांना एका भांड्यात काढून मग बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, बारीक चिरलेली काकडी टाका.
त्यानंतर यात चिमूठभर मीठ, जीरे पावडर, थोडे लाल तिखट आणि थोडा चाट मसाला टाकून सर्व एकत्र करून घ्या. तुम्हाला आवडत असेल तर त्यावर थोडं लिंबू पिळू शकता. आणि अश्या प्रकारे तुम्ही तुमचा चटपटीत मखाना चाट एन्जॉय करू शकता.
मखाना खीर:- मित्रांनो, वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही एखादे डाएट फॉलो करत असाल तर तुम्ही त्यात लो कॅलरी असलेली मखाना खीर ऍड करू शकता. ही खीर बनवण्यासाठी…..
सर्वात आधी एका कढई मध्ये 1 वाटी मखाने 4 ते 5 मिनिटांसाठी मंद आचेवर भाजून घ्या. भाजलेले मखाने काढून याच कढईत 1 चमचा तूप घालून त्यात थोडे काजू व बदाम हलकेसे परतून घ्या. त्या नंतर यात दोन कप दूध टाका. दुधाला चांगली उकळी येऊ द्या. तो पर्यंत भाजलेले मखाने खलबत्ता किंवा मिक्सर मध्ये हलके बारीक करून घ्या. इथे मखानाची पावडर करायची नाही. हे हलकेसे बारीक केलेले मखाने उकळच्या दुधात टाका आणि ढवळत रहा. 4 ते 5 मिनिटांसाठी मखाने दुधात शिजू द्या. आता यात थोडी वेलची पूड टाका. खिर गोड व्हावी यासाठी तुम्ही साखरे एवजी 2 चमचे खारिक पावडर किंवा 3 ते 4 खजुराची पेस्ट करूनही टाकू शकता. अशा प्रकारे तयार झालेली ही मखानाची खीर तुम्ही थंड किंवा गरमागरम ही खाऊ शकता.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण मखाने म्हणजे काय, मखान्यांचे आरोग्यासाठी काय काय फायदे आहेत, काय नुकसान आहेत, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा.
धन्यवादl
FAQ
मखाने किती प्रमाणात खावे?
मित्रांनो, एका दिवसात 20 ते 30 ग्रॅमपेक्षा जास्त मखानाचे सेवन करू नये.
गर्भवती महिलांनी मखान्यांचे सेवन करावे का?
गर्भवती महिलांनी मखानाचे सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
मखना किंवा मखाना हा उपवासाला खाऊ शकतो का?
हो मित्रांनो, मखाना हा उपवासाला देखील खाल्ला जातो. भारतात अनेक ठिकाणी मखाना हा उपवासाच पदार्थ म्हणून ओळखला जातो.
मखाना खाण्याची योग्य पद्धत कोणती?
मखानाचे सेवन नेहमी योग्य प्रमाणात करावे आणि मखाना हा भाजून किंवा पावडर बनवून खाणे योग्य असते.