Voter ID

दोन मिनिटात | ऑनलाइन मतदार यादीत नाव शोधणे

आपण आपल्या आधीच्या आर्टिकल मध्ये पाहिलं की मतदान यादीमध्ये आपलं नाव कसं जोडावे. जर तुम्ही ही माहिती वाचली नसेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून ही माहिती वाचू शकता. मतदान ओळखपत्र: ऑनलाईन अर्ज, नोंदणी माहिती आता ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर किंवा आधी कधीही तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केली असेल आणि आता तुम्हाला तुमचे नाव मतदार यादीमध्ये शोधायचे असेल तर ते कसे शोधायचे? या बाबत आपण आज माहिती करून घेणार आहोत.

स्टेप 1: तर मतदार यादीत नाव शोधण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटवर जा – www.nvsp.in तुमच्यासमोर मुख्यपृष्ठ उघडेल



स्टेप 2: मुख्यपृष्ठावर तुम्हाला मतदार यादीत शोधा (Search in Electoral Roll) वर क्लिक करा

How to Search Name In Voter List Marathi Step 1

स्टेप 3: आता तुम्हाला एका नवीन पेजवर पोहचाल, या पेज वर तुम्ही दोन प्रकारे तुमचे नाव यादीत शोधू शकता

पद्धत 1: तुमची वैयक्तिक माहिती टाईप करून

  • तुम्ही आता ज्या पेज वर आहात electoralsearch.in त्या पेज वर असलेला (विवरण द्वारा खोज/Search by Details) या टॅब वर क्लिक करा
  • त्यानंतर, खाली असलेल्या फॉर्म मध्ये तुमची वैयक्तिक माहिती टाईप करा जसे, तुमचे नाव, वडिल/पती नाव, वय, वय/जन्मतारीख इत्यादी…
  • आता तुम्हाला (सर्च/Search) वर क्लिक करावे लागेल
  • फॉर्मच्या खाली रिजल्ट मध्ये तुमचे नाव दिसेल आणि View Details वर क्लिक करून तुम्ही पूर्ण माहिती पाहू शकता. आणि रिजल्टमध्ये नाव दिसले नाही तर समजून घ्यावे आणखी तुमचे नाव मतदार यादीमध्ये जोडले गेले नाही किंवा तुम्ही फॉर्म मध्ये चुकीची माहिती भरली आहे.
How to Search Name In Voter List Marathi Step 2

पद्धत 2: EPIC नंबर वापर करून

या पद्धतीमध्ये EPIC नंबर म्हणजेच मतदान कार्ड वर असलेला (Voter ID) चा वापर करून तुम्ही तुमचे नाव मतदार यादीत शोधू शकता

  • तुम्ही आता ज्या पेज वर आहात electoralsearch.in त्या पेज वर असलेला (पहचान-पत्र क्र. द्वारा खोज/Search by EPIC No.) या टॅब वर क्लिक करा
  • त्यानंतर, खाली असलेल्या फॉर्म मध्ये तुम्हाला तुमचा EPIC No. टाईप करायचा आहे आणि राज्य निवडायचे आहे
  • नंतर (सर्च/Search) वर क्लिक करा
  • काही सेकंडमध्ये, फॉर्मच्या खाली रिजल्ट मध्ये तुमचे नाव दिसेल आणि View Details वर क्लिक करून तुम्ही पूर्ण माहिती पाहू शकता. आणि रिजल्टमध्ये नाव दिसले नाही तर समजून घ्यावे आणखी तुमचे नाव मतदार यादीमध्ये जोडले गेले नाही किंवा तुम्ही फॉर्म मध्ये चुकीचा EPIC No. टाकला आहे
How to Search Name In Voter List Marathi

Tag: How to Search Name In Voter List Marathi, Voter ID Search by Name Marathi, मतदान यादीत नाव शोधणे २०२१, मतदार यादीत नाव शोधणे २०२१, यादी नाव शोधणे, How to find name in online Voter List Marathi, मतदार यादीत नाव कसे शोधायचे, मतदान यादीत नाव कसे शोधायचे

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!