कोविड लसीसाठी अपॉइंटमेंट रीशेड्यूल करणे, संपूर्ण प्रक्रिया वाचा
तुम्ही लसीसाठी अपॉइंटमेंट बुक केल्याच्या दिवसा आधी तुम्ही कधीही, ती रद्द किंवा रीशेड्यूल करू शकता. लसीकरणाच्या दिवशी तुम्हाला लस घेण्यासाठी जाणे बंधनकारक असते. आपण या ब्लॉग मध्ये लस अपॉइंटमेंट रद्द किंवा रीशेड्यूल कशी करतात ते बघणार आहोत.
स्टेप 1: तुम्ही आधी ज्या खात्यावरून लस बुक केले आहे, ते खाते तुम्हाला लॉग इन करायचे आहे. त्यासाठी, कोविन वेबसाइटला भेट द्या www.cowin.gov.in.
नंतर Register/Sign वर क्लिक करा
स्टेप 2: तुमचा मोबाईल नंबर टाका, आणि Get OTP वर क्लिक करा. मोबाइल वर आलेला ओटीपी टाईप करा आणि Verify बटन वर क्लिक करा.
स्टेप 3: आता तुम्ही Account Details पेज वर पोहचाल. इथे तुम्हाला तुम्ही बुक केलेल्या लसीची माहिती दिसेल.
लसीसाठीची अपॉइंटमेंट रीशेड्यूल करणे
आता आपण बघू लसीसाठीची अपॉइंटमेंट पुढे/मागे (रीशेड्यूल) कशी करायची.
स्टेप 4: सर्वात प्रथम Dose 1/Dose 2 समोर असलेल्या Reschedule बटन वर क्लिक करा.
स्टेप 5: तुम्ही Book Appointment for Vaccination पेज वर पोहचाल.
तुमच्या गावात जर आरोग्य केंद्र असेल तर गावचा पिन कोड टाका, किंवा जवळच्या गाव, शहर, तालुका, जिल्हाचा पिन कोड टाका.
स्टेप 6: आत्ता तुमच्या समोर लसीकरण केंद्रांची यादी येईल, आणि त्या केंद्रामध्ये किती स्लॉट (जागा) शिल्लक आहे तेही दिसेल. तुमच्या वेळेनुसार, वयानुसार आणि मोकळ्या स्लॉटनुसार केंद्र निवडा आणि क्लिक करा.
स्टेप 7: आता तुम्हाला Appointment Confirmation चे पेज दिसेल, तुम्ही तुमच्या सोईनुसार वेळ निवडा आणि Confirm बटन दाबा.
स्टेप 8: आता नवीन पेज वर लस बुक झाल्याचा मेसेज येईल आणि Download बटन वर क्लिक करून तुम्ही तुमची स्लिप डाउनलोड करू शकता. हि स्लिप लस घेताना, केंद्रावर दाखवावी लागेल आणि त्याबरोबर तुमचे फोटो आयडी हि दाखवावे लागेल.
लसीसाठीची अपॉइंटमेंट रद्द करणे
आता आपण बघू लसीसाठीची अपॉइंटमेंट रद्द कशी करायची
Dose 1/Dose 2 समोर असलेल्या X बटन वर क्लिक करून तुम्ही लसीसाठीची अपॉइंटमेंट रद्द करू शकता.
जर तुम्हाला कोविड लसीचे सर्टिफिकेट डाउनलोड कारण्यासंबंधी माहिती पाहिजे असेल तर हि पोस्ट वाचा – कोविड लसीचे सर्टिफिकेट डाउनलोड कसे करायचे