शाळा, ऑफिससाठी बेस्ट लंच बॉक्स | Best Lunch Box for School, Office
नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला लंच बॉक्स बद्दल माहिती देणार आहोत. तसेच भारतातील सर्वात चांगले लंच बॉक्स कोणते आहेत ते ही जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, लंच बॉक्स ही खूप महत्त्वाची वस्तू आहे जी आपण शाळेत किंवा ऑफिस मध्ये जाताना घेऊन जातो. यात आपण ठेवलेले जेवण खराब होत नाही तसेच यात जेवण घेऊन जाणे हे खुप सोपे आहे. पण यात ठेवलेले अन्न कधी कधी बाहेर येते, किंवा मग तो लंच बॉक्स जास्त दिवस टिकत नाही. याचा अर्थ लंच बॉक्स घेताना तुमची चूक झाली आहे. तसेच कोणत्या मटेरियलचा लंच बॉक्स चांगला असतो याची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही पण जर नवीन लंच बॉक्स खरेदी करणार असाल तर हा लेख फक्त तुमच्यासाठी आहे, त्यामुळे शेवट पर्यंत नक्की वाचा.
लंच बॉक्स बद्दल थोडी माहिती
मित्रांनो, ऑफिस किंवा शाळेत किंवा घरातून कुठेही बाहेर जायचे असेल तर जेवण ठेवण्यासाठी केलेली सोय म्हणजे तुमचा लंच बॉक्स. आपली भूक आणि गरज भागविण्यासाठी आपल्याला एका चांगल्या क्वालिटीच्या तसेच फूड ग्रेड मटेरियल पासून बनलेले लंच बॉक्स म्हणजे जेवणाचे डबे हवे असतात. हे लंच बॉक्स बराच वेळ जेवण चांगले फ्रेश ठेवू शकतात. आज मार्केट मध्येही खूप वेग-वेगळ्या प्रकारचे लंच बॉक्स उपलब्ध आहेत. पण स्वतः साठी किंवा इतर कोणासाठी लंच बॉक्स म्हणजे जेवणाचा डबा निवडणे जरा कठीण गोष्ट आहे. आपल्याला असा डबा हवा असतो जो चांगल्या क्वालिटी चा असेल, त्यात जेवण पण चांगले फ्रेश राहायला हवे.
हे हि वाचा – अन्न तासंतास गरम/थंड ठेवणारे इन्सुलेटेड लंच बॉक्स माहिती
त्यासाठी लंच बॉक्स बद्दल तुम्हाला काही गोष्टी माहीत असायला हव्यात. त्या कोणत्या गोष्टी आहेत ते जाणून घेऊ या.
लंच बॉक्स खरेदी करण्याआधी कोणत्या गोष्टी माहीत असायला हव्यात
- मित्रांनो, लंच बॉक्स घेताना सर्वात आधी तुम्हाला कोणत्या प्रकारचा म्हणजे कोणत्या मटेरियल चा लंच बॉक्स हवा आहे ते आधी ठरवावे लागेल. लंच बॉक्स मध्ये प्लास्टिक, स्टेनलेस स्टील, बीपीए फ्री टप्परवेअर असे अनेक प्रकार असतात. प्लास्टिकचे लंच बॉक्स शक्यतो वापरू नये. त्याऐवजी तुम्ही स्टील किंवा बीपीए फ्री डबे वापरू शकता. बीपीए हे एक प्रकारचे केमिकल असते, जे प्लास्टिक कंटेनर वापरताना तुमच्या जेवणात जाते. त्यामुळे कॅन्सर सारखे रोग होऊ शकतात.
- आता मार्केट मध्ये इन्सुलेटेड लंच बॉक्स पण मिळतात. ज्यामध्ये जेवण बराच वेळ गरम राहते. तसेच जर तुम्ही काही थंड पदार्थ ठेवला तर त्याचा थंडावा पण बराच वेळ टिकून राहतो. तसेच लवकर नाशवंत होणारे पदार्थ चांगले सुरक्षित तापमानात ठेवण्यासाठी तुम्ही इन्सुलेटेड लंच बॉक्स वापरू शकता. तुम्ही घेत असलेला इन्सुलेटेड लंच बॉक्स बीपीए फ्री आहे का ते ही चेक करणे खूप आवश्यक आहे.
- मार्केट मध्ये वेग-वेगळ्या आकाराचे लंच बॉक्स उपलब्ध आहेत. तुच्या आवश्यकते नुसार तुम्ही लंच बॉक्स चा आकार निवडू शकता. शक्यतो आकार/साईझ लिटर मध्ये मोजतात.
- तुम्ही घेत असलेला लंच बॉक्स डिश वॉशर आणि मायक्रोवेव्ह सुरक्षित आहे, स्वछ करण्यास सोपा आहे का ते ही तपासून घेणे खूप महत्वाचे आहे.
- तुम्हाला जर लंच बॉक्स मध्ये कम्पार्टमेंट हवे असतील तर त्या प्रकारचा लंच बॉक्स तुम्हाला बघावा लागेल.
- तसेच तुम्ही घेत असलेला लंच बॉक्स तुमच्या खिशाला परवडणारा देखील असावा. याला पर्याय म्हणून तुम्ही स्टेनलेस स्टील चे इन्सुलेटेड लंच बॉक्स चा विचार करू शकता.
- तुम्ही घेत असलेला लंच बॉक्स हवाबंद व लिकप्रूफ आहे का ते ही चेक करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे लंच बॉक्स घेताना तो चांगल्या क्वालिटी चा घ्यावा.
सर्वात चांगले लंच बॉक्स
आता भारतातील सर्वात चांगले लंच बॉक्स कोणते आहेत ते बघू या
मिल्टन लंच बॉक्स (Milton Stainless Steel Combi Lunch Box)
मित्रांनो, तुम्हाला जर आकर्षक दरात एक उत्तम क्वालिटी चा लंच बॉक्स हवा असेल तर हे प्रोडक्ट फक्त तुमच्यासाठी आहे. मिल्टन चा हा स्टेनलेस स्टील चा लंच बॉक्स एक अत्याधुनिक लंच बॉक्स मानला जातो. या लंच बॉक्स ला मार्केट मध्ये खुप जात मागणी असते. शाळा, कॉलेज आणि ऑफिससाठी हा एक उत्तम लंच बॉक्स आहे. या लंच बॉक्स मध्ये तुम्हाला तीन राऊंड कंटेनर व एक टंबलर (पिण्याचे सपाट बुडाचे भांडे) मिळते. या प्रोडक्ट वर तुम्हाला एक वर्षाची वॉरंटी मिळते. तसेच या लंच बॉक्स ची किंमत ही अंदाजे 400 रुपयेच्या जवळ पास असू शकते.
या लंच बॉक्स बरोबर तुम्हाला एक आकर्षक कवर पण भेटतो. या कवर मध्ये तुम्हाला छोटे पॉकेट पण मिळतात. ज्यात तुम्ही तुमचे मेडिसिन किंवा चॉकलेट किंवा इतर काही गोष्टी ठेवू शकता. तसेच हा लंच बॉक्स पूर्ण पणे लिकप्रूफ आहे. आणि तो तुम्ही सहज कॅरी करू शकता.
सेलो बॉक्स (Cello Max Fresh Lunch Box)
मित्रांनो, सेलोच्या या लंच बॉक्स मध्ये तुम्हाला तीन राऊंड कंटेनर (300 ml) व एक छोटा कंटेनर (140ml) मिळतो. या कंटेनरच्या लीड मध्ये सिलिकॉन सिल सह तुम्हाला एक्सट्रा क्लिप मिळते ज्यामुळे आतील अन्न लीक होत नाही. या लंच बॉक्स ची बिल्ड क्वालिटी पण खूप चांगली आहे. या लंच बॉक्स वर तुम्हाला एक वर्षाची वॉरंटी मिळते. या लंच बॉक्स ची किंमत बघायची झाली तर हा लंच बॉक्स तुम्हाला 500 रुपयेच्या आसपास मिळू शकतो. सेलो चा हा लंच बॉक्स स्टेनलेस स्टील चा बनलेला असून एक मजबूत आणि जास्त काळ टिकणारा लंच बॉक्स आहे.
हा एक हवा बंद आणि लिकप्रूफ असा लंच बॉक्स आहे. या लंच बॉक्स मध्ये तुम्हाला लंच बॅग सोबत एक चमचा आणि काटा चमचा ही मिळतो. इन्सुलेटेड स्टील चा बनलेला असल्यामूळे हा अतिशय चांगल्या क्वालिटी चा लंच बॉक्स आहे. तसेच हा लंच बॉक्स वापरण्यास आणि स्वच्छ करण्यास ही खूप सोपा आहे.
ऑलिव्हवेअर लंच बॉक्स (Oliveware Macho Lunch Box)
मित्रांनो, या लंच बॉक्स ची किंमत ही अंदाजे 550 रुपयेच्या आसपास असू शकते. यामध्ये तुम्हाला 450 ml चे दोन कंटेनर मिळतात. तर 250 ml चा एक कंटेनर मिळतो. या कंटेनर ला क्लिप्स दिल्या आहेत ज्यामुळे हा लंच बॉक्स एकदम टाईट बसतो. या लंच बॉक्स ची बॅग पण वॉशेबल आहे. हा लंच बॉक्स स्टेनलेस स्टीलचा असून लिकप्रूफ व हवाबंद आहे. तसेच हा लंच बॉक्स दीर्घकाळ टिकणारा आहे. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा लंच बॉक्स डिश वॉशर सेफ आहे. तसेच स्पिल प्रूफ आहे. तसेच शाळा कॉलेज किंवा ऑफिससाठी हा लंच बॉक्स एक उत्तम प्रोडक्ट आहे.
बोरोसिल लंच बॉक्स (Borosil Stainless Steel Insulated Lunch Box)
मित्रांनो, बोरोसिल चा हा लंच बॉक्स तुम्हाला एक वर्षाची वॉरंटी देतो. आणि यांच्या झाकणा वर तुम्हाला पाच वर्षांची वॉरंटी मिळते. म्हणजे जर या कंटेनर चे झाकण तुटले किंवा ब्रेक झाले तर तुम्ही वॉरंटी क्लेम करू शकता. तसेच या प्रोडक्ट ची किंमत ही अंदाजे 800 रुपयेच्या आसपास असू शकते. या लंच बॉक्स मध्ये तुम्हाला 280 ml चे दोन कंटेनर मिळतात व 180 ml चा एक कंटेनर व एक प्लेट मिळते ज्यात तुम्ही लोणचं, चटणी वगैरे ठेवू शकता. हा लंच बॉक्स डिश वॉशर सुरक्षित आहे.
तसेच हे प्रोडक्ट हवाबंद व लिकप्रूफ फिचर सह येते. तसेच बोरोसिल ही एक खूप प्रसिद्ध कंपनी आहे व त्यांचे सर्वच प्रोडक्ट चांगले असतात. त्याच प्रमाणे बोरोसिल चे लंच बॉक्स पण खूप उत्तम आहे.
काही महत्त्वाचे टिप्स
मित्रांनो, जर तुम्हाला तुमचा लंच बॉक्स म्हणजेच जेवणाचा डबा दिर्घकाळ टिकवायचा असेल तर तो नियमित पणे स्वच्छ करणे खूप आवश्यक आहे. जेवणाचा डबा स्वच्छ करण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स पुढील प्रमाणे:-
- जेवण झाल्यावर तुमचा जेवणाचा डबा लगेच धुवून ठेवावा. तसेच घरी आल्यानंतर जेवणाचा डबा खाली करून ठेवा. जेवणाचा डबा हा नियमित पणे धुतला गेला पाहिजे. त्यासाठी तुम्ही साबण व पाण्याचा वापर करु शकता.
- मित्रांनो, डब्याचे झाकण ही स्वच्छ असणे तेवढेच महत्वाचे आहे. डब्याचे झाकण हे आतून बाहेरून व्यवस्थित धुतले गेले पाहिजे, जेणे करून त्याच्या आत कुठलेही अन्न जमा राहून बॅक्टेरीया तयार होणार नाहीत. तसेच जर तुमच्याकडे हाताने डबे धुण्यासाठी वेळ नसेल तर जेवणाचा डबा डिश वॉशर मध्ये धुवून काढा. डबा धुवून झाल्यानंतर तो नेहमी हवेशीर ठिकाणी सुकण्यास ठेवावा व कोरडा झाल्यावर एका स्वच्छ कपड्याने डबा व त्याचे झाकण पुसून घ्यावा.
- तसेच डब्या सोबत टिफिन बॅग सुद्धा नियमित स्वच्छ केली पाहिजे. कारण टिफिन बॅग ला पण तेलाचा कुमट वास येत असतो. तो येऊ नये म्हणून कमीत कमी आठवड्या तून एकदा तरी टिफिन बॅग स्वच्छ धुवून काढावी.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण लंच बॉक्स बद्दल माहिती जाणून घेतली आहे. तसेच लंच बॉक्स चे सर्वात चांगले प्रॉडक्ट कोणते आहेत ते सुद्धा बघितले. आशा करतो की तुम्हाला आज चा हा लेख नक्कीच आवडला असेल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणी सोबत नक्की शेअर करा.
धन्यवाद।