भारतीय डायनोसॉर बद्दल सविस्तर माहिती
लहानपणापासून आपण ऐकत आणि पाहत आलोय ते अमेरिकेतले किंवा युरोपातले डायनोसॉर. पण कधी विचार केलात का की भारतीय उपखंडात देखिल डायनोसॉर सापडलेले आहेत याचा? कारण पुरातन काळी भारतीय उपद्विप हे अंटारक्टिका आणि आफ्रिका खंडाला जोडलेले होते जे नंतर वेगळे झाले, म्हणूनच मादगास्कर आणि भारतीय डायनोसोर जवळपास एकाच जातींचे आहेत.
तब्बल 33 जीवाष्म सापडलेत ज्यातील 7 मादगास्कर मध्ये असून 26 भारतातील आहेत. यातील 1983 साली सापडलेला राजासॉरस बराच प्रसिद्ध झाला (अज्ञात कारणासाठी 2003 हे वर्ष बऱ्याच ठिकाणी नमूद केलं गेलं आहे). गुजरात राज्यातील लॅमेटा फॉर्मेशन (नर्मदा व्हॅली) या भागात हा शोधला गेला. या डायनासोरचे मोजमाप 6.6 मीटर (22 फूट) ते 11 मीटर (36 फूट) असण्याची शक्यता आहे, आणि त्याच्या कपाळावर एकच शिंग होते जे कदाचित प्रदर्शन आणि हल्ला (करून डोके फोडण्यासाठी) वापरले जात असावे. इतर अबेलिसॉरिड्स प्रमाणे, राजासौरस हा कदाचित हल्ला करणारा शिकारी होता.
आता वळूया भारतीय संस्कृतीचा पाईक मानता येण्यासारख्या बारापासॉरसकडे. तब्बल 14-18 मीटर उंच आणि 7-9 टन वजन असलेला हा प्राणी चक्क शाहाकारी होता. याच्या सापडलेल्या जीवाष्मातील एक दात 5.8सेमी आहे, म्हणजे जवळपास अर्धा फूट!
इंडोसॉर – हा दक्षिण अमेरिकन डायनोसॉर कार्नोटोरसचा दूरचा नातेवाईक मानला जातो. 1933 मध्ये जबलपूर मध्ये मेटली आणि हयून यांनी याचा शोध लावला.
अल्वाल्केरिया – हा एक छोटासा डायनोसोर जो फक्त 1.6 फूट लांब आणि 2 किलोग्राम वजनाचा होता (म्हणजे टर्की पक्षाएवढाचं), जो संकर चॅटर्जी यांना 1987 मध्ये मॅलरी फॉर्मेशन (दक्षिण भारत) येथे सापडला.
मग आहे ब्रुहथकायोसॉरस हा एक विशाल सॉरोपॉड डायनासोर आहे; आतापर्यंत अस्तित्वात असलेला सर्वात मोठा डायनासोर होण्याची उमेदवारी धारण केलेला; अरली Maastrichtian कालखंडापासून, भारतातील लेट क्रेटेशियस कालखंडापर्यंत. 33 मीटर लांबी आणि 85 टन आकारासह, हा ज्ञात असलेल्या सर्वात मोठ्या प्राण्यांपैकी एक होता आणि आजपर्यंत सापडलेला दुसरा सर्वात मोठा डायनासोर होता.
1987 साली मेटली नामक ब्रिटिश जीवाष्मशास्त्रज्ञाला याचे अवशेष कल्लूमेडू फॉर्मेशन, तामिळनाडू येथे सापडले. या नंतर आहे तो म्हणजे दंडकासॉरस जो कोटा फॉर्मेशन, आंध्र प्रदेश येथे 1982 साली प्रथम सापडला जो 10 मीटर लांब आणि 2.5 टन वजनाचा असावा असा अंदाज आहे. याच्या बद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही.
2011 मध्ये तेलंगणाच्या उत्तरी मॅलरी फॉर्मेशन मध्ये जकलापल्लीसौरस सापडला, 2.5 मी लांब, 1.5 मी उंच आणि 250 किलोचा.
लॅम्पलघसौर ही १९६ ते १९० दशलक्ष वर्षांपूर्वीच्या भारतातील सायनेमुरियन-युगातील (प्रारंभिक ज्युरासिक) धर्मराम फॉर्मेशन मधील सॉरीशिअन डायनोसोरची एक प्रजाती आहे. जी 2007 मध्ये सापडली.
नंबलिया – ISI R273 नांबल गावाच्या उत्तरेकडील प्राणहिता-गोदावरी खोऱ्यातील अप्पर मलेरी फॉर्मेशनमधून शोधून काढण्यात आले. 2011 मध्ये फर्नांडो ई. नोव्हास, मार्टिन डी. इझकुरा, शंकर चॅटर्जी आणि टी. एस. कुट्टी यांनी प्रथम नाव दिले होते.