Bank Statement

HDFC बँक स्टेटमेंट ऑनलाइन चेक/ डाउनलोड करा (2 मिनिटात) | HDFC Bank Statement

मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात बँकिंगशी संबंधित काम करणे सोपे नाही तर खूप किफायतशीर ही झाले आहे. कोणतेही काम करण्यासाठी आता आपल्याला बँकेत वारंवार जाण्याची गरज पडत नाही. फक्त मोबाईल किंवा लॅपटॉपच्या मदतीने आपण घरबसल्या बँकेशी संबंधित कोणतेही काम करू शकतो. अगदी बँकेचे स्टेटमेंट सुद्धा आपण घर बसल्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने काढू शकतो. इतर बँका प्रमाणेच HDFC बँक सुद्धा आपल्याला ही सुविधा प्रदान करते.

HDFC Bank Statement Check Ani Download Kase Karayche

मित्रांनो, भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वोच्च बँकांपैकी एक बँक म्हणजे एचडीएफसी बँक ( HDFC Bank). HDFC बँक आपल्या ग्राहकांना 24 तास बँकिंग सुविधा पुरवते. तसेच डिजिटल बँकिंगच्या मदतीने, एचडीएफसी बँकेचे ग्राहक त्यांचे बँक खाते स्वतः तयार देखील करू शकतात. खातेदार बँकेची शिल्लक माहिती, मिनी स्टेटमेंट, डिटेल स्टेटमेंट, मनी ट्रान्सफर आणि इतर सेवा देखील मिळवू शकता.



त्यामुळे तुम्हीही जर एचडीएफसी बँकेचे खातेधारक असाल आणि तुम्हालाही घरबसल्या स्टेटमेंट मिळवायचे असेल तर आमचा हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा या लेखात आम्ही तुम्हाला बँक स्टेटमेंट काढण्याच्या सहा सर्वात सोप्या पद्धती बद्दल माहिती देणार आहोत.

इंटरनेट बँकिंग द्वारे HDFC बँक स्टेटमेंट मिळवणे

मित्रांनो, इंटरनेट बँकिंग द्वारे एचडीएफसी बँक खात्याचे स्टेटमेंट ऑनलाइन मिळविण्यासाठी, खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा

स्टेप 1: सर्वप्रथम तुम्हाला एचडीएफसी बँकेच्या अधिकृत वेबसाइट hdfcbank.com वर जायचे आहे. त्यानंतर Login या बटन वर क्लिक करायचे आणि नंतर Netbanking ऑपशन वर क्लिक करायचे आहे.

HDFC Internet Banking Bank Statement Download Step 1

स्टेप 2: आता तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून इंटरनेट बँकिंग मध्ये लॉग इन करायचे आहे.

HDFC Internet Banking Bank Statement Download Step 2

स्टेप 3: लॉगिन केल्यानंतर, तुम्हाला Enquire या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर A/c Statement – Current & Previous Month या ऑप्शन वर क्लिक करा. जर तुम्हाला स्टेटमेंट डाउनलोड करायचे असेल तर A/c Statement – Upto 5 years या ऑपशन वर क्लिक करायचे आहे.



HDFC Internet Banking Bank Statement Download Step 3

स्टेप 4: यानंतर तुम्हाला तुमचे खाते निवडायचे आहे. तुम्हाला मिनी स्टेटमेंट हवे आहे किंवा तारखेपासूनचे डिटेल स्टेटमेंट मिळवायचे आहे, त्या स्टेटमेंटचा प्रकार निवडा. या नंतर, फॉर्म आणि टू मध्ये, तुम्हाला स्टेटमेंट कधी प्राप्त करायचे आहे याची तारीख निवडायची आहे आणि खाली, All Transactions निवडून View या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 5: या नंतर लगेच तुमचे HDFC बँक खाते स्टेटमेंट दिसेल. हे स्टेटमेंट तुम्ही पीडीएफ स्वरूपात देखील डाउनलोड करू शकता.

HDFC Internet Banking Bank Statement Download Step 4

मोबाईल बँकिंग द्वारे HDFC बँकेचे स्टेटमेंट कसे मिळवायचे?

मित्रांनो, तुम्हाला जर घर बसल्या मोबाईल द्वारे एचडीएफसी बँक स्टेटमेंट काढायचे असेल तर यासाठी तुम्ही खाली दिलेल्या सर्व स्टेप्स फॉलो करा…

स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या मोबाइल फोन मध्ये गुगल प्ले स्टोअर वरून HDFC मोबाइल बँकिंग ऍप डाउनलोड करून घ्यायचे आहे.

HDFC Mobile Banking Bank Statement Download Step 1

स्टेप 2: व नंतर लॉग इन करायचे आहे.

HDFC Mobile Banking Bank Statement Download Step 2

स्टेप 3: त्या नंतर सेव्हिंग अकाउंट समोरील ऍरो वर क्लीक करायचे आहे.

HDFC Mobile Banking Bank Statement Download Step 3

स्टेप 4: आता तुम्हाला Statement ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायचे आहे.

HDFC Mobile Banking Bank Statement Download Step 4

स्टेप 5: व नंतर रिक्वेस्ट स्टेटमेंट या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

HDFC Mobile Banking Bank Statement Download Step 5

स्टेप 6: त्या नंतर तुम्हाला स्टेटमेंट किती महिन्यांसाठी हवं आहे, याचा कालावधी निवडायचा आहे आणि फॉरमॅट, PDF किंवा इतर ऑप्शन निवडून Confirm या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

HDFC Mobile Banking Bank Statement Download Step 6

स्टेप 7: यानंतर, तुमचे HDFC बँक खाते स्टेटमेंट तुमच्या समोर ओपन होईल.

HDFC Mobile Banking Bank Statement Download Step 7

HDFC बँक स्टेटमेंट SMS द्वारे कसे मिळवायचे?

मित्रांनो, एसएमएस द्वारे एचडीएफसी बँक स्टेटमेंट मिळवण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या मेसेज बॉक्स मध्ये जायचे आहे. त्यानंतर 5676712 या क्रमांकावर txn असे लिहून बँक खात्याशी रजिस्टर असलेल्या मोबाइल नंबर वरून एसएमएस पाठवायचा आहे.

यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्याचे मिनी स्टेटमेंट मिळेल. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या बँक खात्याचे स्टेटमेंट एसएमएस द्वारे मिळवू शकता.

मिस्ड कॉल द्वारे HDFC बँक स्टेटमेंट कसे मिळवायचे?

मित्रांनो, एचडीएफसी बँक खाते स्टेटमेंट मिळवण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे मिस्ड कॉल द्वारे स्टेटमेंट मिळवणे. या पद्धती द्वारे कोणत्याही स्मार्टफोन किंवा इंटरनेट कनेक्शन शिवाय तुम्ही तुमचे बँक स्टेटमेंट चेक करू शकता.

त्यासाठी तुम्हाला तुमच्या बँक खात्याला रजिस्टर असलेल्या मोबाइल नंबर वरून 1800-270-3355 या नंबर वर मिस्ड कॉल द्यायचा आहे. त्या नंतर, तुमच्या बँक खात्याशी जोडलेल्या मोबाइल नंबर वर एक एसएमएस पाठवला जाईल ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या शेवटच्या तीन व्यवहारांची माहिती दिसेल. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या HDFC बँक खात्याचे स्टेटमेंट एसएमएस द्वारे देखील मिळवू शकता.

बँकेच्या शाखेत जाऊन स्टेटमेंट कसे मिळवायचे?

मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या HDFC बँक खात्याचे स्टेटमेंट मिळवायचे असेल तर तुम्ही तुमच्या बँक शाखेत जाऊन तुमचे बँक स्टेटमेंट मिळवू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन संबंधित बँक कर्मचाऱ्याला बँक स्टेटमेंट घेण्यासाठी अर्ज लिहुन द्यायचा आहे. त्यानंतर संबंधित बँक कर्मचारी तुम्हाला तुमच्या बँक खात्याचे स्टेटमेंट देईल. अशा प्रकारे तुम्ही बँकेच्या शाखेत जाऊन तुमचे बँक खाते स्टेटमेंट मिळवू शकता.

ATM मधून बँक स्टेटमेंट कसे काढायचे?

मित्रांनो, आता तुम्ही एटीएम द्वारे तुमच्या एचडीएफसी बँकेचे मिनी स्टेटमेंट देखील काढू शकता, यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.

स्टेप 1: सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या जवळच्या एटीएम मध्ये जायचे आहे.

स्टेप 2: यानंतर तुम्हाला तुमचे एटीएम कार्ड एटीएम मशीन मध्ये टाकून स्वाईप करायचे आहे व त्या नंतर तुम्हाला भाषा निवडायची आहे.

स्टेप 3: आता मेन मेन्यू ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. व त्या नंतर Get a Mini Statement या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 4: यानंतर तुम्हाला तुमच्या खात्याचा प्रकार म्हणजे सेव्हिंग किंवा करंट पैकी एक ऑप्शन निवडायचा आहे.

स्टेप 5: आता तुम्हाला तुमचा एटीएम पिन टाकायचा आहे. व त्या नंतर तुमच्या बँक खात्याचे मिनी स्टेटमेंट तुमच्या समोर प्रिंट होऊन येईल.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण HDFC बँक खाते स्टेटमेंट मिळवण्याचे 6 सोपे मार्ग किंवा पद्धती सांगितल्या आहेत. मी आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.

Tags: HDFC Bank Statement Download Kase Karayche, HDFC Bank Statement Download in Marathi, HDFC Statement Download in Marathi, HDFC Bank Statement Check Kase Karayche, HDFC Bank Statement Kase Baghayche, HDFC Bank Statement Kase tapasayche, HDFC Bank Statement Check in Marathi, HDFC Bank Statement Kadhane, HDFC Bank Statement PDF Download Kashi Karaychi, HDFC Bank Statement PDF Download Marathi, HDFC Bank Statement Mahiti, HDFC Bank Statement Info in Marathi

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!