ग्रॅच्युटी बद्दल सविस्तर माहिती (Gratuity Information)

ग्रॅच्युटी म्हणजे काय? ती कधी व कोणाला मिळते? (सोप्या सरळ भाषेत) | What is Gratuity? Who gets & How to calculate?

नमस्कार मित्रांनो, आमच्या आज च्या या नवीन लेखात आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नेहमी प्रमाणे आज ही आम्ही तुमच्या साठी काही तरी नवीन व खूप उपयोगी माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो आज आपण ग्रॅच्युटी म्हणजे काय, ती कशी कॅल्क्युलेट करायची, ती कधी व किती मिळते, या सर्व गोष्टी बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

Gratuity Mhanje Kay ti Calculate Kashi Keli Jate

मित्रांनो, जेव्हा आपण एखादी कोणतीही नोकरी करतो तेव्हा आपल्याला त्या कंपनी कडून अनेक सुविधा मिळतात. त्यात प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच PF, मेडिकल इन्शुरन्स, डीए, वगैरे अश्या अनेक सुविधा समाविष्ट असतात. पण जेव्हा एखादा कर्मचारी आपल्या आयुष्यातील बरीचशी वर्षे त्या कंपनीला देतो, तेव्हा त्याने केलेल्या कामाचे ऍप्रेसिएशन (कृतज्ञता) म्हणून त्याला जी रक्कम देते त्याला ग्रॅच्युटी असे म्हणतात.



मित्रांनो, नोकरी करणाऱ्या प्रत्येकाला ग्रॅच्युटी ची सुविधा मिळते. आणि कोणत्याही कर्मचाऱ्यासाठी ग्रॅच्युटी हा एक महत्त्व पूर्ण निधी असतो. पण बऱ्याचदा लोकांनी ग्रॅच्युटी बद्दल ऐकलेलं तर असत. परंतू त्याबद्दल त्यांना जास्त माहिती नसते. मात्र आता काळजी करू नका, कारण या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला ग्रॅच्युटी बद्दल ची पूर्ण माहिती सांगणार आहोत. त्यामुळे आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

सर्वात पहिले ग्रॅच्युटी म्हणजे काय ते जाणून घेऊ या:-

ग्रॅच्युटी म्हणजे काय?

मित्रांनो, पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी कायदा १९७२ नुसार, जर एखाद्या कर्मचाऱ्याने एकाच कंपनीत सलग पाच वर्षे किंवा चार वर्षे, दहा महिने आणि अकरा दिवस सलग काम केले असेल आणि नंतर नोकरी सोडली, तर तो कर्मचारी ग्रॅच्युटीच्या रकमेचा हकदार असतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, ग्रॅच्युटीची रक्कम ही कर्मचाऱ्याच्या पगारातून न कापता ती पूर्ण रक्कम कंपनी स्वतः देते. सध्याच्या नियमा नुसार जर तुम्ही एखाद्या कंपनीत किमान ५ वर्षे काम केले असेल तर तुम्हाला ग्रॅच्युटीचा लाभ मिळतो. म्हणजेच तुम्ही पाच वर्षांनी कंपनी सोडल्यास तुम्हाला ग्रॅच्युइटी दिली जाईल.

ग्रॅच्युटीचे नियम व अटी

मित्रांनो, जर एखाद्या कंपनी मध्ये 10 किंवा त्या पेक्षा जास्त कर्मचारी काम करत असतील तर त्या कंपनी ला जर तिथे काम करत असलेल्या कर्मचाऱ्याने पाच वर्षे पूर्ण केली आहेत, तेव्हा ते राजीनामा देताना किंवा रिटायर झाल्यावर त्यांना ग्रॅच्युटी देणे ही आता कायद्यामध्ये तशी त्याची तरतूद केली आहे. त्यात जर त्या कर्मचाऱ्याने सलग 4 वर्षे 10 महिने व 11 दिवस काम केले असेल तर तो कर्मचारी ग्रॅच्युटी साठी पात्र असतो.

तसेच जर एखाद्या कर्मचाऱ्याला राजीनामा द्यायचा असेल आणि जर त्याने 4 वर्षे 10 महिने व 11 दिवस हा क्रायटेरिया (निकष) पूर्ण केला असेल तर कंपनीला पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी कायद्या अंतर्गत त्या कर्मचाऱ्याला ग्रॅच्युटी देणे बंधनकारक आहे.



Gratuity Calculate Kashi Karaychi

ग्रॅच्युटी ची गणना कशी केली जाते?

मित्रांनो, ग्रॅच्युटी कॅल्क्युलेट करताना तुम्हाला तुमचा मागील पगार व एकूण कामाचे वर्षे माहीत असायला हवे.

ग्रॅच्युटी फॉर्म्युला = 15 × मागील पगार (DA सह ) × कामाचे एकूण वर्षे ÷ 26

उदा. म्हणजे समजा तुमचा मागील पगार 60000 असेल आणि कामाचे एकूण वर्षे 12 आहे. तर, तुमची ग्रॅच्युटी ची रक्कम ही 15 × 60000 × 12 ÷ 26 = 4,15,385 ₹ इतकी होईल. म्हणजेच 12 वर्षानंतर तुमची ग्रॅच्युटी ची रक्कम ही 4,15,385 ₹ होईल.

ग्रॅच्युटी वर टॅक्स लावला जातो का?

मित्रांनो, आयकर कायद्याच्या कलम 10 (10) नुसार सेंट्रल, स्टेट, आणि लोकल बॉडी च्या कर्मचाऱ्यांना मिळणारी ग्रॅच्युटी ही टॅक्स फ्री आहे. आणि प्रायव्हेट कंपनीतील कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी म्हणून मिळालेली 20 लाख पर्यंत ची किंवा त्या पेक्षा कमी असलेली रक्कम ही टॅक्स फ्री आहे.

ग्रॅच्युटी चे पैसे आधी मिळू शकतात का?

मित्रांनो, पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी कायद्या अंतर्गत कर्मचाऱ्याच्या गरजे नुसार कधी पण ग्रॅच्युटी दिली जात नाही. त्यासाठी त्याला वैध कारण द्यावे लागते. जर कर्मचाऱ्याला एखादा जीवघेणा आजार झाला असेल आणि त्याच्या उपचारासाठी खूप पैसे लागत असतील. तर मेडिकल कागदपत्र पडताळणी नंतरच तो कर्मचारी ग्रॅच्युटीचा हकदार बनतो.

आणि तसा अर्ज केल्यानंतर त्याला ग्रॅच्युटीचे पैसे दिले जाऊ शकतात. तसेच, अपघात झाल्यामुळे जर कर्मचारी अपंग झाला असल्यास, तो ग्रॅच्युटीची रक्कम काढू शकतो. मात्र यासाठी कंपनीत काम करताना ५ वर्षे पूर्ण झाली पाहिजेत. अन्यथा, 5 वर्षापूर्वी आजारपणातही तुम्हाला ग्रॅच्युटीचे पैसे मिळणार नाहीत.

ग्रॅच्युटी पगारातून कापली जाते का?

मित्रांनो, ग्रॅच्युटी ही पगारातून कापली जात नाही तर ती फक्त पगाराची किंमत/ मूल्य बघून कॅल्क्युलेट केली जाते. म्हणजे ग्रॅच्युटी चे हे पैसे आपल्याला कंपनी कडूनच मिळतात.

ग्रॅच्युटी च्या नियमांमध्ये काही बदल झाले आहेत का?

मित्रांनो, कायद्याच्या नवीन तरतुदी नुसार पगाराच्या एकूण स्ट्रक्चर मध्ये बेसिक हे 50 टक्के असायला पाहिजे. मित्रांनो, पूर्वी कंपनी ठरवायची की एम्प्लॉयच्या सॅलरी स्ट्रक्चर मध्ये बेसिक किती ठेवायचे, डीए किती ठेवायचे, अलौन्सेस किती ठेवायचे. पण आता पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी मध्ये नवीन प्रॉव्हिजन नुसार एम्प्लॉय च्या सॅलरी स्ट्रक्चर मध्ये 50 टक्के बेसिक हे असलेच पाहिजे.

त्यामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा व बेनिफिट देणारा बदल आता ग्रॅच्युटी कायद्यामध्ये झाला आहे. आणि ज्या कंपन्यानी बेसिक 50 टक्के पेक्षा कमी ठेवले आहे त्यांनी सॅलरी री-स्ट्रक्चर करून कर्मचाऱ्याचे बेसिक 50 टक्के करणे हे त्यांना क्रमप्राप्त आहे.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण ग्रॅच्युटी म्हणजे काय? ती कधी व कोणाला मिळते, ती कॅल्क्युलेट कशी करायची, या सर्व गोष्टी बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा.
धन्यवाद.

FAQ

मी कंपनीत काम करून पाच वर्षे पूर्ण झाली आणि जॉब सोडून तीन महिने झाले तरीही ग्रॅच्युटी मिळाली नाही, तर काय करावे?

मित्रांनो, अश्या परिस्थितीत तुम्ही कंपनी च्या एचआर डिपार्टमेंट ला मेल पाठवून ही गोष्ट लक्षात आणून देऊ शकता. आणि जर एचआर डिपार्टमेंट ने काही रिस्पॉन्स दिला नाही तर तुम्ही पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी कायद्याखाली असलेल्या कंट्रोल ऑथोरिटी अंतर्गत असलेल्या लेबत कमिशन कडे तक्रार करू शकता. किंवा pgportal.gov.in या पोर्टल वर ऑनलाईन पद्धतीने तक्रार करू शकता. आणि तुमच्या समस्येचे निरसन करून घेवू शकता.

ग्रॅच्युटी कधी मिळते?

मित्रांनो, एखाद्या कर्मचाऱ्याने त्याच कंपनीत किमान 5 वर्षे सेवा केल्या नंतर जर नोकरी सोडली किंवा रिटायर झाल्यावर कंपनी द्वारे त्या कर्मचाऱ्याला ग्रॅच्युइटी दिली जाते.

ग्रॅच्युटी ची रक्कम पगारातून कापली जाते का?

नाही मित्रांनो, ग्रॅच्युटी ची रक्कम पगारातून कापली जात नाही.

ग्रॅच्युटीसाठी किती दिवस लागतात?

मित्रांनो,जेव्हा तुम्ही तुमची ग्रॅच्युटी ची रक्कम मिळवण्यास पात्र असता तेव्हा ती देय झाल्या पासून 30 दिवसांच्या आत तुम्हाला त्यासाठी अर्ज करण्याची परवानगी दिली जाते. तसेच, जर तुम्हाला तुमच्या सेवानिवृत्तीची किंवा निवृत्तीची तारीख माहित असेल, तर तुम्ही 30 दिवसांच्या कालावधीपूर्वी तुमच्या ग्रॅच्युटीसाठी अर्ज करू शकता.

Tags: Gratuity Mhanje Kay, Gratuity Kadhi Dili Jate, Gratuity Konali Dili Jate, Gratuity Calculation Kase Karayche, Gratuity Che Fayde Kay, Gratuity Dili Nahi Tar Kay Karayche, Gratuity Company Det Nahi, Gratuity Company Kadhi Dete, Gratuity Kiti Divas Lagata, Gratuity Sathi Kiti Divas Kamavar Asave Lagte, Gratuity Che Ganit Samjava, Grachuiti Mhanje Kay, Mala Gratuity Kadhi Milnar

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!