Jio

जिओ चे दोन नवीन फोन: Jio Bharat V2 आणि K1 Karbonn (फक्त 999 रू)

नमस्कार मित्रांनो, आज आपण जिओ चे नुकतेच लाँच झालेल्या दोन नवीन फोन बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. यात आपण Jio V2 आणि K1 Karbonn या दोन नवीन लाँच झालेल्या मोबाईल फोनबद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, जिओ आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच काही न काही नवीन गोष्टी आणत असते. त्यातच नुकतेच जिओ ने दोन नवीन फोन लाँच केले आहे. ज्यांची नावे Jio Bharat V2 आणि Jio K1 Karbonn अशी आहेत. सर्वात चांगली महत्वाची बाब म्हणजे या एका फोन ची किंमत ही फक्त रू 999 आहे. जी सामान्य माणसाला परवडणारे आहे. हा एक सर्वात स्वस्त असा फिचर फोन आहे.



मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जेव्हा देशातील लोक स्मार्ट फोन खरेदी करून 5G आणि 6G कडे वाटचाल करत आहेत, मग अशा वेळी 4G फीचर फोन का लाँच करण्या मागचे काय कारण असेल. आणि त्याचा जिओ वापरकर्त्यांना काय फायदा होईल. तर मित्रांनो, जिओ ने हा रू 999 मध्ये 4G फीचर फोन लाँच करण्यामागचा हेतू म्हणजे आजही आपल्या देशातील सुमारे 25 कोटी लोकं सध्या फीचर फोन वर अजूनही 2G सेवा वापरत आहेत. त्यामुळे जे लोकं महागडे स्मार्टफोन खरेदी करण्यास आणि रिचार्ज करण्यास सक्षम नाहीत त्यांच्यासाठी 4G फिचर फोन आणला आहे.

Jio Bharat Phone Mahiti

एका अर्थी या फोन द्वारे जिओ ने 2G मुक्त भारताचा नाराच दिला आहे. आणि महत्वाचे म्हणजे या फिचर फोन मुळे सामान्य गरीब माणसाला देखील आता फिचर फोन मध्येच 4G सेवांचा लाभ घेता येईल. आणि तेही फक्त रू 999 मध्ये. त्यामुळे जिओ चे नवीन फिचर फोन लाँच करण्याचा सर्वानाच फायदा होईल. या दोन्ही फोन बद्दल आपण सविस्तर पणे जाणून घेऊ या तसेच त्यांचे काय वैशिष्ट्ये आहेत ते ही आपण जाणून घेऊ या.

Jio Bharat V2 फोन

मित्रांनो, जिओ चा हा जिओ भारत V2 फोन हा एक पारंपारिक फिजिकल T9 कीपॅड असलेला फीचर फोन आहे. यात 1.77 इंच स्क्रीन, 1000 mAh बॅटरी आणि एक्सटर्नल मेमरी कार्ड आहेत जे 128GB पर्यंत डेटा साठवू शकतात. या फोन च्या मागे VGA कॅमेरा सुद्धा आहे. Jio Bharat V2 फोन हे काळा आणि निळा अश्या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. या फोन मध्ये कॉल रेकॉर्डिंग समाविष्ट आहे. तसेच JioCinema आणि JioSaavn, FM (एफएम) रेडिओ, HD व्हॉइस Calling, ही तुम्ही यात ऐकू शकतात.

Jio Bharat V2 Mobile Phone Mahiti

यासोबतच JioPay वापरकर्त्यांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी UPI चा देखील वापर करता येईल. आणि हा फोन 23 भारतीय भाषाना सपोर्ट करतो.

मित्रांनो, जिओ चा हा फोन भारतात बनवलेला असून त्याची किंमत फक्त 999 रुपये इतकी आहे. त्यामुळे सर्वसामान्य गरीब जनतेला हा फोन नक्कीच वापरता येईल. या फोन चे वजन फक्त 71 ग्रॅम असून jio bharat V2 हा फोन 4G इंटरनेट सेवेवर काम करतो. या मोबाईल फोन मध्ये 3.5 mm हेडफोन जॅक, शक्तिशाली लाऊड स्पीकर आणि टॉर्च देखील उपलब्ध आहे. मित्रांनो, या शिवाय जिओ चा 999 रुपयांचा हा V2 मोबाईल फोन तुम्हाला मासिक प्लॅन सह उपलब्ध होणार आहे.



या प्लॅन मध्ये जिओ भारत V2 आपल्या ग्राहकांना 14 जीबी 4G डेटा देणार आहे, म्हणजेच एका दिवसात तुम्हाला 500MB डेटा मिळेल. 28 दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनसाठी ग्राहकांना 123 रुपये द्यावे लागतील. ज्या ग्राहकाला संपूर्ण एका वर्षासाठी रिचार्ज करायचं असेल तर त्यांना फक्त 1,234 रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर मित्रांनो, जिओ भारत V2 च्या आधारे 10 कोटींहून अधिक ग्राहक लवकरच 2G वरून 4G वर स्विच करतील, असे म्हणण्यास हरकत नाही.

हे हि वाचा: तुमच्या नावावर किती SIM Card रजिस्टर आहेत चेक करा ? 2 मिनिटात

Jio Bharat K1 Karbonn फोन

मित्रांनो, जिओ चा K1 karbonn हा मोबाईल फोन देखील एक फिचर फोन आहे जो मात्र तुम्हाला 999 रुपयाला मिळत आहे. हा फोन रेड आणि ब्लॅक च्या कॉम्बिनेशन मध्ये येतो. यासोबतच या मोबाईल फिचर फोन चा डिस्प्ले तुम्हाला 1.77 इंच चा मिळतो व मागच्या बाजूला 0.3 मेगापिक्सेल चा कॅमेरा दिला आहे. तसेच पावरफुल लाऊड स्पीकर आणि एलईडी टॉर्च देखील देण्यात आला आहे. तसेच 1000 mAh बॅटरी आणि एक्सटर्नल मेमरी कार्ड आहे जे 128GB पर्यंत डेटा साठवू शकतात.

K1 Karbonn Mobile Phone Mahiti

या फोन चे बॅक कव्हर देखील चांगल्या क्वालिटी चे असून यात एक सिम कार्ड व एक मेमरी कार्ड देखील लावू शकतात. मित्रांनो, तुम्हाला जर रिचार्ज करायचा असेल तर तूम्ही 28 दिवसांसाठी 123 रुपयांचा प्लॅन निवडू शकता. ज्यात तुम्हाला 14 GB डेटा मिळतो किंवा एक वर्षासाठी 1234 रुपयांचा प्लॅन देखील निवडू शकता. शिवाय या फोन मध्ये कॉल रेकॉर्डिंग देखील समाविष्ट आहे. तसेच JioCinema आणि JioSaavn, FM (एफएम) रेडिओ , HD व्हॉइस calling, ही तुम्ही यात ऐकू शकतात.

यासोबतच 23 भाषांना सपोर्ट करणारा हा मोबाईल फोन आहे व यात JioPay वापरकर्त्यांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी UPI चा देखील वापर करता येईल.

Jio Bharat V2 ची वैशिष्ट्य

सिम प्रकारसिंगल सिम, जीएसएम
रिलीझ तारीख03 जून 2023
रंगकाळा (सोलो ब्लॅक) आणि निळा (अॅश ब्लू)
डिस्प्ले प्रकार कलर QVGA
रॅम/ RAM512 MB
स्टोरेज4 GB
मागील कॅमेरा0.3 MP
व्हिडिओ रेकॉर्डिंगनाही
फ्रंट कॅमेरा0.3 MP
बॅटरी1000 mAh, Li-ion बॅटरी
मेमरी कार्ड स्लॉट128 GB पर्यंत
3G/ 4G/ VoLTEआहे
Bluetoothआहे v4.1
Wifiनाही
USBआहे microUSB v2.0
28 दिवसांचा प्लॅन123 रुपये
एका वर्षासाठी प्लॅन1,234 रुपये

FAQ

JioBharat फोन कसा आणि कुठे विकत घेऊ शकतो?

JioBharat ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही ठिकाणी मिळू शकतात. तुम्ही तुमच्या जवळच्या Jio सर्विस सेंटर ला भेट देऊन फोन विकत घेऊ शकता आणि जर मिळत नसेल तर jio.com किंवा Amazon, Flipkart वरून ऑनलाईन मागवू शकता.

JioBharat फोनमध्ये ग्राहक नॉन-जिओ सिम कार्ड वापरू शकतात का?

नाही, JioBharat प्लॅटफॉर्म एंट्री-लेव्हल फोनवर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही टेलिकॉम कंपनीचे सिम कार्ड वापरू शकत नाही.

JioBharat फोन मध्ये कॉल रेकॉर्डिंग पर्याय आहे का?

होय, JioBharat फोन वर कॉल रेकॉर्डिंग पर्याय आहे.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण जिओ च्या दोन नवीन फोन Jio bharat V2 आणि K1 Karbonn या दोन्ही फोन बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच इंटरनेट वापरपेक्षा तुम्हाला जर फक्त Calling साठी एखादा चांगला फोन हवा असेल तर तुम्ही या फोन चा नक्कीच विचार करू शकता. मित्रांनो, तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!