मतदान कार्ड हरवलं/खराब झालं असे काढा मोबाईल ॲप मधून | डुप्लीकेट मतदान कार्ड तयार करणे
भारतात मतदान कार्ड हे निवडणूक आयोगाने दिलेले मतदार ओळखपत्र म्हणून ओळखल जाते. याचा बऱ्याच ठिकाणी पत्त्याचा पुरावा किंवा वयाचा पुरावा म्हणून पण वापरता येते. पण जर आपले मतदान कार्ड हरवल्यास किंवा खराब झाल्यास काय करावे हे अनेक जणांना माहित नसते. तर या लेखात आपण मोबाईल ॲपद्वारे हरवलं/खराब झालेले मतदान कार्ड कसे काढायचं आणि त्यासाठी काय प्रोसेस आहे हे पाहूया.
स्टेप 1: सर्वात पहिले Play Store जायचं आहे, आणि तिथे सर्च मध्ये Voter Helpline सर्च करायचं आहे. Voter Helpline सर्च केल्या नंतर Voter Helpline Beta हे अप्लिकेशन दिसेल. हे अप्लिकेशन डाऊनलोड करायचं आणि नंतर Install करायचं आहे. Install झाल्यानंतर हे अप्लिकेशन Open करायचं आहे.
अप्लिकेशन Open केल्यानंतर काय करायचं आहे ते लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने Process करा.
स्टेप 2: अप्लिकेशन Open झाल्यावर Disclaimer च पेज दिसेल, पेजच्या खाली I Agree वर टिक करायचं आहे आणि नंतर Next बटन वर क्लिक करायचं आहे.
स्टेप 3: त्या नंतर Choose Language चा पर्याय येईल त्यात Hindi / English भाषा असेल, English समोरील बटन वर टिक करा. नंतर Get Started बटन वर क्लिक करून पुढे जा.
स्टेप 4: नंतर जे पेज दिसेल त्यात डाव्याबाजूला कोपऱ्यात असलेले Explore बटन क्लिक करा.
स्टेप 5: आता थोड खाली स्क्रोल करून Issue of Replacement Elector’s Photo identity Card ( EPIC) या पर्यायावर क्लिक करा.
स्टेप 6: आता Lets Start बटन वर क्लिक करा.
स्टेप 7: आता स्क्रीनवर असलेल्या बॉक्स मध्ये मोबाईल नंबर टाका, आणि SEND OTP बटन वर क्लिक करा. OTP आल्यानंतर खाली OTP बॉक्स मध्ये तो टाईप करा.
स्टेप 8: नवीन पेज वर Do You Already Have Voter Id Number अस विचारलं जाईल. जर तुमच्याकडे मतदान कार्डचा नंबर असेल तर Yes वर क्लिक करा. आणि Next बटन वर क्लिक करा.
नोट – जर तुम्हाला मतदान कार्डचा नंबर माहिती नसेल तर No वर क्लिक करा, आणि आता नवीन पेज वर तुमची वैयक्तिक माहिती भरून तुम्ही मतदान कार्डचा नंबर शोधू शकता.
स्टेप 9: नंतर तुम्हाला तुमचा मतदान कार्डचा नंबर टाईप करायचा आहे, आणि Fetch Details बटन वर क्लिक करायचे आहे. इथे थोडा वेळ लागेल, त्यामुळे घाई करू नका. तुमचा मतदान कार्डचा नंबर बरोबर असेल तर मेसेज दिसेल We Have Found This Record for Your Enter Voter Id. Please Click on Proceed Button त्यानंतर Proceed बटन वर क्लिक करा.
नोट – जर तुम्हाला वरचा मेसेज दिसला नाही तर समजून घ्या, तुम्ही चुकीचा मतदान कार्ड नंबर टाकला आहे.
स्टेप 10: Proceed बटन वर क्लिक केल्यानंतर नवीन पेज वर तुमची वैयक्तिक माहिती दिसेल ती एकदा तपासून घ्या, जसे की VOTER ID No , Name, Gender, Parent / Spouse, Assembly Constituency, Parliament, District, State, Part No, Part Name, Serial Number. वरील माहिती बरोबर असेल तर Next बटन वर क्लिक करा.
स्टेप 11: आता नवीन पेज वर तुम्हाला तुमचा पत्ता आणि काही बेसिक माहिती टाईप करायची आहे, जसे की House No, Street / Area / Locality, Street / Area / Locality ( in Regional), Town / Village, Police Station, Pin Code. नंतर Next बटन वर क्लिक करा.
स्टेप 12: आता तुम्हाला डुप्लीकेट मतदान कार्ड काढण्यामागचे कारण विचारले जाईल – तिथे असे कारण लिहायचे आहे. ( I Lost My Voter Id Card So I Need New One ) कारण लिहून झाल्यावर तुम्हाला तुम्ही जन्मतारीख टाकायची आहे. आणि ई-मेल टाकून Next बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 13: त्या नंतर तुम्हाला ( Choose Option to Collect Voter Id Card ) हा पर्याय दिसेल. म्हणजे तुम्हाला मतदान कार्ड कुठून घ्यायचं आहे ( Collect करायचं आहे ).
- Option 1 – I Will Collect Voter ID From VRC/CSC
- Option 2 – I Will to Receive My Vote ID Card by Post
- Option 3 – I Will Collect Voter From BLO
तर लक्षात ठेवा नेहमी तिसरा पर्याय निवडा, कारण पहिल्या दोन पर्यायायाने मतदान कार्ड सहसा मिळत नाही. त्यामुळे नेहमी ( Option 3 – I Will Collect Voter From BLO ) हा पर्याय निवडायचा आहे, आणि Next बटन वर क्लिक करा.
नोट – जेव्हा तुमचे कार्ड तयार होईल तेव्हा तहसील कार्यालयात जावून तुम्हाला कार्ड घ्यायचं आहे.
स्टेप 14: त्यानंतर तुम्हाला तुमचे नाव आणि ठिकाण टाकायचं आहे आणि नंतर Next बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 15: Next केल्यानंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती एकदा दाखवली जाईल ती एकदा पाहून घ्या. त्यानंतर तुम्हाला Confirm बटन वर क्लिक करायचं आहे. Confirm बटन वर क्लिक केल्यानंतर आपला हा फॉर्म जमा होतो आणि फॉर्म जमा झाल्यानंतर Thank You चा मेसेज दिसेल.
Thank You च्या मेसेज खाली तुम्हाला Reference Number दिसेल. या Reference Number चा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे. हा स्क्रीनशॉट आणि ओळखपत्र घेवून तुम्हाला तुमच्या तहसील (BLO) कार्यालयात जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुमच्या कागदपत्रांची तपासणी होईल. आणि त्यानंतर तुम्हाला नवीन मतदान कार्ड दिले जाईल.
नोट – कार्ड तयार झाल्यानंतर तुम्हाला मोबाइल वर मेसेज येईल, साधारण १५ ते ३० दिवसात मतदान कार्ड तयार होते.
अश्या प्रकारे कार्ड हरवलं किंवा खराब झाले असल्यास या पद्धतीने तुम्ही तुमचे मतदान कार्ड ऑनलाईन काढू शकता.