जिओ 4G सिम कार्ड 5G मध्ये कन्व्हर्ट कसे करायचे ? | Convert JIO 4G into JIO True 5G - MarathiDiary
Jio

जिओ 4G सिम कार्ड 5G मध्ये कन्व्हर्ट कसे करायचे ? | Convert JIO 4G into JIO True 5G

सध्या देशात सर्वत्र Jio 5G Network पोहोचत आहे. आणि अशातच जिओ काही निवडक युजर्सना वेलकम ऑफर अंतर्गत फ्री मध्ये 5G डेटा देत आहे फक्त अट अशी आहे कि तुमचा मोबाइल 5G सपोर्ट असणारा असावा आणि तुमच्या शहरात 5G चे नेटवर्क असावे. तर मित्रांनो, आज आपण जिओ वेलकम ऑफरचा फायदा कसा करून घ्यायचा तसेच जिओ 4G सिम कार्ड ला 5G मध्ये कन्व्हर्ट कसे करायचे याबद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, आजकाल प्रत्येकाला आपल्या मोबाईल मध्ये हाय स्पीड इंटरनेट असावे असे वाटते. सध्या आपण आपल्या मोबाईल मध्ये 4G वापरत असलो तरी देखील हवा तेवढा इंटरनेट स्पीड आपल्याला मिळत नाही. पण मित्रांनो, तुम्ही जर जिओ चे सिम वापरत असाल तर मात्र तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, की जिओ काही काळापासून 5G तंत्रज्ञाना वर काम करत आहे. आणि जिओ आपल्या ग्राहकांना 5G डेटा ऑफर करन्याची योजना ही आखत आहे. हे काम अजून पूर्ण झाले नसले तरीही काही ठराविक शहरांमध्ये लोकं 5जी डेटा वापरत आहे. ते कसं काय? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर मित्रांनो, मला तुम्हाला सांगायला आवडेल की तुम्ही जर जिओ 4जी सिम कार्ड वापरत असाल तर आता तुम्ही तुमच्या जिओ 4जी सिम कार्ड ला 5जी मध्ये कन्व्हर्ट करून 5G डेटाचा आनंद घेऊ शकता.



Convert JIO 4G into JIO True 5G in Marathi

5G डेटा म्हणजे काय?

मित्रांनो, तर 5G ही मोबाईल नेटवर्क ची पुढची पिढी आहे. 5G नेटवर्क हे हाय स्पीड, कमी विलंब आणि अधिक विश्वासार्ह आहे. त्यामुळे प्रत्येक जिओ वापरकर्ता 5जी डेटा वापरण्याची वाट बघतो आहे. म्हणूनच जिओ ने आपल्या ग्राहकांना 5जी नेटवर्क वापरता यावे यासाठी प्रयत्न सुरू केले. आणि 2022 च्या वर्ष अखेरीस जिओ 5जी आपल्याला उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यात तुम्ही जर 4जी सिम कार्ड वापरत असाल तर तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये 5जी नेटवर्क ऍक्टिव्ह करू शकणार आहात. फक्त त्यासाठी तुमचा मोबाईल 5जी नेटवर्कला सपोर्ट करणारा असायला हवा किंवा मग तुमच्या कडे जिओ 5जी सिम कार्ड असायला हवे. त्याशिवाय तुम्ही 5G नेटवर्क वापरू शकणार नाही. मित्रांनो, जिओ 5G आता आपल्यासाठी उपलब्ध आहे आणि तुम्ही जिओ 5G सिम कार्ड तुमच्या 4G च्या हँडसेट वर ही वापरू शकता. तुम्हाला जर तुमच्या 4G हँडसेट वर जिओ 5G वापरायचे असल्यास, त्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या जिओ 4G सिम कार्डला 5G मध्ये कन्व्हर्ट करणे आवश्यक आहे. आणि तुम्हाला ही जर जिओ 4जी सिम कार्ड ला 5जी मध्ये कन्व्हर्ट कसे करायचे हे जाणून घ्यायचे असेल तर आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

जिओ 4G सिम ला 5G मध्ये कन्व्हर्ट करा

आता जिओ 4जी सिम कार्ड 5जी मध्ये कन्व्हर्ट कसे करायचे ते जाणून घेऊ या

स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये प्ले स्टोअर वरून My Jio अप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचे आहे.

Convert JIO 4G into JIO True 5G Step 1

स्टेप 2: आता अँप ओपन करायचे आहे. व नंतर तुमच्या समोर ओपन झालेल्या इंटरफेस मध्ये Proceed या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. व अँप ने मागितलेल्या परमिशन्स allow करायच्या आहेत.

Convert JIO 4G into JIO True 5G Step 2

स्टेप 3: मित्रांनो, आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला तुमचा जिओ नंबर टाकायचा आहे व Login बटन वर क्लिक करायचे आहे. थोड्याच वेळात तुमच्या जिओ मोबाईल नंबर वर एक OTP येईल. तो दिलेल्या जागी टाकायचा आहे व Submit बटन वर क्लिक करायचे आहे. आता तुमचे अकाउंट लॉगिन होऊन जाईल.



Convert JIO 4G into JIO True 5G Step 3

स्टेप 4: मित्रांनो, आता अँपच्या होम पेज वर तुम्हाला वरती सर्च आयकॉन दिसेल. त्यात तुम्हाला Jio 5G असे सर्च करायचे आहे. सर्च केल्यानंतर खाली काही ऑप्शन शो होतील. त्यातील Device Compatibility हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे.

Convert JIO 4G into JIO True 5G Step 4

स्टेप 5: आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला तुमचा मोबाईल कोणत्या कंपनी ब्रँड चा आहे ते सिलेक्ट करून टाकायचे आहे. व नंतर मॉडेल टाकायचे आहे. व नंतर खाली दिलेले Check Compatibility या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

आणि जर तुमचा मोबाइल आयफोन असेल तर कंपनी ब्रँड मध्ये Apple निवडा नंतर आयफोन चे मॉडेल निवडा.

Convert JIO 4G into JIO True 5G Step 5

स्टेप 6: नंतर तुम्हाला तुमचा मोबाईल 5G सपोर्टेड आहे का ते सांगण्यात येईल. जर नसेल तर तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये 5G नेटवर्क वापरू शकणार नाही.

Convert JIO 4G into JIO True 5G Step 5

तुमच्या शहरात जिओ 5G नेटवर्क तपासा

मित्रांनो, आता तुम्हाला तुमच्या शहरात किंवा एरियात जिओ 5जी नेटवर्क उपलब्ध आहे की नाही ते चेक करायचे आहे. त्यासाठी तुम्हाला परत एकदा My Jio अप्लिकेशन मध्ये Jio 5G असे सर्च करायचे आहे. नंतर 5G Coverage Check या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.



Check JIO True 5G Network Service in my Area Step 1

मित्रांनो, आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला तुमचे स्टेट म्हणजेच राज्य सिलेक्ट करायचे आहे. व त्यानंतर तुम्ही निवडलेल्या राज्यात कोण कोणत्या शहरांमध्ये जिओ 5जी नेटवर्क उपलब्ध आहे ते दाखवले जाईल. व तुम्हाला तुमच्या शहरात जिओ 5G काम करत आहे का ते समजेल.

Check JIO True 5G Network Service in my Area Step 2

जिओ 5G वेलकम ऑफर तपासा

आत्ता तुम्हाला तुमच्या मोबाइल मध्ये 5G वेलकम ऑफर आहे का ते चेक करायचे आहे. त्यासाठी तुम्हाला परत अँपच्या होम पेज वर यायचे आहे. व होम पेज वर थोडे खाली तुम्हाला जिओ ची वेलकम ऑफर बघायला मिळेल. (मित्रांनो, तुम्हाला जर इथे जिओ ची वेलकम ऑफर दिसत नसेल तर तुम्ही जिओ च्या कस्टमर केअर ला कॉल करून या बद्दल विचारू शकता.) त्यात Get Started या बटन वर क्लिक करायचे आहे.

Check JIO True 5G Welcome Offer Step 1

मित्रांनो, आता तुमच्या डिव्हाइस ला कोण कोणत्या गोष्टी मॅच होत आहेत ते दाखवले जाईल. त्यात सगळ्या ऑप्शन्स वर ग्रीन टिक दिसत आहे का ते बघा. त्यात लास्ट ऑप्शन मध्ये म्हणजे Handset 5G settings या ऑप्शन वर ग्रीन टिक दिसत नसेल तर तुम्हाला आता तुमच्या मोबाईल ची सेटिंग बदलायची आहे.

Check JIO True 5G Welcome Offer Step 2

जिओ 5G नेटवर्क सेटिंग सेट करा

स्टेप 1: मित्रांनो, आता तुम्ही तुमच्या मोबाईलच्या सेटिंग मध्ये जायचे आहे. त्यानंतर Mobile Data या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. आता तुम्हाला तुमचे Primary Sim Card सिलेक्ट करायचे आहे. आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला अनेक ऑप्शन दिसतील. त्यातील Network Selection या ऑप्शन ला सिलेक्ट करायचे आहे.

Set Jio 5G Setting on Mobile Phone Step 1

स्टेप 2: त्यात तुम्हाला 4जी किंवा 5जी चा ऑप्शन दिसेल. इथे दिसत नसेल तर तुम्हाला Voice and Data हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. यात तुम्हाला 4जी, 5जी असे ऑप्शन दिसतील. आता तुम्हाला त्यातील 5G ऑन करायचे आहे.

स्टेप 3: मित्रांनो, आता तुम्ही परत My Jio अँप मध्ये जाऊन बघायचे आहे की Handset 5G Settings हा ऑप्शन पण ग्रीन झाला आहे की नाही. तुम्हाला तो ऑप्शन पण ग्रीन टिक झालेला दिसेल. म्हणजे तुम्ही सेटिंग मधून पण Jio 5G ऍक्टिव्हेट केले आहे.

Set Jio 5G Setting on Mobile Phone Step 2

स्टेप 4: आता तुम्हाला अँप मध्येच खाली दिलेल्या Explore True 5G या बटन वर क्लिक करायचे आहे.

Set Jio 5G Setting on Mobile Phone Step 3

स्टेप 5: आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला सांगण्यात येईल की तुमचा मोबाईल सिम सुकसेसफुल्ली जिओ 5G मध्ये अपग्रेड झालेला आहे.

Set Jio 5G Setting on Mobile Phone Step 4

आता त्याखालीच दिलेल्या Check Plan या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. मित्रांनो, तुम्हाला इथे दिसेल की 5G Trial एकदम अनलिमिटेड आहे. म्हणजे तुम्ही जितका डेटा पाहिजे तितका युझ करू शकता व त्याचा स्पीड पण खूप चांगला मिळेल.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे वरील प्रोसेस करून तुम्ही तूमच्या जिओ 4जी सिम कार्ड ला 5जी मध्ये कन्व्हर्ट करू शकणार आहात.

जिओ 5G नेटवर्क चे फायदे

  • मित्रांनो, जिओ 5G नेटवर्क ही वायरलेस नेटवर्क मधील लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे. आणि आधीच्या टेक्नॉलॉजी पेक्षा अधिक जास्त फायदे देते.
  • काही ऍप्लिकेशन्स साठी हाय बँडविड्थ असणे गरजेचे असते. अश्या वेळी 4जी पेक्षा 5जी चा हाय स्पीड नेटवर्क, व कमी विलंब लावणारा नेटवर्क नक्कीच उपयोगी पडेल.
  • 5जी सुधारित कार्यक्षमता देखील देते.
  • ज्या संस्थांना सेन्सिटिव्ह डेटा प्रोटेक्ट करायचा असतो त्यांच्या साठी 5जी नेटवर्क वापरणे अधिक सुरक्षित ठरू शकते.

जिओ 5G नेटवर्क चे तोटे

  • मित्रांनो, 5जी मुळे जसे फायदे मिळतात, तसेच त्याचे काही तोटे देखील आहेत ज्यांची 5जी वापरकर्त्यांनी जाणीव ठेवली पाहिजे…
  • मित्रांनो, 5जी चा सर्वात मोठा तोटा म्हणजे तो अजून मोठ्या प्रमाणावर म्हणजेच सर्वत्र उपलब्ध झालेला नाही. 5जी वापरण्‍यासाठी, तुमच्‍याकडे 5जी ला सपोर्ट करणाऱ्या डिव्‍हाइस ची आवश्‍यकता आहे आणि 5जी कव्हरेज असलेल्‍या क्षेत्रात असण्याची आवश्‍यकता आहे.
  • तसेच 5G चा आणखी एक तोटा म्हणजे तो इतर प्रकारच्या डेटा प्लॅनपेक्षा जास्त महाग असण्याची शक्यता आहे.
  • मित्रांनो, 5 जी इतर डेटा कनेक्शन पेक्षा जास्त पॉवर वापरेल. त्यामुळे तुमची बॅटरी लाइफ लवकर कमी होऊ शकते.
  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे, 5जी हाय फ्रिक्वेन्सी वापरते त्यामुळे या फ्रिक्वेन्सी मुळे आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.

जिओ 5G फोन ची किंमत किती असेल?

मित्रांनो, फेब्रुवारी 2023 पर्यंत देशातील अनेक शहरांमध्ये 5G नेटवर्क काम करण्यास सुरुवात करेल याचा विचार कदाचित मोबाईल वापरकर्त्यांनी केलाही नसेल. पण हे खरं आहे की आज अनेक शहरांमध्ये 5G नेटवर्क काम करत आहे. तसेच आता भारतात 4G पेक्षा जास्त 5G चे स्मार्टफोन विकले जातील याचीही कोणी कल्पना केली नव्हती. आज जवळजवळ प्रत्येक ब्रँड चा मोबाइल फोन 5G कनेक्टिव्हिटीसह लाँच करण्यात येत आहेत. पण या सगळ्यात आता मार्केट मध्ये सर्वात स्वस्त 5G फोन लॉन्च करण्याची शर्यत सुरू आहे. आणि या शर्यतीत, रिलायन्स जिओ (Reliance Jio) ने आणलेला जिओ फोन 5G हा भारतातील सर्वात स्वस्त 5G मोबाईल असू शकतो.

मित्रांनो, काही दिवसांपूर्वी एक अहवाला मध्ये Jio Phone 5G ची किंमत सांगितली गेली होती. त्यात असे म्हटले जात होते की रिलायन्स जिओ चा 5G स्मार्ट फोन भारतात 8,000 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च केला जाऊ शकतो. आणि आता जिओ फोन 5G लवकरच लाँच होईल अशी अपेक्षा आहे. याशिवाय जिओ चा 5G स्मार्ट फोन बाजारात एकापेक्षा जास्त मेमरी व्हेरियंटमध्ये लॉन्च केला जाईल असे म्हटले जात आहे. सुरुवातीची किंमत 8 हजारांच्या आसपास सांगितली जात असली तरी या फोनच्या सर्वात मोठ्या मॉडेलची किंमत 12,000 रुपयांच्या जवळपास ठेवली जाऊ शकते. जिओ च्या या 5जी फोन चे जास्त डिटेल्स समोर आलेले नसले तरी छोट्या व्हेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम आणि मोठ्या व्हेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम पाहता येईल अशी अपेक्षा केली जात आहे. आणि सध्या भारतातील सर्वात स्वस्त 5G स्मार्ट फोन LAVA Blaze 5G आहे जो रु.10,999 च्या किमतीत मार्केट मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

तसेच रिलायन्स इंडस्ट्रीज चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आधीच स्पष्ट केले आहे की Jio 5G ची रिचार्ज प्लॅन्स जगातील सर्वात स्वस्त व परवडणारे असतील. पण अद्याप रिचार्ज प्लॅन ची किंमत किती असेल हे अजून तरी कोणत्याही टेलिकॉम कंपनी ने सांगितलेले नाही. पण दुसरीकडे जिओ 4जी पेक्षा 5जी निश्चित च थोडे महाग असण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे. पण असे असले तरी 5G चा मिळणारा स्पीड हा 4G पेक्षा दहा पट जास्त असेल त्यामुळे इंटरनेट स्पीड बद्दल ग्राहक नक्कीच समाधानी असतील.

FAQ

जिओ 5G आता कोण कोणत्या शहरांमध्ये उपलब्ध आहे?

मित्रांनो, आत्ता पर्यंत जिओ 5G या महाराष्ट्रातील या शहरात चालू झाले आहे – अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, चाकण, चंद्रपूर, धुळे, इचलकरंजी, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मालेगाव, मुंबई, नागपूर, नांदेड-वाघाला, नाशिक, परभणी, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर

जिओ 5जी वापरण्यासाठी काय आवश्यक आहे?

मित्रांनो, जिओ 5जी वापरण्यासाठी, सर्वात प्रथम तुम्हाला Jio कडून 5G ची वेलकम ऑफर येणे आवश्यक आहे. तसेच तुमच्या शहरात किंवा भागात जिओ 5G नेटवर्क असणे आवश्यक आहे आणि तुमच्या कडे 5G ला सपोर्ट करणारा मोबाइल फोन असणे आवश्यक आहे.

जिओ 5जी वापरण्यासाठी काही शुल्क आकारले जाते का?

नाही मित्रांनो, सध्या ट्रायल बेस वर जिओ 5जी अनलिमिटेड डेटा देत आहे व पूर्णपणे मोफत आहे.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण जिओ 4जी सिम कार्ड 5जी मध्ये कन्व्हर्ट कसे करायचे या बद्दल जाणून घेतले. आशा करतो की आजचा हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, तसेच हा लेख महत्व पुर्ण वाटला असल्यास तुमच्या मित्र मंडळीं सोबत नक्की शेअर करा. व असेच नवं नवीन लेख व माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइट ला नेहमी भेट देत रहा. धन्यवाद।

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद

error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!