लाडकी बहीण योजनेची eKYC कशी करायची? (नवीन पद्धत) | Ladki Bahin Yojana eKYC New Process
नमस्कार मित्रांनो, आमच्या आज च्या या नवीन लेखात आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नेहमी प्रमाणे आज ही आम्ही तुमच्यासाठी काही तरी नवीन व खूप उपयोगी माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो आज आपण लाडकी बहीण योजना ई केवायसी एडिट/ दुरुस्त कशी करायची? या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक कल्याण विभागाने सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा उद्देश राज्यातील 18 वर्षे आणि त्यापुढील वय असलेल्या महिलांना विविध प्रकारे आर्थिक सहाय्य आणि सहकार्य प्रदान करणे आहे. या योजनेचा लाभ पुढेही चालू ठेवण्यासाठी, लाभार्थी महिलांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. मात्र अनेक महिलांना पूर्वीच्या ई-केवायसी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी आणि प्रश्नांमुळे संभ्रम निर्माण होत होता. या समस्येची दखल घेत, शासनाने अखेर ई-केवायसी प्रक्रियेत मोठे आणि महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. म्हणजेच या आधी लाडकी बहीण योजनाची ई केवायसी करताना तुमच्या कडून काही चुका झाल्या असतील तर त्या आता तुम्ही एडिट/ दुरुस्त करू शकता.
तसेच महत्वाचे म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना पती नाहीये किंवा वडील नाहीत किंवा घटस्फोटित आहेत, अशा बहिणी देखील आता केवायसी सबमिट करू शकता. याशिवाय ज्या लाडक्या बहिणींना परत केवायसी करायची असेल तर ते देखील तुम्ही आता करू शकता, कारण आता या सर्व गोष्टी करण्यासाठी नवीन ऑप्शन ऍड करण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमीच म्हणावी लागेल. तर चला मग लाडकी बहीण योजना ई केवायसी एडिट कशी करायची? या बद्दलची संपूर्ण प्रक्रिया आपण पुढे जाणून घेणारच आहोत, फक्त त्यासाठी हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
लाडकी बहीण योजना eKYC एडिट करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा
स्टेप 1:- मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला शासनाच्या अधिकृत ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाईट वर यायचं आहे. त्यानंतर वेबसाईट च्या होम पेज वर दिलेल्या ‘येथे क्लिक करा’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

स्टेप 2:- या नंतर लाभार्थी आधार क्रमांक येथे लाडक्या बहिणीचा आधार कार्ड नंबर टाकून खाली दिलेला कॅपचा टाकायचा आहे व ‘मी सहमत आहे’ या वर टिक करून ‘ओटीपी पाठवा’ या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे.

स्टेप 3:- आता तुमच्या लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल, तो टाकून ‘सबमिट करा’ या बटन वर क्लिक करायचं आहे.

स्टेप 4:- मित्रांनो, आता या नंतर पुढे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील १.विवाहित आणि २.अविवाहित यापैकी तुम्ही योग्य पर्याय निवडायचा आहे. (इथे आपण विवाहित हा पर्याय निवडणार आहोत.)
नोट: पती नाही किंवा अविवाहित, घटस्फोटित असाल तर खालची माहिती वाचा

स्टेप 5:- विवाहित पर्याय निवडल्यावर तुम्हाला पुन्हा तीन पर्याय मिळतील: १. पती हयात आहेत २. पती हयात नाहीत ३. घटस्फोटित
नोट: पती नाही किंवा अविवाहित, घटस्फोटित असाल तर खालची माहिती वाचा

स्टेप 6:- यापैकी ‘पती हयात आहेत’ हा पर्याय निवडल्यास, पुढे तुम्हाला पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि दिलेला कॅप्चा कोड टाकायचा आहे व नंतर ‘मी सहमत आहे’ वर टिक करून ‘ओटीपी पाठवा’ पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्या नंतर, पतीच्या आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल. तो ओटीपी दिलेल्या जागी टाकून सबमिट करायचा आहे.

स्टेप 7:- मित्रांनो, आता पतीचा ओटीपी भरून सबमिट केल्यावर, तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग निवडायचा आहे. यानंतर, खालील दोन सुधारित प्रश्न विचारले जातील.
प्रश्न A: “माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/ उपक्रम/ मंडळ/ भारत सरकार/ राज्य सरकारच्या स्थानिक संस्थे मध्ये कार्यरत आहे / नाही.”
प्रश्न B: “माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/ उपक्रम/ मंडळ/ स्थानिक संस्थे मधून सेवानिवृत्ती नंतर निवृत्ती वेतन घेत आहे/ नाही.”
या प्रश्नांची उत्तरे देताना ‘नाही’ अशी स्पष्टपणे द्यायची आहेत. त्या नंतर दिलेली माहिती खरी असल्याची सहमती देताना बॉक्स वर टिक करून ‘सबमिट करा’ बटन वर क्लिक करायचं आहे.

स्टेप 8:- मित्रांनो, आता सर्व माहिती भरून सबमिट केल्यावर, तुम्हाला “तुमची ई- केवायसी पडताळणी यशस्वी रित्या पूर्ण झाली आहे” असा मेसेज आलेला दिसेल. म्हणजेच याचा अर्थ तुमची ई केवायसी प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे.

ज्या बहिणींची वैवाहिक स्थिती ‘विवाहित’ आहे, पण महिलांना पती नाहीत किंवा घटस्फोटित आहेत अश्या बहिणींसाठी काय करायचं ते पाहू या…
स्टेप 1:- या बहिणींनी लाभार्थी आधार क्रमांक मध्ये लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक टाकून खाली दिलेला कॅपचा टाकायचा आहे व ‘मी सहमत आहे’ या वर टिक करून ‘ओटीपी पाठवा’ या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे.
स्टेप 2:- आता तुमच्या लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल, तो टाकून ‘सबमिट करा’ या बटन वर क्लिक करायचं आहे.
स्टेप 3:- त्या नंतर वैवाहिक स्थिती ‘विवाहित’ निवडून नंतर ज्या बहिणींचे पती हयात नाहीत किंवा घटस्फोटित असतील त्यांनी पुढे जात प्रवर्ग निवडून खाली दिलेल्या सुधारित प्रश्नांची दोषी ठिकाणी ‘नाही’ अशी उत्तर द्यायची आहेत.

स्टेप 4:- तसेच जर पतीचे निधन झाले असल्यास तुम्हाला मृत्यू प्रमाणपत्राशी संबंधित माहिती विचारली जाईल. व ‘पतीचे मृत्यपत्र 31.12.2025 पर्यंत अंगणवाडी सेविका यांच्याकडे जमा करेन,’ या ऑप्शन वर टिक करायचे आहे. तसेच दिलेली माहिती खरी असल्याची सहमती देताना बॉक्स वर टिक करायचे आहे व नंतर ‘सबमिट करा’ बटन वर क्लिक करायचं आहे.

नोट: पतीचे निधन झाले असल्यास/ घटस्फोटित असतील तर तसे पुरावे अंगणवाडी सेविका यांच्याकडे जमा करावे (31.12.2025 पर्यंत)
मित्रांनो, ही सर्व माहिती भरून सबमिट केल्याववर, तुम्हाला “तुमची ई- केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा मेसेज आलेला दिसेल. म्हणजेच याचा अर्थ तुमची केवायसी प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे.
ज्या बहिणींची वैवाहिक स्थिती ‘अविवाहित’ आहे, आणि त्यांना वडील आहेत किंवा काहींचे वडील नसतील तर अशा महिलांनी काय करावे या बद्दल पुढे जाणून घेऊ या:-
स्टेप 1:- बहिणींनी लाभार्थी आधार क्रमांक मध्ये लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक टाकून खाली दिलेला कॅपचा टाकायचा आहे व ‘मी सहमत आहे’ या वर टिक करून ‘ओटीपी पाठवा’ या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे.
स्टेप 2:- आता तुमच्या लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल, तो टाकून ‘सबमिट करा’ या बटन वर क्लिक करायचं आहे.
स्टेप 3:- त्या नंतर वैवाहिक स्थिती ‘अविवाहित’ निवडून पुढे वडील असतील तर वडिलांचा आधार क्रमांक टाकून केवायसी पूर्ण करायची आहे. व जर वडील हयात नसतील तर तो ऑप्शन सिलेक्ट करून पुढे जात प्रवर्ग सिलेक्ट करून दिलेले दोन्ही सुधारित प्रश्न ‘नाही’ करायचे आहेत.
स्टेप 4:- तसेच पुढे, वडिलांचे मृत्युपत्र संबंधित अंगणवाडी सेविका कडे 31.12.2025 पर्यंत जमा करेन, अशी सहमती देऊन दोन्ही ऑप्शन वर टिक करून सबमिट करायचे आहे. मित्रांनो, ही सर्व माहिती भरून सबमिट केल्या वर, तुम्हाला “तुमची ई- केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा मेसेज आलेला दिसेल.
आता लाडक्या बहिणीची ई केवायसी पूर्ण झाली की नाही ते चेक कसे करायचे, या बद्दल जाणून घेऊ या:-
स्टेप 1:- पुन्हा वेबसाईट च्या होम पेज वर येऊन ‘येथे क्लिक करा’ ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 2:- त्या नंतर लाभार्थी आधार क्रमांक येथे लाडक्या बहिणीचा आधार कार्ड नंबर टाकून खाली दिलेला कॅपचा टाकायचा आहे व ‘मी सहमत आहे’ या वर टिक करून ‘ओटीपी पाठवा’ या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे.
स्टेप 3:- आता तुमच्या लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल, तो टाकून ‘सबमिट करा’ या बटन वर क्लिक करायचं आहे. या नंतर लगेच तुम्हाला “या आधार क्रमांकाची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे” असा मेसेज येईल.

मित्रांनो, ही ई केवायसी करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 आहे. त्यामुळे, जर तुम्ही अजून केवायसी केली नसेल किंवा तुमच्या मनात पूर्वीच्या केवायसी बद्दल काहीही शंका असेल, तर विलंब न करता लवकरात लवकर वरील सुधारित प्रक्रिये नुसार तुमची ई केवायसी पूर्ण करून घ्या.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण लाडकी बहीण योजना ई केवायसी एडिट कशी करायची, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.
Tags: ladki bahin kyc kaise kare, ladki bahin yojana ekyc kaise kare, ladki bahin kyc process, ladki bahin kyc kashi karychi, ladki bahin ekyc kashi karavi, ladki bahin yojana kyc kaise kare, ladki bahin yojana maharashtra ekyc, mazi ladki bahin yojana kyc kaise kare, ladki bahin yojana ekyc error problem, ladki bahin ekyc process, ladki bahin ekyc mobile se, ladki bahin ekyc portal, ladkibahin.aharashtra.gov.in ekyc, majhi ladki
