आरोग्य टिप्स | Health Tips in Marathi

सुंदर आणि फ्रेश दिसण्यासाठी सोपे घरगुती उपाय | How To Look Beautiful Naturally

नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखामध्ये आपण सुंदर आणि फ्रेश चेहरा दिसण्यासाठी कोणते उपाय करावेत या बद्दल जाणून घेणार आहोत.

How To Look Beautiful Naturally

मित्रांनो, स्त्री असो किंवा पुरुष प्रत्येकाला सुंदर दिसावेसे वाटते. चेहरा सुंदर आणि चमकदार दिसण्यासाठी प्रत्येक जण काही न काही तरी उपाय करत असतो. चेहरा सुंदर दिसण्यासाठी अनेक जण औषधोपचार करतात, नैसर्गिक उपचार करतात तर काही जण ब्युटी प्रोडक्टचा वापर करतात. पण एवढं करून ही चेहऱ्यावर पाहिजे तसा ग्लो येत नाही. म्हणूनच चेहरा सुंदर दिसण्यासाठी नेमकं काय करावं याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.



मित्रांनो, तुम्हाला ही जर सुंदर व फ्रेश चेहरा दिसण्यासाठी काही टिप्स हव्या असतील तर आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

सुंदर चेहरा मिळवण्यासाठी काही उपाय

1) चेहऱ्याला कमीत कमी पाच ते सात मिनिटे स्टीमिंग देणे म्हणजेच गरम पाण्याची वाफ देणे आवश्यक आहे. यामुळे चेहऱ्या वर ग्लो येतो.

2) दुधाची साय, चिमूट भर हळद आणि गुलाब पाणी एकत्र करून ती पेस्ट चेहऱ्यावर लावा. व थोडा हलक्या हाताने मसाज करून वीस मिनीटांनी धुवून टाका. त्याने ही चेहरा उजळतो.

चेहरा चमकदार बनवण्यासाठी तुम्ही मुलतानी मातीचा सुद्धा वापर करू शकता. तसेच तुम्ही त्वचा जर तेलकट असेल तर मुलतानी माती चा लेप तुमच्यासाठी एक चांगला उपाय ठरू शकतो.

3) तुम्ही गुलाब पाण्याचा ही वापर करू शकता. कारण गुलाब पाणी हे त्वचा हायड्रेट करते. तसेच त्यामुळे चेहरा क्लीन व छान दिसतो.



4) लिंबूच्या रसाचा वापर तुम्ही चेहऱ्या वर ग्लो ठेवण्यासाठी करू शकतो. तसेच लिंबाच्या रसामुळे त्वचा वरचे डाग जाण्यास मदत होते.

5) संत्र्याचा रस पिल्याने किंवा संत्र्याच्या सालांची पेस्ट करून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याची त्वचा चांगली उत्तम राहते.

6) चेहरा फ्रेश ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. रात्री उशिरापर्यंत मोबाईल बघणे, जागरण करणे शक्यतो टाळावे. तसेच भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. त्यामुळे त्वचे वर एक वेगळाच ग्लो येतो व पिंपल्स वगैरे येत नाही.

7) ज्यांना आपले सौंदर्य वाढवायचे आहे किंवा टिकवून ठेवायचे आहे त्यांनी दररोज कमीत कमी अर्धा तास व्यायाम केला पाहिजे. तसेच त्यासोबत तुम्ही योगासने ही करून शकता. यांमुळे तुमच्या चेहर्या वर एक वेगळेच तेज येते. आणि चेहरा तरुण दिसतो.

8) चेहरा धुताना शक्यतो साबणाचा वापर करू नये. आणि जर करत असाल तर केमिकल युक्त साबण वापरू नये. त्याने तुमच्या स्किनला हानी पोहचू शकते.

9) त्याचप्रमाणे झोपण्याआधी चेहरा स्वच्छ धुवावा. त्यामुळे दिवस भर चेहऱ्यावर बसलेली धूळ माती निघून जातात. व मेकअप केलेला असेल तर तो ही धुवून टाकावा.

10) जर तुम्ही फेस वॉशचा वापर करत असाल तर तुमच्या स्किनला सूट होईल असा फेस वॉश वापरा. तसेच दिवसातून फक्त दोन वेळा फेस वॉश वापरले तर चालेल पण त्यापेक्षा अधिक नको. कारण त्यामुळे तुमची त्वचा कोरडी पडू शकते.

11) जर तुम्हाला सुंदर आणि कोमल त्वचा हवी असेल तर तुम्ही दिवसातून दोन वेळा मॉइशच्चरायझर वापरवे.

12) घरातून बाहेर जाताना किंवा जर तुम्हाला उन्हात जात वेळ काम करायचे असेल तर सन क्रीमचा वापर करावा. त्यामुळे सूर्याच्या हानिकारक किरणांचा त्वचेला त्रास होत नाही.

13) चेहऱ्यावरील दिवस भराचा थकवा दूर करण्यासाठी एकदा फेस पॅक लावणे गरजेचे आहे. त्यामुळे त्वचा चांगली रहाते व ग्लो पण येतो.

14) चेहरा ताजा व टवटवीत ठेवायचा असेल तर बदामाच्या तेलाने हळुवार पणे चेहऱ्याची मालिश करा. तुम्हाला लवकरच फरक जाणवायला लागेल.

15) मित्रांनो, चेहऱ्याची सुंदरता ठेवत असताना ओठांकडे लक्ष देणे ही तेवढेच महत्वाचे आहे. ओठांमुळे ही तुमची सुंदरता अजूनच वाढते. त्यामुळे ओठांची काळजी घ्या. रात्री झोपताना ओठांवर गाईचे तूप किंवा साय लावा. त्यामुळे ओठ फाटणार नाही व मुलायम राहतील.

16) चेहरा टवटवीत ठेवण्यासाठी तुमच्या खाण्यापिण्या कडे नीट लक्ष द्या. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, कडधान्ये यांचा वापर करा. व भरपूर पाणी प्या. चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी किंवा सुरकुत्या होऊ नयेत म्हणून पिकलेली केळी मॅश करून चेहऱ्यावर चोळावी व थोडा वेळ तशीच ठेवून नंतर चेहरा धुवून टाकावा.

17) सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानसिक ताण किंवा स्ट्रेस घेऊ नये.

18) तसेच जर तुम्हाला चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या ग्लो आणायचा असेल तर कोरफड व काकडीचा वापर करा. यामुळे तुमची त्वचा हळूहळू उजळेल. अजून एक सल्ला आहे की शक्यतो ब्युटी प्रोडक्ट वापरणे टाळावे. किंवा कमीत कमी प्रमाणात वापरावे. कारण त्यामुळे कालांतराने चेहरा खराब होऊ लागतो.

मित्रांनो, जरी वरील सर्व उपाय हे घरगुती असले तरी ही प्रत्येकाची त्वचा ही वेगवेगळी असते. त्यामुळे वरीलपैकी कोणताही उपाय करताना आधी पॅच टेस्ट घेणे किंवा डॉक्टरचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण सुंदर आणि फ्रेश चेहरा दिसण्यासाठी काही उपाय जाणून घेतले. आशा करतो की तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असेल. तर हा लेख तुमच्या मित्र मैत्रिणी सोबत नक्की शेअर करा. आणि हो चेहरा तेव्हाच सुंदर दिसतो जेव्हा त्या चेहऱ्या वर एक छानसे स्मित हास्य असते. त्यामुळे नेहमी हसत रहा.
धन्यवाद!

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!