वाईन शॉप, देशी, विदेशी दारू विक्री परवाना कसा मिळतो व किती खर्च लागतो? | Liquor Shop License
नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रात दारूच दुकान काढण्यासाठी काय प्रोसेस, आणि liquor shop license परवाना म्हणजे दारू विक्री लायसन मिळवण्यासाठी किती खर्च येतो आणि कोणते कागदपत्रे लागतात याबद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, आपला स्वतःचा व्यवसाय असणे हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. त्यात व्यवसाय ही असा असावा ज्यामध्ये नफा सर्वाधिक असेल, आणि असा व्यवसाय सुरू करायला प्रत्येकाला च आवडेल, आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यवसायाची संपूर्ण माहिती देणार आहोत, जो सुरू करताच तुम्हाला नफा मिळू लागतो. तो व्यवसाय म्हणजे दारू विक्री म्हणजेच liquor shop चा व्यवसाय. मित्रांनो, पूर्वी ‘आमचं दारूचं दुकान आहे’ असं सांगायला लाज वाटायची पण आता चित्र बदललं आहे.
सध्याच्या काळात दारू विक्री सातत्याने वाढताना दिसत आहे. आणि यामुळेच देशातील राज्यांना दारू विक्रीतून मिळणाऱ्या एकूण महसुलात अधिक हिस्सा मिळत आहे. अशा परिस्थितीत, तुमची इच्छा असल्यास, तुम्ही दारू विक्रीशी संबंधित व्यवसाय करू शकता आणि यात आपला हात आजमावू शकता आणि चांगले उत्पन्न मिळवू शकता. असे असले तरीही प्रत्येकजण किंवा कुणीही अशी दारू विकू शकत नाही कारण हा महाराष्ट्रात प्रतिबंधित कायदेशीर व्यवसाय आहे.
हा व्यवसाय चालवण्यासाठी राज्य सरकारने काही विशिष्ट कायदे केले असून त्यासाठी काही नियमही लावले आहेत. त्यातला सर्वात महत्वाचा नियम म्हणजे तुमच्या कडे दारूच्या च्या शॉप च लायसन्स म्हणजेच परवाना असणे अति आवश्यक आहे. आणि हे लायसन्स लगेच मिळत नाही, त्यासाठी ही एक प्रोसेस असते. याच प्रोसेस बद्दल आज आम्ही तुम्हाला दारू विक्रीच्या व्यवसायाच्या कायद्या नियमांसह त्याच्या परवाना बद्दल माहिती सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला हा व्यवसाय करणे सोपे होईल. त्यामुळे हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
Note – मित्रांनो, हा लेख व यात दिलेली माहिती आम्ही तुम्हाला फक्त व्यवसायाच्या दृष्टिकोनातून देत आहोत. या द्वारे आम्ही दारू विक्रीला प्रमोट करत नाही. फक्त तुम्हाला नियमांनुसार दारू व्यवसाय कसा करायचा, त्याबद्दल सांगत आहोत.
दारू विक्री लायसन्स चे प्रकार
सर्वात पहिले या पेयांसाठी परवाने किती प्रकारचे असतात ते जाणून घेऊ या:-
- FL:- फॉरेन लिकर म्हणजे विदेशी दारू
- FL/BR (Beer):- विदेशी दारू पण बियर
- नमुना E-2:- फक्त वाईन साठीचा परवाना
- CL:- कंट्री लिकर म्हणजे देशी दारूचा परवाना
या चार प्रकारामध्ये दारूचे उत्पादन आणि विक्री असे अजून दोन प्रकार पडतात, पण आपण किरकोळ विक्रीसाठी काय प्रोसेस आहे ते थोडक्यात बघू.
1) FL/ फॉरेन लिकर
या प्रकारात सरकारने परत वेगवेगळे प्रकार पाडले आहेत. यात पहिला प्रकार येतो तो म्हणजे FL – 2 म्हणजे विदेशी दारूची किरकोळ विक्री करण्यासाठीचा परवाना. पण 1973 पासून हा परवाना देण्यावर शासनाने बंदी घातली आहे.
त्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे FL- 3. म्हणजे हॉटेल मध्ये उत्पादन शुल्क भरलेले भारतीय बनावटीचे विदेशी ब्रॅन्डची दारू व इतर विदेशी दारूची किरकोळ विक्री करण्यासाठीचा परवाना. थोडक्यात सांगायचे झाले तर हॉटेल आणि बार हे एकत्रित ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी हे लायसन्स काढलं जातं.
यात तुम्ही फॉरेन लिकर आणि बिअर हे दोन्ही प्रकार विकू शकता. त्या नंतर पुढे येतो FL- 4 म्हणजे उत्पादन शुल्क भरलेले विदेशी मद्य आणि भारतीय बनावटीच्या विदेशी दारूची रजिस्ट्रेशन असलेल्या क्लब मध्ये विक्री करण्यासाठीचा परवाना. म्हणजेच परमिट रुम.
2) FLBR बिअर शॉप
मित्रांनो, FLBR 2 म्हणजे सीलबंद बाटल्यांमधून बिअरची किरकोळ विक्री करण्यासाठीचा परवाना.
3) नमुना E – 2
मित्रांनो, ‘नमुना ई’ म्हणजे सौम्य दारूची म्हणजेच बिअरची आणि वाईनची खाद्य गृह, हॉटेल, कॅन्टीन आणि क्लब मध्ये किरकोळ विक्री करण्यासाठीचा परवाना.
4) CL/ कंट्री लिकर
मित्रांनो, CL -3 या प्रकारात देशी दारुची किरकोळ विक्री करण्यासाठीचा परवाना मिळतो. 1973 पासून हा नवीन परवाना देण्यासाठी शासनाने बंदी केली आहे. हा परवाना फक्त दुसऱ्याकडे ट्रान्सफर करता येतो. तसेच CL / FL / TOD -3 या प्रकारात देशी दारुची सीलबंद बाटल्यांमधून किरकोळ विक्री करण्यासाठीचा परवाना असतो.
दारू विक्री लायसन्स मिळवण्यासाठीची प्रक्रिया
मित्रांनो, पुर्वी दारूच्या दुकानाचे लायसन्स काढण्यासाठी एक्साईज ऑफिस मध्ये जाऊन ऍप्लिकेशन फॉर्म भरावा लागत होता. परंतु इंटरनेचे युग आल्यापासून सर्वच गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत. आणि आता त्यात राज्य उत्पादन शुल्क विभाग देखील मागे नाहीये. मागच्या काही वर्षापासून शासनाने हे परवाने काढण्याची सर्व प्रक्रिया ऑनलाईन केली आहे.
त्यामुळे आता तुम्ही राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या www.exciseservices.mahaonline.gov.in या वेबसाईट वर जाऊन ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन करू शकता. तसेच तुमचे आधार कार्ड, ड्रायविंग लायसन्स व लायसन्स साठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्र देखील इथे ऑनलाईनच अपलोड करावी लागतात.
महत्वाचे:- मित्रांनो, तुम्ही दारूचे ठेके काढण्यासाठी कधीही अर्ज करू शकत नाही, यासाठी सरकार जाहिरात किंवा निविदा काढते आणि ही निविदा सरकारी वेबसाइट आणि जाहिराती द्वारे जारी केली जाते, यामध्ये तुम्हाला अर्ज करावा लागेल, यासाठी तुम्हाला प्रोसेसिंग फी आणि डिमांड ड्राफ्ट बँकेकडे GST सह, अर्ज करावा लागेल. त्या नंतर तो फॉर्म मध्ये जमा करावा लागतो, जो कोणी त्याच्या फॉर्म मध्ये जास्त फी सरकारला भरतो त्याला दारूचे ठेके मिळतात.
दारू विक्री लायसन्ससाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात
FL लायसन्ससाठी
FL च्या लायसन्ससाठी त्याच्या अर्जा सोबत तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रे लागतील, ती म्हणजे
- हॉटेलचं लायसन्स
- अन्न व औषध प्रशासनाचं लायसन्स
- क्लब असेल तर त्याचं नोंदणीपत्र
- बँकेचे हमीपत्र
- आरोग्य विभागाचे प्रमाणपत्र
- आयकर व विक्रीकर प्रमाणपत्र इत्यादी.
बिअर किंवा वाईनसाठी
- या लायसन्स साठी तुमच्या कडे आयकर आणि विक्रीकर थकबाकी नसल्याबाबतचं प्रतिज्ञापत्र असायला हवे,
- तसेच बँकेचं हमीपत्र, डिमांड ड्राफ्टच्या स्वरुपात एका वर्षाच्या लायसन्सचं जेवढं शुल्क असतं तेवढं डिपॉजिट,
- आणि जिल्हा समितीच शिफारसपत्र आवश्यक आहे.
देशी दारुसाठी
- देशी दारूच्या दुकानाच्या लायसन्स साठी तुमच्या कडे ऐपत पत्र,
- आयकर व विक्रीकर थकबाकी नसल्याबाबतच प्रतिज्ञापत्र, असणे आवश्यक आहे.
- हा सगळा अर्ज व कागदपत्रे जमा केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षते खाली एक समिती गठीत होते. यात पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उत्पादन शुल्क अधीक्षक,सदस्य, सचिव असतात. त्यांच्या समोर या अर्जासंबंधीची पडताळणी आणि मग सुनावणी होते.
दारू विक्री लायसन्स साठी किती शुल्क/खर्च लागते
मित्रांनो, लायसन्स साठीची शुल्क रचना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून प्रत्येक वर्षी बदलत जाते. हे शुल्क नवीन लायसन्स काढताना,परवान्यांच प्रत्येक वर्षी नुतणीकरण करताना भरावे लागते. तसेच ते शुल्क किती घ्यायचं ते लोकसंख्येवरुन ठरत.
उदाहरणार्थ:- FL – 2 साठी 50 हजार लोकसंख्येसाठी 86 हजार इतकं शुल्क आहे. तर 50 हजार ते 1 लाख लोकसंख्येसाठी 1 लाख 15 हजार 500 रुपये. त्यानंतर 1 लाख ते 2 लाख 50 हजार लोकसंख्येसाठी 2 लाख 31 हजार इतकं शुल्क भरावं लागतं. कमी जास्त फरकानं FL आणि FLBR अशा सगळ्यासाठीचं असेच शुल्क आकारले जातात. ही सगळी प्रक्रिया पुर्ण झाल्या नंतर शेवटी तुम्हाला परवाना मिळून जातो.
आता जर तुम्हाला हा व्यवसाय करायचा नसेल तर हे परवाने विकू शकतात का? त्या बद्दल जाणून घेऊ:-
मित्रांनो, तुम्हाला जर हा व्यवसाय करायचा नसेल तर तुम्ही हा परवाना विकू शकता. म्हणजे च हे सगळे परवाने विकता येतात. म्हणजेच ट्रान्सफर करता येतात. जर सध्या तुम्हाला हा व्यवसाय करायचा नसेल किंवा विकायचा असेल तर हा परवाना दुसऱ्याला विकता देखील येतो. यासाठी लागणार शासनाचं विषेशाधिकार शुल्क भरुन संबंधित परवाना तुम्ही दुसऱ्याच्या नावे करु शकता.
हा व्यवसाय करण्यासाठी किती खर्च येतो?
मित्रांनो, लिकर शॉप हा एक असा व्यवसाय आहे ज्यातून चांगले उत्पन्न मिळू शकते. व नफाही चांगला होतो. पण दुसरीकडे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी खर्च ही तेवढाच होतो. यात तुम्हाला कोणत्या प्रकारचे दारू दुकान सुरू करायचे आहे त्यानुसार व्यवसायातील गुंतवणूक अवलंबून असते. हे दुकान उघडण्यासाठी तसा निश्चित रकमेचा अंदाज लावणार येणार नाही, पण संशोधन नुसार असे कळते की लहान प्रमाणात दारूचे दुकान सुरू करण्यासाठी 9 ते 10 लाख रुपयांपर्यंत प्राथमिक खर्च येऊ शकतो. तर मोठ्या प्रमाणात दुकान सुरू करण्यासाठी 25 ते 30 लाख रुपयांपर्यंत प्राथमिक खर्च येऊ शकतो.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण महाराष्ट्रात दारूच दुकान काढण्यासाठी liquor shop license मिळवायला काय प्रोसेस आहे, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.
Tags: Daru Dukan Chalu Kase Karayche, Daru License Kase Milte, Daru License Sathi Kiti Kharch Yeto, Daru License Kase Kadhayche, Daru License Price, Daru License Kharch, wine license price in maharastra, Wine License Kase Kadhayche, Daru License Mahiti, Wine License Mahiti, Daru Parvana Mahiti, Daru Shop License Mahiti, Deshi Daru License Kase Kadhayche, Wideshi Daru License Mahiti, liquor shop license mahiti, Parmit Room License Mahiti, Daru Vikri Mahiti, Daru Vikri Kashi Karaychi