Uncategorized

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात आधी 1 रुपया जमा | Ladaki Bahin Yojana Aadhar Bank Linking Status Check Online | Bank Seeding Status

माझी लाडकी बहीण योजने मध्ये काही निवडक महिला अर्जदारांच्या बँक खात्यांत प्रायोगित तत्त्वावर प्रत्येकी 1 रुपया जमा करण्यात आहे. पण काय खरचं सर्व महिलांच्या बँक खात्यात एक रुपया जमा केला जाणार आहे का? आणि जर तुमच्या बँक खात्यात एक रुपया जमा झाला नसेल तर काय तुम्हाला योजनेचे पैसे मिळणार नाहीत का? असे एक ना अनेक प्रश्न तुमच्या मनात आलेच असतील मित्रांनो. पण काळजी करू नका, या बाबतची संपूर्ण माहिती आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा…

1 Rs Credit Message Ladaki Bahin Yojana

तसेच मित्रांनो, इथे महिलांनी एक काम करायचं आहे की शासनाने सांगितल्या प्रमाणे हे पैसे DBT द्वारे देण्यात येणार आहेत. त्यामुळे आधार ला तुमचं बँक खाते सीडिंग असेल तरच तुम्हाला हे पैसे मिळतील, अन्यथा योजनेचे पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे तुमची बँक आधारला लिंक असणे गरजेचे आहे. आता तुम्ही म्हणाल आमचे चार पाच अकाउंट आहेत आणि ते सगळेच आधारला लिंक आहेत. तर मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की, आधारला बँक लिंक असणं वेगळं आणि आधारला बँक सीडिंग असणं वेगळं आहे.



Check Bank Account for Ladki Bahin Yojana

इथे आपलं बँक सीडिंग असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमचे बँक खाते आधारला सीडिंग आहे की नाही ते चेक करायचे आहे. त्यासाठी तुम्ही आधारच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुमचे बँक सीडिंग स्टेटस चेक करू शकता. आणि तिथे कोणती बँक ऍक्टिव्ह दाखवते आहे, ते बघायचं आहे. कारण त्याच खात्यात तुम्हाला योजनेचे पैसे मिळणार आहेत.

कोणत्या बँक खात्यात येणार माझी लाडकी बहीण योजनेचा हफ्ता?

स्टेप 1: मित्रांनो, तुमचे कोणते बँक खाते आधार शी लिंक आहे हे पाहण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला आधारच्या म्हणजेच UIDAI च्या ऑफिशियल वेबसाईट वर जायचे आहे. आधार कार्ड UIDAI वेबसाइट => myaadhaar.uidai.gov.in

Check Bank Account for Ladki Bahin Yojana Step 1

स्टेप 2: त्या नंतर तिथे तुम्हाला अनेक ऑप्शन दिसतील त्यातील ‘बँक सीडिंग स्टेटस/ Bank Seeding Status’ या ऑप्शन वर क्लीक करायचे आहे.

स्टेप 3: आता नेक्स्ट पेज वर लॉगिन करायचे आहे. त्यासाठी तुमचा आधार कार्ड नंबर व दिलेला कॅपचा टाकून ‘OTP ने लॉगिन करा’ या बटन वर क्लिक करायचे आहे.

Check Bank Account for Ladki Bahin Yojana Step 3

स्टेप 4: त्या नंतर तुमच्या आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी पाठवला जाईल. तो ओटीपी दिलेल्या जागी टाकून नंतर login बटन वर क्लिक करायचे आहे.



स्टेप 5: परत एकदा तुम्हाला अनेक ऑप्शन दिसतील त्यातील ‘बँक सीडिंग स्टेटस/ Bank Seeding Status’ या ऑप्शन वर क्लीक करायचे आहे.

Check Bank Account for Ladki Bahin Yojana Step 5

स्टेप 6: त्या नंतर तुमच्या आधार कार्ड शी लिंक आलेले बँक खाते इथे दाखवले जाईल. त्यात हे बँक खाते कधी पासून लिंक आहे, बँक अकाउंट नंबर चे शेवटचे चार डिजिट, आणि अकौंटची सध्याची स्थिती म्हणजे ऍक्टिव्ह आज की इनऍक्टिव्ह ते दाखवले जाईल.

Check Bank Account for Ladki Bahin Yojana Step 6

जर इथे तुमचं बँक सीडिंग इन -ऍक्टिव्ह/ In-Active दाखवत असेल तर तुम्ही लवकरात लवकर बँकेत जाऊन डीबीटी लिंक चा फॉर्म भरून देऊ शकता आणि काही दिवसांनी बँक तुम्हाला सीडिंग करून देईल. पण मित्रांनो, कधी कधी ही प्रोसेस करायला बँकेकडून खूप लावला जातो. त्यावर अजून एक पर्याय म्हणजे तुम्ही पोस्टात तुमचे डिजिटल अकाउंट ज्याला IPPB (Indian post payment bank ) account असे ही म्हणतात, हे अकाउंट तुम्ही उघडू शकता. यामध्ये तुम्हाला पासबुक मिळत नाही, तर एक डिजिटल कार्ड दिल जातं. मित्रांनो, तुम्ही जर हे अकाउंट उघडलं तर फक्त तीन ते चार दिवसात तुमचं बँक सीडिंग स्टेटस ऍक्टिव्ह दिसेल. आणि त्याच खात्यात तुम्हाला योजनेचे पैसे मिळतील.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात आधी 1 रुपया कशा बद्दल जमा करण्यात आले, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद

Tags: ladki bahin yojana bank account link status check online, ladki bahin yojana 1rs in bank account, ladki bahin yojana online form apply, mukhyamantri mazi ladaki bahin yojana Maharashtra 2024, mukhyamantri mazi ladaki bahin yojana 1st installment 2024, ladki bahin yojana dbt, bank account for ladki bahin yojana, ladli behna yojana Maharashtra, mukhyamantri majhi ladki bahin yojana application, documents required for Majhi ladki bahin scheme, aadhar bank account seeding status, bank account aadhar link, mukhyamantri mazi ladki bahin yojana installment, mukhyamantri mazi ladki bahin yojana online installment info, mukhyamantri mazi ladki bahin yojana installment info, mukhyamantri mazi ladki bahin yojana hapta mahiti, mukhyamantri mazi ladki bahin yojana payment info, mukhyamantri mazi ladki bahin yojana nari shakti doot payment, mazi bahin ladki yojana form kasa bharava, mazi ladki bahin online form, form filling

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!