मतदार यादी डाउनलोड: कोणतेही गाव, शहर, महापालिका, नगरपरिषद, जिल्हापरिषद | Maharashtra Voter List Download
पूर्वी मतदार यादी पाहण्यासाठी किंवा नाव तपासण्यासाठी लोकांना पंचायत कार्यालय किंवा तालुका कार्यालयात जावं लागायचं. पण आता ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली आहे.

आता तुम्ही घरबसल्या मोबाईल आपल्या गावाची, शहराची किंवा तालुक्याची मतदार यादी सहज पाहू आणि डाउनलोड करू शकता. या यादीच्या मदतीने तुम्ही –
- तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही हे तपासू शकता,
- कुटुंबातील व नातेवाईकांची नावे पाहू शकता,
- आणि नोंद केलेली माहिती योग्य आहे की नाही हेही तपासू शकता.
या लेखात आपण पायरीपायरीने (Step-by-Step) पाहू की भारत निवडणूक आयोगाच्या (Election Commission of India) अधिकृत संकेतस्थळावरून संपूर्ण मतदार यादी PDF स्वरूपात कशी डाउनलोड करायची. ही प्रक्रिया पूर्णतः मोफत आहे आणि काहीच मिनिटांत तुम्ही तुमच्या गावाची यादी पाहू किंवा प्रिंट करू शकता.
मतदार यादी डाउनलोड करण्याची प्रक्रिया
स्टेप 1: सर्वात आधी तुमच्या मोबाईल किंवा संगणकाच्या ब्राउजरमध्ये voters.eci.gov.in ही भारत निवडणूक आयोगाची अधिकृत वेबसाइट उघडा. वेबसाइटवर गेल्यावर खाली स्क्रोल करा आणि “Service” या विभागात असलेल्या “Download Electoral Roll” या पर्यायावर क्लिक करा.

स्टेप 2: आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल. त्यावर खालील माहिती योग्यरित्या भरा –
- राज्य (State)
- जिल्हा (District)
- विधानसभा क्षेत्र (Assembly Constituency)
- भाषा (Language)
- Roll Type मध्ये Final Roll 2025 निवडा आणि दिलेला Captcha Code भरा.

स्टेप 3: आता पेज खाली स्क्रोल करा. तुमच्या निवडलेल्या जिल्हा आणि विधानसभा क्षेत्रानुसार अनेक गावांची नावे दिसतील.

स्टेप 4: एकावेळी फक्त 10 गावांची नावे दिसतील. जर तुमचं गाव त्या यादीत नसेल तर खाली असलेल्या (>) या बाणावर क्लिक करा, म्हणजे पुढील गावांची यादी दिसेल.

स्टेप 5: आता तुमच्या गावाच्या नावासमोरील बॉक्सवर टिक करा, आणि वर दिसणाऱ्या “Download Selected PDFs” या बटणावर क्लिक करा.

स्टेप 6: काही सेकंदांत तुमच्या गावाची संपूर्ण मतदार यादी PDF स्वरूपात उघडेल. त्यात तुमच्या गावाशी संबंधित सर्व माहिती – मतदारांचे नाव, पत्ता, मतदान केंद्र इत्यादी दिसेल.

General Election List म्हणजे काय?
“General Election” म्हणजेच सामान्य निवडणूक. या निवडणुकीत लोक आपल्या पसंतीचे नेते निवडतात – राज्य विधानसभेसाठी किंवा केंद्र सरकारसाठी. निवडणुकीपूर्वी मतदार यादी अपडेट केली जाते. ही प्रक्रिया SIR (Special Intensive Revision) अंतर्गत केली जाते.
SIR Draft List म्हणजे काय?
SIR म्हणजे विशेष गहन पुनरावलोकन (Special Intensive Revision). या प्रक्रियेद्वारे मतदार यादीत नव्या मतदारांची नावे जोडली जातात (१८ वर्षांवरील नागरिकांसाठी). तसेच चुकीची माहिती दुरुस्त केली जाते आणि मृत व्यक्तींची किंवा अवैध नावे वगळली जातात.
Draft Roll List म्हणजे काय?
Draft Roll ही एक तात्पुरती यादी असते जी निवडणूक आयोग सार्वजनिकपणे जारी करतो. यामुळे नागरिक आपली माहिती तपासू शकतात. जर नाव, पत्ता किंवा इतर तपशील चुकीचा असेल तर तक्रार करून सुधारणा करता येते. जर तुमचं नाव नसेल तर नवीन मतदार नोंदणी करून नाव जोडता येतं.
नोंद:
- Draft Roll दरवर्षी नियमितपणे प्रकाशित केली जाते.
- Draft SIR मात्र केवळ मोठ्या निवडणुकीच्या आधी विशेष मोहिमेत जारी केली जाते.
Final Roll List म्हणजे काय?
Final Roll म्हणजे अंतिम मतदार यादी. Draft Roll मध्ये केलेले सर्व बदल आणि दुरुस्त्या यात समाविष्ट करून ही अंतिम यादी तयार केली जाते. Final Roll मध्ये फक्त त्याच मतदारांची नावे असतात ज्यांची कागदपत्रं पूर्ण आणि योग्य असतात. जर तुमचं नाव Final Roll मध्ये नसेल, तर तुम्ही मतदान करू शकत नाही. म्हणून निवडणुकीपूर्वी ही यादी नक्की तपासा.
Supplement List म्हणजे काय?
Supplement List ही Final Roll नंतर तयार केली जाते. यात त्या लोकांची नावे असतात ज्यांनी नुकतंच नवीन मतदार कार्डाचं अर्ज केलं आहे किंवा मतदार यादीतील माहिती दुरुस्तीसाठी तक्रार केली आहे.
निवडणुकीच्या वेळी Final Roll आणि Supplement List दोन्ही वैध असतात. म्हणजेच तुमचं नाव Supplement List मध्ये असेल तरी तुम्ही मतदान करू शकता.
निष्कर्ष:
आता मतदार यादी पाहणं आणि डाउनलोड करणं खूपच सोपं झालं आहे. फक्त काही क्लिकमध्ये तुम्ही तुमच्या गावाची, शहराची किंवा वॉर्डची यादी पाहू शकता. तुमचं नाव Final List मध्ये आहे की नाही हे नक्की तपासा, कारण तेच तुम्हाला मतदानाचा हक्क वापरता येईल की नाही हे ठरवतं.
Tags: मतदार यादी महाराष्ट्र, voter list download, voter list pdf, eci voter list 2025, voting list marathi, maharashtra voter card, voter list check online, voting list download, मतदार यादी डाउनलोड करा, voter name check marathi, online voter list check, voter registration maharashtra, Matadan Yadi Download, Matadan Yadi Check, Matadan Yadit Nav Check, Matadan Yadi 2025, Voter List Marathi, Voter List 2025 Marathi, Matadan Yadi Shodhne, Matadan Yadi Search, Matadan Yadi 2025 Mahiti, Matadan Yadi Satara, Mahanagarpalika Voter List, ZP Voter List, ZP Matadan Yadi, Gav Matadan Yadi, Gavachi Matadan Yadi
