Loan

नावी अँप वरून लोन कसे घ्यायचे: तसेच फायदे, तोटे, वैशिष्ट्ये | How to apply for Navi loan?

नमस्कार मित्रानो, आमच्या आजच्या या नावीन लेखात आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नेहमी प्रमाणे आज ही आम्ही तुमच्यासाठी काही नावीन व उपयोगी माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो, आज आपण नावी (Navi) अँप काय आहे, नावी अँप वरून लोनसाठी कसे अप्लाय करायचे, नावी अँप वरून लोन घेतले तर फायदे, तोटे काय आहेत. याबद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेऊ या.

How to apply for Navi loan in Marathi

मित्रांनो, प्रत्येक माणसाला कधी न कधी तरी पैश्यांच्या अडचणीला सामोरे जावे लागते. मग अश्या वेळी आपण आपल्या नातेवाईक किंवा मित्रां कडे पैसे उधार मागतो. पण आजकाल कोणाकडे पैसे मागितले तर लोक काहीतरी कारण सांगून नाही म्हणतात. मग अश्या वेळेस आपण निराश होतो आणि काय करावे ते सुचत नाही. पण मित्रांनो, तुम्हाला जर कधी पैश्यांची गरज पडली तर कोणाकडे मागायची गरज नाही, कारण आता तुम्ही नावी अँप द्वारे पर्सनल लोन किंवा होम लोन मिळवू शकता. आणि हे लोन चे पैसे ही तुम्ही लगेच तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर करू शकता. तर मित्रांनो, पैश्यांची गरज असणाऱ्या व लोन घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी हा लेख खूप महत्व पूर्ण ठरणार आहे. त्यामुळे आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.



सर्वात पहिले नावी लोन अँप (Navi Loan App) म्हणजे नेमकं काय आहे ते जाणून घेऊ या…

मित्रांनो, नावी लोन अँप हे एक असे ऍप्लिकेशन आहे ज्याच्या मार्फत तुम्ही घरबसल्या होम लोन किंवा पर्सनल लोन घेऊ शकता. आणि या अँपची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही घेतलेल्या लोन ची अमाउंट तुमच्या बँक खात्यात लगेच जमा होते. याचे मूळ नाव नावी फिनसर्व्ह प्रायव्हेट लिमिटेड असे असून ही कंपनी NBFC द्वारे नोंदणीकृत आहे. तसेच याला RBI ची सुद्धा मान्यता मिळाली आहे. नावी लोन अँप द्वारे तुम्ही 5 लाख पर्यंत पर्सनल लोन आणि 1.5 कोटी पर्यंत होम लोन घेऊ शकता.

नावी पर्सनल लोन अँप ची वैशिष्ट्ये:-

  • मित्रांनो, या अँप द्वारे तुम्हाला रू 20 लाख पर्यंत लोन मिळू शकते.
  • या लोनचा इंटरेस्ट रेट म्हणजेच व्याजदर हा 9.9% पासून सुरू होते ते 45% प्रतिवर्षी इतका असू शकतो. (मित्रांनो, अंतिम व्याजदर हे अर्जदाराचे वय, त्याचे मासिक उत्पन्न, त्याचा जॉब प्रोफाइल, त्याचा क्रेडिट स्कोअर, कर्ज परतफेड करण्याचे रेकॉर्ड इत्यादी गोष्टीं वर अवलंबून असते)
  • तसेच कर्जाचा कालावधी हा 3 ते 72 महिने म्हणजे 6 वर्षांपर्यंत असतो.
  • नावी लोन ची संपूर्ण प्रक्रिया ही डिजिटल पद्धतीने होते.
  • तसेच लोनची अमाउंट त्वरित तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाते.

मित्रांनो, नावी पर्सनल लोन कसे कार्य करते ते आपण एका उदाहरणा द्वारे समजून घेऊ या…

मित्रांनो, समजा तुम्ही घेतलेल्या कर्जाची रक्कम ही रू 50,000 आहे. आणि या कर्जाचा कालावधी 12 महिन्याचा आहे.

  • या कर्जावरचा व्याज दर – 22% इतका आहे. आणि तुमचा EMI – रू 4,680 इतका बसेल.
  • एकूण देय व्याज – रू 4,680 x 12 महिने – रू 50,000 (मुद्दल) = रू 6,160
  • प्रोसेसिंग फी म्हणजे प्रक्रिया शुल्क (जीएसटीसह) – रू 1,475 इतकी आकारली जाईल.
  • तुम्हाला बँकेत वितरित होणारी एकूण रक्कम – रू 50,000 – रू 1,475 = रू 48, 525
  • आता इथे तुमची एकूण देय रक्कम – रू 4,680 x 12 महिने = रू 56,160 इतकी होईल.
  • कर्जाची एकूण किंमत = व्याजाची रक्कम + प्रक्रिया शुल्क = रू 6,160 + रू 1,475 = रू 7,635

नावी होम लोनची वैशिष्ट्ये:-

  • मित्रांनो, नावीन अँपद्वारे तुम्ही 5 कोटी पर्यंत होम लोन म्हणजेच गृह कर्ज मिळवू शकता.
  • घेतलेल्या कर्जावर 8.75% प्रतिवर्ष पासून व्याजदर आकारला जातो.
  • तसेच कर्जाचा कालावधी हा 30 वर्षे पर्यंत असू शकतो.
  • या कर्जासाठी प्रोसेसिंग फी ही शून्य आहे. तसेच या कर्जासाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे पेपरलेस आहे.

नावी अँप वरून कर्ज कसे घ्यायचे

आता आपण नावी अँप वरून कर्ज कसे घ्यायचे त्याची पूर्ण प्रोसेस जाणून घेऊ या:-



स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला प्ले स्टोअर वरून Navi अँप डाउनलोड करून घ्यायचे आहे.

Navi अँप डाउनलोड साठी लिंक => 5 लाखापर्यंत झटपट लोन पूर्णपणे पेपरलेस/ऑनलाईन प्रक्रिया

स्टेप 2: आता अँपच्या होम पेज वर तुम्हाला cash loan असे लिहिलेले दिसेल. त्या खाली दिलेल्या Apply Now या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे किंवा login ऑपशन वर क्लिक करायचे आहे.

How to apply for Navi loan Step 1

स्टेप 3: आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे व खाली दिलेल्या Get OTP या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. व थोड्याच वेळात तुमच्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो दिलेल्या जागी टाकून व्हेरिफाय करून घ्यायचा आहे.

How to apply for Navi loan Step 2

स्टेप 4: आता नेक्स्ट पेज वर खाली Get Started या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. नंतर अँप तुम्हाला काही परमिशन्स मागेल त्या allow करायच्या आहेत.

How to apply for Navi loan Step 3

स्टेप 5: आता नेक्स्ट पेज वर काही Basic Details टाकायच्या आहेत. जसे की तुमचे नाव (पॅन कार्ड प्रमाणे), त्या नंतर तुमची जन्म तारीख, व नंतर तुमचा पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. आता Next बटन वर क्लिक करायचे आहे.

How to apply for Navi loan Step 4

स्टेप 6: आता तुम्हाला Work details मध्ये तुमचे Employment type निवडायचे आहे. म्हणजे तुम्ही Salaried आहात की Self employed आहात की Others ते सिलेक्ट करायचे आहे. व खाली तुमचे मंथली इन्कम टाकायचे आहे. व शेवटी Next बटन वर क्लिक करायचे आहे.

How to apply for Navi loan Step 5

स्टेप 7: मित्रांनो, आता अँप तुम्हाला परत काही परमिशन्स मागेल त्या Agree करायच्या आहेत.

स्टेप 8: आता परत तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो दिलेल्या जागी टाकून व्हेरिफाय करून घ्यायचा आहे.

How to apply for Navi loan Step 6

स्टेप 9: मित्रांनो, आता तुम्हाला तुमचे Bank Details विचारले जातील. यात तुम्हाला तुमचे ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेचे नाव टाकायचे आहे. मित्रांनो, इथे तुमची बँक अकाउंट व्हेरिफाय करण्यासाठी त्याचे नेट बँकिंग किंवा इंटरनेट बँकिंग असणे गरजेचे आहे. आता तुम्हाला तुमचे बँक अकाउंट व्हेरिफाय करण्यासाठी नेट बँकिंगसाठीचे युझरनेम व पासवर्ड टाकून व्हेरिफाय करून घ्यायचे आहे. व तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वर परत एक ओटीपी येईल तो टाकून व्हेरिफाय करून घ्यायचा आहे.

How to apply for Navi loan Step 7

स्टेप 10: मित्रांनो, आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला तुमचे Loan Details दिसतील. यात तुम्हाला किती लोन अमाउंट मिळू शकते व त्याचा कालावधी, व ईमआय लिहिलेला दिसेल. इथे तुम्ही EMI Plan निवडू शकता.

मित्रांनो अश्या प्रकारे तुम्ही नावी अँप द्वारे लोन साठी अप्लाय करू शकता.

नावी लोन तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर कसे करायचे

आता लोन तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर कसे करायचे ते जाणून घेऊ या…

मित्रांनो, लोन बँक खात्यात ट्रान्सफर कसे करावे ते आपण एका उदाहरण द्वारे समजून घेऊ या. समजा तुम्हाला रू 1,90,000 चे लोन अप्रुव्ह झाले आहे. तर तुम्ही या लोन अमाउंट मध्ये चेंजेस ही करू शकता. फक्त 1,90,000 पेक्षा जास्त लोन तुम्हाला मिळणार नाही. म्हणजे इथे कमीत कमी रू 10,000 पासून ते रू 1,90,000 पर्यंत तुम्ही कितीही लोन घेऊ शकता.

हे लोन परतफेड करण्यासाठी तुम्हाला 36 महिन्यांचा कालावधी दिला जाईल. व त्यासाठी तुमचा EMI हा रू 8,811 इतका असेल. जर तुम्हाला हा कालावधी कमी करायचा असेल तर तुम्ही Custom या ऑप्शन वर क्लिक करून कालावधी टाकायचा आहे.

How to apply for Navi loan Step 8

आता तुम्हाला EMI Date सुद्धा दिली जाईल. म्हणजे तुमचा EMI कधी डिडक्ट होईल त्याची तारीख सांगितली जाते. ही तारीख तुम्हाला चेंज करायची असेल तर Change ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही तुमच्या सोयीनुसार ईमआय तारीख चेंज ही करू शकता.

मित्रांनो, आता तुम्हाला लोन डिटेल्स चेक करून घ्यायचे आहे. म्हणजे

इथे Net Loan Amount – ₹ 1,90,000 इतकी आहे.
त्या नंतर घेतलेल्या लोन अमाउंट वर Processing Fee – रू 7,499
तसेच GST: रू 1,349 वजा होऊन उरलेली रक्कम रू 1,81,151 तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाईल.

How to apply for Navi loan Step 9

मित्रांनो, ही रक्कम बँक खात्यात ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या Continue ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. व नंतर तुम्हाला तुमचा आधार ओटीपी व्हेरिफाय करावा लागेल. त्या नंतर परत एकदा तुमचे बँक डिटेल्स व्हेरिफाय करावे लागतील. त्यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेचा अकाउंट नंबर व IFSC कोड टाकून Continue बटन वर क्लिक करायचे आहे.

आता तुम्हाला सेल्फ प्रूफ मागितले जाईल , तर इथे तुम्हाला तुमचा सेल्फी फोटो घेऊन अपलोड करावा लागेल. आता तुम्हाला e -mandate ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. म्हणजे तुमचा ईमआई तुमच्या बँक अकाउंट मधून ऑटोमॅटिकली डेबिट होईल. व नंतर Continue बटन वर क्लिक केल्या नंतर तुमची लोन अमाउंट आता तुमच्या बँक खात्यात सकसेसफुली ट्रान्सफर होऊन जाईल.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे तुम्ही नावी अँप द्वारे लोन घेऊन त्वरित तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर करू शकता.

FAQ

नावी अँप वरून लोन घेण्यासाठी पात्रता काय असावी?

मित्रांनो, नावी अँप वरून लोन घेण्यासाठी तुम्ही भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे. कारण हे अँप फक्त भारतीय नागरिकांना लोन देते. तसेच तुमचे वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असेल तरच तुम्हाला नावी अँप कर्ज देते.

नावी अँप वरून लोन घेण्यासाठी कोण कोणती कागदपत्रे लागतात?

मित्रांनो, नावी अँप वरून कर्ज घेण्यासाठी खूपच कमी कागदपत्रे लागतात. यात दोन्ही प्रकारचे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचे बँकेचे डिटेल्स व तुमचा सेल्फी फोटो एवढयाच गोष्टी लागतात. आणि महत्वाचे म्हणजे पर्सनल लोन घेण्यासाठी तुम्हाला सॅलरी स्लिप किंवा बँक स्टेटमेंट ची आवश्यकता नसते. तसेच कोणत्याही प्रकारचे तारण ठेवण्याची ही गरज नसते.

नावी अँप वरून कोण कोणती प्रकारचे कर्ज मिळते?

मित्रांनो, नावी अँप वरून तुम्ही पर्सनल लोन किंवा होम लोन घेऊ शकता.

नावी अँप वरून किती पर्सनल लोन घेऊ शकतो?

मित्रांनो, नावी अँप वरून तुम्ही 10,000 ते 5 लाख पर्यंत पर्सनल लोन घेऊ शकता.

नावी अँप वरून घेतलेले लोन बँक खात्यात जमा होण्यासाठी किती वेळ लागतो?

मित्रांनो, एकदा का तुम्ही प्रोसेस पूर्ण केली की लोन तुमच्या बँक खात्यात त्वरित जमा केले जाते.

महत्वाची टीप – मित्रांनो, नावी सम्पूर्ण भारत भर लोन देत नाही. फक्त काही ठराविक मोठया शहरातच लोन देते. त्यामुळे तुम्ही ज्या भागात राहता त्या भागात तुम्हाला लोन मिळेल की नाही ते तुम्ही Navi App मध्ये तपासून घेऊ शकता.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण नावी अँप वरून त्वरित लोन कसे मिळवू शकतो ते जाणून घेतले. मित्रांनो, आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तसेच हा लेख जर तुम्हाला महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र मंडळीं सोबत नक्की शेअर करा. व अश्याच नवं नावीन गोष्टीं बद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला भेट देत रहा. धन्यवाद

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!