Shop

ऑफिससाठी बेस्ट इन्सुलेटेड लंच बॉक्स | Best Insulated Lunch Box for Office Men/Women

नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला इन्सुलेटेड (Insulated) लंच बॉक्स बद्दल माहिती देणार आहोत. तसेच भारतातील सर्वात चांगले इन्सुलेटेड लंच बॉक्स कोण कोणते आहेत ते ही जाणून घेणार आहोत.

Insulated Lunch Box for School, Office

मित्रांनो, लंच बॉक्स ही खूप महत्त्वाची वस्तू आहे जी आपण शाळेत किंवा ऑफिस मध्ये जाताना घेऊन जातो. यात आपण ठेवलेले जेवण खराब होत नाही तसेच यात जेवण घेऊन जाणे हे खुप सोपे आहे. पण यात ठेवलेले अन्न कधी कधी बाहेर येते, किंवा मग तो लंच बॉक्स जास्त टिकत नाही. याचा अर्थ लंच बॉक्स घेताना तुमची चूक झाली आहे. कोणताही लंच बॉक्स घ्या पेक्षा इन्सुलेटेड लंच बॉक्स घ्या, असा मी तुम्हाला सल्ला देईल. कारण इतर लंच बॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करण्याऐवजी तुम्ही या इन्सुलेटेड लंच बॉक्स मध्य वन टाइम इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्यामुळे इन्सुलेटेड लंच बॉक्स म्हणजे नेमकं त्यात काय असत की त्याला इतर लंच बॉक्स पासून वेगळं करत, हे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.



इन्सुलेटेड लंच बॉक्स बद्दल थोडी माहिती

मित्रांनो, इन्सुलेटेड लंच बॉक्स म्हणजे असा लंच बॉक्स आहे जो तुमचे अन्न तासंतास गरम ठेवतो. म्हणजेच हे इन्सुलेटेड टिफिन जेवणाची उष्णता कमी होण्यापासून रोखतात. व बराच वेळ अन्न जसेच्या तसे राहते.

ऑफिस किंवा शाळेत किंवा घरातून कुठेही बाहेर जायचे असेल तर जेवण ठेवण्यासाठी केलेली सोय म्हणजे आपला लंच बॉक्स. आपली भूक आणि गरज भागविण्यासाठी आपल्याला एका चांगल्या क्वालिटी च्या तसेच फूड ग्रेड मटेरियल पासून बनलेले लंच बॉक्स म्हणजे जेवणाचे डबे हवे असतात. तसेच असे लंच बॉक्स हवे जे बराच वेळ जेवण चांगले, गरम व फ्रेश ठेवू शकतात. आज मार्केट मध्येही खूप वेग वेगळ्या प्रकारचे लंच बॉक्स उपलब्ध आहेत. पण स्वतःसाठी किंवा इतर कोणासाठी लंच बॉक्स म्हणजे जेवणाचा डबा निवडायचा असेल तर त्यासाठी तुम्ही इन्सुलेटेड लंच बॉक्स ला निवडू शकता. कारण या मध्ये अन्न सात ते आठ तास पर्यंत आहे तसेच म्हणजे गरम किंवा थंड राहते. तुम्हाला जर कधी लांबच्या प्रवासाला जायचे असेल तर हा इन्सुलेटेड लंच बॉक्स एक चांगला पर्याय आहे. पण तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की इन्सुलेटेड लंच बॉक्स च का घ्यावा? असे काय खास आहे त्यात, तर चला मग जाणून घेऊ या…

इन्सुलेटेड लंच बॉक्स च का घ्यावा?

मित्रांनो, तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्य आणि सुरक्षेच्या दृष्टीने इन्सुलेटेड लंच बॉक्स महत्वाचा आहे, याचे कारण म्हणजे…

  • मित्रांनो इन्सुलेटेड लंच बॉक्स हे स्टेनलेस स्टील चे बनलेले असल्याने ते केमिकल फ्री असतात. त्यामुळे आपण त्यांना रोज वापरू शकतो. तसेच प्लास्टिकच्या तुलनेत हे इन्सुलेटेड लंच बॉक्स बीपीए फ्री असतात. बीपीए हे एक प्रकारचे केमिकल असते जे प्लास्टिक मधून अन्नात जाते व आपल्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो.
  • याशिवाय इन्सुलेटेड लंच बॉक्स हे स्टेनलेस स्टील चे असल्याने ते पर्यावरण सुरक्षित आहेत. तसेच ते दीर्घकाळ टिकतात.
  • मित्रांनो, काही जेवणाच्या डब्यांमध्ये अन्न हे जास्त वेळ टिकत नाही. पण इन्सुलेटेड लंच बॉक्समध्ये जेवण हे बराच वेळ पर्यंत चांगले जसेच्या तसे राहते. जवळ जवळ 7 ते 8 तासापर्यंत इन्सुलेटेड लंच बॉक्स मध्ये जेवण हे गरम किंवा थंड राहते. याचे कारण म्हणजे या लंच बॉक्स मधील इन्सुलेटेड मटेरियल जेवणातील उष्णता टिकवून ठेवते. त्यामुळे ते अन्न दीर्घ वेळपर्यंत गरम किंवा थंड राहते.
  • मित्रांनो, इन्सुलेटेड लंच बॉक्स फक्त जेवणातील उष्णता टिकवून ठेवत नाही तर त्या अन्नाला ताजे पण ठेवते.
  • बरेच लोक ऑफिस मध्ये टिफिन घेऊन जात नाही व बाहेर कॅन्टीन मधले खातात. पर्यायी रोजचे पैसे पण खर्च होतात. पण तेच जर तुमच्याकडे इन्सुलेटेड लूमच बॉक्स असेल तर तुम्हाला दररोज चांगले उत्तम गरमा गरम आणि ताजे जेवण खायला भेटेल. त्यामुळे तुमचे पैसे ही खर्च होणार नाही आणि आरोग्य ही चांगले राहील.
  • पूर्वीच्या काळी लंच बॉक्स रंगबिरंगी नसायचे. फक्त स्टीलचा रंग मिळायचा. पण आता इन्सुलेटेड लंच बॉक्स तुम्हाला अनेक प्रकारचे डिझाइन्स, ऍनिमेटेड, कार्टून इमेजेस तसेच काही ट्रेंडी डिझाइन मिळतात.
  • इन्सुलेटेड लंच बॉक्स हे पोर्टेबल तसेच खूप कार्यक्षम असतात.
  • सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे इन्सुलेटेड लंच बॉक्स हे हवाबंद म्हणजे एअर टाइट व लिकप्रूफ असतात. तुम्ही कितीही पातळ पदार्थ जरी त्यात ठेवला तरीही इन्सुलेटेड लंच बॉक्स मधून गळती होत नाही.
  • तसेच, इन्सुलेटेड लंच बॉक्स हे डिश वॉशर तसेच मायक्रोवेव्ह सेफ असतात.
  • तसेच यात वापरले जाणारे स्टेनलेस स्टील हे फूड ग्रेड मटेरियल चे असतात.
  • इन्सुलेटेड लंच बॉक्सचे कवर बॅग पण खूप आकर्षक डिझाइन मध्ये बनवलेले असतात. त्यांची पट्टा(स्क्रॅप) पण आपल्या हाइट नुसार ऍडजस्ट करता येते. शिवाय या लंच बॉक्स ला कॅरी करण्यासाठी हँडल पण दिले जाते.

सर्वात चांगले इन्सुलेटेड लंच बॉक्स

आता भारतातील सर्वात चांगले इन्सुलेटेड लंच बॉक्स कोणते आहेत ते जाणून घेऊ या

Homecare Executive tiffin lunch Box

होम केअर लंच बॉक्स (Homecare Executive tiffin/lunch Box)

मित्रांनो, तुम्हाला जर बाहेरच्या ठिकाणी घरच्या गरमा गरम जेवणाचा आनंद घ्यायचा असेल तर तुमच्याकडे होम केअरचा हा व्हॅक्यूम इन्सुलेटेड लंच बॉक्स असायलाच हवा. हा लंच बॉक्स एक फंक्शनल लंच बॉक्स असून यात तुम्हाला तीन प्रकारचे कंटेनर मिळतात. तीन पैकी दोन कंटेनर हे 320 ml चे आहेत व एक कंटेनर 550 ml चे आहे. या लंच बॉक्स मध्ये तुमचे जेवण सहा तास पर्यंत गरम व ताजे राहते. तसेच जर तुम्ही एखादा थंड पदार्थ या लंच बॉक्स मध्ये ठेवला तर तो 9 तास पर्यंत थंडच राहतो. हे तिन्ही कंटेनर पर्यावरण सुरक्षित म्हणजे बीपीए फ्री आहेत.



तसेच यात असलेल्या एक विशिष्ट प्रकारच्या यंत्रणेमुळे आतील गरम जेवण वाफेने ओले होत नाही. तसेच या लंच बॉक्स चा लुक एकदम ग्लॉसी दिसतो. म्हणजे या लंच बॉक्स ला रोझ गोल्ड फिनिशिंग दिली आहे. त्यामुळे दिसायला हा लंच बॉक्स खूप चांगला आहे. या लंच बॉक्स ची किंमत सांगायची झाली तर ती तुम्हाला अंदाजे 2615 रुपये च्या जवळ पास मिळू शकते.

Vaya Tyffyn Silver Copper-Finished Stainless Steel Lunch Box

वाया लंच बॉक्स (Vaya Tyffyn Copper-Finished Stainless Steel Lunch Box)

मित्रांनो, वाया चे प्रोडक्ट तुम्हाला ओव्हल शेप मध्ये मिळते. तसेच याची डिझाइन खुप वेगळी आणि छान आहे. याला खाली लॉक सिस्टीम दिली आहे. या इन्सुलेटेड लंच बॉक्स ची किंमत तुम्हाला 2590 रुपयेच्या जवळ पास मिळू शकते. तसेच या प्रोडक्ट वर तुम्हाला एक वर्षाची वॉरंटी मिळते. तसेच या लंच बॉक्स मध्ये तुम्हाला 300ml चे दोन कंटेनर मिळतात व 400 ml चे एक ओव्हल शेप कंटेनर मिळते. या लंच बॉक्स मध्ये जेवण 5 तास पर्यंत गरम किंवा थंड राहू शकते. तसेच या लंच बॉक्स मधल्या कंटेनर मध्ये तुम्हाला कम्पार्टमेंट सुद्धा बघायला मिळतील.

हा लंच बॉक्स तुम्हाला मॅट फिनिश मध्ये मिळतो. तसेच याची डिझाइन बेस्ट बनवली गेली आहे. या लंच बॉक्स चे झाकण ही लिकप्रूफ आहेत. तसेच एअर टाईट आहेत. हा लंच बॉक्स कॅरी करण्यासाठी तुम्हाला हँडल दिले आहे.

Milton Thermosteel Hot Meal Lunch Box

मिल्टन लंच बॉक्स (Milton Thermosteel Lunch Box)

मित्रांनो, मिल्टनच्या या लंच बॉक्समध्ये तुम्हाला तीन 300 ml चे कंटेनर मिळतात. तसेच याचे झाकण इन्सुलेटेड आहे व जाड दिले आहे. त्यामुळे बराच वेळ हे तुमचे जेवण गरम किंवा थंड ठेवू शकते. या लंच बॉक्समध्ये तुमचे जेवण 5 तास पर्यंत ताजे व गरम किंवा थंड राहते. याचे हँडल पण मोठे आणि जाड आहे. त्यामुळे हातावर प्रेशर येत नाही. या प्रोडक्ट वर तुम्हाला एक वर्षाची वॉरंटी मिळते व या लंच बॉक्स ची किंमत ही अंदाजे 1300 रुपये पर्यंत असू शकते.

VAYA TYFFYN Denim Copper-Finished Stainless Steel Lunch Box

वाया लंच बॉक्स (VAYA TYFFYN Denim Copper-Finished Stainless Steel Lunch Box)

मित्रांनो, या लंच बॉक्स ची खासियत म्हणजे यात तुम्हाला ओव्हल शेप चे कवर बॅग मिळते. याची किंमत ही अंदाजे 3980 रुपयेच्या जवळ-पास असू शकते. यात ही तुम्हाला 300 ml चव दोन व 400 ml चे एक असावं कंटेनर मिळते. तसेच या लूमच बॉक्स वर तुम्हाला एक वर्षाची वॉरंटी मिळते. यामध्ये ही कंटेनर मध्ये तुम्हाला कम्पार्टमेंट मिळतात. या लंच बॉक्स चे कवर बॅग खूप छान डिझाइन ची आहे. त्यामुळे याची किंमत जरा जास्त आहे.

Home Puff Double Wall Vacuum Insulated Stainless Steel Lunch Box

होम पफ लंच बॉक्स (Home Puff Double Wall Vacuum Insulated Lunch Box)

मित्रांनो, हा लंच बॉक्स तुम्हाला XL साईझ मध्ये मिळतो, म्हणजे तो बराच मोठा आहे. यात तुम्ही जास्त जेवण घेऊन जाऊ शकता. हा लंच बॉक्स तुम्हाला अंदाजे 3500 रूपये पर्यंत मिळतो. तसेच या लंच बॉक्स वर तुम्हाला एक वर्षाची वॉरंटी मिळते. या लंच बॉक्स मध्ये तुम्हाला 325 ml चे दोन कंटेनर मिळतात. 425 ml चे एक कंटेनर व 600 ml चे एक कंटेनर मिळते. म्हणून यामध्ये स्टोरेज कॅपॅसिटी खूप जास्त आहे. अजून एक गोष्ट म्हणजे याच्या बाहेरच्या कंटेनर मध्ये तुम्हाला डबल व्याक्यूम इन्सुलेशन दिले आहे. तसेच याचे झाकण ही खूप जाड व इन्सुलेटेड आहे. त्यामुळे या लंच बॉक्स मध्ये तुमचे जेवण जास्त तास गरम किंवा थंड राहते. याचे हँडल खूप टिकाऊ आहे तसेच या लंच बॉक्स मध्ये तुम्हाला ऍडजस्टेबल बकल मिळते. जे तुमच्या हाईट नुसार ऍडजस्ट करू शकता. मुलांच्या शाळेसाठी हा लंच बॉक्स तुम्ही वापरू शकत नाही कारण हा लंच बॉक्स खूप मोठा आणि जड आहे. याची डिझाइन पण खूप आकर्षक रित्या बनवली आहे.

इन्सुलेटेड लंच बॉक्स साफ व स्वच्छ ठेवण्यासाठी काही टिप्स

मित्रांनो, इन्सुलेटेड लंच बॉक्स स्वच्छ ठेवण्यासाठी त्याला साबणाच्या पाण्याने धुऊ शकता. तसेच धुवून झाल्यावर एका स्वच्छ कपड्याने त्याला पुसून सुकण्यासाठी हवेशीर ठिकाणी ठेवावे. जर या डब्यांतून अन्नाचा वास येत असेल तर तुम्ही ब्लिच किंवा बेकिंग सोडा पाण्यात एकत्र करून त्याने डबा स्वच्छ धुवून मऊ कपड्याने पुसून घ्या व नंतर हवेशीर सुकायला ठेवा. तसेच अतिरिक्त वास येऊ नये यासाठी तुम्ही अँटी बॅक्टेरिअल वाईप चा ही वापर करू शकता. तसेच लंच बॅग पण वेळोवेळी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही व्हाईट व्हिनेगर किंवा बेकिंग सोडा चा वापर करू शकता. लक्षात ठेवा जर तुम्हाला इन्सुलेटेड लंच बॉक्स जास्त दिवस टिकवायचे असतील तर त्यांना मेन्टेन करणं म्हणजे स्वच्छ ठेवणे खूप महत्त्वाचे आहे.

तर मित्रानो, अश्या प्रकारे आज आपण इन्सुलेटेड लंच बॉक्स बद्दल बरीचशी माहिती जाणून घेतली आहे. तसेच भारतातील काही बेस्ट इन्सुलेटेड लंच बॉक्स ही बघितले. आशा आहे की तुम्ही पण लंच बॉक्स घेताना इन्सुलेटेड लंच बॉक्स चा विचार नक्की कराल.

मित्रांनो, तुम्हाला हा लेख आवडला असल्यास किंवा महत्व पूर्ण वाटला असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!