Marathi TipsPopular Post Healthआरोग्य टिप्स | Health Tips in Marathi

केसगळती लक्षणे, कारणे व घरगुती उपाय | How to Stop Hair Fall

नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखात आपण केसांविषयी माहिती जाणून घेणार आहोत. त्यात प्रामुख्याने केस गळण्याची कारणे काय आहेत, त्याची लक्षणे काय आहेत, व त्यावर उपाय काय करायचा या सर्व गोष्टींबद्दल माहिती बघणार आहोत.

How to Stop Hair Fall

मित्रांनो, पुरुष असो किंवा स्त्री प्रत्येकाच्या सौंदर्याचा एक महत्वाचा भाग म्हणजे केस. सुंदर केसांमुळे कुणाच्याही सौंदर्यात आणखीनच भर पडते. पण जर हेच केस गळायला लागले, तर समस्या बनते. आजकाल शंभर पैकी ऐंशी लोकांना केस गळतीची समस्या असतेच. केसांवरून हात किंवा कंगवा फिरवला तर लगेच हातात केस येतात. सततच्या केस गळतीमुळे पुरुषांमध्ये टक्कल पडतो तर स्रियांमध्ये केस विरळ होतात. प्रत्येकाला आपल्या बाबतीत अस होऊ नये, असे वाटत असते. मग केस गळू नयेत यासाठी वेग-वेगळे उपाय केले जातात. परंतु उपाय करण्याआधी तुम्हाला केस गळतीचे कारण माहीत असायला हवे, तरच त्यावर योग्य तो उपचार होऊ शकतो.



केस गळतीची कारणे

Causes of Hair Loss

चला तर मग केस गळतीचे कारणं काय आहेत ते जाणून घेऊ या

  • मित्रांनो, केस गळतीचे मुख्य कारण म्हणजे केस अस्वच्छ असणे. केस नियमित न धुतल्याने केसांवर धूळ बसते, केसांवरील तेलामुळे ही धूळ केसांवर चिटकुन बसते व नंतर कोंडा होतो आणि खाज यायला सुरुवात होते, आणि परिणामी केस गळायला सुरुवात होते.
  • बरेच जण केस धुतल्या वर टॉवेल ने खसाखस पुसतात. तसेच तेल लावताना ही स्काल्प (टाळू) ला बोटांनी जोरात घासायची सवय असते. यामुळे ही केस तुटू किंवा गळू शकतात.
  • मित्रांनो केस गळती चे अजून एक कारण म्हणजे योग्य आहार न घेणे अनेक वेळा विटामिन डी, विटामिन सी तसेच झिंक व आयर्नच्या कमतरतेमुळे केस गळती होऊ शकते.
  • अनुवांशिकतेमुळे, हार्मोनल चेंजस मुळे, एखाद्या मोठ्या आजारपणामुळे, किंवा तुम्ही जर खूप ताण तणाव घेत असाल तरी सुद्धा तुमचे केस गळू शकता.
  • तसेच जर तुम्ही खूप गोळ्या किंवा औषधं खात असाल तर त्याचा परिणाम केसांवर होऊन केस गळती होऊ शकते.
  • मित्रांनो, केमिकल युक्त शॅम्पू वापरल्याने किंवा अतिरिक्त हेअर प्रोडक्टस वापरल्याने किंवा सतत डाय केल्याने व हेअर ड्रायर सतत केसांवर वापरल्यास केस गळती होऊ शकते.
  • धूम्रपान केल्यास ही केस गळती होऊ शकते. कारण धूम्रपान केल्याने केसांना मिळणारे पोषण नष्ट होते व रक्तप्रवाह सुद्धा मंदावतो.
  • केस ताणून बांधल्याने व उन्हात केस मोकळे सोडल्याने देखील केस गळती होते.
  • तसेच डिलीव्हरी झाल्यानंतर व मेनोपॉज नंतर केस गळती जास्त प्रमाणात होऊ शकते.

केस गळतीची लक्षणे काय आहेत?

मित्रांनो, पुरुषांमध्ये केस गळती होण्याचे लक्षण म्हणजे त्यांच्या डोक्या वर एम आकाराचा पॅटर्न दिसायला लागतो, केस पातळ होतात आणि मागे मागे जातात. तर स्त्रियांमध्ये सगळेच केस हळू हळू पातळ व्हायला लागतात.

  • पहिली स्टेज – सर्वात पहिली स्टेज म्हणजे केस धुतल्या वर, केस विंचरताना किंवा रबर बँड काढल्या वर जास्त केस दिसतात.
  • दुसऱ्या स्टेज – दुसऱ्या स्टेज मध्ये केस घरभर पडलेले दिसतात तसेच उशीवर पडलेले दिसतात.
  • तिसऱ्या स्टेज – तिसऱ्या स्टेज मध्ये स्त्रियांमध्ये स्काल्प दिसायला लागतो, व पोनी पातळ होते. असे होत असेल तेव्हा तुम्ही समजून घ्या, आपले केस जास्तच गळायला लागलेत.

केस गळती वर उपाय काय आहेत?

How to Stop Hair Fall

  • मित्रांनो, केस चांगले ठेवण्यासाठी तसेच केस गळती होऊ नये यासाठी तुमचा आहार व जीवनशैली चांगल्या प्रकारे ठेवली पाहिजे. तुमच्या आहारात हाय प्रोटीन डाएट पाहिजे. म्हणजे तुमचे जितके वजन असेल तेवढे ग्रॅम प्रोटीन तुम्ही खाल्ले पाहिजे. उदाहरण द्यायचे झाले तर समजा तुमचे वजन 60 किलो आहे तर तुम्ही 60 ग्रॅम इतके प्रोटीन घ्यायला हवे.
  • तसेच जर डिलीव्हरी नंतर किंवा मेनोपॉझ नंतर केस गळती जास्त होऊ लागते, ती थांबवण्यासाठी एकमात्र उपास्य म्हणजे तुमचा आहार योग्य ठेवला पाहिजे.
  • केमिकल युक्त हेअर प्रॉडक्ट्स वापरू नका. तसेच हेअर ड्रायरचा कमीत कमी वापर करावा. तसेच केसांना जास्त ताणून बंधू नये.
  • मित्रांनो, केस गळती जर जास्त प्रमाणात होत असेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
  • जास्त गरम पाण्याने केस धुवू नये.
  • तसेच ओल्या केसांना रगडून पुसू नये, हळुवार पुसावे. याशिवाय केस ओले असताना ते विंचरू नये. कोरडे झाल्यावर विंचरावे.
  • नियमित व्यायाम व योगासने करा. खास करून शीर्षासन करावे. त्यामुळे केसांना रक्तपुरवठा चांगला होतो.
  • केस नेहमी स्वच्छ ठेवा. आठवड्या तून दोन वेळा तरी केस स्वच्छ धुतले पाहिजे.
  • केस गळती वर बाजारात अनेक औषधं उपलब्ध असतात, पण डॉक्टरांच्या सल्ला घेतल्याशिवाय कोणतेही औषध किंवा प्रोडक्ट वापरू नये.
  • पुन्हा-पुन्हा केसांमधून हात फिरवू नका. व तसेंच जास्त ताण तणाव घेऊ नका.
  • तसेच नियमित एक्सरसाईझ म्हणजे च व्यायाम करणे आवश्यक आहे. त्यामुळे तुमचे मेटबॉलिझम रेट व इन्सुलिन मुळे होणारी केस गळती थांबते.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज च्या या लेखातून आपण केस गळतीचे कारणे व उपाय जाणून घेतले. वरील उपाय करून तुम्ही ही तुमची होणारी केस गळती थांबू शकता. परंतु जर तुमची केस गळतीची समस्या जास्त प्रमाणात असेल तर डॉक्टरचा सल्ला अवश्य घ्यावा. तुम्हाला किंवा तुमच्या घरात किंवा मित्र मैत्रिनीना केस गळतीचा त्रास असेल तर हा लेख त्यांच्या पर्यंत नक्की पोहचवा म्हणजे शेअर करा. तसेच आशा करतो की आजचा हा लेख तुम्हाला नक्की आवडला असेल. धन्यवाद।



नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!