Aadhaar Card

आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करा: 2 मिनिटात | Link Aadhaar Card with Mobile Number

नमस्कार मित्रांनो, आज आपण आधार कार्ड ला मोबाईल नंबर कसा जोडायचा म्हणजे लिंक कसा करायचा, या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

Aadhaar Card La Mobile Number Link Kasa Karaycha

मित्रांनो, आपल्या भारत देशात आधार कार्ड हे एक ओळखीचा पुरावा म्हणून खूप आवश्यक असे कागदपत्र आहे. सरकारी नियमानुसार, जसे तुमचे आधार कार्ड हे पॅन कार्ड शी लिंक करणे आवश्यक आहे. तसेच आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक करणे देखील खूप महत्त्वाचे आहे. यामुळे नागरिकांना आधारशी संबंधित असणाऱ्या अनेक सेवांचा लाभ घेता येतो.



मित्रांनो, युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI ने आधार कार्ड मिळविण्यासाठी आता ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिल्याने, नागरिक त्यांचे आधार कार्ड सहज पाहू आणि डाउनलोड करू शकतात. हा, पण आधार केंद्राला भेट देऊन मोबाईल क्रमांक आधार कार्ड शी लिंक करणे आवश्यक आहे. त्यामुळे जर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक कसा करायचा किंवा तुमच्या आधार कार्ड वर तुमचा नवीन मोबाईल नंबर अपडेट कसा करायचा ही प्रक्रिया जाणून घ्यायची असेल तर आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करा

स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला आधार कार्डच्या अधिकृत वेबसाइट uidai.gov.in ओपन करायचे आहे.

स्टेप 2: त्या नंतर तुमच्या आवडी नुसार कोणतीही एक भाषा निवडायची आहे.

Aadhaar Card La Mobile Number Link Kasa Karaycha Step 2

स्टेप 3: त्या नंतर नेक्स्ट पेज वर खाडे खाली स्क्रोल केल्या नंतर तुम्हाला Get Aadhar च्या सेक्शन मध्ये Book an appointment चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करायचे आहे.

Aadhaar Card La Mobile Number Link Kasa Karaycha Step 3

स्टेप 4: आता या नंतर थोडे खाली आल्यावर तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी पुढे जाण्यासाठी दोन पर्याय दिसतील. त्यापैकी दुसरा ऑप्शन प्रोसीड टू बुक अपॉइंटमेंट (proceed to book appointment) या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.



Aadhaar Card La Mobile Number Link Kasa Karaycha Step 4

स्टेप 5: आता नेक्स्ट पेज वर दिलेल्या जागी तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉगिन करायचे आहे. इथे तुम्ही तुम्हाला आधार कार्डशी लिंक किंवा अपडेट करायचा असलेला मोबाइल नंबर सुद्धा एंटर करू शकता. आता मोबाईल नंबर टाकून दिलेला कॅपचा टाकायचा आहे आणि Send OTP या बटन वर क्लिक करायचे आहे.

Aadhaar Card La Mobile Number Link Kasa Karaycha Step 5

स्टेप 6: आता थोड्याच वेळात तुमच्या मोबाईल नंबर वर एक OTP येईल. तो ओटीपी दिलेल्या जागी टाकून submit OTP and proceed या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 7: आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील New enrollment आणि update aadhar . तर यातील update aadhar या ऑप्शन ला सिलेक्ट करायचे आहे.

Aadhaar Card La Mobile Number Link Kasa Karaycha Step 7

स्टेप 8: आता नेक्स्ट पेज वर Document based update हा ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर आधार कार्ड नुसार तुमचे पूर्ण नाव आणि आधार नंबर टाकायचाआहे . या नंतर resident type मध्ये Indian सिलेक्ट करायचे आहे. या नंतर खाली तुम्हाला What do you want to update म्हणजेच तुम्हाला काय अपडेट करायचे आहे या ऑप्शन मध्ये मोबाइल नंबर या पर्याय निवडायचा आहे आणि नंतर Proceed या बटण वर क्लिक करायचे आहे.

[टीप: मित्रांनो, तुम्हाला काय अपडेट करायचे आहे या ऑप्शन तुम्ही ते सर्व पर्याय निवडू शकता, जे तुम्हाला तुमच्या आधार कार्ड मध्ये अपडेट करायचे आहे. जसे की जर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड मध्ये तुमच्या मोबाईल नंबर सह तुमचे नाव अपडेट करायचे असेल, तर मोबाईल नंबर आणि नाव या दोन्हीचा पर्याय तुम्ही निवडू शकता. ]

Aadhaar Card La Mobile Number Link Kasa Karaycha Step 8

स्टेप 9: मित्रांनो, आता अपडेट मोबाईल नंबर या ऑप्शन मध्ये तुम्हाला तो मोबाईल नंबर टाकायचा आहे जो तुम्हाला अपडेट किंवा लिंक करायचा आहे. तो मोबाईल नंबर टाकून नंतर दिलेला कॅपचा टाकायचा आहे व ओटीपी द्वारे तो नंबर वेरीफाय करून घ्यायचा आहे. या नंतर save and proceed या बटन वर क्लिक करायचे आहे.

Aadhaar Card La Mobile Number Link Kasa Karaycha Step 9

स्टेप 10: मित्रांनो, आता नेक्स्ट पेज वर दिलेले डिस्क्लेमर बॉक्स मध्ये टिक करून सबमिट या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे

Aadhaar Card La Mobile Number Link Kasa Karaycha Step 10

स्टेप 11: या नंतर आता तुमचे ऍप्लिकेशन सबमिट होऊन जाईल व त्या नंतर आता खाली दिलेल्या बुक अपॉइंटमेंट ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

Aadhaar Card La Mobile Number Link Kasa Karaycha Step 11

स्टेप 12: आता पुढे तुम्हाला तुमचे जवळचे आधार सेवा केंद्र शोधावे लागेल. त्यासाठी तुम्हाला तिथे तुमच्या एरिया चा पिन कोड टाकावा लागेल. आणि Get Details या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

Aadhaar Card La Mobile Number Link Kasa Karaycha Step 12

स्टेप 13: त्या नंतर उजव्या बाजूला तुमच्या जवळच्या सर्व आधार सेवा केंद्रांची लिस्ट ओपन होईल. या लिस्ट मधून तुमच्या घराच्या सर्वात जवळ असलेल्या आधार सेवा केंद्राला सिलेक्ट करून बुक अपॉइंटमेंट या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

Aadhaar Card La Mobile Number Link Kasa Karaycha Step 13

स्टेप 14: आता तुम्हाला ज्या वेळी आधार सेवा केंद्रावर जायचे आहे, तो दिवस व वेळ निवडून नंतर सबमिट या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

Aadhaar Card La Mobile Number Link Kasa Karaycha Step 14

स्टेप 15: आता नेक्स्ट स्क्रीन वर तुम्हाला तुमच्या जवळच्या आधार सेवा केंद्राचे नाव, पत्ता आणि तुमची सेवा केंद्राला भेट देण्याची तारीख आणि वेळ तुम्हाला दिसेल. मित्रांनो, या सोबतच तुमचा मोबाइल नंबर आधार कार्डशी लिंक करण्यासाठी तुम्हाला काही पैसे भरावे लागतील ते साधारणतः रू 50 भरावे लागतील. हे पेमेंट तुम्हाला आधार सेवा केंद्राला भेट द्याल तेव्हा करायचे आहे. या नंतर आता Confirm बटन वर क्लिक करायचे आहे.

Aadhaar Card La Mobile Number Link Kasa Karaycha Step 15

मित्रांनो, तुम्ही कन्फर्म ऑप्शन वर क्लिक करताच तुमचा आधार अपडेट फॉर्म तुमच्या समोर ओपन होईल. त्या फॉर्मची प्रिंट काढून घेऊन, तुम्ही तुमच्या निवडलेल्या आधार सेवा केंद्रावर तुमच्या नियोजित ठरलेल्या तारखेला आणि वेळेला आधार कार्ड घेऊन जायचे आहे. तेथे, पहिले तुमचे बायोमेट्रिक्स स्कॅन केले जाईल आणि मग आधार कार्ड मध्ये मोबाइल नंबर जोडण्याची प्रक्रिया पुढे जाईल आणि तुम्हाला एक अकनोलेजमेंट दिले जाईल. ज्याद्वारे तुम्ही तुमच्या फॉर्म चे स्टेटस पाहू शकता.

मित्रांनो तुमच्या आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर अपडेट किंवा लिंक होण्यासाठी जवळपास 7 ते 15 दिवस लागतात. आणि मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक होताच UIDAI कडून तुमच्या मोबाईल नंबर वर एक एसएमएस देखील पाठविला जातो.

मित्रांनो, वर सांगितलेली पूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन नाहीये. पण इथे तुम्ही तुमची अपॉईंटमेंट बुक करून तुमचा वेळ वाचवू शकता. आणि तुम्हाला आधार सेवा केंद्राची चक्कर देखील मारावी लागत नाही.

आधार कार्डला कोणता नंबर लिंक आहे, तपासा

आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर जोडला आहे हे विसरला असाल, तर काय करावे?

मित्रांनो, जर तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी आधीच लिंक केलेला असेल पण तुम्ही तुमच्या आधार कार्डमध्ये कोणता मोबाईल नंबर जोडला आहे हे विसरला असाल, तर खाली दिलेल्या प्रक्रिये द्वारे तुम्ही तुमच्या आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर सहज लिंक करू शकता.

स्टेप 1: मित्रांनो, सर्वप्रथम, UIDAI च्या अधिकृत वेबसाइट uidai.gov.in ओपन करायचे आहे आणि तुमच्या आवडी नुसार कोणतीही एक भाषा निवडा.

स्टेप 2: आता होम पेज वर खाली दिलेल्या aadhar services या ऑप्शन मध्ये verify an aadhar number या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

Aadhaar Card La Link Mobile Number Check Kara Step 2

स्टेप 3: ता नंतर नेक्स्ट पेज वर थोडे खाली स्क्रोल करून check aadhar validity या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

Aadhaar Card La Link Mobile Number Check Kara Step 3

स्टेप 4: आता नेक्स्ट ओएज वर दिलेल्या जागी तुमचा आधार क्रमांक टाका आणि त्या नंतर दिलेला कॅपचा जसा चा तसा टाकून नंतर Proceed या ऑप्शन वर क्लिक करा.

Aadhaar Card La Link Mobile Number Check Kara Step 4

स्टेप 5: मित्रांनो, आता तुम्ही Proceed बटणावर क्लिक करताच तुमच्या आधार कार्डशी संबंधित असलेली माहिती तुम्हाला दिसेल. तसेच त्यात तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाइल नंबर चे शेवटचे तीन अंक तुम्हाला दिसतील. आता या द्वारे तुम्ही तुमच्या आधार कार्डशी कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे सहज शोधू शकता.

Aadhaar Card La Link Mobile Number Check Kara Step 5

पण मित्रांनो, जर तुमचा मोबाईल नंबर चा भाग हा रिकामा असेल तर याचा अर्थ असा की तुमच्या आधार कार्डशी कोणताही मोबाईल नंबर लिंक केलेला नाही. त्यावेळी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आधार शी लिंक करावा लागेल.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण आधार कार्ड ला मोबाईल नंबर कसा जोडायचा किंवा अपडेट कसा करायचा, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.

Tags: Aadhaar Card La Mobile Number Link Karne, Aadhaar Card La Mobile Number Link Kasa Karaycha, Adhaar Card La Mobile Number Joda, Aadhaar Card Mobile Number Link in Marathi, Aadhaar Card Mobile Number Link, आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!