ATM मशीनमध्ये पैसे कसे जमा करावे ? How to Deposit Cash at ATM Machine Marathi
नमस्कार मित्रांनो या पोस्टमध्ये आपण ATM मशीनचा वापर करून बँक अकाउंट मध्ये पैसे कसे जमा करायचे ते बघणार आहोत. बहुतेक लोक त्यांच्या किंवा दुसऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यासाठी बँकेत जाणे पसंत करतात. पण बँकेत जाऊन पैसे भरण्यासाठी खूप मोठी रांग असते हे तुम्हाला सांगायची गरज नाही आणि खास करून जर ती बँक SBI असेल तर विचारूच नका २ ते ३ तास रांगेतच निघून जातात. जर तुम्ही बँकेत न जात ATM Deposit मशीन मध्ये गेलात तर तुमचा टाइम वाचू शकतो आणि काही मिनिटात बँक अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर होतील.
जर तुम्ही आधी कधी Cash Deposit Machine वापरली नसेल तर काळजी करू नका या पोस्ट मध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत मशीन बद्दल माहिती देणार आहे. सर्वात आधी ATM मशीन आणि Cash Deposit Machine यातला फरक समजून घेऊ. ATM मधून आपण पैसे काढता आणि Cash Deposit Machine मध्ये आपण पैसे जमा करता. दोन्ही मशीन दिसायला एकसारख्या असतात आणि कधी कधी ATM मशीन पण Cash Deposit Machine चे काम करते. कॅश मशीन ओळखण्याची सोपी पद्धत म्हणजे पैसे जमा करण्यासाठी या मशीनमध्ये एक स्लॉट असतो. सर्व मोठ्या भारतीय बँक आपल्याला हि सुविधा देते जसे SBI, HDFC, Axis Bank, ICICI Bank आणि Bank Of Maharashtra.
ATM मशीनमध्ये पैसे कसे जमा करावे ?
स्टेप 1: सर्वात आधी आपले ATM कार्ड मशीन मध्ये टाका. आत्ता तुम्हाला भाषा निवडायची आहे आपण English निवडू
स्टेप 2: आत्ता १० ते ९९ मधला कोणताही नंबर टाकून Yes बटण वर क्लिक करा
स्टेप 3: पिन टाईप करा
स्टेप 4: Banking बटण वर क्लिक करा
स्टेप 5: Deposit बटण वर क्लिक करा
स्टेप 6: Cash Deposit बटण वर क्लिक करा
स्टेप 7: नवीन स्क्रीनवर तुम्हाला पैसे जमा करण्याची मर्यादा सांगितली जाईल, Continue बटण वर क्लिक करा
स्टेप 8: आत्ता तुमच्या अकाउंट चा प्रकार निवडा ( Current / Savings )
स्टेप 9: नवीन स्क्रीनवर सूचना दिली जाईल कि तुम्ही फक्त १००, २००, ५००, आणि २००० च्या नोटा जमा करू शकता.
आत्ता पैसे जमा करण्यासाठी असलेला स्लॉट उघडेल, त्यामध्ये तुम्ही पैसे टाका आणि Enter बटण वर क्लिक करा
स्टेप 10: आत्ता मशीन तुम्ही टाकलेल्या पैशाची तपासणी करेल आणि स्क्रीनवर वर तुम्ही जमा केलेले पैसे दाखवेल. एकदा खात्री करून घ्या आणि Confirm बटण वर क्लिक करा.
(कधी कधी फाटलेली किंवा खराब झालेली नोट तुम्ही टाकली असेल तर मशीन ती बाजूला काढते आणि स्लॉट उघडला जातो आत्ता तुम्ही ती नोट काढू शकता किंवा दुसरी नोट टाकू शकता, नंतर Enter बटण वर क्लिक करा)
यानंतर आपले पैसे आपल्या खात्यात जमा होतील आणि आपल्याला मशीनकडून पावती मिळेल, जर आपले कार्ड मशीनमध्ये असेल तर आपण आता ते काढू शकता.
बँकेमध्ये पैशे भरण्यासाठी लाईन न लावता काही मिनिटात तुम्ही ATM मशीनचा वापर करून बँक अकाउंट मध्ये पैसे कसे जमा करू शकता. हि सुविधा खूप वर्षांपासून सुरु आहे पण लोकांनां माहिती नसल्यामुळे याचा वापर कमी होत आहे. तुम्ही या मशीन चा वापर करून कोणाच्याही अकाउंट वर पैसे पाठवू शकता यासाठी तुमच्यकडे त्या व्यक्तीचा अकाउंट नंबर आणि IFSC कोड असणे गरजेचे आहे.
जर या पोस्ट बद्दल तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर खाली कंमेंट करू शकता. धन्यवाद !