Ladki Bahin Yojana

लाडकी बहीण योजना अपात्र यादीत तुमचे नाव आहे का, ते चेक करा | Ladki Bahin Yojana Rejected List Download

नमस्कार मित्रांनो, आज आपण लाडकी बहीण योजना अपात्र यादीत तुमचे नाव आहे का, ते कसे चेक करायचे? या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

Ladki Bahin Yojana Rejected List

मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना” सुरू केली होती. या योजने द्वारे 21 ते 60 वयोगटातील महिलांना दरमहा रु 1500 थेट त्यांच्या बँक खात्यात DBT प्रणाली द्वारे जमा केले जातात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील महिलांना यातून मोठा आधार मिळतो. मात्र नुकतेच योजनेसाठी अपात्र महिलांची यादी तयार करण्यात आली असून काही महिलांचे अर्ज विविध कारणांमुळे अपात्र (disqualified/ ineligible) म्हणून घोषित करण्यात आले आहेत.



त्यामुळे अनेक महिलांना प्रश्न पडला आहे की “आपले नाव अपात्र यादीत आहे का?”, “ते कसे तपासायचे?” यासाठी सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही तुमच्या साठी लाडकी बहीण योजना अपात्र यादीत तुमचे नाव आहे का, ते कसे चेक करायचे? हा लेख घेऊन आलो आहोत. त्यामुळे या बद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा…

लाडकी बहिण योजना अपात्र यादीत तुमचे चेक करा

स्टेप 1: मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाइटला भेट द्याची आहे =>ladakibahin.maharashtra.gov.in या लिंक वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 2: तर मित्रांनो, तुमचे अपात्र यादीत आहे हे जाणून घेण्यासाठी वर दिलेल्या ‘अर्जदार लॉगिन’ या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे.

Ladki Bahin Yojana Rejected List Check Step 1

आता लाडकी बहीण ची वेबसाईट ओपन झाल्या वर त्याच्या होम पेज वर तुम्हाला नुकताच ऍड झालेला “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे लाभार्थी ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करू शकतात.” असा एक ऑप्शन आलेला दिसेल. यावर क्लिक करून तुम्ही तुमची ई केवायसी पूर्ण करायची आहे.

मित्रांनो, सध्या तरी हा ऑप्शन बंद आहे, जेव्हा सुरू होईल तेव्हा इथून ई केवायसी कशी करायची याची माहिती लगेच जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सएप्प चॅनेल => मराठी डायरी ला आजच जॉईन करून ठेवा.



स्टेप 3: आता पुढे लॉगिन करण्यासाठी मोबाईल नंबर, पासवर्ड व कॅपचा टाकून लॉगिन करून घ्यायचं आहे.

Ladki Bahin Yojana Rejected List Check Step 2

स्टेप 4: आता नेक्स्ट पेज वर वरती काही ऑप्शन दिले आहेत, त्यापैकी Application made earlier या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे.

Ladki Bahin Yojana Rejected List Check Step 3

स्टेप 5: त्या नंतर पुढे तुम्हाला काही नावं दाखवली जातील. त्यातून तुमच्या नावासमोर असलेल्या Action या ऑप्शन काही दिलेल्या चिन्हा वर क्लिक करायचं आहे.

Ladki Bahin Yojana Rejected List Check Step 4

स्टेप 6: त्या नंतर तुम्हाला आता पर्यंत किती रुपये मिळाले ते दाखवले जाईल. तसेच खाली Transaction Status मध्ये तुमची अमाउंट Paid आहे की Cancelled आहे ते दाखवले जाईल. तसेच जर तुमच स्टेटस Cancelled दाखवत असेल तर तुम्हाला अपात्र केले आहे. व सोबतच तुम्ही योजनेसाठी अपात्र का आहात याचे कारण देखील तिथे दिलेले असेल.

मित्रांनो, तुमचं स्टेटस जाणून घेण्यासाठी तुम्ही ज्याच्याकडे फॉर्म भरला होता त्याच्याकडे जायचं आहे. तिथेच तुम्हाला तुमचा स्टेटस दिसेल. तसेच तुम्ही स्वतः मोबाईल वरून फॉर्म भरला असेल तर तुम्ही स्वतः तुमचं स्टेटस चेक करू शकता.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण लाडकी बहीण योजना अपात्र यादीत तुमचे नाव आहे का, ते कसे चेक करायचे, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.

Tags: ladki bahin yojana a patra list online, ladaki bahin yojana apatra list free, ladaki bahin yojana apatra list download, ladaki bahin yojana apatra list today download pdf, ladki bahin yojana maharashtra, ladki bahin yojana new website, laadki bahin yojana naav kut, Ladki Bahin Yojana Rejected list, लाडकी बहिण योजना अपात्र यादी, ladki bahin yojana kyc, ladki bahin yojana new update, ladki bahin yojana new kyc, Ladki Bahin Yojana Rejected List Download

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!