केस प्रत्यारोपण (Hair Transplant): म्हणजे काय, खर्च किती येतो?, प्रकार, फायदे व नुकसान
- हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे काय?
- हेअर ट्रान्सप्लांट करण्याच्या पद्धती
- हेअर ट्रान्सप्लांट करण्यासाठी कोण पात्र आहेत?
- हेअर ट्रान्सप्लांट करण्यासाठी खर्च किती येतो?
- हेअर ट्रान्सप्लांट प्रक्रिया वेदनादायक आहे का?
- हेअर ट्रान्सप्लांट नंतर नवीन केस यायला किती दिवस लागतात?
- हेअर ट्रान्सप्लांट करण्याचे फायदे व तोटे
नमस्कार मित्रांनो, आज आपण हेअर ट्रान्सप्लांट (Hair Transplant) म्हणजेच केस प्रत्यारोपण बद्दल माहिती बघणार आहोत. यात आपण हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते, हेअर ट्रान्सप्लांट साठी कोण कोणत्या टेक्निक वापरल्या जातात, हेअर ट्रान्सप्लांट चे फायदे व नुकसान, त्यासाठी येणारा खर्च किती व हेअर ट्रान्सप्लांट ची प्रोसेस वेदनादायक असते का, या अश्या सर्व गोष्टी बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, केस ही एक अशी गोष्ट आहे जी स्त्री असो वा पुरुष प्रत्येकाच्या जीवनातील खूप महत्वाचा एक भाग आहे. आणि आपले केस हे आपल्या जीवनात खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. केसांमुळेच आपले सौंदर्य अजूनच खुलून दिसत असते. स्त्रिया केसांसोबत वेगवेगळी स्टाइल करणे, कलर करणे किंवा केसांच्या लांबी कमी जास्त करणे अश्या गोष्टी नेहमी आवडीने किंवा ट्रेंड आहे म्हणून करत असतात. तर पुरुषांमध्ये केस आत्मविश्वास आणि तरुनपणाची अनुभूती देत असतात. परंतु हेच सुंदर केस जर कमी होऊ लागले तर…? मित्रांनो, अकाली टक्कल पडणे यामुळे दुर्दैवाने, माणसाच्या मनात एक विशिष्ट प्रकारचा कॉम्प्लेक्स येतो आणि माणसाचा आत्मविश्वास कमी होतो. यामुळे, माणसाच्या व्यावसायिक, सामाजिक आणि कौटुंबिक जीवनात कमीपणा असल्याची भावना निर्माण होते.
खरंतर ही केस गळती कोणत्याही कारणामुळे होऊ शकते. जसे की बदलती जीवनशैली, शरीरातील हार्मोन्सचे असंतुलन, वाढता ताणतणाव, प्रदूषण, अयोग्य आहार अशा विविध कारणांमुळे आजकाल केस गळतीची समस्या वाढते आहे. या वर उपाय म्हणून अनेक लोक विविध कंपनी चे तेल, मेडिसीन्स घेतात. पण त्याने हवा तसा फरक पडत नाही. पम मित्रांनो, आता केस गळती वर किंवा टक्कल पडण्यावर एक प्रभावी उपाय आहे, तो म्हणजे केस प्रत्यारोपण म्हणजेच हेअर ट्रान्सप्लांट (Hair Transplant). पण मित्रांनो, हेअर ट्रान्सप्लांट करण्याआधी हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे काय, ते कसे केले जाते, ते कोणी करावे आणि कोणी करू नये, त्याचे विविध प्रकार कोणते आहेत, हेअर ट्रान्सप्लांट चे फायदे नुकसान काय आहेत या सर्व गोष्टी बद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. तरच तुमची हेअर ट्रान्सप्लांट प्रक्रिया पूर्ण पणे यशस्वी होईल. त्या साठीच आम्ही आजचा हा लेख घेऊन आलो आहोत. त्यामुळे तुम्हाला ही जर हेअर ट्रान्सप्लांट बद्दल सविस्तर जाणून घ्यायचे असेल तर आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा…
सर्वात आधी केस प्रत्यारोपण म्हणजेच हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे काय, ते जाणून घेऊ या:
हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे काय?
मित्रांनो, केस प्रत्यारोपण किंवा हेअर ट्रान्सप्लांट ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यात रुग्णाच्या डोक्यावर ज्या भागात केसांची घनता जास्त आहे त्या भागातून केसांचे फॉलिकल्स (बीज) घेतले जातात आणि जिथे कमी केस आहेत किंवा जिथे टक्कल आहे त्या जागी या केसांचे प्रत्यारोपण म्हणजेच ट्रान्सप्लांट केले जाते. केसांची जास्त घनता शक्यतो डोक्याच्या मागच्या बाजूस किंवा डोक्याच्या कडेच्या बाजूस जास्त असते. त्यामुळे केसांचे फॉलिकल्स या जागेतून घेतले जातात. मित्रांनो, हेअर ट्रान्सप्लांट ची पूर्ण प्रक्रिया ही एखाद्या प्लास्टिक सर्जन किंवा कॉस्मेटिक सर्जन कडून केली जाते. बहुतेक वेळा केसांची अति प्रमाणात गळती झाल्याने टक्कल पडतो.
याची कारणे ही भिन्न असू शकतात. जसे की आहार, ताण तणाव, प्रदूषण, एखादा आजार, हार्मोन्स चे असंतुलन किंवा औषधे इत्यादी. परंतु या सर्व समस्यांवर उपचार करण्यासाठी प्रभावी उपाय म्हणजे हेअर ट्रान्सप्लांट किंवा ज्याला आपण केस प्रत्यारोपण असे म्हणतो. ही प्रक्रिया पुरुष किंवा महिला कोणीही करू शकतो. पण त्यातल्या त्यात पुरुषांना टक्कल पडण्याची जास्त समस्या असते, त्यामुळे बहुतेक पुरुष हेअर ट्रान्सप्लांट करण्याची प्रक्रिया अवलंबतात.
मित्रांनो, केस प्रत्यारोपण केल्यानंतर बऱ्याच पुरुषांना किंवा महिलांना असे आढळून येते की त्यांचा स्वाभिमान, आत्मविश्वास आणि आरोग्य पुन्हा पूर्वी सारखे झाले आहे. त्यामुळे आजकाल प्रत्येक व्यक्ती हेअर ट्रान्सप्लांट या प्रक्रियेला सकारात्मक दृष्टिने बघतो आहे. तसं पाहिलं तर एखाद्या प्रशिक्षित आणि पात्र सर्जनने केस प्रत्यारोपण प्रक्रिया केली पाहिजे. ही शस्त्रक्रिया केली जात असताना तुम्हाला वेदना होऊ नये यासाठी प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी तुम्हाला सामान्य भूल दिली जाते.
मित्रांनो, केस प्रत्यारोपणाच्या दोन पद्धती जास्त प्रचलित आहेत. त्या दोन पद्धती म्हणजे फॉलिक्युलर युनिट एक्सिजन म्हणजेच FUE आणि फॉलिक्युलर युनिट ट्रान्सप्लांटेशन म्हणजेच FUT. या दोन्ही FUE आणि FUT पद्धती म्हणजे काय असतं आणि त्या मधील फरक काय आहे ते आपण पुढे बघणारच आहोत.
Different Types of Hair Transplants
हेअर ट्रान्सप्लांट करण्याच्या पद्धती:
मित्रांनो, केस प्रत्यारोपण करण्याच्या साधारणपणे दोन पद्धतीने आहेत. दोन्ही पद्धती बद्दल सविस्तरपणे जाणून घेऊ या:
FUE म्हणजे फॉलिक्युलर युनिट एक्सट्रॅक्शन
मित्रांनो, FUE या पद्धतीत रुग्णाच्या डोक्यातील केसांची घनता जास्त असलेल्या भागातून म्हणजेच डोनर भागातून एक एक केसांचे फॉलिकल्स (बीज) काढतात आणि मग ज्या भागात टक्कल आहे त्या भागात ब्लेड किंवा सुई च्या साहाय्याने छोटे छोटे छिद्र करतात आणि त्यात केसांचे हे एक एक फॉलिकल हळुवारपणे लावले जातात. एकावेळी अनेक फॉलिकल्स लावले जातात. आणि पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर काही दिवस डोक्याला मलमपट्टी केली जाते.हि पद्धत खूप प्रभावी आणि गॅरेंटेड रिझल्ट देणारी आहे. तसेच या पद्धतीमध्ये वेदना पण कमी होतात.
मित्रांनो FUE केस प्रत्यारोपण साधारण करण्यासाठी चार ते पाच तास किंवा त्याहून अधिक वेळ लागू शकतो. हा वेळ पूर्ण पणे तुम्हाला किती प्रमाणात केस प्रत्यारोपण करायचे आहेत त्यावर अवलंबून असते. सुरुवातीला डोनर भागातून केस काढले जातात त्याला साधारण दोन ते अडीच तास लागतात. आणि नंतर जिथे टक्कल आहे त्या भागात केस प्रत्यारोपण करण्यासाठी दोन ते अडीच तास लागतात पण टक्कल असलेला भाग कमी कसेल तर पूर्ण प्रत्यारोपण दोन ते तीन तासात होऊ शकते. आणि हि पद्धत कमी वेदना देणारी आहे. प्रत्यारोपण झाल्यावर तुम्ही पुढच्या एका तासात घरी जाऊ शकता.
FUT Hair Transplants Information
FUT म्हणजे फोलिक्युलर युनिट ट्रान्सप्लांटेशन
मित्रांनो, या प्रक्रियेत रुग्णाच्या डोक्याच्या मागच्या भागातून म्हणजे ज्या भागात काही इंच लांब केसांची चांगली वाढ असेल, अश्या भागातून त्वचेची एक पट्टी कापली जाते. व ती जागा नंतर शिवली जाते. त्या नंतर टाळूच्या काढलेल्या या भागाला दोन भागांमध्ये वेगळे केले जाते, म्हणजेच त्याचे लहान लहान तुकडे केले जातात. आणि हे फॉलिक्युलर युनिट ग्राफ्ट्स नंतर टक्कल पडलेल्या भगत प्रत्यारोपित केले जातात. ही प्रक्रिया काही डाग मागे ठेवते, परंतु वेगवेगळ्या कॉस्मेटिक उपचारांच्या वापराने त्याची दृश्यमानता कमी केली जाऊ शकते. त्यानंतर अडीच ते तीन महिन्यांत, तिथे नवीन केस वाढू लागतात.
मित्रांनो, केस प्रत्यारोपण करण्यासाठी चार तास किंवा त्याहून अधिक वेळ लागू शकतो. तसेच टाके विरघळणारे नसतील तर शस्त्रक्रिया झाल्या नंतर सुमारे 10 दिवसांनी तुमचे टाके काढले जातात. तसेच तुम्हाला हवे असलेले केस प्रत्यारोपण पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तीन किंवा चार तास लागू शकतात. आणि प्रत्येक प्रत्यारोपणाला पूर्णपणे बरे होण्यासाठी अनेक महिन्यांच्या अंतराने ही सत्रे होतात.
Who is eligible for a Hair Transplant?
हेअर ट्रान्सप्लांट करण्यासाठी कोण पात्र आहेत?
मित्रांनो, केस प्रत्यारोपण करणाऱ्या व्यक्तीची तब्येत चांगली असणे गरजेचे आहे. तसेच त्याच्या केसांचे फॉलिकल्स (थोडक्यात डोनर भागात जास्त केस) सुद्धा चांगल्या कंडिशन मध्ये असणे आवश्यक आहे. जेणे करून केस प्रत्यारोपण झाल्यानंतर ते निरोगी राहू शकतील. याशिवाय ही प्रक्रिया अश्या पुरुषांसाठी योग्य आहे ज्यांना Male Pattern Baldness (पुरुषांच्या पुढच्या भागातील केस कमी होणे) आहे आणि ज्यांचे केस औषधाने किंवा वयोमानानुसार नैसर्गिक रित्या गळाले आहेत. याशिवाय ज्या स्त्री किंवा पुरुषांचे केस जळाल्यामुळे, किंवा एखाद्या आघाताने गळत असतील तर अश्या स्त्रियांसाठी व पुरुषांसाठी केस प्रत्यारोपण प्रक्रिया करणे योग्य आहे. आणि महत्वाचे म्हणजे व्यक्तीचे वय हे 28 वर्षांपेक्षा जास्त असेल तर चांगले असते.
Male Pattern Baldness / टक्कल पडण्याची कारणे:
मित्रांनो, Male Pattern Baldness चे महत्वाचे कारण आनुवंशिकता किंवा टक्कल पडण्याची फॅमिली हिस्ट्री असणे असू शकते. परंतु, केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की Male Pattern Baldness हे पुरुष सेक्स हॉर्मोन्स एंड्रोजेन शी संबंधित आहे. एन्ड्रोजन हॉर्मोन मध्ये केसांच्या वाढीचे कार्य करण्या सोबतच अनेक कार्ये करत असतात. खरतर आपल्या डोक्यावरील प्रत्येक केसाची एक ग्रोथ सायकल असते. Male Pattern Baldness मुळे ही ग्रोथ सायकल हळूहळू कमकुवत होऊ लागते. आणि केसांचे फॉलिकल्स कमीकमी होत जातात. ज्यामुळे केसांचे लहान आणि कमकुवत पट्टे तयार होतात. आणि नंतर कालांतराने केसांची ग्रोथ सायकल थांबते आणि त्या जागी टक्कल पडते व त्या जागी पुन्हा नवीन केस उगवत नाहीत.
तसे पाहिले तर Male Pattern Baldness चे काही दुष्परिणाम नाहीत. पण टक्कल पडण्याची कारणे काही प्रमाणात गंभीर असू शकतात. जसे की, कॅन्सर, मेडिसीन्स, थायरॉईड कंडिशन्स, ऍनाबॉलीक स्टिरॉइड्स, रॅशेस, लालसरपणा, वेदना, स्काल्प सोलणे, किंवा केस तुटणे वगैरे… याशिवाय तुम्हाला जर नवीन औषधे घेतल्यानंतर किंवा जर तुम्हाला आरोग्याच्या काही तक्रारीमुळे केस गळती होत असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टर ला भेटू शकता. तसेच केस गळतीसाठी कोणती गोष्ट जबाबदार आहे त्या जबाबदार असलेल्या विकाराचे निदान करण्यासाठी त्वचेची बायोप्सी आणि ब्लड टेस्ट करणे देखील आवश्यक असू शकते.
What is the Hair Transplant Cost in Maharashtra
हेअर ट्रान्सप्लांट करण्यासाठी खर्च किती येतो?
मित्रांनो, केस प्रत्यारोपण करण्याची किंमत ही अनेक घटकांवर अवलंबून असते. जसे की प्रत्यारोपण चे क्षेत्रफळ, ग्राफ्ट्स (त्वचेच्या पट्ट्या ज्यात निरोगी केसांचे कलाम किंवा बीज असते) ची संख्या, जितके जास्त ग्राफ्ट्स लागतील तितके अधिक पैसे लागतील. तसेच ग्राफ्ट्स जास्त असतील तर जास्त सत्रांची गरज भासेल व आपोआप च किंमत ही वाढेल. याशिवाय सर्जनची व इतर कर्मचाऱ्यांची फी, मेडिकल इक्विपमेंट फी, हेअर ट्रान्सप्लांट साठी कोणती टेक्निक वापरतो म्हणजे FUE की FUT त्यावर देखील किंमत ठरते. याशिवाय तुमचे केस गळण्याचे प्रमाण किती आहे, तुमचे वय काय आहे, तुमच्या केसांचा रंग, तुमच्या केसांचा प्रकार आणि तुमचे लिंग यानुसार केस प्रत्यारोपणाची किंमत अनेक घटकांनुसार बदलते. शेवटी काय तर प्रत्येकाचे केस वेगवेगळे असल्याने हेअर ट्रान्सप्लांट सर्जनशी सल्लामसलत करूनच तुम्हाला किंमतीचा अचूक अंदाज कळू शकेल.
पण साधारण किंमत सांगायची झाली तर कमी टक्कल असेल तर साधारण खर्च साधारण 20,000 आणि जास्त असेल तर खर्च 30,000 पासून सुरु होतो ते 1 लाखापर्यंत जाऊ शकते. तसेच तुम्ही कोणत्या डॉक्टर आणि कोणत्या हॉस्पिटल मध्ये केस प्रत्यारोपण करून घेता त्यावर हि खर्च अवलंबून असतो.
Hair Transplant Side Effects
हेअर ट्रान्सप्लांट पासून होणारे दुष्परिणाम:
मित्रांनो, केस प्रत्यारोपण चे अनेक सामान्य दुष्परिणाम असतात. पण ते शक्यतो किरकोळ असतात आणि काही आठवड्यात कमी होतात. जसे की…
- केस प्रत्यारोपण प्रक्रिये नंतर सूज येणे अगदी सामान्य गोष्ट असू शकते. आणि हे सहसा काही दिवसांपेक्षा जास्त काळ टिकत नाही. नंतर कमी होऊन जाते.
- केस प्रत्यारोपण झाल्या नंतर दिसून येणारा आणखी एक सामान्य दुष्परिणाम म्हणजे खाज येणे. खरंतर खाज येणे हे बरे होण्याचा एक नैसर्गिक प्रतिसाद आहे आणि ते रिकव्हरी प्रोसेस चांगली होत आहे हे दर्शवते. पण तरी तुम्हाला टाळूला खाज येत असेल तर तुम्ही तिथे खाजवणे टाळले पाहिजे.
- काही परिस्थितीत रक्तस्राव होणे किमवा फॉलिकल्स मध्ये संक्रमण देखील होऊ शकते.
- केस प्रत्यारोपण झाल्या नंतर बऱ्याच वेळा त्याचे डाग तसेच राहतात. FUE टेक्निक मध्ये तुम्हाला हे डाग जास्त दिसून येत नाहीत. पण FUT टेक्निक मध्ये बऱ्याच वेळा स्काल्प च्या मागच्या बाजूला एक रेशीय डाग दिसू शकतो. हे डाग नंतर नैसर्गिक रित्या कमी होण्यास सुरूवात होते. या शिवाय नवीन केसांची वाढ देखील डाग लपवण्यास मदत करते. काही लोक हे डाग लपविण्यासाठी वैद्यकीय टॅटू देखील करतात. असे असले तरी FUT शस्त्रक्रिया झाल्या नंतर डाग लपविण्यासाठी तुम्ही लांब केश रचना ठेवू शकता.
Is Hair Transplant Process Painful?
हेअर ट्रान्सप्लांट प्रक्रिया वेदनादायक आहे का?
मित्रांनो, हेअर ट्रान्सप्लांट करणे म्हणजे ही एक प्रकारची शस्त्रक्रियाच आहे. आणि कोणतीही शस्त्रक्रिया वेदना रहित नसते. फक्त त्याचे प्रमाण कमी जास्त असते. त्यामुळे केस प्रत्यारोपण प्रक्रिया सुद्धा थोड्याफार प्रमाणात वेदना दायक असते. परंतु रुग्णाला जास्त त्रास होऊ नये यासाठी टाळूला भूल दिली जाते. त्यामुळे रुग्णाला कोणतीही अस्वस्थता जाणवत नाही. आणि जर तरीही रुग्णाला अस्वस्थ वाटत असेल तर डॉक्टर काही औषधे देतात. तसेच केस प्रत्यारोपण प्रक्रिये दरम्यान रुग्णाचे मन या प्रक्रिये पासून दूर राहण्यासाठी अनेक उपाय केले जातात, जसे की टीव्ही पाहणे, संगीत ऐकणे वगैरे… तसेच केस प्रत्यारोपण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही रुग्णाने पुरेसा आराम करणे गरजेचे आहे. याशिवाय शस्त्रक्रिया झाल्यानंतर टाळूला जर सूज येत असेल तर डॉक्टर ही काही औषधे लिहून देतात व संसर्ग होऊ नये म्हणून अँटिबायोटिक ही घेण्यास सांगू शकतात. एकंदरीत काय तर केस प्रत्यारोपण प्रक्रिया थोडीफार वेदनादायक असू शकते पण औषधांच्या मदतीने वेदना कमी करता येऊ शकतात.
How Long It Takes For Hair To Grow After Hair Transplant
हेअर ट्रान्सप्लांट नंतर नवीन केस यायला किती दिवस लागतात?
मित्रांनो, केस प्रत्यारोपण प्रक्रिया झाल्यानंतर विचारला जाणारा एक सामान्य प्रश्न म्हणजे, ‘नवीन केस वाढण्यास किती वेळ लागेल?’ मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे की प्रक्रियेनंतर तुमचे केस लगेच वाढणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला थोडा धीर धरावा लागेल आणि प्रक्रियेनंतर तुमच्या सर्जनच्या सल्ल्याचे तुम्हाला काळजी पूर्वक पालन करावे लागेल.
- केस प्रत्यारोपण प्रक्रिया झाल्या नंतरचे पहिले 5 किंवा काही दिवस केसांची वाढ होत नसते. तर या दिवसात ते केस म्हणजेच फॉलिकल्स टिकून राहणे महत्वाचे आहे. त्यासाठी नवीन फॉलिकल्स चे संरक्षण करणे महत्वाचे आहे. आणि प्रक्रिया झाल्यानंतर काही दिवस टाळूला स्पर्श करणे टाळावे.
- दोन ते तीन आठवडे ते तीन महिन्यात नंतर तुमचे केस गळणे सुरू होऊ शकते. अश्या वेळी घाबरून जाऊ नये. तर केस गळणे हा केस वाढीच्या टप्प्यातील एक सामान्य भाग आहे.
- चौथ्या महिण्यापासून तुमचे नवीन केस वाढू लागतील व त्याचे प्रमाण ही जास्त असेल.
- सात ते बारा महिन्यानंतर तुमचे केस पूर्णपणे वाढलेले दिसतात. व तुम्ही हवा तो लूक व स्टाइल मिळवू शकता.
How Long Does the Transplanted Hair Last?
हेअर ट्रान्सप्लांट नंतर केस किती काळ टिकतात ?
मित्रांनो, साधारण एक वर्षानंतर तुम्हाला केस वाढलेले दिसतात. बऱ्याच लोकांना प्रत्यारोपित केलेले हे केस आयुष्यभर टिकू शकतात. किंवा 15 ते 20 वर्षे किंवा त्याहून ही अधिक काळ हे केस टिकू शकतात. याशिवाय केसगळती टाळण्यासाठी तुम्ही जर कोणती औषधे घेत असाल, तर तुमच्या केस प्रत्यारोपणाचे परिणाम तुमच्यासाठी जास्त काळ अनुकूल असतील.
केस प्रत्यारोपणात चूक होऊ शकते का?
हो मित्रांनो, कधी कधी खराब हेअर ट्रान्सप्लांट होऊ शकते. ही गोष्ट टाळण्यासाठी तुम्ही केस प्रत्यारोपण करणारे क्लिनिक शोधताना ते क्लिनिक परवाना धारक आणि नोंदणी कृत आहे का त्याची चौकशी करा. तसेच एक विश्वसनीय व अनुभवी सर्जन च निवडा.
हेअर ट्रान्सप्लांट करण्याचे फायदे व तोटे:
फायदे :
- मित्रांनो, केस प्रत्यारोपण म्हणजेच हेअर ट्रान्सप्लांट करण्याचा एक फायदा म्हणजे हा एक कायम स्वरूपी उपाय आहे. साधारणतः प्रक्रियेनंतर प्रत्यारोपित केलेले केस 10 ते 15 दिवसात गळायला लागतात. पण नंतर येणारे केस हे नैसर्गिक केसांइतकेच चांगले असतात.
- केस जरी प्रत्यारोपित केलेले असले तरीही पूर्ण वाढ झाल्यावर ते अगदी नॅचरल लुक देतात.
- मित्रांनो, प्रक्रियेनंतर जरी याचे काही दुष्परिणाम असले तरी देखील केस प्रत्यारोपण प्रक्रिये मध्ये कमी इजा होते आणि जोखीम ही कमी असते.
- केस प्रत्यारोपण मुले केसांसंबंधीत अनेक समस्या कमी होतात. आणि टक्कल दूर होऊन केसांची घनता वाढते.
- केस प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर व्यक्ती आपला आत्मविश्वास परत निर्माण करू शकतो.
- यसेच प्रत्यारोपित केलेले केस अगदी नैसर्गिक असतात. त्यामुळे त्यांच्या देखभालीसाठी कोणत्याही विशेष शॅम्पू वापरण्याची आवश्यकता नसते.
तोटे:
- मित्रांनो, कधी कधी केस प्रत्यारोपण झाल्यानंतर केस व्यवस्थित सेट होत नाहीत. ते पातळ होतात किंवा जास्त प्रमाणात गळू लागतात. अश्या वेळी पुन्हा टक्कल पडू शकते.
- प्रत्यारोपण योग्य पद्धतीने केले गेले नाही तर दृष्टीही जाऊ शकते. त्यामुळे अनुभवी व विश्वसनीय सर्जन कडून च ही ट्रीटमेंट करून घ्यावी.
- काही वेळा प्रत्यारोपण प्रक्रिये नंतर डोक्याला सूज येते. व ही सूज वाढल्याने त्याचा परिणाम कपाळ व डोळ्यांवर ही दिसून येतो. तुम्हाला जर असे दुष्परिणाम होत असतील तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांकडे जावे.
- केस प्रत्यारोपण झाल्यानंतर संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे त्याची खूप काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.
- हेअर ट्रान्सप्लांटमुळे केसांच्या मुळांना जास्त प्रमाणात नुकसान होते.
Who Should Not Have Hair Transplant Surgery?
हेअर ट्रान्सप्लांट कोणी करू नये?
- मित्रांनो, तुम्हाला जर कोणतीही मेडिकल ऍलर्जी असेल तर तूम्ही केस प्रत्यारोपण करू नये. आणि जर करायचेच असेल तर अनुभवी डॉक्टर चा सल्ला अवश्य घ्यावा.
- तुम्हाला जर डायबिटीज किंवा हाय ब्लड प्रेशर चा त्रास असेल तर तुम्ही केस प्रत्यारोपण करू नये. कारण डायबिटीज आणि हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांना भूल देणे धोकादायक ठरू शकते.
- ज्या लोकांना हृदयविकारचा त्रास आहे किंवा ज्यांच्या हृदयात पेसमेकर किंवा कोणतेही कृत्रिम उपकरण बसवले आहे, त्यांनी केस प्रत्यारोपण करू नये. कारण केस प्रत्यारोपण प्रक्रियेत भूल दिली जाते. आणि हृदय रोगांसाठी जास्त वेळ बेशुद्ध राहणे हानिकारक आहे. म्हणूनच हृदयरोग्यांनी केस प्रत्यारोपण करू नये.
- थोडक्यात काय तर, तुम्ही स्त्री असो वा पुरुष, प्रत्येक जण केस प्रत्यारोपण करू शकतो. पण जर तुम्ही कोणत्याही आजाराने ग्रस्त असाल किंवा तुमची प्रतिकारशक्ती कमी असेल, ऍलर्जी असेल, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी या सर्व गोष्टीं बद्दल बोलले पाहिजे. आणि मगच केस प्रत्यारोपण चा निर्णय घेतला पाहिजे.
- तसेच तुमचे वय कमी असेल तर हेअर ट्रान्सप्लांट करणे टाळावे ज्यांचे वय साधारण 25 च्या पुढे आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने हेअर ट्रान्सप्लांट करावे.
हेअर ट्रान्सप्लांट शस्रक्रिया करण्याआधी न नंतर काय खबरदारी घ्यावी?
केस प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया करण्यापूर्वी घ्यावयाची काळजी:
- मित्रांनो, तुमची जर आधीची कोणती औषधे चालू असतील तर केस प्रत्यारोपण प्रक्रियेच्या एक आठवड्या आधी त्यांना घेणे थांबवले पाहिजे.
- तुम्ही जर धूम्रपान करत असाल तर प्रत्यारोपण प्रक्रियेच्या आठवडा आधी पासून ते थांबवले पाहिजे.
- तुम्हाला जर कोणती मेडिकल ऍलर्जी, दमा, झोपेचे विकार, हाय ब्लड प्रेशर, थायरॉईड, डायबिटीज, किंवा इतर कोणताही जुना आजार असेल तर केस प्रत्यारोपणच्या आधी त्या आजार बद्दल तुमच्या डॉक्टर ला सांगा.
- केस प्रत्यारोपण करण्याआधी केस मुंडण करणे आवश्यक नाही.
- प्रत्यारोपण प्रक्रिया करण्यासाठी एखाद्या चांगल्या अनुभवी सर्जन चा विचार करावा.
केस प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिये नंतर काय खबरदारी घ्यावी?
- मित्रांनो, केस प्रत्यारोपण झाल्यानंतर तुम्ही केसांच्या कलमांची म्हणजेच हेअर ग्राफ्ट्स ची योग्य प्रकारे काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. जेणेकरून ते सुरक्षित राहू शकतील आणि त्यांचे फॉलिकल्स सामान्यपणे वाढू शकतील. तसेच प्रत्यारोपण प्रक्रिया झाल्या नंतर पहिले काही आठवडे तुम्हाला व्यायाम टाळावा लागेल.
- केस प्रत्यारोपण झाल्या नंतर सुमारे पाच दिवस केस धुणे टाळले पाहिजे. त्या नंतर डॉक्टरच्या सल्ला घेऊन केस धुवू शकता.
- तुम्हाला गरज असेल तेव्हा डॉक्टर च्या सल्ल्या नुसार वेदना कमी करणारी औषधे वापरा.
- घराबाहेर जाताना टोपी वापरा.
- केस धुतल्या नंतर केस फॅब्रिक टॉवेल ने पुसू नका. तर हवेत कोरडे होऊ द्या.
- टाळूला खाजवू नका. प्रत्यारोपण प्रक्रिया झाल्या नंतर 15 दिवस कोणतीही कठीण शारीरिक क्रिया करणे टाळावे.
- सुमारे तीन आठवड्या पर्यंत केस विंचरणे टाळावे.
- प्रदूषण असलेल्या ठिकाणी जाणे टाळा.
FAQ
हेअर ट्रान्सप्लांट ट्रिटमेंट सुरक्षित आहेत का?
मित्रांनो, केस प्रत्यारोपण ही एक सुरक्षित उपचार पद्धती मानली जाते. परंतु ती प्रशिक्षित, पात्र आणि विश्वसनीय सर्जन द्वारेच केली पाहिजे. तसे या उपचारांचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक क्षमतेवर अवलंबून असतो. काही केसेस मध्ये, व्यक्तीच्या टाळूवर किरकोळ संसर्ग होऊ शकतो. जो वेळेसोबत आणि औषध उपचारांसह दूर होण्याची शक्यता आहे.
हेअर ट्रान्सप्लांट प्रक्रियेला किती वेळ लागतो?
मित्रांनो, केस प्रत्यारोपण पूर्ण होण्यास 4-8 तासांचा कालावधी लागण्याची शक्यता असू शकते. पण जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात केस प्रत्यारोपण करण्याची आवश्यकता असेल तर तुम्हाला जास्त वेळ लागू शकतो.
एकापेक्षा जास्त वेळा हेअर ट्रान्सप्लांट प्रक्रिया करता येते का?
मित्रांनो, जोपर्यंत रुग्णाच्या डोनर साईट वर म्हणजेच डोक्याच्या साइटवर पुरेसे हेअर ग्राफ्ट आहेत तो पर्यंत आणि सर्जनला तुमच्या टाळूच्या आरोग्यात काहीही गडबड दिसत नसेल, तर तुम्ही कमीतकमी 2 ते 3 वेळा केस प्रत्यारोपण करू शकता.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण केस प्रत्यारोपण म्हणजेच हेअर ट्रान्सप्लांट या बद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आशा करतो की हा लेख व ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र-मंडळीं सोबत नक्की शेअर करा. व अश्याच नवनवीन लेख व माहिती जाणून घेण्यासाठी मराठी डायरी.com वेबसाईट ला भेट देत रहा. धन्यवाद।
Tags: Hair Transplant info in Marathi, Hair Transplant inforamtion in Marathi, Hair Transplant Cost in Marathi, Hair Transplant Loss in Marathi, Hair Transplant in Marathi, Hair Transplant Mhanje kay, Hair Transplant Kashi Keli jate, Hair Transplant Sathi Paise Kiti Lagtat, Hair Transplant fayde, Hair Transplant kelyavr Kes yetat ka, Hair Transplant Mahiti, Hair Transplant Kadhi Keli jati, Hair Transplant for Men in Marathi, Hair Transplant For Ladies in Marathi, FUE Hair Transplant Information In Marathi, FUT Hair Transplant information in Marathi