Mahavitaran App - Electricity Bill Payment Maharashtra

महावितरण अँप माहिती: चालू लाईट बिल चेक, जुनी बिल, मीटर बद्दल तक्रार | Mahavitaran App

नमस्कार मित्रांनो, आज आपण महावितरणच्या अँपचा वापर कसा करायचा? या सोबतच या अँप द्वारे चालू बिल कसे चेक करायचे, जुनी बिल कशी बघायची, खराब/बंद मीटर आणि वीज चोरीची तक्रार कशी करायची या सर्व गोष्टी बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, महावितरणशी प्रत्येक जणाचा कधीना कधी, काही तरी कारणांस्तव संपर्क हा होतच असतो. विद्युत पुरवठा करणाऱ्या अश्या या महावीतरणाने आपल्या ग्राहकांना चांगल्या व तत्पर सेवा देण्यासाठी वेळोवेळी काही चांगले बदल घडवून आणले आहेत. त्यातलाच एक बदल म्हणजे ग्राहकांच्या सेवेसाठी महावितरणने आणलेले ‘महावितरण अँप’. या अँप द्वारे अनेक कामे तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल द्वारे करू शकणार आहात.



How to use Mahavitran App in Marathi

महावितरणने या अँपमध्ये बिल पे करण्याची तसेच चालू बिल किती आहे, बिल युनिट किती आहे, अश्या सर्व गोष्टीची सुविधा करून दिली आहे. तसेच ग्राहकांची तक्रार असल्यास ती महावितरण पर्यंत पोहचवण्यासाठी ची ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पण अजून ही बऱ्याच लोकांना या अँप बद्दल व यात दिल्या जाणाऱ्या सुविधे बद्दल माहीत नाही. पण आता काळजी करू नका, कारण आजच्या या लेखात आपण महावितरण अँप बद्दल सर्व काही माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे शेवट पर्यंत हा लेख नक्की वाचा.

महावितरण बिल चेक करणे

सर्वात पहिले महावितरण अँप मध्ये इलेक्ट्रिसिटी बिल चे डिटेल्स कसे चेक करायचे तसेच ऑनलाईन वीज बिल कसे भरायचे ते जाणून घेऊ या

स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये प्ले स्टोअर मधून महावितरण चे अँप (Mahavitaran App) डाउनलोड करून घ्यायचे आहे.

How to check Mahavitaran Electricity bill details Step 1

स्टेप 2: त्यानंतर अँप ओपन करायचे आहे व आलेल्या मेसेज मध्ये Ok बटन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 3: यानंतर तुम्हाला Login ID व Password विचारला जाईल. जर तुमचे आधीच अकाउंट असेल तर तुम्ही लॉगिन आयडी व पासवर्ड टाकायचा आहे. अन्यथा तुम्ही Continue as a guest या ऑप्शन वर क्लिक करू शकता.



How to check Mahavitaran Electricity bill details Step 2

स्टेप 4: इथे आपण Continue as a guest या ऑप्शन वर क्लिक करणार आहोत. त्यानंतर तुमच्या समोर काही ऑप्शन ओपन होतील. त्यातील पहिले ऑप्शन View/Pay Bill या वर क्लिक करायचे आहे. मित्रांनो, या ऑप्शनचा वापर करून तुम्ही, तुमचे लाइट बिल किती आले आहे ते बघू शकता. तसेच तुम्हाला जर लाइट बिल ऑनलाईन भरायचे असेल तरी सुद्धा तुम्ही या पर्यायाचा वापर करू शकता.

How to check Mahavitaran Electricity bill details Step 3

स्टेप 5: तर View/Pay bill ऑप्शन वर क्लिक केल्या वर नेक्स्ट पेज वर तुम्हाला Consumer Number म्हणजेच ग्राहक क्रमांक विचारला जाईल. तो टाकायचा आहे व खाली View Bill बटन वर क्लिक करायचे आहे. लगेचच तुमच्या समोर तुमचे वीज बिल ओपन होईल. त्यात तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, ग्राहक क्रमांक, कोणत्या महिन्याचे वीज बिल आहे, बिल किती आहे, बिल युनिट, बिल due date वगैरे अश्या सर्व गोष्टी लिहिलेल्या दिसतील.

How to check Mahavitaran Electricity bill details Step 4

स्टेप 6: आता सर्वात खाली तुम्हाला Pay Bill चा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे. त्या नंतर नेक्स्ट पेज वर I agree या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 7: या नंतर तुम्हाला पेमेंट ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. यात तुम्ही UPI, QR कोड मार्फत ही पेमेंट करू शकता. तर मित्रांनो, पेमेंट ऑप्शन सिलेक्ट करून Make Payment या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. तुमचा पेमेंट होऊन जाईल.

जुने महावितरणचे बिल चेक करणे

आत्ता पण बघू तुमचे जुने (Bill History) लाईट बिल कसे चेक करायचे.

स्टेप 1: मित्रांनो, जुने बिल (Bill History) करण्यासाठी तुम्हाला अँप मधल्या Billing & Payment History या ऑप्शन मध्ये जायचे आहे.

How to check Mahavitaran Electricity Bill History Step 1

स्टेप 2: त्यानंतर Consumer Number टाकून View History या बटन वर क्लिक करायचे आहे. त्या नंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील.

  1. Billing History
  2. Payment History

यात बिलिंग हिस्ट्री (Billing History) मध्ये कोणत्या महिन्यात किती बिल आले आहे ते बघू शकता. आणि पेमेंट हिस्ट्री (Payment History) मध्ये तुम्ही बिल चे आत्ता पर्यंत चे केलेले पेमेंट बघू शकता.

How to check Mahavitaran Electricity Bill History Step 2

लाइट चोरी किंवा मीटर बद्दल तक्रार

महावितरण अँप मध्ये मीटर बद्दल किंवा लाइट चोरी बद्दल तक्रार कशी करायची ते बघू.

स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला Report/Power Theft या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे

how to raise complaint power theft complaint Step 1

स्टेप 2: तुम्हाला जर लाइट चोरी कोणी केली आहे हे माहीत असेल तर त्या व्यक्तीची माहिती तुम्हाला नेक्स्ट पेज वर भरायची आहे. यात त्या व्यक्तीचे नाव, त्याचा पत्ता, तसेच method of theft म्हणजे चोरी कशी केली आहे याचे कारण द्यायचे आहे. जसे की हुक लावून वगैरे. त्या नंतर evidence photo म्हणजेच पुरावा म्हणून चोरी केलेला फोटो पण इथे द्यावा लागणार आहे. व या सगळ्या नंतर खाली Submit Information या बटन वर क्लिक करायचे आहे. तुमची कम्प्लेन्ट सबमिट होऊन जाईल.

how to raise complaint power theft complaint Step 2

लाइट बिल कॅल्क्युलेट करणे

तुम्ही या महावितरण अँप मध्ये तुमच्या घराचे लाइट बिल किती येऊ शकते याचे पूर्ण गणित मांडू शकता . ते कसे करायचे ते पुढे पाहू.

स्टेप 1: मित्रांनो, तुमचे लाइट बिल जर जास्त येत असेल तर तुम्ही Bill Calculator या पर्यायाचा वापर करून तुम्ही तुमचे बिल कॅल्क्युलेट करू शकणार आहात. त्यासाठी सर्वात पहिले Bill Calculator ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

How to use Bill calculator in Mahavitaran app Step 1

स्टेप 2: या नंतर नेक्स्ट पेज वर Tariff या ऑप्शन मध्ये तुम्हाला कोणते लाइट बिल कॅल्क्युलेट करायचे आहे ते सिलेक्ट करायचे आहे. जसे की रेसिडेंशिअल, कमर्शिअल, इंडस्ट्री वगैरे.

How to use Bill calculator in Mahavitaran app Step 2

स्टेप 3: नंतर तुम्हाला Phase सिलेक्ट करायची आहे. व नंतर तुम्ही जे इलेकट्रीक उपकरणे (Appliances) वापरता ते सिलेक्ट करायचे आहे. जसे की फॅन, फ्रीज, बल्ब, सीएफएल, ट्यूब लाइट, वगैरे वापरल्या जाणाऱ्या वस्तू सिलेक्ट करायच्या आहेत. त्या नंतर या वस्तू किती वेळ वापरता ते सिलेक्ट करायचे आहे. त्यानुसार तुमचे किती पैसे होतात ते सांगितले जाते. व अश्या प्रकारे तुम्ही Get Estimation या ऑप्शन वर क्लिक केल्या वर तुम्हाला तुमच्या पूर्ण महिन्याचे बिल कॅल्क्युलेट करता येईल.

महावितरण मीटर रिडींग स्वतः अँप मधून पाठवा

तुम्हाला तुमचे मीटरचे रिडींग स्वतः अँप मधून महावितरण कडे पाठवायचे असेल तर आम्ही लिहिलेला ला लेख तुमच्या कामी येईल => महावितरण मीटर रिडींग स्वतः अँप मधून पाठवा ? (2 मिनिटात) 

तर मित्रांनो, अश्या प्रकारे तुम्ही महावितरण अँप द्वारे तुमचे लाइट बिल चे सर्व डिटेल्स मिळवू शकता. तसेच काही तक्रार असेल तर ते सुद्धा टाकू शकता. असे हे महावितरण चे अँप वीज ग्राहकांसाठी खूप उपयोगी आहे. व त्याचा वापर हा प्रत्येकाने करावा. मित्रांनो, तसेच तुम्हाला जर हा लेख आवडला असल्यास व महत्व पूर्ण वाटला असल्यास तुमच्या मित्र मंडळीं सोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!