Ladki Bahin Yojana

लाडकी बहीण ई-केवायसी करताना येणारे प्रॉब्लेम आणि त्यांचे सोल्युशन | Ladki Bahin eKYC Send OTP Error Problem

नमस्कार मित्रांनो, आज आपण लाडकी बहीण ई केवायसी करताना येणारे प्रॉब्लेम आणि त्यांचे सोल्युशन, या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, राज्यातील महिलांसाठी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ला पूर्ण राज्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजने अंतर्गत पात्र महिलांना आता पर्यंत योजनेचे सर्व हप्ते त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. पण आता, या योजने मध्ये पारदर्शकता आणण्यासाठी व गैरप्रकार टाळण्यासाठी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे की, सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी (e-KYC) करणे बंधनकारक करण्यात आले आहे आणि या संदर्भात शासनाने एक परिपत्रक (GR) देखील जारी केला आहे.



हा जीआर जाहीर झाल्या पासून पुढील दोन महिन्यांत ई- केवायसीची प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु मित्रांनो, ई- केवायसीला सुरुवात झाली असली, तरी अनेक महिलांना ही प्रक्रिया करताना अनेक प्रोब्लेम्स येत आहेत. हे कोणते प्रोब्लेम्स आहेत व त्यावर सोल्युशन काय आहे, या बद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे लाडकी बहीण ई केवायसी करताना येणारे प्रॉब्लेम आणि त्यांचे सोल्युशन या बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

Ladki Bahin eKYC Send OTP Error Problem

प्रॉब्लेम 1 – (Unable to Send OTP)

मित्रांनो, लाडक्या बहिणीची ई केवायसी करताना भरपूर जणांना सर्वात जास्त येणारा प्रॉब्लेम म्हणजे ‘Unable to send OTP’. मित्रांनो, भरपूर जण पोर्टल वर येऊन ई केवायसी करत आहेत, म्हणून बऱ्याचदा पोर्टल वर लोड येतो व ओटीपी पाठवण्यात error येते.

सोल्युशन:- मित्रांनो, तुमच्या या प्रॉब्लेम वर उपाय म्हणून तुम्ही शक्यतो रात्रीच्या वेळेस म्हणजे 11/ 12 नंतर पोर्टल वर येऊन लाभार्थी महिलेची ई केवायसी करायची आहे. किंवा परत काही दिवसांनी ई केवायसी करायची आहे.

प्रॉब्लेम 2 – जून, जुलै, ऑगस्ट महिन्याचे पैसे आले नाहीत

मित्रांनो, बऱ्याच महिलांचे जून, जुलै, ऑगस्ट महिन्याचे पैसे आलेले नाहीत. तर त्यांना तीनही महिन्याचे पैसे मिळतील का? असा प्रश्न बऱ्याच महिलांना पडला आहे.

सोल्युशन:- तर मित्रांनो, यासाठीच शासनाने सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया करण्यास सांगितले आहे. तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यास व तुम्ही पात्र आहात याची पडताळणी झाल्यावर तुम्हाला तुमचे सर्व पैसे एकत्र मिळतील. असे महिला व बाळ विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आधीच दिलेली आहे.



Ladki Bahin eKYC Problem 1

प्रॉब्लेम 3 – सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही

मित्रांनो, अनेक महिलांना ई केवायसी करताना आधार नंबर टाकल्या नंतर एक error येतोय, तो म्हणजे ‘सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही’. म्हणजेच तुम्ही लाडकी बहीण या योजनेसाठी अपात्र आहात व तुम्हाला या योजनेतून वगळण्यात आले आहे.

सोल्युशन:- आता तुम्हाला यावर काहीही उपाय नाही. असा एरर तुमच्या घरात कोणी ITR भरत असेल किंवा तुमच्या कडे चार चाकी गाफी असेल किंवा तुमच्या घरात दोन पेक्षा जास्त महिला योजनेचा लाभ घेत असतील, तर असा एरर येऊ शकतो.

प्रॉब्लेम 4 – वडील / पती नाहीत

मित्रांनो, भरपूर जण विचारताय की, केवायसी करताना जेव्हा वडील किंवा पती यांचा आधार नंबर द्यायचा असतो, तेव्हा ज्यांना पती किंवा वडील दोघेही नाहीत त्यांच्यासाठी काय ऑप्शन आहे?

सोल्युशन:- तर मित्रांनो, या प्रॉब्लेम वर अजून तरी शासनाकडून काही दुसरा पर्याय आलेला नाही. तुम्हाला काही दिवस थांबावं लागेल. शासनाकडून जेव्हा त्या बद्दल अपडेट येईल, तेव्हा आम्ही तुम्हाला कळवू.

Ladki Bahin eKYC Problem 2

प्रॉब्लेम 5 – वडील / पती नाहीत कोणाचा आधार टाकायचा

मित्रांनो, अनेक जणांचा प्रश्न आहे की, पती किंवा वडील दोघेही असतील तर नेमकं कोणाचा आधार क्रमांक टाकायचा?

सोल्युशन:- मित्रांनो, जर लाभार्थी महिलेला पती आणि वडील दोघेही असतील, तर अश्या वेळेस तुमच्या आधार कार्ड वर ज्याचं नाव असेल त्याचा आधार नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. म्हणजे जर तुम्ही तुमच्या नावामागे वडिलांचे नाव लावत असाल तर तुम्हाला वडीलांचा आधार नंबर टाकायचा आहे व जर तुम्ही पतीचे नाव लावत असाल तर पतीचा आधार नंबर टाकायचा आहे.

Ladki Bahin eKYC Problem 3

प्रॉब्लेम 6 – निवृत्ती वेतन ऑप्शन?

मित्रांनो, निवृत्ती वेतन च्या ऑप्शन मध्ये ‘होय’ करायचं की ‘नाही’ ऑप्शन सिलेक्ट करायचं? या बद्दल अनेक महिलांना प्रश्न पडला आहे.

सोल्युशन:- मित्रांनो, आमच्या मते तुम्ही होय/ नाही काही केलं तरी देखील तितका फरक पडणार नाही. कारण तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर तिथे गेलेला आहे. आणि त्या आधार नंबर वरून सरकारी कर्मचारी कोण आहे ते कळेल. तसेच जर यामध्ये काही बदल झाला तर आम्ही तुम्हाला कळवू.

Ladki Bahin eKYC Problem 4

प्रॉब्लेम 7 – एक विवाहित महिला व एक अविवाहित महिला

मित्रांनो, अनेक जण असेही विचारत आहेत की डिक्लरेशन मध्ये दुसऱ्या पर्याय मध्ये विवाहित एक आणि अविवाहित एक असं विचारलं आहे तिथे होय करायचं की नाही.?

सोल्युशन:- मित्रांनो, जर तुमच्या घरात एक विवाहित महिला व एक अविवाहित महिला असेल तर तुम्हाला ‘होय’ करायचं आहे, तसेच जर तुमच्या घरात दोन पेक्षा जास्त महिला असतील तर तुम्हाला ‘नाही’ करायचं आहे. पण जर तुम्ही ‘नाही’ पर्याय टाकला तर तुम्ही अपात्र ठरू शकता. त्यामुळे एकच महिला असेल तर तुम्ही ‘होय’ पर्यायच निवडायचा आहे.

इतर प्रश्न:-

  1. ई केवायसी ची शेवटची तारीख काय आहे?
    :- मित्रांनो, ई केवायसी करण्यासाठी तुम्हाला दोन महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे.
  2. आम्हाला लाडकी बहीण योजना बंद करायची असेल तर काय करायचं?
    :- जर लाभार्थी महिलेला योजना बंद करायची असेल तर एकच पर्याय आहे, की तुम्ही ही ई केवायसी करू नका, म्हणजे तुमची योजना किंवा मिळणारा लाभ बंद होऊन जाईल.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण लाडकी बहीण ई केवायसी करताना येणारे प्रॉब्लेम आणि त्यांचे सोल्युशन, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.

Tags: ladki bahin ekyc unable to send otp error problem, ladki bahin ekyc error, ladki bahin yojana ekyc problem, Majhi ladki bahin yojana ekyc, ladki bahin yojana ekyc unable to send otp, ladki bahin yojana yes or no, mazi ladki bahin yojana ekyc problem, ladki bahin yojana problem

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!