AirtelBSNLJioMobile HelpVi

तुमच्या नावावर किती SIM Card आहेत चेक करा ?

सिम कार्ड म्हणजे Subscriber Identity Module. ज्याला शॉर्ट मध्ये सिम कार्ड असे म्हणतात. मोबाईल मध्ये सिम कार्ड नसेल तर कॉल, मेसेज आणि इंटरनेट वापरू शकत नाही. सिम कार्ड हे मोबाईलचे हार्ट आहे. या सिम कार्ड मध्ये आपले ठिकाण फोन नंबर नेटवर्क माहिती वैयक्तिक माहिती इत्यादी अनेक गोष्टी समाविष्ट असतात.

मित्रांनो भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने एक नवीन पोर्टल लॉन्च केला आहे. त्या पोर्टलच्या माध्यमातून आपण स्वतःच्या नावावर किती सिम कार्ड रजिस्टर आहेत ते चेक करू शकतो आणि जर आपल्या नावावर एकापेक्षा जास्त सिमकार्ड असतील आणि ते जर आपण वापरत नसू तर ते सिम कार्ड कसे बंद करायचे, हे आपण या लेखात पाहणार आहोत.



भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने एक पोर्टल सुरू केला आहे.त्या पोर्टलवरून आपल्या नावावर किती सिम कार्ड आहेत, ते कळते

स्टेप 1: ब्राउझर उघडून https://tafcop.dgtelecom.gov.in ही लिंक उखडा. या वेब पोर्टल द्वारे व्यक्तीच्या नावावर किती सिम कार्ड आहेत ही माहिती आपणास मिळू शकते. तुमच्या आयडी कार्ड आधारे दुसरा कोणी व्यक्ती बनावट सिम कार्ड वापरत असेल, तर तो नंबर या पोर्टलवरून ब्लॉक करू शकतात.

पण हो एका आयडी प्रूफ च्या आधारे जास्तीत जास्त 9 सिम कार्ड आपण वापरू शकतो.

स्टेप 2: या विभागाच्या या पोर्टलवर आल्यावर यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम आपला चालू मोबाईल नंबर टाकायचा आहे. नंतर Request OTP बटन वर क्लिक करायचे आहे.

How many SIM cards are registered in your name

स्टेप 3: चालू मोबाईल नंबर टाकल्यावर तुम्हाला तुमच्या आत्ताच मोबाईल वर एक ओटीपी येईल, तो ओटीपी बॉक्स मध्ये टाकून Validate बटन वर क्लिक करायचे आहे. जर मोबाइल वर OTP येत नसेल तर Resend OTP लिंक वर क्लिक करा.



How many SIM cards are registered in your name

स्टेप 4: आता Validate वर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या आयडी प्रूफ वर जे मोबाईल नंबर चालू आहेत, त्यांची यादी दिसेल. जर तुम्ही वापरत असलेल्या नंबर शिवाय आणखी नंबर दिसत असतील, जे तुम्ही वापरत नाही किंवा तुमचे नाहीत, तर ते तुम्ही सिमकार्ड बंद करू शकता.

How many SIM cards are registered in your name

सिमकार्ड बंद करण्यासाठी

तुमच्या समोर जी यादी आहे, त्या यादीमधले सिमकार्ड तुमच्ये नसेल, ते तुम्हाला बंद करायचे असेल तर, तुम्ही पहिला ऑप्शन निवडा (This is not my number) म्हणजे हा सिमकार्ड माझ नाही. नंतर स्टेप 5 वाचा.

वापरत नसलेले सिमकार्ड बंद करा

तुमच्या समोर जी यादी आहे, त्यातील जे सिमकार्ड तुम्ही वापरत नसाल किंवा भविष्यात पण वापरणार नसाल, अशा वेळेस दुसरा ऑप्शन निवडा (Not Required). नंतर स्टेप 5 वाचा.

स्टेप 5: आता वरती असलेल्या बॉक्स मध्ये तुमचे नाव टाका, किंवा काही वेळेस तुमचे नाव आपोआप बॉक्स मध्ये येईल. त्यानंतर खाली रिपोर्ट या बटन वर क्लिक करा.

रिपोर्ट ऑप्शन वर क्लिक केल्यावर एक रेफरन्स नंबर तुम्हाला दिसेल. तो रेफरन्स नंबर कुठेतरी लिहून ठेवा किंवा मोबाईल मध्ये सेव करा किंवा फोटो काढून ठेवा.

How many SIM cards are registered in your name

हि पोस्ट तुम्ही बुकमार्क करून ठेवा, किंवा Whatsapp वर पाठवून ठेवा, कारण थोड्या दिसानंतर तुम्हाला तुमच्या रिपोर्टचा स्टेटस चेक करायचा आहे. त्यासाठी खालची स्टेप वाचा.

e-SIM (ई-सिम) म्हणजेच व्हर्च्युअल सिम कार्ड विषयी माहिती वाचा emarathi.in वेबसाईट वर

नंतर काही दिवसांनी तुम्ही केलेल्या रिपोर्ट ची माहिती बघण्यासाठी, परत या वेब पोर्टल वर येऊन लॉगिन करा. म्हणजे स्टेप 1 सारखे. नंतर तुम्हाला तुमचा रिपोर्ट ट्रॅक करण्यासाठी तुमचा Ticket ID Ref No. वरती असलेल्या बॉक्स मध्ये टाका. नंतर तुमच्यासमोर तुमच्या रिपोर्ट चा स्टेटस उघडेल.

How many SIM cards are registered in your name

तर अशाप्रकारे न वापरलेले सिमकार्ड, तुम्ही न घेतलेले सिमकार्ड या पोर्टलच्या माध्यमातून बंद करू शकता. आणि तुम्हाला तुमच्या नावावर किती सिम कार्ड चालू आहेत हे सुद्धा कळू शकते.

Tag: How to find out how many SIM cards are registered in your name, Mazy Navavar Kiti Sim Card ahet, Mazy Aadhar Card var kiti sim ahe check, Check how many Sim register on my Name, Check how many Sim register on my Aadhar Card, Vaparat naslele sim band kara, Nako aslele Sim card band kara, Vaparat nasele Sim card band kara

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!