Clubhouse

क्लबहाउस अँप काय आहे ते कसे वापरावे: संपूर्ण माहिती | How to Use Clubhouse Marathi

अगदी अलीकडेच, क्लबहाउस (Clubhouse) या ऑडिओ सोशल मीडिया अँप खूप कमी वेळातच व्हायरल झाले. सध्या जर तुमच्याकडे याचे आमंत्रण असेल तरच तुम्ही हे अँप वापरू शकता पण काही दिवसातच हे सगळ्यांसाठी खुले केले जाईल.

तसे हे अँप वापरणे खूप सोपे आहे पण नवीन माणसाला गोंधळायला होते, पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये या अँप ची संपूर्ण माहिती दिली जाईल.



क्लबहाउस अँप काय आहे ते कसे वापरावे: संपूर्ण माहिती

क्लबहाउस अँपची संकल्पना काय आहे ?

Clubhouse App in Marathi: क्लबहाउस हे ऑडिओ सोशल मीडिया अँप म्हणजे तुम्ही क्लबहाउस वर क्लब/ग्रुप तयार करून एकमेकांशी बोलू शकता जसे तुम्ही व्हाट्सअँप वर ग्रुप व्हिडिओ कॉल करता तसेच येथे तुम्ही ऑडिओ कॉल करता. येथे तुम्ही व्हाट्सअँप सारखे ग्रुप/क्लब तयार करून एकमेकांशी बोलू शकता. क्लबहाउस मध्ये ग्रुपला क्लब बोलले जाते. तुम्ही स्वतःचे क्लब तयार करू शकता. फक्त यासाठी तुमचे १०० Followers असणे गरजेचे आहे.

क्लबहाउस अँप इन्स्टॉल कसे करायचे ?

How to install Clubhouse in Marathi:

क्लबहाउस अँप हे सुरुवातीला फक्त अँपलसाठी बनवले गेले होते पण याच वर्षी (२०२१) मे महिन्यात हे अँड्रॉइडसाठी हि उपलब्ध केले गेले आहे. तुम्ही गूगल प्ले स्टोअर किंवा अँपल स्टोअरवर जाऊन इन्स्टॉल करू शकता.

जेव्हा तुम्ही पहिल्यांदा अँप इन्स्टॉल करून ओपन करता तेव्हा तुम्हाला तुमचे Interests/आवड विचारले जातील. तुमच्या आवडीचे टॉपिक तुम्ही सिलेक्ट करू शकता याचा फायदा म्हणजे सुरुवातीला तुम्हाला तुमच्या आवडीनुसार क्लब दाखवले जातील.

नंतर तुम्हाला काही लोकांना Follow करायचे आहे. नंतर तुम्ही Unfollow हि करू शकता.



क्लबहाउस अँप इन्स्टॉल कसे करायचे ?

क्लबहाउस वर प्रोफाइल सेट अप करणे

Clubhouse Profile Set up Guide in Marathi

क्लबहाउस वर प्रोफाइल सेट अप करणे म्हणजे तुमची थोडक्यात माहिती देणे, जसे तुम्ही इंस्टाग्राम वर बायो लिहिता त्याप्रमाणे. बायो मध्ये तुम्ही तुमच्या आवडीनिवडी, छंद, नोकरी संदर्भात माहिती, शिक्षण असे काहीही टाकू शकता.

बायो नंतर तुम्ही तुमचे इंस्टाग्राम आणि ट्विटर क्लबहाउस लिंक करू शकता

नंतर प्रोफाइल मध्ये जाऊन प्रोफाइल फोटो सेट करू शकता

क्लबहाउस वर प्रोफाइल सेट अप करणे

क्लबहाउस चे होमपेज समजून घेऊ

Understand Clubhouse Homepage in Marathi

क्लबहाउस होमपेज वर सध्या चालू असणाऱ्या चर्चा दाखवतात. म्हणजेच सध्या क्लब मध्ये लोक ऑनलाईन एकमेकांशी चर्चा करत आहेत तुम्ही त्यावर क्लिक करून त्यांची चर्चा ऐकू शकता आणि चर्चा मध्ये भाग हि घेऊ शकता.

क्लबहाउस चर्चामध्ये भाग घेण्यासाठी तुम्हाला हात वर करावा लागतो म्हणजे त्या हात वर करणाऱ्या आयकॉन वर क्लिक करावा लागतो. नंतर ती Request मॉडरेटर कडे जाते आणि जेव्हा मॉडरेटर तुमची विनंती स्वीकारतो तेव्हा तुम्हाला त्या क्लब च्या चर्चेत बोलता येते.

क्लबहाउस चे होमपेज समजून घेऊ

क्लबहाउस वर ओळखीच्या लोकांना, क्लब शोधणे

How to Find friends & family members, clubs, and rooms on Clubhouse in Marathi

क्लबहाउस वर तुम्ही तुमच्या ओळखीच्या लोकांना किंवा तुमच्या आवडीचे क्लब शोधू शकता त्यासाठी सर्च बटण वर क्लिक करा आणि त्या व्यक्तीचे किंवा क्लब चे नाव टाकून सर्च करा.

क्लबहाउस वर ओळखीच्या लोकांना, क्लब शोधणे

या पोस्ट बद्दल काही प्रश्न असतील तर खालील कंमेंट मध्ये टाकू शकता, धन्यवाद…

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!